चालू घडामोडी - ऑगस्ट 2018
राजीव गांधींच्या काळात एन आर सी चा मसुदा ठरविण्यात आला होता , भाजप ने त्या अंतर्गत घुसखोरांचा आकडा जाहीर केला असता सगळ्या विरोधकांनी आरडा ओरड करत सभात्याग केला विशेष म्हणजे त्यात काँग्रेस सुद्धा शामिल होती , भाजप चे हे दिसून येणारे काम पण मीडिया याच कौतुक न करता त्या 40 लाख लोकांच्या वेदना छापत बसणार , या बेकायदेशीर लोकांमूळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते पण मीडिया ला त्याच्या शी घेणेदेणे काय ? या विषयांवर काँग्रेस ची अवस्था धरलसोडलचावतय अशी झालेली दिसते .
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मसुदा आज जाहीर झाला आहे. या यादीनुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना अवैध घोषित करण्यात आले आहे. कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकता सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांना अवैध घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे, ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचं नाव या यादीत आलं नाही ते लोक पुन्हा अर्ज करून आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं. दरम्यान, एनआरसीच्या या मसुद्यावर तृणमूल काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. तर आरजेडीने यावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे.
सात जिल्ह्यात कलम १४४ लागू
हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अत्यंत स्पृहणिय उपक्रम ! त्या
<strong>Biofuel Flight: जैवइंधनावर उडाले पहिले विमान</strong>
<strong>नेहरूंचे योगदान पुसण्याचा प्रयत्न करू नका!</strong>
हेच अभिप्रेत
तीन मूर्तीभवन मध्ये सध्या काय
<strong>नरेंद्र मोदींच्या हत्येचा माओवाद्यांचा कट</strong>
वृंदा करात , आणि गालावर गोड
अरुण जेटली राफाएल
All 5 human rights activists
तथाकथीत डाव्या माओवादी
मानवाधिकाराचे उल्लंघन किंवा आणिबाणीसदृश्य परिस्थिती
अशी कोल्हेकुई ऐकली नव्हती. यापैकी वरवरा राव हे माओइस्ट आहेत आणि गौतम नवलखा हे काश्मीर मध्ये मानवाधिकार हक्काचे कार्यकर्ते आहेत आणि तेथे सार्वमत घ्यायचे आग्रही आहेत.एल्गार परिषद : आरोपींचे
आश्चर्य आहे !! अजून एक ही
पवारांनी
GDP Growth rate of 8.2% for 18-19
अर्बन नक्षली मध्ये भिषण
पुरुषी व्यवस्था