Skip to main content

चालू घडामोडी - ऑगस्ट 2018

लेखक सोमनाथ खांदवे यांनी बुधवार, 01/08/2018 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
राजीव गांधींच्या काळात एन आर सी चा मसुदा ठरविण्यात आला होता , भाजप ने त्या अंतर्गत घुसखोरांचा आकडा जाहीर केला असता सगळ्या विरोधकांनी आरडा ओरड करत सभात्याग केला विशेष म्हणजे त्यात काँग्रेस सुद्धा शामिल होती , भाजप चे हे दिसून येणारे काम पण मीडिया याच कौतुक न करता त्या 40 लाख लोकांच्या वेदना छापत बसणार , या बेकायदेशीर लोकांमूळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते पण मीडिया ला त्याच्या शी घेणेदेणे काय ? या विषयांवर काँग्रेस ची अवस्था धरलसोडलचावतय अशी झालेली दिसते . आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मसुदा आज जाहीर झाला आहे. या यादीनुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना अवैध घोषित करण्यात आले आहे. कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकता सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांना अवैध घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे, ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचं नाव या यादीत आलं नाही ते लोक पुन्हा अर्ज करून आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं. दरम्यान, एनआरसीच्या या मसुद्यावर तृणमूल काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. तर आरजेडीने यावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे.  सात जिल्ह्यात कलम १४४ लागू  हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. 

वाचने 82991
प्रतिक्रिया 266

प्रतिक्रिया

केल्याने भाजप नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकाला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना रात्री अटक करण्यात आली आहे. सय्यद मतीन यांच्याविरोधात जातीय तेढ निर्माण करणे आणि दंगल घडविण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे मतीन याला मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक प्रमोद राठोड, राज वानखेडे आणि विजय आवताडे यांच्याविरोधातदेखील सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? शिवसेनचे राजू वैद्य यांनी 'भारतरत्न' अटलजींचा श्रद्धांजली प्रस्ताव मांडला. मात्र सय्यद मतीन यांनी या प्रस्तावाला विरोध केला. यानंतर संतापलेले नगरसेवक प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे हे मतीन यांच्यावर धावून गेले. यापुढे जाऊन त्यांनी मतीन यांना बेदम मारहाण करुन सभागृहाबाहेर बाहेर काढलं. तसंच सय्यद मतीनला कायमस्वरुपी निलंबित करावं, अशी मागणीही या नगरसेवकांनी केली आहे. सय्यद मतीन यांना मारहाणीनंतर संतप्त झालेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोरील भाजप संघटना मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड केली. तोडफोड केल्याप्रकरणी नगरसेवकासह एमआयएमच्या 100 कार्यकर्त्यांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही पक्षाची भूमिका नाही : इम्तियाज जलील श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावाला विरोध करणं ही एमआयएमची भूमिका नाही, ते सय्यद मतीन यांचं वैयक्तिक मत होतं, असं स्पष्टीकरण एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिलं. एमआयएम या नगरसेवकाच्या पाठीमागे उभं राहणार नसून याला समर्थन देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

विनाकारण वाद उत्पन्न करून रस्त्यावर नंगानाच करणाऱ्या समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना असंच बदडल पाहिजे . ममता , मायावती आणि सोनिया सोडून , पाकिस्तान च्या इम्रान ने सुद्धा भारतातील विरोधी नेत्यांप्रमाणे वाजपेयींच्या निधनानंतर सदभावनेने प्रतिक्रिया दिल्या , आणि ही बांडगुळाची जात विखारी प्रतिक्रिया देण्याची हिंमत करतेच कशी ?

In reply to by माहितगार

सहिष्णुते च्या चांगुलपणा मूळे पूर्वी किती राजे मेले ? किती राजघराणी तैमुर च्या वंशजांनी क्रूरपणे बुडवली याची मोजदाद आहे का ? यांचा धार्मिक विखार कधीच कमी होऊ शकत नाही . आपल्या देशाच्या पायातील साखळदंड आहे ही जमात . जगाच्या पाठीवर मला एक ही मुस्लिम देश आठवत नाही की ज्याने विज्ञानाची कास धरून प्रगती केली . मुस्लिम बहुल देशात धार्मिक कट्टरते मूळे सतत यादवीसुदृश परिस्थितीती असते . मला वाटतंय सतराव्या शतकात अमेरिके ने ब्रिटिश विरोधात दीर्घकालीन स्वातंत्र्ययुद्ध करून विजय मिळवला , आणि त्यावेळी आपल्या भारतात पेशवे व इतर हिंदू राजे आपापल्या परीने मोगला विरुद्ध लढत होते . तीच अमेरिका आता सर्व शक्तिमान झाली आहे आणि आपण अजून सुद्धा पाकिस्तान व पाकिस्तान चे भारतातील समर्थक यांच्या बरोबर दोन हात करण्यात वेळ घालवत आहे .

In reply to by ट्रम्प

तुम्ही तुमच्या मते असलेल्या समस्या - नेहमीची ऐकीवातील एक बाजू- सांगत आहात, आपणास अभिप्रेत सोल्यूशन्स काय आहेत ?

In reply to by माहितगार

स्वित्झर्लंड ला राहायला जाणें =) = ) आपल्या पूर्वजांना सोल्युशन नाही सापडले तर मी पामर सांगणारा कोण ?

पुरुषांची गरज नाही म्हणणाऱया प्रियांका चोप्राने लग्न केलं म्हणे. तेही चक्क एका पुरुषाशी. तो अमेरिकन, गोरा, सिंगर व पैसेवाला आहे हे सगळे निव्वळ योगायोग. तसा मला भारतीय फेमिनिस्टांबद्दल प्रचंड आदर आहे. भारतीय ब्राऊन पुरुष आहेतच मेले पर्व्हर्ट आणि आंबटशौकीन. खुशाल पिग्गीचॉप्स बघायला जातात पैसे देऊन.

In reply to by नगरीनिरंजन

इतका त्रास करून घ्यायची काय गरज आहे बरं? मी प्रत्यक्ष इंटरव्ह्यू नाही पाहिलाय तिचा, पण वाचलंय ह्या बद्दल. त्यात ती हे वाक्य अशा अर्थाने म्हणतेय की एक मूल जन्माला घालणं सोडलं तर तिला बाकी कशालाही पुरुषाची गरज नाही म्हणजेच त्याच्यावर अवलंबून राहायची गरज नाही. (माझ्यासाठी हिरे मी स्वतः विकत घेऊ शकते अशाही अर्थाचे एक वाक्य ती बोलली आहे ) तिने ट्विटर वरही हेच क्लिअर केलं होतं. Need आणि Want ह्यातला फरक आहे तो. आता पैशाचं म्हणाल तर ती स्वतः रग्गड कमावते. रोल्स रॉईस बाळगून आहे म्हणतात बुवा. तिला काय गरज पैशासाठी लग्न करायची? आणि असेल तिचा होणारा नवरा गोरा, अमेरिकन वगैरे. त्यावरून भारतीय पुरुषांवर घसरायची तरी काय गरज..? तिने कधी तसं काही स्टेटमेंट केलंय का? तिचा चॉईस आहे ना भाऊ..

In reply to by पिलीयन रायडर

आता पैशाचं म्हणाल तर ती स्वतः रग्गड कमावते. रोल्स रॉईस बाळगून आहे म्हणतात बुवा.
ह्यासाठीच पुरुषांची गरज ना बाईसाहेबांना. पुरुष नसते तर ह्यांचे हिंदी चित्रपटात येऊन कंबर हलवण्याचे काय प्रयोजन होते? दुटप्पीपणा पाहिला की आम्हाला त्रास होतोच; त्याला इलाज नाही. पुरुषांनी उभारलेल्या सिव्हिलायझेशनच्या जीवावर बाष्कळ बडबड करु नये इतकंच.

In reply to by नगरीनिरंजन

अग्गो बाई! पुरुषांनी उभं केलं म्हणायचं का हे सगळं?! ग्रेट्च! गेट वेल सून हो काका!

In reply to by पिलीयन रायडर

आम्ही वेल आणि फाईनच आहोत हो मावशी. पुरुषांनी निर्मिलेल्या व्यवस्थेत साधा मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी संघर्ष करुन शंभर-दीडशे वर्षं उलटली नसताना आता असा माज करणार्‍या निर्बुद्धांची तुम्ही बाजू का घेताय ते मात्र कळत नाहीय. असो. तुम्हीच जरा स्वतःच्या तब्ब्येतीची काळजी घ्या. आहे ते टिकवायला सुद्धा उदारमतवादी पुरुषांची गरज आहेच. पुरुषांची गरज नाही म्हणणार्‍या नटमोगर्‍यांसाठी शेकडो वर्षे संघर्ष करणार्‍या स्त्रियांचा अपमान नका करु कमीतकमी.

सानिया मिर्झाने पाकिस्तान्याशी लग्न केले तेव्हा मुस्लिम का होईना परंतु एखादा भारतीय मिळाला नाही का? असा भारतीय संस्क्रुती रक्षक अभिजन शंख करत होते. आता हा मात्र गोरा आणि हामेरिकन आहे म्हणून निषेधाचा एकही सूर उमटला नसेल काय?

