Skip to main content

चालू घडामोडी - ऑगस्ट 2018

लेखक सोमनाथ खांदवे यांनी बुधवार, 01/08/2018 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
राजीव गांधींच्या काळात एन आर सी चा मसुदा ठरविण्यात आला होता , भाजप ने त्या अंतर्गत घुसखोरांचा आकडा जाहीर केला असता सगळ्या विरोधकांनी आरडा ओरड करत सभात्याग केला विशेष म्हणजे त्यात काँग्रेस सुद्धा शामिल होती , भाजप चे हे दिसून येणारे काम पण मीडिया याच कौतुक न करता त्या 40 लाख लोकांच्या वेदना छापत बसणार , या बेकायदेशीर लोकांमूळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते पण मीडिया ला त्याच्या शी घेणेदेणे काय ? या विषयांवर काँग्रेस ची अवस्था धरलसोडलचावतय अशी झालेली दिसते . आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मसुदा आज जाहीर झाला आहे. या यादीनुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना अवैध घोषित करण्यात आले आहे. कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकता सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांना अवैध घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे, ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचं नाव या यादीत आलं नाही ते लोक पुन्हा अर्ज करून आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं. दरम्यान, एनआरसीच्या या मसुद्यावर तृणमूल काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. तर आरजेडीने यावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे.  सात जिल्ह्यात कलम १४४ लागू  हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. 

वाचने 82991
प्रतिक्रिया 266

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

ही वरची टिप्पणी तुंम्ही नक्की कोणावर अाणि कोणत्या मुद्दयावर केली अाहे, ते स्पष्ट केले तर बरे होईल. मी या संपूर्ण चर्चेत फक्त नोटबदलीविषयी मत मांडले होते. इतके उपप्रतिसाद अाले अाहेत, की नक्की तुंम्ही कोणाच्या मुद्द्यावर हे बोलला अाहात समजत नाही.

In reply to by सुबोध खरे

देशाच्या न्यायालयाने अजून देशद्रोही ठरवलेले नसताना न्यायालयापेक्षा स्वतःला जास्त शहाणे समजणार्‍यांना व देशाच्या नागरिकांचा अपराध सिद्ध होईपर्यंत निर्दोष मानले जाण्याचा हक्क मारणार्‍यांनाही देशद्रोही म्हणले पाहिजे.

In reply to by नगरीनिरंजन

ननिजी, मी जिएनयु प्राध्यापकांच्या नेमक्या निसटत्या बाजूंवर सविस्तर प्रतिसाद मालिका मागे लिहिली आहेत. नेमकी भूमिका तुम्हाला शोधून वाचावी लागेल. जिएनयु काही क्षण बाजूस ठेवा. इन एनी केस जादवपूर प्रकरण सुस्पष्ट उदाहरण आहे. जादवपूर प्रकरणावर आपण तथाकथित पुरोगामी तोंड का उघडत नाही. जादवपुरच्या बाबतीत न्यायालयातून कारवाईस स्वतः कथित पुरोगाम्यांनीच पुढाकार घेऊन स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध का करत नाही. शहाबानो केस नंतर न्यायालयीन आणि राज्यघटना उत्पातमुल्य आणि मतपेटीच्या जोरावर धाब्यावर कशी काय बसवली गेली ? त्यावेळी तथाकथित पुरोगाम्यांनी आणि धर्मांधांच्या पाठीराखे स्वतःस केवळ न्यायालयांपेक्षा शहाणेपद घेतले नाही भरतीय राज्यघटनेचे हरण केले आणि जे खरोखर देशप्रेमी असतात ते राज्यघटना आणि न्यायव्यवस्थेची आपोआप बूज राखतात राज्यघटनेची फसवणूक करत नाहीत. जिथून राज्यघटनेला वाकवणार्‍या चुकीच्या मार्गांची सुरवात झाली त्या घटनात्मक उद्दीष्टांचे आधी पुर्नस्थापन करावे आणि मग प्रतिपक्षाला व्याख्याने द्यावीत. देशाच्या एकतेची आणि देशप्रेमाची अपेक्षा करणार्‍यांच्याही लेजीटीमेट अपेक्षा असतात सर्व कायद्यात राष्ट्राची एकसंघता सर्वोच्च प्राधान्याची असते ती देशप्रेमीव्यक्तींच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते हे मी वर स्पष्ट केलेच आहे. बाकी उर्वरीत शंकाना माझे आधीचे प्रतिसाद पुरेसे आहेत. अहिंसेच्या अपेक्षेबाबत माझा वेगळा पूर्ण लेख लौकरच येईल.

In reply to by सुबोध खरे

फुटीरतावाद्यांना साथ देणे, देशद्रोह्यांची भलामण करणे हे अजिबात मान्य होणार नाही. पुरोगामी म्हणवण्यासाठी असल्या हलकट लोकांची साथ देणारे लोक सुद्धा देशद्रोहीच आहेत.
आता आपण कोण? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश?? जर नसाल तर आपले शिक्के आणि प्रमाणपत्रे आपल्याजवळ ठेवा! कोणता चष्मा घालून कुठल्या प्रतिसादात फुटीरतावाद्यांना साथ देणे, देशद्रोह्यांची भलामण समर्थन दिसले ते स्पष्ट दाखवून द्या. पाल्हाळ नको उगीच! सरकारची तळी उचलायला कोणाची ना नसेल पण उठसुठ "देशातल्या इतर नागरिकांना" हलकट, देशद्रोही शिक्के मारणारे लोक सुद्धा देशद्रोही का म्हणू नयेत?(मी असली पांचटगिरी करणार नाही पण इथल्या काही आयडींना देशद्रोह कावीळ झालेली दिसतेय त्याच लायनीवर हे पण!) आपल्या आवडत्या पक्षाने फुटीरतावादाला समर्थन असणाऱ्यांसोबत "सत्तासोबत" केली तरीही ते मात्र याना चालते!

In reply to by शब्दबम्बाळ

मी एक सामान्य नागरिक आहे. ज्याने आपल्या तारुण्याची २२ वर्षे लष्करात काढलेली आहेत. काश्मीर, पूर्वांचलातील फुटीरतावाद म्हणजे काय हे मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय आणि अनुभवलंय. वरील दोन वाक्ये यात सुद्धा तुम्हाला पक्षीय दृष्टिकोन दिसतोय? ती वाक्ये द्वेषाने तुम्ही तुम्हाला म्हणालो आहे हे गृहीत धरून असे प्रतिसाद देताय. आपला दृष्टिकोन भाजप द्वेषाने किती भरलाय कि सध्या सरळ दोन ओळीतही तुम्हाला पूर्वग्रह दिसतोय? आपल्या समोर एखादा राष्ट्रध्वज जाळत असेल किंवा देशविरोधी घोषणा देत असेल तर न्यायालयाने त्याला दोषी म्हणे पर्यंत तुम्ही वाट पाहणार का? किंवा याकूब मेमनला फाशी झाली याबद्दल निषेध करणारे मेणबत्त्या जाळणारे पुरोगामी हे देशद्रोही नाहीत का? उगाच मुद्दा पुढे रेटण्यासाठी काहींच्या काही

