जोहार परकीयासी फितुरांचा जोहार __/|__

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
18 Apr 2018 - 5:06 pm

प्रेर्ना हे आणि असेच असम्ख्य आपलेच

भारत द्वेष्ट्यांची प्रार्थना

जोहार परकीयासी फितुरांचा जोहार । किती ग्वाडगे सकळ मराठीच्या पाठीवर प्रहार । सहनशील दृढ आचार । तो ऎका की जी मायबाप ॥१॥
तुमचा इचार मेकॉले देइला । तो भारतीया कसा भावला । परका जवळी, भावंड वेगळा । या विचारें बोधिलें की जी मायबाप ॥२॥
अरबी अन चिनी । सर्वांमाजीं विंग्रजी। आणिकही फुरोगामीटिचर सांगेन । सावध ऎका की जी मायबाप ॥३॥
पंचमहासत्ता र्शेजी केले शत्रु श्रेष्ठजाण । या विचारें पावलें समाधान । फितुरी परदास्य सुखसंपन्न । झाले की जी मायाबाप ॥
ऎशा देश फुको चालावे । देशीय पुनरपि नाहीं उभावे । कोनाची धरती कोन जन्माचे मायबाप, जगावे खळगीचे ऐश्वर्य । ऎक्यपण कसले, परकेप्रेम अन फितुर दास जन्मांतरी तुमीचच जी मायबाप ॥५॥
__/|__

संत चोखामेळ्याच्या चरणी एका पराभूताकडून माफी :(

रतीबाच्या कविताविराणीकरुणउपहाराचे पदार्थमटणाच्या पाककृती

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

18 Apr 2018 - 7:51 pm | सिरुसेरि

संत दामाजी असे म्हणायचे असावे . अर्थात दोन्ही संत एकाच गावचे . ( मंगळवेढा ) .

माहितगार's picture

18 Apr 2018 - 8:13 pm | माहितगार

असे काही झाले का , तपासतो पुन्हा एकदा . निदर्शनास आणण्यासाठी अनेक आभार