इम्रान खानच्या नवीन मंत्रिमंडळातील २१ पैकी १२ मंत्री पुर्वाश्रमीच्या जनरल परवेझ मुशर्रफच्या मंत्रिमंडळात होते . म्हणजे लष्कराचा वाढता प्रभाव लक्षात यावा. खैबर पख्तुन्वाचा इम्रान खानच्या पक्षाचा मंत्री आता डिफेन्स मिनीस्टर आहे. म्हणजे लष्कर आणि अतिरेकी धार्जीण्य यात समन्वय साधणे सोपे जाईल असा आडाखा असावा. शिरीन मझाली नावाची स्त्री जी अण्वस्त्रे टाकण्यासाठी कोणती शहरे निवडावीत कोणती निवडू नयेत याची उघड चर्चा करते तीला मानवाधिकार मंत्रालय दिले आहे . आणि २००८ च्या मुंबई हल्ल्याच्यावेळी चा परराष्ट्रमंत्री पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री म्हणून कारभार बघणार आहे. इम्रान खान ने मंत्रिमंडळ कर्मठ निवडलेले आहे पण त्याची महत्वाची परिक्षा आर्थीक आघाडीवर परकीय चलनाची गंगाजळी सांभाळताना येणार आहे. येत्या तीन महिन्यात इम्रान खानला बारा अब्ज डॉलरची गरज भासणार आहे. आय एम एफ आणि आमेरीका धार्जीण्य न दाखवण्याच्या इम्रानच्या वल्गना चालू आहेत . सौदी आणि अथवा चीन ने आउट ऑफ द वे जाऊन लार्ज फंडींग पुरवले तर इम्रान सांभाळला जाऊ शकेल नाही तर नाही म्हणूनही आमेरीकेच्या तालावर नाचावे लागेल . आर्थीक आघाडीवर काय होते ते येत्या दोन तीन महिन्यात कळेल. प्रत्यक्षात संघर्ष शक्यता मर्यादीत राहीली तरी काश्मिरी अतिरेकी कारवाया आणि सिमेवर संघर्ष मुद्दाम वाढवण्याची रणनिती पाकीस्तानकडून होऊन इम्रान - मोदी वादाने मिडीया बातम्यांनी भरु शकतो. यात पाकिस्तान आणि इम्रानला नित्याप्रमाणे पाश्चात्य देश आणि आमेरीकेवर अप्रत्यक्ष दबाव वाढवण्याची आर्थीक फायदे पदरात पाडून घेण्याची संधी मिळेल, तर दुसर्‍या बाजूस असे काही झाले तर मोदींना २०१९च्या निवडणूकात कणखर नेतृत्व हवे म्हणून भारतीय मतदाता पुन्हा मोदीकडे वळणे असे काही होऊ शकतेच. तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे

In reply to by प्रसाद_१९८२

सकारात्मक आणि रचनात्मक असे समस्या निदानही सुचवावे. जसे की स्वातंत्र्य दिनाच्या निमीत्ताने चित्रकला स्पर्धा इत्यादी, नाही तर असे काही पाहून फ्रस्ट्रेट व्हायला होईल.

In reply to by प्रसाद_१९८२

मिपावर असले व्हिडीओ टाकू नका हो , ती बांडगूळा ची जात सुधारणार नाही पण इथं आपण शिव्या पोस्ट करू शकत नसल्या मूळे टेम्पर आऊट होणार . त्या पेक्षा आपण त्याला मिपामान्य शाप देऊ . " हे शासन कुणी भंग करील तेहाची माय गाढवे झबिजे " https://googleweblight.com/i?u=https://www.misalpav.com/node/21649&hl=e…

In reply to by मार्मिक गोडसे

उलट आधीजे माहिती होतं तेच पुन्हा शिक्कामोर्तब झालय. २००७ पर्यंत तुफानी रेट होताच. जी वाजपेयी सरकारची कृपा होती. NDA-1ने जबरदस्त अर्थव्यवस्था UPA-1च्या ताब्यात दिली. ८+%ने वाढणारी आणि महागाईचा दर ४% असणारी. सुरुवातीला याचा फायदा झाला ते दिस्तं आहेच. २००७ पर्यत. त्यानंतर UPA ने दिवे लावलेले दिसत आहेत. UPA ने NDA-2 ला १०% महागाई आणि फक्त ५/६%ने वाढणारी अर्थव्यवस्था दिली. याखेरीच बुडीत कर्जांचा डोंगर देखील दिला. आता पुन्हा अर्थव्यवस्था ८% ने वाढत आहे आणि महागाई ४% आहे. ही मोदी सरकारची अचिव्हमेंट आहे.

In reply to by अनुप ढेरे

८+%ने वाढणारी आणि महागाईचा दर ४% असणारी. सुरुवातीला याचा फायदा झाला ते दिस्तं आहेच. २००७ पर्यत. त्यानंतर UPA ने दिवे लावलेले दिसत आहेत. २००८ ची जागतिक मंदी आणि खनिज तेलाचे आकाशाला भिडलेले दर ह्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला, परंतू त्याही परिस्थितीत GDP फार घसरला नाही ह्याचे श्रेय UPA 2 ला दिले पाहिजे.

In reply to by मार्मिक गोडसे

कारणं द्यायची काहीतरी उगाच. उलट २०१३ ला भारत फ्रॅजाईल फाईव्ह या गटात टाकला गेलेला. ममो सरकारमुळे. सरकारी बॅंकांची लूट, एअर इंडिया, बिएसेनेल्ची लुट, नैसर्गिक संसाधनांची लूट, बॅड लोन्स, १४% स्पर्शुन आलेली महागई हे पासॉने केलं मन्मोहन सरकारने. त्यांना मिळालं काय, पुढे दिलं काय... इथे उलट मोदीनी लागोपाठा २०१४ आणि २०१५ असे दुष्काळ असुन देखील महागई नियंत्रणात ठेवली. लागोपाठ दोन राष्ट्रीय दुष्काळ हे अत्यंत दुर्मिळ असतं. काँगी भगत तेल-तेल असेच ढोल बडवत असतात. "आम्ही माती खाल्ली ती तेला मुळे. मोदींनी अर्थव्यवस्था चांगली ठेवली ती तेलामुळे" एवढच ढोलकं! वाजपेयी सरकारने दिलेली उत्तम अर्थव्यवस्था मातीत घातली/विकुन खाल्ली.

In reply to by अनुप ढेरे

मोदींनी अर्थव्यवस्था चांगली ठेवली ती तेलामुळे" एवढच ढोलकं! चांगली बिंगली काही ठेवली नाही, बिनडोक नोटबंदी आणि GST सारखे हेकटपणे निर्णय घेवून सरासरी GDP ग्रोथ UPA पेक्षा कमीच ठेवली.

In reply to by मार्मिक गोडसे

गोडसे साहेब ह्याच धाग्यावर जरा आधी शोधून पहा भाजपा प्रेमींना अर्थशास्त्राच्या मुद्यावर थंडक ठेवण्यासाठी मीच सांगितले त्यांचे ट्रोलींग पण सहन केले. एकमेकांची धोबी पछाड डाव उलटणे आपापसात असते हो ! GDP देशाचा असतो तो कमी झाला असेल तर सरकारवर कठोर टिका करा , काँग्रेस भाजपाला एकमेकांची धोबी पछाड नक्कीच करु द्यात . " भारताचा GDP कमी झाला अरे वा ! भाजपाची धोबी पछाड " , केव्हा एकदा भारताचा GDP कमी होतो म्हणून वाट पहात होतो का आपण ? तसे नक्कीच नसावे असा विश्वास आहे म्हणून म्हटले.

भाजपाची धोबी पछाड " , केव्हा एकदा भारताचा GDP कमी होतो म्हणून वाट पहात होतो का आपण ? वाट नक्कीच बघत नाही, फ़क्त चुकीचे दावे करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करू नये.

म्हणजे मोदी सरकारच्या अपयशाला ते स्वतःच जबाबदार आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला?

In reply to by मार्मिक गोडसे

सरकार अपयशी आहे हा प्रचार फक्त काँगि लोक करत आहेत. उलट जी अर्थव्यवस्था मिळाली होती ती आता बरीच सशक्त आहे.

In reply to by अनुप ढेरे

उलट जी अर्थव्यवस्था मिळाली होती ती आता बरीच सशक्त आहे. बीजेपी सरकारने मागील चार वर्षात नक्की असं काय केलंय अर्थव्यवस्था सशक्तीकरणासाठी?