In reply to by सुबोध खरे

काही गोष्टी स्पष्ट बोलणेच आवश्यक असते! म्हणून मी तुम्हाला धाग्यावर कोणी या गोष्टींचं समर्थन केलं आहे का स्पष्ट विचारलाय. तुमच्या प्रतिसादावरून हे दिसून येतंय कि किमान तुम्ही या धाग्यावरच्या प्रतिसादांच्या रोखाने बोलत नाही आहात. काही लोक तुमच्या खांद्यावर बंदूक ठेऊन निशाणा साधू नयेत म्हणून हे करावं लागलं. वाईट वाटल्यास माफी असावी. या धाग्यावर माहितगार नामक आयडी कोणालाही देशद्रोही ठरवू पाहत आहे. (सध्या मी रडार वरती आहे) तुम्ही दिलेल्या प्रतिसादामध्ये "फुटीरतावादी" हा शब्द आहे त्यावर इथे काहीच चर्चा झालेली नाहीये पण "देशद्रोही" हा शब्द इतका कॉमन करून टाकलाय या लोकांनी कि उद्या कोणालाही देशद्रोही ठरवून टाकतील. (जसे आत्ताच मला ठरवायचं चाललंय) तुम्ही सैन्यदलात सेवा केली आहे त्याबद्दल आदर ठेऊन देखील मी हेच म्हणेन कि "देशद्रोही" ठरवायचं अधिकार हा न्यायालयाचा आहे. तो कोणत्याही सामान्य माणसाच्या हातात बिलकुल देऊ नये आणि तशी पद्धत देखील पाडू नये.
"आपल्या समोर एखादा राष्ट्रध्वज जाळत असेल किंवा देशविरोधी घोषणा देत असेल तर न्यायालयाने त्याला दोषी म्हणे पर्यंत तुम्ही वाट पाहणार का?"
भारतात सध्या एकमेकांवरच्या संशयातून जे मॉब लीचिंग होत आहे त्यात लोकांचे जीव जात आहेत. जर उद्या कोणाबद्दल तो देशद्रोही असल्याची बातमी पसरवली गेली आणि दुर्दैवाने स्वतःला देशभक्त समजणाऱ्या लोकांकडून त्याचे काही बरे वाईट झाले आणि नंतर कळून आले कि तो देशद्रोही वगैरे नव्हता तर झालेलं नुकसान कोण आणि कसे भरून देईल? माहितगार यांनी आधीच्या धाग्यावर चक्क झुंडशाहीचे समर्थन केले आहे. आणि अशा प्रवृत्तींना माझा कायमच विरोध राहील. ते संभाषण खाली देत आहे त्यांना माझा प्रश्न होता :
याशिवाय इतकाच निषेध म्हणत असाल तर हातात झेंडा घेतलेल्या वकिलांनी आणि जमावाने "न्यायालयाबाहेर" निवाडा होण्याआधीच त्याला बदडले त्याच काय? न्यायालयाने असे प्रकार रोखायला हवेत असे सांगून पण पुन्हा मारहाण झाली त्याच काय? जेन्यू च्या विद्यार्थ्याला भाजपच्या विधायकाने भर रस्त्यात लाथा घातल्या होत्या, बंदूक असती तर गोळ्या घातल्या असत्या असेही म्हणाला होता त्याच काय? हे सगळे संविधानाला अनुसरून वाटते का? हे समाजात भीती पसरवणारे वाटत नाही?
त्यावर माहितगारांचा प्रतिसाद:
कायदा त्याची वळणे घेतो. समाजाला एखादी गोष्ट रुचली नाही तर दबाव पडणे सहाजिक आहे. खासकरून देशप्रेमासारख्या गोष्टींबाबत खेळ होतो तेव्हा समाज हातावर हात ठेवून बसेल असे कसे समजावे."
हेच बघा कि इथेच कोणीतरी "भारतचा झेंडा कोणा मुसलमान मुलाने फाडला" असा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. नंतर कळले (पुम्बा यांनी बातमीची लिंक देखील दिलेली आहे) की तो मुलगा मुसलमान नव्हताच! दुसऱ्याच कोणत्या जातीचा होता. पण हे माहित नसताना लोकांनी मुसलमानांबद्दल हेट कमेंट्स दिल्या, दुर्दैवाने दंगल वगैरे झाली असती तर कोण जबाबदार मानायचे? जर कुठे काही आक्षेपार्ह दिसले तर सामान्य माणसाने पोलिसांना कळवावे आणि जे काही पुरावे असतील ते सुपूर्त करावेत. पोलीस आणि न्यायालय तिथून पुढचे काम करेल. आणि आपण आपले काम करू शकू. मीडिया ट्रायल आणि मॉब जस्टीस पूर्णतः बंद व्हायला पाहिजे. बिहार मधल्या घडलेल्या घटनेचं वृत्तांकन पाहिलं पर्वा आणि सुन्न व्हायला झाल. तरुणांना शिक्षण, नोकरी आणि जबाबदारी असणे किती गरजेचे आहे नाही तर समाजाचे अधःपतन किती होऊ शकते ते पहा. पहिले ४-५ मिनिटच बघून नको होत...

In reply to by शब्दबम्बाळ

मीडिया ट्रायल आणि मॉब जस्टीस पूर्णतः बंद व्हायला पाहिजे. पूर्ण सहमत बाकी मेगाबायटी प्रतिसाद मी वाचतच नाही( कुणाचेही असो) तेंव्हा त्याबद्दल काही बोलणे नाही

In reply to by शब्दबम्बाळ

@ शब्दबम्बाळ आपण स्वतः माझे वाक्य अर्धवट क्वोट केलेत, सांगण्याचा मुद्दा हा की तथाकथित पुरोगामी आगीत तेल ओतण्यात परंपरावाद्यांपेक्षा अगदी पुढे असतात. वरच्या प्रतिसादातील भोजपूर बातमीचा देशप्रेम विषयक उपरोक्त चर्चेशी अन्योन्य संबंध नाही. संबंध नसलेली बातमी क्वोट करण्या इतपत आपणास अनावर होते. मी अशा अनावर होण्याचे समर्थन करत नाही, पण 'आमचे अनावर होणे इतरांच्या अनावर होण्यापेक्षा अधिक चांगले', हा तथाकथितांचा दुटप्पीपणा आहे त्या बद्दल साशंकता आहेत. जादवपूर विद्यापीठातील देशाच्या एकतेची जी थट्टा केली गेली त्या बद्दल प्रश्न उपस्थित करुनही त्याबाबत पाळले गेलेले मौन सहज दिसते. असाच प्रकार याकुब मेमनच्या फाशीचा काही अती शहाण्यांनी विरोध केला, फाशीस तत्वतः विरोध असेल तर, फाशीच्या शीक्षेचा इतर वेळी विरोध करता आला असता ना पण तो नेमका याकुब मेमनच्या बाबतीत करणे कित्पत औचित्यास धरुन होते. हे सर्व समाज बघत असतो. मग समाजाचा राग कुठेतरी अनावर होतो , हे सामाजिक राग अनावर होण्याचे समर्थन नाह, समजून घेणे आहे, हे लक्षात घ्यावे. देशप्रेमाच्या विषयाचा खेळ करण्यात काही प्राध्यापक मंडळींच्या भूमिका साशंकीत असाव्यात ह्या बाबत मी मागच्या पहिल्या चर्चेत काय विश्लेषण केले ते आपण शोधण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नसताना आउट ऑफ काँटेक्स्ट अर्धवट विधान नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे. झूंडशाहीचे समर्थन करतो असे मी कुठेही लिहिलेले नाही. ' कायदा त्याची वळणे घेतो' हे आधी लिहिलेले आहे. खासकरून देशप्रेमासारख्या गोष्टींबाबत खेळ होतो तेव्हा समाज हातावर हात ठेवून बसेल हि अपेक्षा अवाजवीच आहे - हे लिहिले म्हणजे झूंडशाहीचे समर्थन केले असा होत नाही, देशप्रेमावर सावट आले तर देशप्रेम व्यक्त करुन मोकळे होणे हा राजमार्ग आहे, हे मत त्या आणि या धाग्यात मी व्यक्त केले ते आपण लक्षात घेऊ इच्छित नाही ही आपली समस्या आहे. झेंडा प्रकाराबद्दलची माझा प्रतिसाद 'रचनात्मक सकारात्म्क मत परिवर्तन कसे करता येईल ' असा आहे. यात तुम्हाला कुठे झुंडशाही सुचवलेली दिसते का ? प्राध्यापकांच्या निसटत्या बाजूंबद्दल संताप व्यक्त केला पण सोबत गांधींसारखा अहिंसावादी आहे हे लिहिले त्याकडे आपण सोईस्कर डोळे झाक केली हि तथाकथीत पुरोगामींची समस्या आहे. देशप्रेमाचे मनमोकळे व्यक्त करायचे नाही तर टिका होणार मग नंतर स्वतःच गुंता करुन खुंतण्याला अर्थ नसतो.