In reply to by मार्मिक गोडसे

- नैसर्गिक संसाधनांचा कंपलसरी लीलाव - GST (प्लीज ही सोमिया सरकारची आय्डिआ होती म्हणू नका. ही कल्पना वाजपेयी सरकारच्या काळातली आहे. हा कायदा आणायला सर्व राज्य एकत्र आणणं गरजेचं होतं. त्यासाठी राजकीय भांडवल लागतं. ते मोदींनी मिळ्वलं आणि ही सुधारणा आणली.) - प्रत्यक्ष कर संकलनात वाढ ( GST आणि मेबी नोटबंदीमुळे) - तेलाच्या प्रॉडक्टवरची सबसीडी कमी. डिझेल वर शून्य सबसीडी आणि केरेसीनची कमी. - सरकारी खर्चात कपात - महागईचा दर १२ वरून ४ वर - लागोपाठ दोन दुष्काळ असुनदेखील अन्न महागई १५ वरुन ४ वर. - बँकाच्या बुडीत कर्जासाठी आर्बिआय ला पावर. - बुडीत कर्ज सोडवायला दिवाळखोरी कायदा. (या कायद्यांतर्गत भुषण स्टीलच्या ५०००० कोटी कर्जापैकी ४००००कोटी वसुल. इतर मोठ्या १२ बुडीत कर्ज केसेस निवारणात आहेत.) - महागई नियंत्रणाचं टार्गेट आणि अधिकार आर्बिआयकडे

In reply to by अनुप ढेरे

वा! स्पिनमास्टर! नोटबंदीमुळे जवळ जवळ २% जीडीपीचे नुकसान झाले ते नजरअंदाज करुन त्या तुलनेत क्षुल्लक असलेल्या करसंकलनाकडे बोट दाखवायचं. शिवाय जीएसटी काँग्रेस आणू पाहात असताना बीजेपीने "संसद चालू न देणे हा विरोधकांचा हक्क आहे" असं म्हणून जीएसटी येऊ दिला नाही. म्हणजे जीएसटी आणण्यास उशीर झाल्याने देशाचे नुकसान झाले त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन श्रेय लाटायचे. लिलाव न केल्याने झालेले नुकसान हा घोटाळा असेल तर उशीर केल्याने झालेले नुकसानही घोटाळाच मानला पाहिजे. तेलावरची सबसिडी कमी करण्याची प्रक्रिया युपीएच्या काळापासूनच चालू आहे. बीजेपीने सुरुवात केली असं काही नाही. उलट आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती गगनाला भिडलेल्या असताना पेट्रोल महाग झालं म्हणून ममोंना दोषी ठरवून बोंब ठोकण्यात प्रधानसेवक आघाडीवर होते. तेच स्वतःच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी असताना टॅक्स कमी न करुन वर डेफिसिट मॅनेजमेंट चांगली केल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली. सरकारी खर्चात कपात केली असेल पण त्याच बरोबर उच्चशिक्षणावरच्या खर्चाचे बजेट कट केले. आरोग्यसेवांवरच्या खर्चाचे बजेट कमी केले. काँग्रेसच्याच रोजगार योजना पुढे चालू ठेऊन त्याचेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. लागोपाठ दोन दुष्काळांचे कौतुक सांगणार्‍यांनी २००८ मध्ये प्रचंड मोठे आर्थिक संकट असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेला बर्‍यापैकी इन्शुलेट करणार्‍या अर्थशास्त्रींचे आभार मानायला विसरु नये. शिवाय हा दुष्काळ संपत असतानाच नोटबंदी करुन लोकांचे कंबरडे मोडले त्याबद्दल तर चकार शब्द काढत नाहीत. एनपीएच्या बाबतीत रघुराम राजन जेव्हा कडक पावले उचलत होते तेव्हा त्यांना विरोध केला. एका पीएसयुची मालकी दुसर्‍या पीएसयुला विकून ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचे प्रकार केले. व्याजदरातून इन्फ्लेशन नियंत्रणाचे अधिकार आरबीआयकडेच असतात, ते आत्ता दिले असे नाही. उलट गुरुस्वामी सारख्या धर्मांध स्यूडोइकॉनॉमिस्टाला बोर्डावर बसवून त्रास द्यायची सोय करुन ठेवलीय. बाकी सगळी ग्रोथ जॉबलेस आहे हे तर स्पष्ट असताना भजी तळा वगैरे सल्ले देऊन प्रधानसेवकांनी आपली समज दाखवून दिली आहेच. आश्चर्य फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की चांगलं शिकले सवरलेले लोक आतून इतके धर्मांध आहेत की काहीही करुन ह्या सरकारचं समर्थन करताहेत; हे सरकार सरळसरळ धर्माचं राजकारण करतंय हे दिसत असूनही. ह्या राजकारणाने इनोव्हेशन न होणे, नव्या कंपन्या व संधी न येणे यामुळे अर्थव्यवस्थेचे जे नुकसान होतेय त्याची तर गणनाच नाही. अनेक श्रीमंत लोक देश सोडून चाललेत. काँग्रेसबद्दल प्रेम नाही; पण त्यांना नावं ठेऊन सत्ता हस्तगत केलेल्यांनी त्यांच्यापेक्षा चांगलं असावं इतकी किमान अपेक्षाही पूर्ण होत नाहीय.

In reply to by नगरीनिरंजन

काहीही! एकतर जिएस्टी वाजपेयी सरकारची कल्पना होती. त्याचं श्रेय सोनिया सरकारने लाटायचा प्रयत्न केला. ---
तेलावरची सबसिडी कमी करण्याची प्रक्रिया युपीएच्या काळापासूनच चालू आहे.
निखालस खोटं! ही प्रक्रिया वाजपेयींनी सुरु केलेली जी यांनी स्लो केली.
२००८ मध्ये प्रचंड मोठे आर्थिक संकट असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेला बर्‍यापैकी इन्शुलेट करणार्‍या अर्थशास्त्रींचे आभार मानायला विसरु नये.
वर एक म्हणतायत की २००८च्या संकटामुळे महागई वाढली आणि ग्रोथ कमी झाली. नक्की काये? इन्शुलेट झाली का नाही अर्थव्यवस्था.
एनपीएच्या बाबतीत रघुराम राजन जेव्हा कडक पावले उचलत होते तेव्हा त्यांना विरोध केला.
हे कुठे दिसलं तुम्हाला? उलट २०१४/१५ पासुन भसाभस खरे एन्पिए बाहेर यायला लागले. आधी कसे काय नाही आले. राजन २०१३मध्ये गव्हरनर झाले. त्याअधी अर्थसल्लागार होते. असं काय २०१४मदध्ये की खरे एन्पिए बाहेर आले?
व्याजदरातून इन्फ्लेशन नियंत्रणाचे अधिकार आरबीआयकडेच असतात, ते आत्ता दिले असे नाही.
पुन्हा चूक. मनिटरी पॉलिसी कमीटी आणि त्याला दिलेलं इन्फ्लेशन टर्गेटिंग हे २०१५ का २०१६ चं आहे.

In reply to by अनुप ढेरे

जर जीएसटी वाजपेयींची कल्पना होती तर निव्वळ सोनियाने श्रेय घेऊ नये म्हणून भाजपने व मोदींनी त्याला विरोध केला काँग्रेसच्या काळात? वा! काय राष्ट्रवाद आहे! वा! हेच लॉजिक आधारला लावलं तर काय दिसतं? आधारविरुद्ध छाती बडवणारे प्रधानसेवक आता जिकडेतिकडे आधार लिंक करा म्हणताहेत. शिवाय हेतू हा सांगितला जातोय की सरकारी योजनांचे लाभधारक ओळखता यावेत म्हणून व सत्पात्री दान देता यावे म्हणून ते आवश्यक आहे. मग जे लोक सरकारी योजनांचा लाभ घेत नाहीत त्यांची बँक खाती व फोन नंबर आधारला जोडायचे काय कारण? मॉनेटरी नियंत्रण हे नेहमीच सेंट्रल बँकेचं काम असतं. २०१५-१६ मध्ये त्याची कमिटी केली गेली पूर्वी अशी कमिटी नव्हती इतकंच. अशी कमिटी करण्याचा हेतूही गुलदस्त्यात आहे. राजन यांनी बँकांची बॅलन्स शीट स्वच्छ करायचा तगादा लावला होता. https://indianexpress.com/article/business/banking-and-finance/npa-clean-up-should-have-started-much-earlier-rajan-2937015/ As with inflation, it was the duty of the central bank to press for bank clean-up earlier, when few among the public support the central bank’s activism,” he said, addressing the 10th Statistics Day conference at the RBI headquarters here. He also said the lenders were initially reluctant to implement the clean-up which started from December 2015 with RBI identifying 150 largest accounts which were facing problems in servicing their debt obligations. “Fortunately, after an initial reluctance, banks have entered the spirit of the clean-up and some have gone beyond what was demanded of them,” he said, adding that it was “easy to ignore” the problem of loan losses hoping that it goes २००८ च्याक्रायसिसमुळे वाढ कमी झाली हे खरेच पण ती तुलनात्मकरित्या. म्हणजे ते संकट नसते तर आणखी वाढ झाली असती. कोणत्याही परिस्थितीत ह्या सरकारपेक्षा सरासरी वाढ युपीएच्या काळात चांगली होती हे तर सरकारी संस्थेनेच सांगितलंय.