In reply to by शब्दबम्बाळ

जिएनयुतील तुकडे तुकडे गँग काश्मिर बाबत काय म्हणताहेत युट्यूबवर पहा ( देशाच्या अंखंडते इतकी विरोधी भूमिका आहे की मी युट्यूब इथे जसाच्या तसा जोडणे शहाणपणाचे समजत नाही) तथाकथित प्राध्यापक निवेदीता मेनन ; तथाकथित विद्यार्थी उमर खालीद

In reply to by शब्दबम्बाळ

...आपल्या आवडत्या पक्षाने फुटीरतावादाला समर्थन असणाऱ्यांसोबत "सत्तासोबत" केली तरीही ते मात्र याना चालते!
आता आपणसुद्धा न्यायालयीन निर्णयाचा दाखला दिलेला आहे असे दिसत नाही. अगदी बरोबर फुटीरतावाद्यांबद्दलची 'सत्तासोबत' चुकत असेल तर -अशा परिस्थितीस कारणीभूत झालेल्या- फुटीरतावाद्यांचे गुरुजन आणि त्यांनी आधार घेतलेले शब्द-ग्रंथ प्रामाण्य हे ही प्रश्नांकीत व्हावयास हवे ना ? आणि हि वस्तुस्थिती पाठीशी घालणार्‍यांनाही प्रश्नचिन्हांकीत केले जावयास हवे ना ? आणि प्रश्नस्थिती या पेक्षा हाता बाहेर गेल्यावर उपस्थित करायचे की आधीच उपस्थित करणे उत्तम ? बाकी विशीष्ट बाजुच्य राजकीय समर्थनात रस नाही तरीपण जो पर्यंत देश विघटनाचे समर्थन होत नाही तो पर्यंत तात्पुरत्या राजकीय तडजोडी रास्तही असू शकतात.
....उठसुठ "देशातल्या इतर नागरिकांना" हलकट, देशद्रोही शिक्के मारणारे लोक सुद्धा देशद्रोही का म्हणू नयेत?
खर्‍यांचे लेखनात हलकट हे विशेषण 'फुटीरतावाद्यांना साथ देणे, देशद्रोह्यांची भलामण करणे ' यासाठी आलेले दिसते आणि देशद्रोह्यांची साथ देणार्‍यांना देशद्रोही म्हटले आहे. देशद्रोह्यांची साथ देणारे देशद्रोहीच असतात की अजून वेगळे काही असतात ? आणि 'देशातल्या इतर नागरीकांनी', त्यांनी असे काही म्हटलेले नसताना आपण असा जावई शोध लावू शकता, -कावीळ पांचटगिरी नेमकी कुठे होते हे लक्षात यावे म्हणून इतर वाचक आणि आपल्या स्वतःच्या सोयीसाठी नोंदवून ठेवतो.
...पाल्हाळ नको उगीच!
जोपर्यंत मिपाधोरणात बसते तो पर्यंत उत्तरांची लांबी आणि शैली सांगणारे आणि चर्चा व्यक्तिगतते नेणारे आपण कोण ? पाल्हाळ आहे की नाही वाचायचे की फाट्यावर मारायचे जो तो वाचक ठरवेल, नको म्हणणारे आपण कोण ?
आता आपण कोण? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश?? जर नसाल तर आपले शिक्के आणि प्रमाणपत्रे आपल्याजवळ ठेवा!
देशप्रेम्यांचा देशावर पहिला आधीकार असतो आणि देशद्रोहावर आक्षेप घेणे आणि देशावर वेळ आल्यास प्रसंगी प्राणांची बाजी लावणे हे देशप्रेम्यांचे कर्तव्यही असते. विसृत चोख उत्तर आधीच्या प्रतिसादांमधून दिलेले आहेच. तरीही खरे स्वतःला सामान्य नागरीक म्हणून घेतात हि त्यांच्या मनाची मोठी बाजू . आता इतर संबंधीत मुद्द्यांवर येऊ, सलमान खानच्या देशप्रेमा बाबत शंका नाही, एक उदाहरण म्हणून सलमानखान न्यायालयातून सुटून येत नाही तो पर्यंत तो आरोपी असतो, आणि सुटल्यावर .. काय ते आपल्याला माहितच असावे. खाली संविधानाच्या अवमानने बद्दल आपण लिहिले आहे आणि त्याबाबतही पोलीस चैकशी आणि कारवाई व्हावी अशी आपली किंबहूना इतरांचीही अपेक्षा असणारच, न्यायालयातून मुक्तता होई पर्यंत त्यांच्यावर होणार्‍या पोलीस कारवाईवर आक्षेप घेण्यास कारण नसावे तसे जिएनयु प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयातून निर्दोषमुक्त होई पर्यंत पोलीस कारवाईच्या नावाने शंख करण्याचे काही कारण नसावे, आणि आरोपींना आरोपी म्हणण्यासही. ज्यांच्यावर न्यायालयातून ठपका नाही त्यांची सोशल मिडिया आणि मिडीयातून बदनामी करताना तथाकथित पुरोगामी एकतर्फीपणा करतात की नाही हे चष्मेलावलेले स्विकारतील अथवा न स्विकारतील तटस्थ प्रेक्षक आणि तटस्थ विश्लेषकांना हे व्यवस्थीत दिसत असते. आता पुढच्या मुद्याकडे येऊ जि एन यु बाजूस ठेवा, पाठीशी घातल्यावर काय होते त्याचे जादवपुर प्रकरणातील कायद्याची मस्करी जिवंत उदाहरण होते, जादवपूर प्रकरणात काहीच कारवाई कशी काय झाली नाही ? कायदे कमी पडले की आमच्या देशभक्तीची प्रमाणपत्रे मागू नका म्हणणारे कमी पडले ? जादवपूर वाल्यांनी जादवपूर प्रकरणात शासकीय अथवा न्यायालयीन कारवाई करण्याचे कायदे कमी पडत असतील तर कायदे बदलण्याचे केंद्रीय भाजपा अथवा स्थानिक भाजपा कडूनही फारसे काही दिसले नाही त्यास तथाकथित पुरोगाम्यांचा भाजपा समर्थक विरोधी अवास्तव गोबेल्स प्रचार कारणीभूत ठरला नाही असे कसे म्हणावे ? जादवपुर प्रकरणात देशाची थट्टा टाळण्यात कायदे कमी पडले असतील तर संबंधीत कायद्यत सुधारणेचे समर्थन आपण करता का ?

In reply to by अनुप ढेरे

भाजप सरकार अपयशी आहे असा प्रचार किती ही काँग्रेस च्या लोकांनी केला तर मतदार त्यांना फाट्यावर मारतात हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे , शिवाय चौकट राजा रागा सारखा एक ही ' विशेष ' माणूस भाजप मध्ये नाही ही जमेची बाजू .

दोन महिन्यांपूर्वी महिलांच्या सुरक्षितता वरून कानउघाडणी करणाऱ्या वर्ल्डबँक ने आता GDP बद्दल भारताची पाठ थोपटली आहे म्हणून जनतेत संभ्रम पसरवण्या करिता काँग्रेस चे स्वपार्श्वलाल प्रवक्ते सुरजीत वाला काँग्रेस ने न केलेल्या कामगिरी बद्दल ' आमच्या काँग्रेसची च लाल ' म्हणवून घेत आहेत .

..........If one looks at the per capita income levels, India is far behind many countries whom we have beaten on the GDP growth rate. Take France for instance. India has an estimated per capita income of $7,060 while France has $43,720, some six times more than that of India. India is ranked at the 123th position when it comes to per capita income at PPP while France is in the 25th position. For the record, China, which has a population of 1.4 billion has a per capita income of $16,760. Perhaps, the governments, both UPA and NDA, are too fixated on the GDP figures and less on the broad-based economic recovery that can bring in actual changes for the common man on the ground.... संदर्भ GDP game: How to cherry-pick your.. Dinesh Unnikrishnan.
युपीए २ मध्ये कथित विकास दर अधिक असूनही कदाचित महागाईच्या बडग्याने आणि 'कॉमन'-वेल्थच्या प्रभावाने युपीएला पराभव पत्करावा लागला असे काही झाले का ठाऊक नाही . ज्यांच्या हाती नौकर्‍या नाहीत, शेती आणि उद्योग चालवण्यासाठी व्याजदर अवास्तव आहेत त्यांना या जिडीपी विवादातून कोणत्याही एका पक्षाबद्दल प्रेम उत्त्पन्न होण्याची शक्यता तुर्तास कमी असावी.