In reply to by नगरीनिरंजन

@ नगरीनिरंजन
...काँग्रेसबद्दल प्रेम नाही; पण त्यांना नावं ठेऊन सत्ता हस्तगत केलेल्यांनी त्यांच्यापेक्षा चांगलं असावं....
जनतेच्या अपेक्षा कितपत पूर्ण होताहेत आणि नाही याचे परिमाण नॅशनल सँपल सर्वेक्षण टाईप सर्वेक्षणांमधून यावयास हवे, आर्थीक आकडेवारी एक घटक असतो, तर मिडीया क्रिएटेड परसेप्शन सर्वस्वी वेगळा घटक असतो. आणि अनेक एकत्रित परिणामातून निवडणूकीचे निकाल येतात ते २०१९ मध्ये काय येतील ते काळाच्या ओघात दिसेल. व्यक्तिगत स्तरावर अपेक्षा पूर्ण होताहेत अथवा नाही हे सब्जेक्टीव्ह गणित असावे. पण आपल्या उपरोक्त वाक्यातील अपेक्षेत गैर काही नसावे हेही खरे.
...अनेक श्रीमंत लोक देश सोडून चाललेत....
इथे नेमके काय अपेक्षीत आहे ? हा केवळ परसेप्शनवर अवलंबून न रहाता फॅक्ट बेस्ड विसृत चर्चेचा भाग असावा आणि इतर सदस्यांनी या विषयावर नगरीनिरंजन यांच्याशी मोदी समर्थकांनी अवश्य चर्चा करावी.
...ह्या राजकारणाने इनोव्हेशन न होणे, नव्या कंपन्या व संधी न येणे यामुळे अर्थव्यवस्थेचे जे नुकसान होतेय त्याची तर गणनाच नाही. ...
हे विरोधकांचे आपोझीट गोबेल्स प्रचाराचे टेक्नीक नाही ना अशी प्रथमदर्शनी शंका वाटते. नव्या कंपन्या सुरु करण्यात काँग्रेस काळात नव्हती अशी नेमकी कोणती व्यवधाने मोदी काळात वाढली आहेत ? व्यवसाय मैत्रीपूर्णतेत सुधारणा हे मोदींचे लक्ष्य होते असे ऐकुन होतो ते किती प्रत्यक्षात आले ते सर्वेक्षणे आणि आकडेवारीने तपासले जावयास हवे ऑफ हँड कॉमेंटला काय अर्थ आहे ? मोदींच्या राष्ट्रवादी राजकारणाने टेक्नॉलॉजी क्षेत्रातील इनोव्हेशन कशी थांबू शकतात ? ऊलट आय आयटी च्या सीट वाढवणे आय आयटी झालेल्यांना ग्रामीण अभियांत्रीकी महाविद्यालयात शिकवण्यसाठी पाठवणे अशी पावले उचलताना मोदी सरकार दिसते आहे. उदा. द्वितीय महायुद्धकालीन जर्मनीचा मी समर्थक नाही -सांगण्याचा मुद्दा आवळा आणि भोपळ्याची मोट बांधण्याबद्दलच्या साशंकतेचा आहे- जिथ पर्यंत तंत्रज्ञान विकास आणि औद्योगीक उत्पादन वाढ या गोष्टी आहेत त्यांचा राष्ट्रवादी राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध असतोच असे नाही.
आश्चर्य फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की चांगलं शिकले सवरलेले लोक आतून इतके धर्मांध आहेत की काहीही करुन ह्या सरकारचं समर्थन करताहेत; हे सरकार सरळसरळ धर्माचं राजकारण करतंय हे दिसत असूनही.
धर्म आणि राजसत्ता यांची फारकत असावी याचा तात्विक समर्थक आहे. पण तटस्थ विश्लॅषक म्हणून बघताना या विषयात काही गोष्टी जाणवतात आधीच्या आणि राज्यसरकारातील आताच्याही काही तथाकथीत सेक्युलर सरकारांनी स्वतःसुद्धा लांगुलचालनवादी धर्मीय आणि जातीय राजकारणाचे आधार घेतल्याच्या परिणामातूनच परंपरावादी राजकारणास संधी मिळाली. आपल्या मिपाच्या ताज्या घडामोडी धाग्यावर कुणितरी येऊन मुस्लिम लीगची भलावण करते, मिपावरचे सेक्युलर मुस्लिम लीग शब्दातच धर्मीय राजकारण आहे हे लक्षात न घेता अशा भलावणीची बाजू घेतात यातून नेमक्या कोणत्या सेक्युलॅरीझमचे चित्र उभे रहाते आणि अशा तथाकथित सेक्युलॅरीझम वर परंपरावाद्यांना विश्वास का आणि कसा वाटेल ? आणि ज्यांना असा विश्वास वाटत नाही ते शिकले सवरलेले आहेत हे तुम्हीच सांगताय. जो पर्यंत सेक्युलरांचा तथाकथितपणा आणि लांगुलचालन लोप पावणार नाही, तथाकथित धर्म निरपेक्षतेत सापेक्षतेची भेसळ असेल तोपर्यंत खर्‍या शिकल्या सवरलेल्यांचा विश्वास उडणे स्वाभाविक असावे. आता उडालेला विश्वास वापस संपादन करण्यासाठी विरोधी पक्ष काय करत आहेत तर आम्ही सुद्धा बहुसंख्यीय धर्मीय राजकारण करु शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न . म्हणजे आक्षेपार्ह लांगुलचालनवादी कृती न थांबवता दुसर्‍याही बाजूचे लांगुलचालन याला सेक्युलॅरीझम म्हणतात ? हि तुमच्या (म्हणजे राजकारण्यांच्या ) सेक्युलॅरीझमची व्याख्या आणि कमिटमेंट आहे ? राजकारणी माणूस धर्मीय नैतिकतेने शुद्ध असावा ही म.गांधीकृत व्याख्या राजकारणात धर्मीय उत्पातमुल्य आणि मतपेटीमुल्यापुढे वाकते तेव्हा तेव्हा हा सेक्युलरांचा वैचारीक घोटाळा चालू झालेला असतो.
...नोटबंदी...
अंमलबजावणीत त्रुटी असणे आणि एखादे तत्व चुकणे यात फरक असावा . नोटबंदी अर्थशात्रीय तत्वांवर अगदीच चुकीची नसावी हे नोटबंदीत पर्सनली सफर होऊनही मांडावे वाटते. जेव्हा ग्रोथरेट वाढतात तेव्हा ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना महागाईची झळ बसत नसते पण ज्यांच्याकडे पैसा पोहोचलेला नाही त्यांना ती झळ बसत असते म्हणूनच ग्रोथरेट असूनही विरोधीपक्ष सत्तेत येऊ शकतो आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्यची जबाबदारी असलेल्या सरकारने त्या दिशेने पाऊले उचलण्याचे धारीष्ट्य दाखवले ह्याचे अमंलबजावणीतील त्रुटी स्विकारुनही अशा धारीष्ट्याचे स्वतःचे महत्व असावे. अर्थात इतरांची राजकीय कारणांनी मते वेगळी असू शकतात. बाकी प्रतिसादातील टिका कुठे कुठे योग्य ही असू शकेल. उर्वरीत टिकेस स्विकारायचे कि प्रतिवाद हे भाजपा आणि मोदी समर्थक बघतील.

In reply to by माहितगार

ह्ये काय, राजकारनात इतकं सम्तोल लिवायचं नसतं. आप्ल्या साईटचं खरं डोंगराइत्कं वाढ्वून आनि नाय काय गावलं तर खोटंनाटं लईच रंगवून सांगायचं अस्त नव्हं का ?! आप्ला ईजय व्हयाला हवा. सत्यबित्य सग्ला साला अंधश्रद्धा. आनी जो कोनी खोटं दनकून सांग्तो त्येलाच हाल्ली शेक्युलर आनि काय ते- हां ईचारवंत- म्हंत्यात नव्हं का ? ;) =))

In reply to by गब्रिएल

खरय अस सगळ चालू असताना, सळसळून उठणे आणि देशप्रेमाच्या आणाभाका पुनःश्च घेऊन देशासाठी त्याग करण्यास सदैव तयार टेवणार्‍या मनांची मशागत ज्यांनी ज्यांनी म्हणून केली त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे वाटते.

In reply to by गब्रिएल

एखाद्या प्रतिसादाला उपप्रतिसाद मिळाला तरी संपादन करण्याची सोय फक्त "काहींना"च आहे. "ग्रब्रिएल" त्या मोजक्या काहींपैकी दिसतात!!!

In reply to by सुनील

एखाद्या प्रतिसादाला उपप्रतिसाद मिळाला तरी संपादन करण्याची सोय फक्त "काहींना"च आहे. खरंय, ठराविक लोकांनाच ही सोय का दिली असावी?

In reply to by मार्मिक गोडसे

आपली नेमकी समस्या लक्षात आली नाही. प्रतिसादातील उणीवेसाठी प्रतिसाद संपादीत करुन हवा असेल तर संपादकांना विनंती करण्याची सुविधा उपलब्ध असते असे वाटते.

In reply to by माहितगार

वाटते ,की आहे? ह्याला काही कालमर्यादेचे बंधन आहे का? काही जण आपल्या एकाच प्रतिसादात अनेकवेळा बदल करतात, नवीन बदल समजण्यासाठी संपूर्ण प्रतिसाद वाचवा लागतो, जेथे जेथे बदल केलं तिथे बोल्ड मध्ये लिहिले तर नवीन बदल सहज समजून येईल.

In reply to by मार्मिक गोडसे

प्रतिसादातील उणीवेसाठी प्रतिसाद संपादीत करुन हवा असेल तर संपादकांना विनंती करण्याची सुविधा उपलब्ध असते असे वाटते. +१ मजकूरातील चुकीचे व्याकरण, अर्थात गडबड होईल असे टंकन, इत्यादीत सुधारणा करण्यासाठी कोणीही विनंती करू शकतो.