जंतर मंतर वरती संविधानाची प्रत जाळली गेली, बाबासाहेब, दलित आणि आरक्षण विरोधी नारे दिले गेले! तरीही मिपावर काहीच घडोमोडी नाहीत? इतर वेळेस देशद्रोह ठरवायला पुढे असलेले सगळेच गायब! महाराष्ट्रात ATS ने धडक कारवाई करत बॉम्ब आणि इतर शस्त्रांसहित काही संशयित लोकांना अटक केली आणि त्यांचा दहशतीचा डाव उधळून लावला, त्याबद्दल अभिनंदन करायचे राहिले बाजूला केवळ ते लोक हिंदू आहेत आणि ठराविक हिंदू संघटनांशी संबंधित आहेत म्हणून त्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला गेला! त्याच कारवाई मधून दाभोलकरांच्या खुनामधील संशयित देखील पकडला गेला आहे. सचिन अंदुरेच्या मित्राकडून ७.६५ बोअरचे पिस्तूल जप्त; या पिस्तुलानेच दाभोलकरांची हत्या? काय होणारे पुढे काय माहित अजून...

In reply to by शब्दबम्बाळ

संविधान जाळणारे माथेफिरू होते आणि त्या कर्तृत्वाच्या समर्थनार्थ संपूर्ण ब्राह्मण समाजाला ओढू पहात होते , पण ते विसरले की ब्राह्मण ला कट्टर विरोध फक्त ब्राह्मण च करू शकतो . गावोगावी भाजप कार्यकर्त्यांनी ऑन दी स्पॉट सेल्फ डिसीजन घेऊन कार्यवाही करत दलित अत्याचार , गाईंच्या वाहतूक करणाऱ्याच्या केलेल्या हत्या या गोष्टी मूळे भाजप ची प्रतिमा थोडी मळलेली होती , म्हणून 2019 मधील निवडणूक मध्ये पक्षाच्या उजळ प्रतिमे साठी ATS कारवाई मध्ये काही प्याद्यांचा बळी दिला गेला का ? . सुब्रह्मण्यम स्वामीनीं गांधी राजघरान्या वर टाकलेली नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चे केस सोडता गेल्या चार वर्षात कॉ व राकॉ ने केलेल्या भ्रष्टरचाराचे कुठलेही प्रकरण बाहेर काढले गेले नाही . देशातील बावळट जनतेने बच्चन प्रमाणे दोन्ही काँग्रेस ची गाडलेली गाठोडी बाहेर काढतील या आशेने मोदी व फडणवीसांना भरभरून मते दिली , पण गेल्या चार वर्षात एक ही गाठोडे बाहेर निघाले नाही . बाकी फक्त हिंदू धर्मावर टीका करणाऱ्या दाभोळकर व पानसरे केस माझ्या तर्फे फुल इग्नोर साईड ट्रॅक ,कारण त्यावर बोलणे म्हणजे तिकीट काढून ओ माय गॉड आणि पी के सिनेमे बघणे .

In reply to by शब्दबम्बाळ

जंतर मंतर वरती संविधानाची प्रत जाळली गेली, बाबासाहेब, दलित आणि आरक्षण विरोधी नारे दिले गेले! तरीही मिपावर काहीच घडोमोडी नाहीत? इतर वेळेस देशद्रोह ठरवायला पुढे असलेले सगळेच गायब!
कारण देशप्रेम, घटनेचा आदर, समान नागरिक वगैरे फक्त सत्ता मिळवण्यापुरतंच आहे हे उघड बोलायचं नसलं तरी बहुतेक "देशप्रेमी" मंडळींना चांगलंच माहित आहे. खरा अजेंडा वेगळा आहे आणि त्या दिशेने हळू हळू पण दमदार वाटचाल चालू आहे. मध्ययुगीन काळात जेव्हा "खरी घटना" लागू होती आणि शोषण करायचे जन्मजात अधिकार होते ते खरे अच्छे दिन! ते परत आणायला हवेत ना!

खरं म्हणजे कन्हैया ने वक्तव्य केले आहे त्याच्या अगदी उलटा अर्थ निघतो . ' आता पर्यंत कन्हया ने कित्तेक वेळा मोदींना चावण्याचा प्रयत्न केला , पण मोदींनी त्याला एकदाही प्रतिसाद न दिल्या मूळे तो पिसाळलेल्या कुत्र्या सारखा चावत सुटला आहे . नरेंद्र मोदींसंदर्भात कन्हैय्या कुमारनी दिलं चावणाऱ्या कुत्र्याचं उदाहरण Updated: Aug 23 2018 04:50 p.m. | Written by लोकसत्ता ऑनलाइन कुत्रा आपल्याला चावला तरी आपण कुत्र्याला चावत नाही असं उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदींसदर्भात विचारलेल्या प्रश्नावर कन्हैय्या कुमार यांनी दिलं आहे. मुंबई प्रेस क्लबमध्ये कन्हैय्या कुमार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांना असं विचारण्यात आलं की, "तुम्हाला लोकप्रिय करण्यामध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग असल्यामुळे त्यांना तुम्ही धन्यवाद द्याल का?". या खोचक प्रश्नाला तितकंच तिरकस उत्तर देताना कन्हैय्या कुमार यांनी ही प्रसिद्धी मिळण्यासाठी किती गमवायला लागलंय याचा दाखला दिला. अनेक धमक्या येतात, जाहीर सभांमध्ये हल्ले होतात, आवाज बंद करण्याचे प्रकार होतात, देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो असे अनेक दाखले देत ही प्रसिद्धी खडतर असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदींसंदर्भात कन्हैय्या कुमारनी दिलं चावणाऱ्या कुत्र्याचं उदाहरण https://www.loksatta.com/mumbai-news/kanhaiyya-kumar-gave-reference-of-… जाता जाता कन्हैया साठी एक सुभाषित : - मच्छर आपल्या गाडीला चावू शकतो पण आपण मच्छर च्या गाडीला चावू शकत नाही .

नमो फेब्रुवारी २०१९ पर्यंत देशातील सुमारे पन्नास पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे स्वतः उदघाटन करणार आहेत. जनता अगोदरच त्यांच्या हातवार्यांना, थापांना आणि रेकून बोलण्याच्या शैलीला कंटाळली आहे. या पन्नास कार्यक्रमांमुळे ती पूर्ती वैतागून जाऊन त्यांना बहुतेक घरी पाठविलं.