In reply to by माहितगार

चर्चा ससंदर्भ व मुद्देसूद असावी हा आग्रह स्तुत्य आहे. पण वरती ढेरेसाहेब ठासून म्हणतात की सेंट्रल बँकेला इन्फ्लेशन कन्ट्रोलचे अधिकारच२०१४५-१६ ला ”दिले” तर काय बोलणार अशा लोकांसमोर? आधी बहुतेक रिझर्व बँकेचं काम फक्त नोटा छापण्याचं असावं. पलीकडच्या साईटवर गब्बरसिंग साहेब जेव्हा इन्फ्लेशन नियंत्रण फक्त सेंट्रल बँकेचीच जबाबदारी आहे म्हणतात तिथे हे वाद घालत नाहीत. तसंही विधा आणि संदर्भ देऊन मतपरिवर्तन होत नाही असा अनुभव आहे. मुळात लोकशाहीत लोकांनी सरकारचे टीकाकार असले पाहिजे ही गोष्टच समजत नसेल किंवा इतर काही कारणांमुळे समजून घ्यायची नसेल तर त्याला कोण काय करणार? असो. आता इतर मुद्द्यांकडे. नोटबंदी... नोटबंदीला नोटबंदी का म्हणतात कळत नाही; प्रत्यक्षात ती नोटबदली होती. मुळात हेतू नक्की काय आहे ते सांगितले नाही. म्हणजे काळापैसा बाहेर काढायचा होता का? की खोट्या नोटा बाहेर काढायच्या होत्या? की टेररिस्ट फायनॅन्सिंग थांबवायचं होतं? कॅशलेस इकॉनॉमी हवी होती की लेसकॅश हवी होती? नक्की काहीच माहिती दिली नाही; त्यामुळे कोणता हेतू कितपत साध्य झाला हे जाहीर करायची आपोआपच जबाबदारी नाही सरकारची. कॅग आता काय म्हणेल ते म्हणो. अर्थव्यवस्थेतली कॅश तेवढीच राहणार असेल, उलट आणखी मोठ्या नोटा येणार असतील तर अर्थशास्त्राच्या नक्की कोणत्या तत्वाला अनुसरुन हे बरोबर आहे याची मलातरी कल्पना नाही. समर्थकांनी संदर्भ दिल्यास उत्तम. श्रीमंत लोक देश सोडून चालले आहेतः https://m.businesstoday.in/story/at-least-23000-dollar-millionaires-have-left-india-since-2014-report/1/273018.html The report states that while the outflow of HNWIs from India is not particularly concerning as the country is still producing far more new HNWIs than it is losing, a spike in this number is usually bad news. "HNWIs are often the first people to leave. They have the means to leave unlike middle class citizens. If one looks at any major country collapse in history, it is normally preceded by a migration of wealthy people away from that country," said Amoils. He added that as the standard of living improves in India and China, he expects several wealthy people to move back home. सेक्युलरिजम काँग्रेसने अल्पसंख्यांकांचे अवाजवी लांगूलचालन केले म्हणून असंतोष आहे हे समजण्यासारखं आहे. त्यामुळे व भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काँग्रेसला जावे लागले. पण ह्याचा अर्थ असा नाही की नवीन सरकारने बहुसंख्यांचे लांगूलचालन करावे. जे काँग्रेसला जमले नाही ते खरेखुरे निधर्मी सरकार देणे हा खरा पर्याय होता. पण ते न करता व विकासकामांवर लक्ष केंद्रित न करता जो पक्ष आधीच सत्तेबाहेर गेला आहे, ज्याला जनतेने नाकारले आहे त्यापक्षाचा समूळ नायनाट करण्याची भाषा केली जातेय हे पूर्ण लोकशाही विरोधी आहे. खरा सेक्युलरिझम भारतात कधी आलाच नाही; पण आजकालचा सरकारमान्य दहशतवाद पाहता कॉग्रेसने केलेले लांगूलचालन कमी हानीकारक होते असे म्हणायची वेळ आली आहे. इनोव्हेशन... पहिली गोष्ट म्हणजे मोदींच्या राजकारणाला राष्ट्रवादी राजकारण म्हणणे बंद करा. “मी राष्ट्रभक्त आहे आणि मला विरोध करणारे राष्ट्रद्रोही आहेत” असे म्हणणारा व खुशाल खोटे बोलणारा नेता कधीही राष्ट्राचे भले करत नाही हा इतिहास आहे. बाकी विज्ञान परिषदेत वैदिक विज्ञानाच्या गप्पा करणे, गोमूत्र-गोमयावर संशोधन करणे वगैरे विनोदी प्रकार सोडले तरी शैक्षणिक क्षेत्रात मूलभूत सोयी करण्यापेक्षा बुलेट ट्रेन टाईप प्रोजेक्ट्स करुन इंडिया शायनिंग करायची वृत्ती जास्त दिसते. https://www.theindianwire.com/education/modi-visits-iit-b-students-question-govts-anti-education-politics-69553/ The disturbed student sentiment is a result of various governmental measures in the past few months. They include the decreasing budget allocation for institutes of higher learning and retraction of the Government of India- Post Matric Scholarship (GoI-PMS) for reserved categories (ST/SCs and OBC) in Institutes like Tata Institute of Social Sciences (TISS). The most recent one includes the shortcomings of the new Higher Education Committee of India Bill (HECI Bill). इनोव्हेशनची संस्कृती तशी भारतात फार पूर्वीच बंद पाडली गेली आणि कॉंग्रेसनेही फार भरीव काही केलं नाही; पण ह्या सरकारनेही काहीच केलं नाही ही वस्तुस्थिती त्याने बदलत नाही. असो.

In reply to by नगरीनिरंजन

उत्पादनात लागणार्‍या इन्नोव्हेशनची गरज विज्ञान तंत्रज्ञानात असते, सोशल सायन्सेस मध्ये नव्हे. सोशल सायन्सेस म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान नव्हे. सोशल सायन्सवर किती पिएचड्या ओतल्या तरी राजकीय आणि सरकारी निर्णय मतपेटीवर आधारीत होतात सोशल सायन्सच्या पिएचड्या वाचून नव्हे. खासकरुन ज्यांच्या देशभक्ती साशंकीत आहेत त्या लोकांच्या पिएचड्या डोक्यावर घेऊन नव्हे. देशभक्तीचा मामला शिंपल असतो प्रमाणपत्र दे म्हणले रात्री बारावाजता सुद्धा झेंड्याला सॅल्युटमारुन राष्ट्रगीत म्हणावे. जे म्हणणार नाहीत त्यांना देशप्रेमाचे पाठ चिनी कम्युनीझम पद्धतीने द्यावेत. चिनी कम्युनीझमच्या मानाने मला ते मोदीच काय भाजपा लय शामळू प्रकरण वाटते. त्या कंदाहारच्या विमान अपहरण प्रकरणातही बोटचेपेच होते बोटचेपे पणा करुनही शिव्या खायच्या कोणा देवाने यांना सांगितले ते कळत नाही. कुणि मला पंतप्रधान करत नाही ते ठिक नाही तर ज्या देशद्रोह्यांच्या फाशीच्या विरोधात काहुर माजवले त्या फाश्या अयोग्य होत्याना ? फाशी माफ का केली नाही असे म्हणत काँग्रेस नेतृत्वाला आधी आत टाकले असते. मग ते फाशी देणे तर बरोबर होते म्हणाले की फाशीचा विरोध करणर्‍यांना पुढच्या ४८तासात आत केले असते, भारताचा लष्कर प्रमुख असतो तर , देशभक्तीचा मामला शिंपल असतो प्रमाणपत्र दे म्हणले रात्री बारावाजता सुद्धा झेंड्याला सॅल्युटमारुन राष्ट्रगीत मी म्हणतो इतरांनीही म्हणावे., असे एका वाक्यात ऐकवून, भारत विरोधी कारवाया करणार्‍या प्राध्यापक मंडळींना खास करुन जीनयु आणि जादवपूर उलटे लटकवून खालून मिरच्यांचा धूर देऊन मागच्या सात जन्मातील पापे आठवतील एवढी फटके देण्याची व्यवस्था नक्कीच केली असती. या देशद्रोह्यांचे सुदैव आहे मी महात्मा गांधींचा अंहिसावाद मानतो आणि म्हणून देशाचा लष्कर प्रमुख होऊ शकत नाही ते.

In reply to by माहितगार

मीच फक्त देशभक्त आणि मीच ठरवणार आणखी कोणी आहे का ते! :D "माझी बॅट माझे नियम" असे चालायचे लहापणी तेच काही लोक मोठेपणी सुद्धा करतात वाटत!
उत्पादनात लागणार्‍या इन्नोव्हेशनची गरज विज्ञान तंत्रज्ञानात असते, सोशल सायन्सेस मध्ये नव्हे.
क्या बात!! आयटी सेल वापरून (अप)प्रचार करणे हे ही इन्नोव्हेशनच होते हो भारतीय राजकारणात! आता मानगुटीवर बसतेय ती वेगळी गोष्ट...
देशभक्तीचा मामला शिंपल असतो प्रमाणपत्र दे म्हणले रात्री बारावाजता सुद्धा झेंड्याला सॅल्युटमारुन राष्ट्रगीत म्हणावे. जे म्हणणार नाहीत त्यांना देशप्रेमाचे पाठ चिनी कम्युनीझम पद्धतीने द्यावेत.
एक्कच नंबर हा! नाही म्हणजे इतक्या महिन्यात काही फरक पडला असेल विचारात असे वाटले होते पण देशभक्तीचे घट्ट/पातळ असले "फॅट" मोजण्याचे यंत्र अजून पण "तुमच्याकडेच" आहे वाटत. राष्ट्रगीत म्हणा आणि इतर वेळी लोकांना लुटा किंवा गायी वाचवायला त्यांना मारून टाका... तरीही तुम्ही देशभक्तच हा! देशात कचरा करा, उघडयावर लघवी करा आणि राष्ट्रगीत म्हणा, तुम्ही लगेच देशभक्त!
भारताचा लष्कर प्रमुख असतो तर , देशभक्तीचा मामला शिंपल असतो प्रमाणपत्र दे म्हणले रात्री बारावाजता सुद्धा झेंड्याला सॅल्युटमारुन राष्ट्रगीत मी म्हणतो इतरांनीही म्हणावे., असे एका वाक्यात ऐकवून, भारत विरोधी कारवाया करणार्‍या प्राध्यापक मंडळींना खास करुन जीनयु आणि जादवपूर उलटे लटकवून खालून मिरच्यांचा धूर देऊन मागच्या सात जन्मातील पापे आठवतील एवढी फटके देण्याची व्यवस्था नक्कीच केली असती.
नाही म्हणजे, न्यायालये आहेत देशात हे आपल्याला माहित नसले तर आठवण करून देतो! कोण राष्ट्रद्रोही वगैरे ठरवायला कायदे देखील आहेत. तुम्ही कोण ठरवणारे? जरी लष्कर प्रमुख झाला असतात (बाता मारायला काय जातंय?) तरीपण तुम्हाला हेच बोललो असतो. मागच्या वेळी काहीतरी देशासाठी रक्त सांडलं, कुर्बानी द्यायला चालले तरच देशभक्त वगैरे असली डेफिनिशन होती तुमची... बदलली आता ती?

In reply to by शब्दबम्बाळ

मागच्या वेळी काहीतरी देशासाठी रक्त सांडलं, कुर्बानी द्यायला चालले तरच देशभक्त वगैरे असली डेफिनिशन होती तुमची... बदलली आता ती?
नाही देशभक्ती विषयक अपेक्षा आजीबात बदललेल्या नाहीत, जेएनयु आणि जादवपूर मधील प्राध्यापक मंडळी नेमकी कुठे कमी पडली याचे सविस्तर विश्लेषण माझे तुमच्याही धाग्याच्या आधी करुन झाले आहे ते पहावे. जगातला कोणताही देश बहुसंख्यांच्या अथवा राज्यकर्त्यांना पाठींबा देणार्‍यांच्या इच्छाशक्ती आणि हेजिमोनीवर चालतो हे वास्तव जीनयुच्या जादवपूरच्या तथाकथीत प्राध्यापकांनी पण नाकारुन दाखवावे. आसेतू हिमाचल एक न राहू शकलेल्या देशाला सातत्याने परकीय आक्रमणे आणि मानहानीला सामोरे जावे लगले आहे हे वास्तव कसे बदलेल ? आसेतू हिमाचल भारताचा भाग असलेल्या देशांना भिकार्‍याचा कटोरा घेऊन फिरावे लागते हे वास्तव जनतेपासून किती लपवता येते ? पाकीस्तानचा नवा पंतप्रधान इम्रानखान काही ट्रिलीयन डॉलरचे कर्ज असल्याची स्वतःच कबुली देतो सौदी आरब चिन ते युरोमेरीका सगळीकडे येते चार महिने भीक मागत फिरणार आहे. एकसंघ भारतावरचे प्रेम शाबुत ठेऊन पाकीस्तानचे भाग एकसंघ भारताचे भाग असते तर एवढी नामुष्कीची वेळ आली असती का ? जिओग्राफीकली एक असलेल्या देशांचे अर्थशास्त्र एक असू शकते परस्परात्ली युद्धे हनीकारक आणि महागडी असतात , देशाची व्याख्या हि जिओग्राफीकलच असावी लागते त्याला धर्म भाषा वंश आधारीत राष्ट्र निर्मीतीच्या युरोपीयन व्याख्या अवास्तव आणि तर्कशुन्य असतात हे फुटीरतावादी चळवळींना तर्कपूर्ण पणे पटवण्याची पहिली जबाबदारी देशातील विचारवंतांची आणि प्राधान्याने प्राध्यापकांची असते, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणे ही जबाबदारी सुद्धा त्यांची असते - सीमेवर लढाईला जात नाही कमीत कमी तेवढेतर करा, मी चीनचे उदाहरणच एवढ्यासाठी दिले की कुणीही शहाणपणा केला की आधी लेबरकँप मध्ये पाठवले जाते सरकारी पगार घेऊन नक्षलवादाच्या गप्पा हाणता येतात त्यांनी लालबहादूरशास्त्रींचा मंत्र घेऊन आधी स्वतः मजूर म्हणून आणि सीमेवर जवान म्हणून काम करुन मग विद्यापीठात शिकवण्यास यावे, आणि राष्ट्रप्रेम जागृत ठेवण्याची जबाबदारी राजधानीच्या शहरातील प्राध्यापकांची तर आधी असते, आणि देशप्रेम विषयक जबाबदारीत कुचराई करायची आणि विद्वान असल्याच्या वल्गना करायच्या त्या ज्यांचे देशप्रेम जागृत आहे त्यांनी का ऐकुन घ्याव्यत ? राष्ट्रप्रेमाची हेजीमोनीवरच देशाचे अस्तीत्व आणि बहुसंख्यांचे हित असते आणि स्वराष्ट्रप्रेमाचे प्रदर्शन करण्यात आणि या विषयावर कठोर वचने ऐकवण्याबाबत बहुसंख्यांनी लाजण्याचे काही कारण नसावे. देशाचे अस्तीत्व या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. जिनएनयु जादवपूरच्या ज्या प्राध्यापकांना शरीयाच्या बाजू घ्यायच्या आहेत त्या शरीयांतील शिक्षांच्या इक्विव्हॅलेंट शिक्षाच सुचवली ना ? हि शिक्षा देशद्रोही समर्थकांना बोचत असेल तर शरीयाचे ग्रंथप्रामाण्य, नक्षलवादी ते अतीरेकींयांचे अमानवीय हिंसाचार बोचावयास हवेत की नको ? माझी आधीची आपल्या धाग्यावर केलेल्या निम्नलिखीत भागाशीही मी ठाम आहेच. ते इतर वाचकांच्या माहिती साठी पुन्हा कॉपीपेस्ट करतो.
देशप्रेमा बद्दल ज्यांच्या प्रिऑरिटी सुस्पष्ट आहेत त्यांना प्रश्नांचा बाऊ करण्याचे कारण काय असावे ? मला कूणी एक लाख वेळा देश प्रेमाची शपथ घे म्हटले तर मी अब्जावधी वेळा घेईन, कुणी शंका घेतली तर आधी त्याच्या देशप्रेमाचा आदर व्यक्त करेन आणि मग मी सुद्धा तुझ्या एवढाच देशप्रेमी आहे चल दोघे मिळून देशासाठी कुर्बानी देऊ म्हणेन. ज्यांची हि तयारी नसते त्यांचे देशप्रेम पातळ असू शकते आणि अशा पातळ फाटण्याची शक्यता असलेल्या पोतेर्‍यांकडे समाज बोट दाखवेल याला ते स्वतःच जबाबदार असतात,
तुम्ही कोण ठरवणारे?
देशाच्या अस्तीत्वात देशप्रेमाने स्वआहुती देण्यास खारीचा वाटा घेणारी काळाच्या ओघात विसरले जाणारी फुलाची पाकळी , ज्या पाकळ्याच्चे योगदान देशाचा आधारस्तंभ असते. सुजाण नागरीक लोकशाहीचा आधारस्तंभ असेल तर देशप्रेमी नागरीक देशच्या अस्तीत्वाचे आधारस्तंभ असतात आणि देशप्रेमी नागरीकांचा देशावर आधीकार आधी असतो. आणि हा आधिकार ते त्यांच्या इच्छाशकीच्या सातत्यपुर्ण देशप्रेम आणि देशासाठी स्वाअहुती देऊन टिकवत असतात. आणि ते ठरवणारे आम्ही अभिमानी देशप्रेमी !!
...नाही म्हणजे, न्यायालये आहेत देशात हे आपल्याला माहित नसले तर आठवण करून देतो! कोण राष्ट्रद्रोही वगैरे ठरवायला कायदे देखील आहेत.
देशप्रेमी मंडळींना स्वतःच्या देशाचे कायदे आणि न्यायालये मान्य असतातच, हो ते आम्हा देशप्रेमींना अभिमन्यू प्रमाणे आईच्या गर्भात असताना पासून कल्पना असते. पण देशाची एकसंघतेचा कायदा सर्वात मोठा कायदा असतो, आणि देशाची एकसंघता नाकारणारे देशाच्या कायद्यांचे आणि न्यायव्यवस्थेचे पहिले दोषी असतात. याच देशाच्या संस्कृती, कायदा आणि न्यायालयीन उदारतेचा आणि व्यवस्थेचा गैरफायदा घेत देशा विरुद्ध फितुरीच्या भूमिका बजावणार्‍यांना चार खडे बोल सुनावून वेडात दौडणारे देशप्रेमी या देशात जन्मतात हे सडेतोड प्रतिक्रीयांनी वेळच्या वेळी दाखवून द्यावे लागते. खरे तर अशी फितुरीची लागण हे देशाचे दुर्दैव , त्याच वेळी देशप्रेमींच्या देशप्रेमाची वेळीच शक्तीवर्धक लस टोचुन देशप्रेमी रक्त सळसळवण्यासाठी देशप्रेमी कटू पण सत्य शब्दातून फितुरांचे एकप्रकारे आभारच मानत असतात.
..तरीही तुम्ही देशभक्तच हा!
अगदी ठळकपणे देशभक्ती व्यक्तिपरत्वे कमी अधिक प्रमाणावर घट्ट पातळ असणे स्वाभाविक असावे, बाकीचे हजार गुन्हे आणि देशाच्या विघटनाची भाषा बोलणे या गुन्ह्यांमध्ये जमिन अस्मानचे अंतर असते. बाकी गुन्ह्यांमुळे देशाचे विघटन होत नाही. जेव्हा भारतमाता देशद्रोह्यांना सहन करते तेव्हा, देशाच्या विघटनाविरुद्ध उभे टाकणार्‍या देशभक्तांचे हजार अपराध तिने क्षमाकरुन पोटात घेण्यास हरकत नसावी. देशाच्या विघटनास जबाबदार देशद्रोह आणि इतर अपराध यांची तुलना होऊच शकत नाही.
...नाही म्हणजे इतक्या महिन्यात काही फरक पडला असेल विचारात असे वाटले होते...
फरक कुणात पडावयास हवा ह्याचे आजच्या तथाकथित गुरुजनांना सांगता येत नाही म्हणूनच त्यांना गुरजन म्हणून पुर्वीसारखे संबोधणेही कठीण होते म्हणून आधी तथाकथीत प्राध्यापक (देशाशी फितुरी पसरवणार्‍या) मंडळींना सुतासारखे सरळ करावयास हवे. आपल्या गुरुजनांचे गुरुजन कोण होते त्यांना स्वर्गातून वापस आणून प्रश्न विचारावयास हवेत की ते त्यांच्या विद्यार्थीजनंना देशप्रेमाचे पाठ व्यवस्थित शिकवण्यास नेमके कुठे कमी पडले ? नुसतेच वयाने वाढले देशप्रेमान उणे झाले ते तुमच्या शिक्ष्ण देण्यात उणीव राहील्या कारणे आणि त्यांना त्यांच्या कमी पडण्याची प्रायश्चित्ते घेण्यास सांगितली पाहिजेत.
...इन्नोव्हेशनच...
तेच तर साम्गतोय टेक्नॉलॉजीकल इन्नोव्हेशन आणि राजकारण चालवण्यासाठी सोशल सायन्स मधल्या पिएचड्या लागत नाहीत, प्रत्येक राजकारणी निवडून येतो राजकारणात यशस्वी होतो तेव्हा स्वतः जात्याच प्रत्यक्ष अनुभवातून सोशल सायन्समधला डॉक्टरेट होत असतो, आणि म्हणून सोशल सायन्स मधल्या पिएचडी च्या नावाखाली देश विघटनाचे समर्थ्न करणारी इनोव्हेशन्स होत असतील असे सोशल सायन्स गुंडाळून ठेवावे देशाला अशा वाळवीचा काय उपयोग नाही, आधी देशप्रेमाचे बोला मग बाकी !!