केरळ राज्यात आलेल्या भयानक पुरामुळे मनुष्यहानी व बरीच मालमत्तेची व वित्तहानी झाली आहे. केरळ सरकारच्या नविन अनुमानाप्रमाणे वित्तीय हानी २०,००० कोटीच्या घरात गेलेली आहे. केरळ राज्य सरकारच्या चुकीच्या हाताळण्यामुळे पुर परीस्थीती काबु बाहेर गेली अस केरळातले लोक बोलुन दाखवत आहे. व्यवस्थीत नियोजन न केलल्यामुळे केरळ राज्यात ईतकी वाईट परिस्थीती उत्पन्न झाली. मुळ्ळ्पेरीयार नावाच्या धरणातल्या पाण्याच्या पातळीत धोकादायक लेव्हल पर्यंत वाढ झाल्याने धरणाची झडपे उघडली, त्यामुळे पुर परीस्थीती तयार झाली. धरणाची झडपे उघडताना नागरीकांना कोणतीही धोक्याची सुचना दिली नव्हती त्यामुळे येणार्या परिस्थीतीला सामोर जाण्यास नागरीक तयार नव्हते. ह्या पुरात बरीच मनुष्य हानी झालेली आहे. पण ह्या सर्वांना राज्य सरकार व जवाबदार अधिकारी कधीच पकडले जाणार नाहीत. ह्या प्रकरणात केंद्र सरकारने केरळ राज्याला ६०० कोटी रु ची सहाय्यता घोषीत केली, भारतातल्या बर्याच राज्य सरकारांनी आपापल्या परीने सढळ हस्ते मदत घोषीत केलेली आहे. देश विदेशातल्या उद्योजकांनी, केरळ, तामिळ सिने तारकांनी सुद्धा भरघोस मदत केलेली आहे. गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारने विविध योजनांतर्गत केरळ सरकारला दिलेला निधी विना वापर पडुन आहे, त्याचा ताळेबंद केरळ सरकारकडुन केंद्र सरकारला दिलेला नाही ना , ही रक्कम केंद्र सरकरला परत करण्यात आलेली आहे. तो निधी कित्येक हजार कोटीच्या घरात आहे. पण केरळ सरकारला केंद्र सरकार कडुन आता वेगळे २०,००० कोटी हवे आहेत. यु ए ई ( दुबई ) देश ७०० कोटीची मदत देणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसने जाहीर केली . पण अशी कोणतीही घोषणा यु ए ई ( दुबई ) देशाने केलेली नसल्याचे यु ए ई च्या सरकारी प्रवक्त्याने सांगीतले आहे. मुख्यमंत्री विजयन ह्यांना ह्याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी सांगीतल की यु ए ई ( दुबई ) देश ७०० कोटीची मदत देणार अशी माहिती युएईतल्या अनिवासी व्यावसायीकाने त्यांना दिली होती. भारत सरकार गेले दोन दशक पेक्षा जास्त वेळेपासुन "कोणत्याही नैसर्गीक विपत्तीच्या परिस्थीतीत केंद्र सरकार विदेशी आर्थिक मदत स्विकारणार नाही " अस धोरण राबवत आहे. तरी सुद्धा भारत सरकार , यु ए ई ( दुबई ) देशाकडुन येणार्या ७०० कोटीची मदत केरळ सरकारला परवानगी द्यावी अशी केरळ राज्य सरकार गळ घालत होत. मुळातच यु ए ई ( दुबई ) देश ७०० कोटीची मदत देणार नसताना केरळ सरकारला कोणाकडुन ७०० कोटीची मदत अपेक्षीत होती ? पुर्ण गोष्टीची माहीती नसताना सुद्धा यु ए ई ( दुबई ) देशाकडुन येणार्या ७०० कोटीची मदत केंद्र सरकार नाकारत आहे अशी चुकीची माहीती मिडीया पसरवत होती. यु ए ई ( दुबई ) देश ७०० कोटीची मदत देणार नसल्याची नविन माहीती समोर आल्यावर केंद्र सरकारला ह्या प्रकरणात जाब विचारणार्या मिडीयाची आता दातखीळ बसलेली आहे. पुरग्रस्त राज्यात पैश्याचा अपहार कसा केला जातो ह्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/65535609.cms?utm_source=…

In reply to by डँबिस००७

गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारने विविध योजनांतर्गत केरळ सरकारला दिलेला निधी विना वापर पडुन आहे, त्याचा ताळेबंद केरळ सरकारकडुन केंद्र सरकारला दिलेला नाही ना , ही रक्कम केंद्र सरकरला परत करण्यात आलेली आहे. तो निधी कित्येक हजार कोटीच्या घरात आहे.
ह्याचा उल्लेख दिलेल्या बातमीत नाही. ह्या माहितीचा सोर्स देता येईल का?

In reply to by नगरीनिरंजन

केरळला केंद्र सरकार सापत्न वागणूक देत आहे म्हणून आम्हाला अरब अमिरातीकडून पैसे पाहिजेत. 40% of Central funds unutilised, says CAG The latest report of the Comptroller and Auditor General of India on local self-government institutions in Kerala tabled in the Assembly on Monday has revealed that ₹1,263.5 crore of the ₹3,162.96 crore available for various Central schemes during the year ending March 2016 had been unutilised. https://www.thehindu.com/news/national/kerala/40-of-central-funds-unuti…

In reply to by सुबोध खरे

तरी बरं या सर्व योजना गांधी नेहरू नावाच्या आहेत. संघ मोदी वाजपेयींच्या नावाच्या नाहीत. The unutilised funds mainly related to the Integrated Housing and Slum Development Programme (IHSDP), ₹358.02 crore, Indira Awas Yojana (IAY), ₹234.81 crore, Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission, ₹185.19 crore and the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, ₹131.57 crore.

In reply to by सुबोध खरे

अत्यंत नालायकपणा व अकार्यक्षमतेचा कळस आहे हा केरळ सरकारचा. शिवाय युएईच्या मदतीच्या बाबतीतही खोटारडेपणा उघडा पडला आहे त्यांचा. इतकी साक्षरता असलेल्या राज्यात लोकांना सरकारचा खोटारडेपणा कळायला हवा खरं तर; पण मला बिलकुल आशा नाही. साक्षरच काय उच्चविद्याविभूषित लोकही वस्तुनिष्ठपणे विचार करु शकत नाहीत हे या देशाचे दुर्दैव आहे. तुमचेच उदाहरण घ्या ना. एक डॉक्टर, लष्करी अधिकारी व जग पाहिलेली व्यक्ती असूनही मोदीचा खोटारडेपणा तुम्हाला दिसत नाही. शेवटी धर्म व जात महत्त्वाची मानून लोक आपापल्या “तारणहारांना” पाठिंबा देत राहतात; पण ह्या तारणहारांची निष्ठा नक्की कोणाप्रति आहे हे तपासण्यासाठी सतत जागरुक राहून टीकाकाराची भूमिका घेतली पाहिजे हे विसरुन जातात. दैवदुर्विलास!

In reply to by नगरीनिरंजन

इतकी साक्षरता असलेल्या राज्यात लोकांना सरकारचा खोटारडेपणा कळायला हवा खरं तर; केरळ राज्याचे आताचे मुख्यमंत्री पिणराई विजयन हे लँवलिन पॉवर केस मध्ये आरोपी आहेत !! ७०० कोटी रु भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर आरोप आहे. ही केस ७-८ वर्षांपुर्वीची आहे. तरी सुद्धा अच्चुतानंदन सारख्या स्वच्छ पुर्व मूख्यमंत्र्याला डावलुन विजयन ह्यांना मुख्यमंत्री करण्यात आल ! केरळ राज्याच्या परंपरेनुसार दर पाच वर्षांने कॉंग्रेस व कम्युनीस्ट पार्टी सत्तेत असते. कम्युनीस्ट पार्टीमुळे राज्यात एकही उद्योग आलेला नाही. ईतके वर्षे केरळमधला सुशिक्षीत मध्यपुर्वेत काम करत आहे. त्यामुळे बेरोजगारी सारखे प्रश्न तिथल्या सत्तेत असल्यांना पडत नाहीत.पण येणार्या जागतीक बदलामध्ये तिथली रोजगार भरती कमी होत आहे !! पुढे येणार्या काळात मोठे प्रश्न केरळ राज्यासमोर येणार आहेत. अंधाधुंद माईनींग, जंगल तोड, बेजवाबदार अधिकारी व अत्याधिक पाउस ह्या मुळे केरळ राज्य पुरात संपुर्ण बुडाल ! फक्त दोन जिल्हे सोडुन संपुर्ण राज्य पुरात लोटले गेलेले आहे !