In reply to by माहितगार

निबंध लिहू नका, असल्या तोंडाच्या वाफा दवडून कोणी "फक्त स्वतःलाच " आणि स्वतःच्या विचारांची आरती ओवाळणाऱ्या लोकांनाच देशभक्त समजत असेल तर बालबुद्धी म्हणून दुर्लक्ष करता येईल. ननि यांनी मुद्दे मांडले होते त्यात कुठे फुटीरतावादी आणि जेएनयू होते? पण तुम्हाला मुख्य मुद्दे सोडून फक्त (तथाकथित) देशभक्तीचे उमाळे फुटतात त्याला इतरांनी काय करावे? का जाणून बुजून मुद्दे सोडून चर्चा (तथाकथित) देशभक्तीकडे न्यायची असते काय माहित... जिथेतिथे मुद्द्याला धरून लेखन करा म्हणून इतरांना सान्गायचे आणि स्वतः मात्र मी कोणाला धुरी देईन आणि कोणाला प्रमाणपत्र देईन असले फालतू प्रतिसाद देत बसला आहात! आणि अगदीच म्हणता आहेत ना कुर्बानी, कुर्बानी तर माझ्यामते तुमच्या काळात एखाद तरी युद्ध झालं असेलच कि शत्रूशी, कितीदा कुर्बानी दिलीत ते ऐकायला आवडेल. का फक्त रोज सकाळी उठून मी कुर्बानी देईन अशी घोकंपट्टी केली आणि राष्ट्रगीत म्हटले कि तुमचा देशभक्तीचा क्रायटेरिया भरतो? (हे व्यक्तिगत वाटत असेल तर संपादक मंडळ काढून टाकू शकते, परंतु इथे काही आयडीनी देशभक्तीचे जे स्वतःचे "नियम" प्रस्थापित करायचं ठरवलं आहे त्याला उत्तर देण्याचा दुसरा मार्ग दिसत नाही) आणि मग जे लोक देश सोडून परदेशात स्थायिक होतात ते तर देशद्रोहीच होतील तुमच्यानुसार नाही का? एक तर ते स्वार्थासाठी चक्क देश सोडतात, ते बाहेरच्या नागरिकत्वासाठी भारतीय नागरिकत्व देखील सोडायला तयार असतात. केवळ चांगल्या राहणीमानाकरिता देशाला सोडून परदेश पकडतात, मग कुर्बान व्हायचं तर कुठच्या कुठे राहील! मग देश सुधारायचा कोणी, नाही का? आणि तिकडे तर सिनेमागृहात भारताचे "राष्ट्रगीत" पण वाजवलं जात नाही. तुमचा मुख्य क्रायटेरिया तर इथेच गंडला! मी मागच्या वेळी एक प्रश्न विचारला होता तुम्हाला, त्याच उत्तर अजून दिले नाहीत! सामान्य माणसाचं आयुष्य... "समजा एक माणूस देशात पूर्ण टॅक्स भरतो, देशाचे सगळे नियम पाळतो कुठेही कचरा करत नाही. गरिबांना जेवण देखील देतो. स्वतःच्या कुटुंबासोबत एका गरीबाच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च देखील देतो. "पण तो देशासाठी कुर्बान व्हायला तयार नाही". कारण त्याला या गोष्टी आयुष्यभर करत राहायचं आणि हे सगळे लोक त्याच्यावर अवलंबून आहेत. मग त्याच देशप्रेम घट्ट, पात्तळ, उतू गेलेलं कि नासलेले? घ्या ठरवून तुम्हीच." आणि आमच्या देशाचे सैनिक हे फक्त "कुर्बानी" द्यायला नाही आहेत. ते देशाचे संरक्षण करायला आहेत, त्यांना देखील कुटुंब आहेत जेव्हा कोणा सैनिकाला स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागते तेव्हा ते "राजकीय अपयश" असते. वर्षानुवर्षे आपल्या आणि शेजारच्यांच्या हुकलेल्या राजकीय निर्णयांमुळे सैनिकांना आपले प्राण देऊन किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे कृपया "कुर्बानी" हा शब्द इतका स्वस्त असल्याप्रमाणे वापरू नका.