In reply to by डँबिस००७

बेरोजगारीबद्दल तर सगळ्या भारतात हेच चित्र कमीअधिक स्वरुपात आहे. जे जे राज्यकर्ते बदलत्या काळाकडे दुर्लक्ष करतील त्या त्या ठिकाणी भयंकर कठीण काळ येणारच आहे. मुळात जगभर प्रोटेक्शनिजम व आत्यंतिक नॅशनलिजम यायचं यायचं कारण केवळ धर्मांधता किंवा सगळीकडे देशद्रोही वाढले अचानक हे नसून रिसोर्स टंचाई हे आहे. त्यामुळेच परदेशात नोकर्‍या मिळणे अवघड होणे, नवीन गुंतवणूक न येणे या गोष्टी होतात. २ कोटी रोजगार निर्माण करण्याची इच्छा असताना काही लाखांत रोजगार निर्माण होणे हे काय दाखवते? ह्यावर उपाय म्हणून स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे व लहान-मध्यम उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणे ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण दुर्दैवाने धर्म-जात, आपण आणि ते ह्या मुद्द्यांवरुन लोकांमध्ये भांडणं लावून काही मूठभरांची धन करण्याचे प्रकार चालू आहेत. अर्थात हे आत्ता कितीही माथेफोड करुन सांगितलं तरी समजण्याच्या मनस्थितीत कोणी नाही. ह्युमन इन्जेन्युइटी रिसोर्स टंचाईवर मात करेल ह्या आशेवर बसलेत आणि लोक. प्रत्यक्षात टोळ्या करुन स्वतःसाठी संसाधने मिळवणे हेच आणि एवढंच लोक करणार. सुरुवात मोठ्या टोळ्यांनी होईल आणि हळू हळू टोळ्या लहान होत जातील. त्यात ह्या नेसर्गिक आपत्तींचे खापर केवळ स्थानिक भ्रष्टाचारावर फोडले जातेय. पण क्लायमेट चेंजबद्दल कोणी बोलत नाहीय. मोदींचा विश्वास नाही क्लायमेट चेंजवर; पण भारताला त्याची झळ बसणार की नाही ते त्यावर ठरत नाही. इतर राज्यांमधे सगळं व्यवस्थित आहे असंही नाही. उत्तराखंडातल्या पुरावेळी दिसलंच. पण ह्या सगळ्याचा शांत डोक्याने विचार करता येईल अशी परिस्थितीच ठेवलेली नाही. फूट पाडून टोळीयुद्ध आधीच सुरु करण्याचे प्रयत्न जोरात सुरु झालेत.

In reply to by सुबोध खरे

खरे साहेब बुलेटप्रूफ जॅकेट घालून बसा !!!!!! तीर सुटले आहेत . टॅक्सपेयर च्या पैशातून शिक्षण, आरक्षण घेतले पण म्हणतात ना ' पादऱ्याला पावट्या चा आधार ' अशी गत झाली आहे मोदी विरोधकांची . कितीही उच्च शिक्षण घेतले तरी सामाजिक जबाबदारी मुक्त वागणूक ज्याच्या अंगी भिनलेली असते आशा व्यक्ती अक्कल ना बक्कल , अन गावभर नक्कल करत फिरत असतात.

देशद्रोही कोण हा प्रश्न असेल तर अफझल गुरुच्या फाशीच्या विरोधात मोर्चा काढणारे , तसेच नंतर त्याला फाशी दिली म्हणून त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्कृतीक कार्यक्रम आयोजित करणारे, तसेच याकूब मेमन साठी मध्यरात्री कोर्ट उघडायला लावणारे हे तर नक्कीच देशद्रोही आहेत. अफझल गुरु, याकूब मेमन यांनी भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणले याबद्दल कोणाला काही शंका आहे का? असल्यास स्पष्टपणे सांगावे. नसेल तर मग भारताच्या विरुद्ध दहशतवादी कारवाया करणाऱ्या या लोकांचा एवढा पुळका असणाऱ्यांना देशद्रोही का म्हणू नये? आणि मग हाच न्याय पुढे लावून जनेवि किंवा AMU मधल्या तथाकथित विद्यार्थी पुढाऱ्यांना गरीब बिच्चारे म्हणून त्यांचे गोडवे गाणाऱ्यांना काय म्हणावे? आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण रहात असलेल्या एरियात केवळ भुकेपोटी चोरी केली म्हणून चोर शिक्का बसलेल्या लोकांसोबत नाव जोडले जाऊ नये याची काळजी करणाऱ्या लोकांना या देशद्रोह्यांची काळजी करणाऱ्यांसोबत जोडले जायला काहीच वाटत नाही?

याकुब मेमन च्या समर्थकांचे , बाटला हाऊस मध्ये आतेरिकी मेला म्हणून रात्रभर न झोपणाऱ्या म्याडम चे , डोकलम मध्ये चिनी सैन्यची भाजप वाटाघाटी करून परतावत असताना चिनी राजदूता ची गुपचूप भेट घेणाऱ्या चौकट रागा चे , पाकिस्तान मध्ये जाऊन भाजप ला सत्तेतून दूर करण्यासाठी भीक मागणारा मणिशंकर चे , उपराष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्या नंतर मुस्लिम खतरे में असे बोलणारा व काँग्रेस चे नेते आणि पाकिस्तानी राजदूत ची एकत्र पार्टी ठेवणारा हमीद अन्सारी चे देशप्रेम आम्हाला दिसलेच नाही हो !!!!!!!!!! का यांच्या देशप्रेमाची व्याख्या उच्चपातळीवरची आहे ? वर उल्लेख केलेले सगळे देशप्रेमी पाकिस्तान किंवा अरबी देशात असे देशप्रेम दाखवू शकले असते का ? का भारतात विचारस्वातंत्र्य आहे म्हणून राष्ट्रध्वज जाळायचा , तुकडे होंगे हजार म्हणायचे आणि त्यांच्या समर्थकांनी मात्र निषेध न करता ' हे पाहायला न्यायालय आहे ' मर्दुमकी करायची ? आर्थिक , सामाजिक , राजकीय फायदा करून घेण्यासाठी सद्सद्विवेक बुद्धी गहाण ठेवून काय फायदा ?

एका धाग्यात कुमार केतकर यांचे आकंठ प्रेमात गुणगान केले होते, त्यांच्यासाठी खुशखबर. निस्पृह, तटस्थ आणि साक्षेपी केतकर यांचा आता कॉंग्रेसचे लोकसभा जाहीरनामा समितीत समावेश केला आहे. कुबेरांना राज्यसभेचे डोहाळे लागले असतीलच त्यांना या बातमीने आनंद वाटला असेल. संपूर्ण बातमी आजचा मटा मध्ये वाचकांची पत्रेवाला नाखु

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चांगली बातमी. दोन्ही बाजूंनी चष्माबदल होतोय ही चांगली गोष्ट आहे. एनपीएसाठी परत राजन यांच्याशी सल्लामसलत करणे हेही स्तुत्यच आहे व शिवाय रुपया पडला तरी काही होत नाही हे भारतीयांना कळले हाही चांगला चष्माबदल आहे. करंट अकाऊंट डेफिसिट नियंत्रित ठेवा असा सल्ला देण्यापूर्वी फिस्कल अकाऊंट मॅनेजमेंटची स्तुती करुन राजन यांनी चांगली प्रथा पाडली आहे. शर्करावगुंठीत औषध चांगल्या प्रकारे स्विकारलं जातं.

रघुराम राजन यांनी चष्मा /पार्टी बदलेली दिसतेय , चक्क श्री मोदीजींच कौतुक ? कमाल आहे ? ज्यांना सहन होत नाही त्यांनी बर्नाॅलची सोय स्वतःच करावी !!

In reply to by डँबिस००७

सांगतो त्यामागे संघाचा हात आहे तशी प्रथाच आहे मिपावर प्रत्येक गोष्टीचा संघाशी संबंध जोडण्याची. अडाणी ओंडके नाखु

कै. श्री अटल बिहारी यांच्या मृृत्यु नंतर काढलेल्या व्हिडीओत त्यांना श्रद्धांजली देण्याऐवजी हीन दर्ज्याची टिका केलेली आहे !! आता पर्यंत दुआ बद्दल असलेला थोडा आदर ही गळुन पडला !! श्रद्धांजली देताना मृृत व्यक्ती बद्दल संवेदनशील असण्याचा संकेत मोडुन जग प्रसिद्ध अटजी बद्दल ईतक्या खोट्या गोष्टी सांगीतल्यात ! बाबरी सारख्या अनेक गोष्टींचा तसेच पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या मृृत्युबद्दलही अटलजींनाच दोषी ठरवलय ! https://youtu.be/R_uTryBkUh4 हाच माणुस करुणानिधीनां श्रद्धांजली देताना मात्र त्यांच्या कार्याबद्दल सांगताना थकत नव्हता !! खरच मा श्री मोदीजींना विरोधी पक्षाचीच नव्हे तर अश्या विकल्या गेलेल्या मिडीया ला वठणीवर आणायच आहे !! मिडीया व डावे भारतातील जनतेला दिशाभुल करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत !! ह्या प्रकारावर आपला काय विचार आहे !!

Raksha Bandhan 2018: रक्षाबंधनानिमित्त बहिणींना शौचालय भेट रक्षाबंधननिमित्त रविवारी जिल्ह्यात एकूण २४०० शौचालये भावांनी बहिणींना भेट दिली आहेत. बेळगाव जिल्ह्यात गरजूंना शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर. रामचंद्रन यांनी ठेवले होते. ज्या घरी शौचालये नाहीत त्या घरी शौचालय बांधण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात रविवारी सुमारे २४०० शौचालये बहिणींना भेट स्वरूपात मिळाली आहेत. विशेष म्हणजे आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही अनेक भावांनी पदरमोड करून बहिणीला शौचालयाची ओवाळणी दिली आहे. या अनोख्या भेटीने भारावलेल्या बहिणींनी शौचालयासमोरच भावाला राखी बांधून औक्षण केले. इतर वेळी सहसा न दिसणारे हे चित्र रविवारी बेळगाव जिल्ह्यात पहायला मिळाले. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/on-the-occasion-of-r…

In reply to by डँबिस००७

देश बदल रहा है !! स्वच्छ हो रहा है !! देशात अशी लाट आणण्याच सर्व श्रेय फक्त श्री मोदीजींनाच जात आहे ! त्यामुळेच २०१९ पुर्वी देशात ५ लाख शौचालय बांधुन पुर्ण होतील !! Over 6 crore toilets built across rural India under Swachh Bharat Mission http://www.uniindia.com/over-6-crore-toilets-built-across-rural-india-u… देशात ६ कोटी शौचालय बांधुन झालेली असताना, हिंदु पेपर Not one toilet built under Swachh Bharat Mission अश्या मथळ्या खाली बातमी देतो की दिल्ली शहरात स्वच्छ भारत मिशनच्या खाली एकही शौचालय बांधुन झालेल नाही. भारतातील मिडीया किती खालच्या पातळीवर गेलेले आहेत ह्याचाच एक पुरावा आहे.

In reply to by डँबिस००७

@डँबिस००७ Not a single toilet was constructed in the national capital since the inception of the Swachh Bharat Mission two-and-half years ago, with funds to the tune of Rs 40.31 crore for this purpose lying 'idle', the CAG said on Tuesday. According to a report by the Comptroller and Auditor General (CAG) tabled in the Delhi Assembly, the AAP-led city government did not allocate the Mission funds to implementing agencies as per their requirements. उघड्यावर शौचास बसणे हे सार्वजनिक आरोग्यास हानिकारक आहे असे केवळ श्री मोदी म्हणाले म्हणून रस्त्यावर टमरेल घेऊन बसणारी माणसं तेथे सरकार चालवत आहेत. दोष त्यांना द्या येथे तरी माध्यमांचा दोष दिसत नाही.

In reply to by डँबिस००७

अत्यंत स्पृहणिय उपक्रम ! त्या सर्व भावांचे आणि डॉ. आर. रामचंद्रन यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच ठरेल !

Biofuel Flight: जैवइंधनावर उडाले पहिले विमान नागरी हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात भारतानं आज ऐतिहासिक भरारी घेतली. जैवइंधनाच्या जोरावर भारतातील पहिल्या विमानानं आज यशस्वी उड्डाण करण्यात आलं. या यशामुळं जैवइंधनावर विमान उड्डाणाची यशस्वी चाचणी घेणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या गटात भारताला स्थान मिळालं आहे. स्पाइसजेटच्या 'क्यू ४००' या विमानात जैवइंधन भरून डेहराडून ते दिल्ली अशी चाचणी घेण्यात आली. डीजीसीए व स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांसह एकूण २० जणांनी या विमानातून प्रवास केला. तब्बल २५ मिनिटे हे विमान आकाशात होतं. आजच्या उड्डाणासाठी विमानात वापरण्यात आलेल्या इंधनापैकी २५ टक्के जैवइंधन होतं, अशी माहिती 'स्पाइसजेट'नं दिली आहे. जैवइंधनाच्या वापरामुळं कार्बनचं उत्सर्जन कमी होतं. शिवाय, सध्याच्या इंधनाच्या (एटीएफ) तुलनेत ते कमी लागतं,' असा दावा कंपनीनं केला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमनं जेट्रोफाच्या बियांपासून या इंधनाची निर्मिती केली आहे. आतापर्यंत कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांनी जैवइंधनावर आधारित विमानाचं उड्डाण केलं आहे. मात्र, विकसनशील देशांमध्ये अशी चाचणी घेणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. जगातील पहिल्या जैवइंधन विमानानं या वर्षी सुरुवातीलाच लॉस एंजलिस ते मेलबर्न असं उड्डाण केलं होतं.

तीन मूर्ती स्मारकाबाबत मनमोहन सिंग यांचे मोदींना पत्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीतील नेहरू स्मृती संग्रहालय आणि वाचनालय (एनएमएमएल) आणि तीन मूर्ती स्मारक यांच्यात केल्या जाणाऱ्या प्रस्तावित बदलांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या वास्तूंमध्ये बदल करून नेहरूंचे योगदान पुसून टाकण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे. दिल्लीतील तीन मूर्ती संकुलात आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे स्मारक आणि संग्रहालय उभे करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. त्या पाश्र्वभूमीवर सिंग यांनी मोदी यांना पत्र लिहिले आहे. या प्रकल्पातून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वारसा आणि योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका सिंग यांनी केली. पत्रामध्ये सिंग यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, वाजपेयी यांनी नेहरूंच्या निधनानंतर संसदेत केलेल्या भाषणात नेहरूंबद्दल गौरवोद्गार काढले होते. नेहरूंसारख्या उत्तुंग आणि महान व्यक्तिमत्त्वाचे तीन मूर्ती भवनात पुन्हा वास्तव्य होऊ शकणार नाही, असे वाजपेयींनी म्हटले होते. सध्याचे सरकार मात्र नेहरूंचा अमीट वारसा पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. नेहरू हे केवळ काँग्रेसचे नव्हते तर ते संपूर्ण देशाचे होते. तीन मूर्ती स्मारक आहे तसे जतन केल्याने आपण वारसा आणि इतिहासाचा आदर करणार आहोत, असे सिंग यांनी पत्रात म्हटले आहे. दिल्लीतील तीन मूर्ती संकुलात आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे स्मारक आणि संग्रहालय उभे करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध करावा हे काही कळले नाही !! काँग्रेसने देशावर ६५ वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केले. याचा अर्थ ह्यांचेच जास्तीत जास्त पंत प्रधान होऊन गेले तरीही केंद्र सरकारच्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध करावा म्हणजे किती पराकोटीची व्यक्ती पुजा काँग्रेसवाले करत आहेत !!

In reply to by डँबिस००७

दिल्लीतील तीन मूर्ती संकुलात आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे स्मारक आणि संग्रहालय उभे करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे
साहजिकच आहे,तीन मूर्ती म्हणजे नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी इतकेच असा अर्थ लावून घेतला आहे!!! हे चुकीचे आहे हे मनमोहन मनोमन वाटत असूनही काहीच उपाय नाही. याव्यतिरिक्त इतर काही कांग्रेसी पंतप्रधान होते असा दावा करु नये (तशी त्या पक्षाच्या नोंदवहीत नोंद नाही) खुलाशी नाखु वाचकांची पत्रेवाला

तीन मूर्तीभवन मध्ये सध्या काय आहे ? काँग्रेस का विरोध करत आहे ? त्याबद्दल जरा स्पष्ट करून सांगा ना म्हणजे आम्ही पण काँग्रेस ला चार शिव्या ( मनात ) हासडू .

नरेंद्र मोदींच्या हत्येचा माओवाद्यांचा कट: पुणे पोलिसांचं देशभरात अटकसत्र पाच राज्यांमध्ये पुणे पोलिसांनी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अनेक ठिकाणी छापे मारले आहेत. पी वरावर राव, गौतम नवलखा, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, अनू भारद्वाज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करण्याचा माओवाद्यांचा कट होता असा दावा करण्यात येत आहे. कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असून त्याच्याशी संबंधित या अटका आहेत. पुण्यामधून वरावर रावना अटक केल्यानंतर त्यांच्या हैदराबाद येथील घरावरही छापा मारण्यात आला. नवलखाना दिल्लीतून अटक करण्यात आली व साकेत कोर्टात हजर करण्यात आले. त्यांचा तांबा महाराष्ट्र पोलिसांकडे देण्यात येणार आहे. पोलिसांनी नवलखा यांच्या घरातून बॅग, लॅपटॉप व काही कादगपत्रं जप्त केली आहेत. मानवाधिवकारकार्यकर्त्या वकिल सुधा भारद्वाज यांना फरीदाबादमधून अटक करण्यात आली व महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना स्थानिक न्यायालयासमोर हजर केले. भारद्वाज यांच्या बदरपूर येथील घरावरही छापा मारण्यात आला. त्यांची मुलगी अनू हिलाबी पोलिलांनी ताब्यात घेतले आहे. अरूण परेराना पुण्यातून अटक करण्यात आली असून परेरा यांनी आपण निष्पाप असल्याचा दावा केला आहे. आपण काही खटल्यांमध्ये सरकारविरोधी काम केल्याने अटक केल्याचा त्यांचा दावा आहे. आपली अटक म्हणजे मानवाधिकारांचं उल्लंघन असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

All 5 human rights activists to be kept under house arrest till next hearing: SC कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी एल्गार परिषदेवर ठपका ठेवण्यात आला होता. यासंदर्भात तपासामध्ये एल्गार परिषदेशी संबंधित कार्यकर्त्यांचे व बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे लागेबांधे असल्याचे पोलिसांना आढळले होते. या प्रकरणी पोलिसांनी काल देशभरात विविध ठिकाणी कारवाई करत नक्षलींशी संबंध असल्याचा ठपका ठेवत पाच जणांना अटक केली होती. यामध्ये वरवरा राव, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा व वर्नन गोन्सालवीस या पाच जणांचा समावेश होता. या पाचही जणांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. हे पाचही जण ५ सप्टेंबरपर्यंत नजर कैदेत राहतील असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे तथाकथीत डाव्या माओवादी संघटनांच्या लोकांना अटक सुरु झाल्या पासुन देशात " केंद्र सरकारने " ईमरजेंसीच लागु केली आहे व ह्या संघटनेवर अत्याचार होत आहे अशी हाकाटी पेटवायला सुरुवात झालेली आहे. अटक झालेले लोक विचारवंत , बुद्धी जीवी आहेत असा त्या लोकांचा दावा आहे.

In reply to by डँबिस००७

तथाकथीत डाव्या माओवादी संघटनांच्या लोकांना अटक सुरु झाल्या पासुन देशात " केंद्र सरकारने " ईमरजेंसीच लागु केली आहे व ह्या संघटनेवर अत्याचार होत आहे अशी हाकाटी पेटवायला सुरुवात झालेली आहे. अटक झालेले लोक विचारवंत , बुद्धी जीवी आहेत असा त्या लोकांचा दावा आहे. ते सर्व ठीक आहे परंतु याच लोकांना काँग्रेच्या कार्यकाळात पण बऱ्याच वेळेस अटक झाली होती तेंव्हा

मानवाधिकाराचे उल्लंघन किंवा आणिबाणीसदृश्य परिस्थिती

अशी कोल्हेकुई ऐकली नव्हती. यापैकी वरवरा राव हे माओइस्ट आहेत आणि गौतम नवलखा हे काश्मीर मध्ये मानवाधिकार हक्काचे कार्यकर्ते आहेत आणि तेथे सार्वमत घ्यायचे आग्रही आहेत.

एल्गार परिषद : आरोपींचे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध – पुणे पोलीस नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्यांचे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान पुणे पोलिसांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सीपीआय माओवादीकडून एल्गार परिषदेला पैशांचा पुरवठा करण्यात आला असून परिषदेमार्फत जनतेला भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही सांगितलं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवरा राव यांना 5 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून यावेळी पेन ड्राईव्ह, कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत विविध पुरावे हाती लागले असून तपासात ई-मेल्स, पत्र असे भक्कम पुरावे हाती लागले आहेत. एल्गार परिषदेच्या आडून शासनाविरोधात जनतेला भडकवण्याचे नियोजन होते याचेही पुरावे हाती आले आहेत असं पोलिसांनी सांगितलं. यावेळी पोलिसांनी आरोपी वरवर राव नेपाळमधून शस्त्र विकत घ्यायचा अशी माहिती दिली आहे. हाती आलेल्या इलेक्ट्रिक पुराव्यांची पाहणी केली असता प्रतीबंधित सीपीआय-माओवादी संघटनेने व्यूहरचना आणि रणनीतीचा भाग म्हणून भारतात कायद्याने प्रस्थापित केलेली राज्यव्यवस्था उलथून टाकण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय युनायटेड फ्रंटच्या माध्यमातून विविध कारवाया करण्याचा कट रचला आहे. अशा प्रकारचे संघटन तयार करण्याचा ठराव सीपीआय माओवादीच्या ईस्टर्न रिजनल ब्यूरोच्या बैठकीत संमत झाला आहे, आणि त्याबद्दल पुरावा उपलब्ध आहे अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली. ईस्टर्न रिजनल ब्यूरो सीपीआय माओवादीचा एक भूमिगत गट आहे. याच कटाचा भाग म्हणून महाराष्ट्रात एक फ्रंट तयार करण्याच्या दृष्टीने पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती असंही पोलिसांनी सांगितलं आहे. सीपीआय माओवादीने रचलेल्या कटात सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवरा राव यांचा स्पष्ट सहभाग असल्याचा ठोस पुरावा उपलब्ध असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सीपीआय माओवादीच्या सदस्यांकडून बेकायदेशीर कृत्यांकरिता निधी जमवणे, शहरी भागातील विद्यार्थ्यांना, तरुणांना भडकावणे, शस्त्र जमवणे याबद्दलचा पुरावा उपलब्ध झाला आहे. या कटात वरिष्ठ सदस्यांचाचा सहभाग असल्याचंही निदर्शनास आलं असल्याचं सांगण्यात आलं आहे. तपासादरम्यान सीपीआय माओवादी, त्यांचे वरिष्ठ सदस्य आणि हिंसाचार करणाऱ्या प्रतिबंधित संघटनांचं संबंध असल्याचं समोर आलं आहे. राजकीय व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी विविध संघटना त्यांचे पदाधिकारी तसंच सर्वोच्च राजकीय पदाधिकाऱ्यांवर हल्ले करुन घातपात करण्याचा कट सीपीआय माओवादीने रचल्याचंही समोर आल्याचं सांगण्यात आलं आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान २८ तारखेला नऊ ठिकाणी छापे टाकण्यात आले. मुंबई, ठाणे, फरिदाबाद, नवी दिल्ली, हैदराबाद आणि रांची या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. यावेळी हार्ड डिस्क, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, मोबाइल, सीम कार्ड तसंच गुन्ह्याशी आऱोपींचा संबंध असल्याचं स्पष्ट दर्शवणारी कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. तपासात आरोपींविरोधात भक्कम पुरावे हाती लागल्यानेच त्यांना अटक करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

In reply to by डँबिस००७

आश्चर्य आहे !! अजून एक ही पुरोगामी कोकलात आला नाही . अटक केलेल्या पाच अर्बन टेररिस्ट पैकी तीन जणांना काँग्रेस सरकारने अटक करून , कोर्टात केस चालवून न्यायाधीशांनी 4 वर्षांची शिक्षा ठोठावली होती . अरुण फेरिरा (2007) 4 वर्ष वेरणोन गोंसलवीस (2007) 4 वर्षे गौतम नवलाखा (2011 ) 5 वर्ष

अर्बन नक्षली मध्ये भिषण शांतता पसरलेली आहे !! रफाल विमान खरेदी प्रकरणात राहुल गांधींनी आपल्याच पायावर कुर्हाड मारुन घेतली आहे !!

पिराताई,
अग्गो बाई! पुरुषांनी उभं केलं म्हणायचं का हे सगळं?! ग्रेट्च!
गेले कित्येक सहस्रके पुरुषांनी स्त्रियांवर पिढ्यानुपिढ्या अन्याय केल्याचं म्हंटलं जातं. खरंखोटं माहित नाही. पण जर खरं धरलं तर ही सर्वच व्यवस्था बहुधा पुरुषांनी उत्पन्न केलेली असावी असा निष्कर्ष निघतो. आ.न., -गा.पै.