In reply to by शब्दबम्बाळ

...त्यामुळे कृपया "कुर्बानी" हा शब्द इतका स्वस्त असल्याप्रमाणे वापरू नये.
अगदी बरोबर आहे, याच न्यायाने देशप्रेम्यांचे प्रेम स्वस्त झाल्या प्रमाणे देशद्रोह्यांच्या फुटीरते सोबत मोजू नये. देशप्रेमी व्यक्ती देशासाठीच्या कुर्बानीचे मोल स्वस्त करुन मोजत नसतात हा कॉमनसेन्स असावा. आपण देशासाठी कुर्बानी का देतो याची देशप्रेमी व्यक्तीस यथोचीत कल्पना असते. आणि ज्यांना कल्पना नसते तेच देशविघातकांना पाठीशी घालणारे युक्तीवाद करत फिरतात. सोबत बाकी सजीवांच्या कुर्बान्यामात्र स्वस्त करुन विकतात. :(
"समजा एक माणूस देशात पूर्ण टॅक्स भरतो, देशाचे सगळे नियम पाळतो कुठेही कचरा करत नाही. गरिबांना जेवण देखील देतो. स्वतःच्या कुटुंबासोबत एका गरीबाच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च देखील देतो. "पण तो देशासाठी कुर्बान व्हायला तयार नाही". कारण त्याला या गोष्टी आयुष्यभर करत राहायचं आणि हे सगळे लोक त्याच्यावर अवलंबून आहेत. मग त्याच देशप्रेम घट्ट, पात्तळ, उतू गेलेलं कि नासलेले? घ्या ठरवून तुम्हीच."
याचे उत्तर सक्तीच्या लष्करी सेवेच्या गरजेत असावे. म्हणजे आपल्या गुण्या गोविंदाने रहाण्याच्या स्वप्नासाठी सीमेवर कोणी कुर्बानी देत असते हे स्वतः अनुभवण्यास मिळते, आणि मग देशद्रोह्यांची पाठराखण करण्याची इच्छा कमी होऊ शकते. जो देशप्रेमी असतो तो कुर्बान व्हायला मनाने सज्ज असतो आणि आपल्या प्रमाणे एक्सक्युजेस देत नाही. जे एक्सक्युजेस देतात त्यांचे देशप्रेम पातळ असते, आणि फितुरी करतात त्यांच्या देशप्रेमाचे पोतेरे झालेले असते. आपल्या इच्छेप्रमाणे ठरवून दिले
...आणि मग जे लोक देश सोडून परदेशात स्थायिक होतात ते तर देशद्रोहीच होतील तुमच्यानुसार नाही का? एक तर ते स्वार्थासाठी चक्क देश सोडतात, ते बाहेरच्या नागरिकत्वासाठी भारतीय नागरिकत्व देखील सोडायला तयार असतात. केवळ चांगल्या राहणीमानाकरिता देशाला सोडून परदेश पकडतात, मग कुर्बान व्हायचं तर कुठच्या कुठे राहील! मग देश सुधारायचा कोणी, नाही का? आणि तिकडे तर सिनेमागृहात भारताचे "राष्ट्रगीत" पण वाजवलं जात नाही. तुमचा मुख्य क्रायटेरिया तर इथेच गंडला!
नाही आपला युक्तीवाद गंडतोय. ( भारतीय उपमहाद्वीपीय प्रदेश सोडून) जे दुसर्‍या देशाचे नागरीकत्व घेतात त्यांनी त्या त्या देशावर देशप्रेम करावे. भारतासाठी सदिच्छा ठेवाव्यात. आणि भारतीयांनी त्यांच्यासाठी सदिच्छा ठेवाव्यात. परदेशात राहूनही जे भारतीय नागरीकत्व कायम ठेवतात तो पर्यंत देशप्रेमाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते. मी प्रत्येकवेळी अथवा थिएटरात राष्ट्रगीत म्हणा असे कुठेही म्हणालो नाहीए. पण कुणी शंका घेतली अथवा शंका न घेताही म्हण म्हणाले तर समोरचेच्या अपेक्षेपेक्षा हजार गुणा अधिक वेळा म्हणावे.
...परंतु इथे काही आयडीनी देशभक्तीचे जे स्वतःचे "नियम" प्रस्थापित करायचं ठरवलं आहे त्याला उत्तर देण्याचा दुसरा मार्ग दिसत नाही...
देशद्रोहाच्या आरोप्यांचे गोडवे गाणार्‍या प्रतिसादकांच्या फितुर प्रतिवादांवर कोणत्याही कारवाईची अपेक्षा संपादकांकडून करत नाही, कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सहिष्णूता कि काय म्हणतात ते भारतीय देशप्रेमींच्या अंगात फितुरी समर्थकांपेक्षा अधिक चांगले वसले आहे आणि फितुरीचा प्रतिवाद करण्याची क्षमता अब्जावधी(अनंत)पटींनी अधिक आहे.
...का फक्त रोज सकाळी उठून मी कुर्बानी देईन अशी घोकंपट्टी केली आणि राष्ट्रगीत म्हटले कि तुमचा देशभक्तीचा क्रायटेरिया भरतो?
किमान एवढे करतो एवढे सिद्ध होते ना =)) आपण तर तेवढेही न करता कुर्बानी देण्यास तयार असलेल्यांचे पाय ओढता, "सहिष्णू असल्यामुळे पाय ओढणार्‍यांकरताचे विशेषण लावत नाहीए" (एफसीस अ‍ॅडेड) :)
...आणि अगदीच म्हणता आहेत ना कुर्बानी, कुर्बानी तर माझ्यामते तुमच्या काळात एखाद तरी युद्ध झालं असेलच कि शत्रूशी, कितीदा कुर्बानी दिलीत ते ऐकायला आवडेल....
(अधिकृत भारतीय सैन्याला अधिकृतपणे रसद पुरवून प्रत्येक वेळी) पण त्यापेक्षाही महत्वाचे मानसीक सामर्थ्य दिले, त्यांच्यातला कुणी पडला तर मीही त्यांच्या माघारी बंदूक हातात घेऊन त्यांचे देशाच्या संरक्षणाचे अधुरे राहिलेले कार्य पुढे नेण्यास सदैव तत्पर राहीलो तत्पर असेन. जिएंगे तो और भी लडेंगे. आपल्यासारखे शेळपटासारखे (देशप्रेम) पातळ करुन फितुरा तू किती गोड फितुरा तू किती गोंडस असे फितुरांचे गोडवे गाण्याचा डाग घेऊन फिरत नाही आणि कोणत्याही देशप्रेम्यांच्या देशप्रेमाला फालतुही समजत नाही. अस्सल देशप्रेम्यांच्या देशप्रेमाला फालतु किंवा तथकथित समजणे हि फितुरीच्या मार्गावरची पहिली पायरी असते, फितुरीचा डाग नको असेल तर स्वतःस वेळीच सावध करुन घ्यावे .
...देशभक्तीचे उमाळे फुटतात त्याला ...
जे खरे देशप्रेमी आहेत ते एकमेकांच्या देशप्रेमाच्या उमाळ्यांना सलामअसा/ प्रणाम करत असतात. देशप्रेमाची अबोध बालबुद्धीही देशप्रेमींसाठी अमोघ मुल्याची असते. ज्यांचे देशप्रेम पातळ असते त्यांना हे न उमगणे सहाजिक असावे. ( देशभक्तांसाठी बालबुद्धी शब्द वापरणार्‍यांना मूर्ख शब्द वापरुन मूर्ख शब्दात समाविष्ठ होऊ शकणार्‍या चांगल्या लोकांचा अपमान करायचा नाही म्हणून मूर्ख शब्द वापरत नाही )
निबंध लिहू नका...
एक स्वतः करायचे आणि दुसर्‍यांना नको म्हणायचे आम्ही कमीत कमी देशप्रेमाचे निबंध लिहीतो फुटीरतेचे प्रबंध नव्हे. आपल्या फुटीरतेच्य गोडवा प्रबंधांनाही - सहिष्णूता न संपून देता लिहू नका न म्हणता- लिहूद्या राहू द्या सज्जपणे प्रतिवाद करुन देतो म्हणतो. आमचे देशप्रेमाचे निबंध देशाच्या मातीला, खाल्लेल्या मीठाला, पिलेल्या पाण्याला, सुखदवर देणार्‍या आईच्या दुधाला, तिच्या सुमधूर भाषेला, त्याच्या प्रांगणातल्या फुलांना, शीतल हवेला सदोदीत जागत असतात. वंदेमातरम

In reply to by माहितगार

ननि यांनी मुद्दे मांडले होते..
भारतीय उपमहाद्वीपीयांच्या निष्ठा भारत मातेच्या चरणीच असाव्यात आणि ननिंच्या या प्रतिसादातील उपदेशात अभिप्रेत धर्मनिरपेक्षतेत एकाच बाजूला टार्गेट करणारी सापेक्षतेची अंशतः भेसळ जाणवल्यामुळे चर्चा येथवर आली. आणि यदा यदा धर्मनिरपेक्षतेत सापेक्षतेची ग्लानी येते तेव्हा तेव्हा माहितगारसारखे देशप्रेमी देशप्रेमाचे सृजन करतात. हे नमुद करायचे राहीले होते.

In reply to by माहितगार

यदा यदा धर्मनिरपेक्षतेत सापेक्षतेची ग्लानी येते तेव्हा तेव्हा माहितगारसारखे देशप्रेमी देशप्रेमाचे सृजन करतात. दिसलं दिसलं....विश्वरुप दिसलं. त्यो एक कृष्ण...अन दुसरे तुम्हीच... बास्स्स्स्स्स्स्स. बूटं तेवढी वूडलॅन्डची घालत जावा झोपताना. सोल जाड असतो म्हणे. बाणबिण घुसनार नाही.

In reply to by अभ्या..

.

In reply to by माहितगार

सार्वजनिक इमारती मध्ये गुटखा खाणाऱ्यानीं थुंकू नये म्हणून देवाचे फोटो लावणाऱ्याची मानसिकता आणि तरी सुद्धा थुंकणाऱ्याची मानसिकता एकच असते , तसेच " नावडतीचे मीठ आळणी , आवडतीचा शेंबूड गोड ' म्हणी प्रमाणे तुमच्यावर कंपू चा हल्ला सुरू झालेला दिसतोय

In reply to by ट्रम्प

दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यांचे अल्पसंख्यांकाबद्दलचे प्रेमही केवळ मतपेटीभरु आणि निव्वळ बेगडी असते अहो.(अल्पसंख्याकांना सुद्धा व्यवस्थित समजते अहो, बेगडीपणामुळे जीनासुद्धा गांधीम्ना स्वच्छ सांगत अहो हिंदू म्हणून भेटायला या म्हणून ) . मिपावर शेवटी मी कितीसा पुरोगामी आहेस ? म्हणून कविता लिहिली एकपण फिरकला नाही, कितीसा पुरोगामी आहेस ? चे आव्हान घेतले नाही म्हणून त्यांच्या बाजूने 'व्हेअर द माईंड इज विदाऊट फिअर'चा विषय घेतला तिथे पण साध सोप आव्हान पण झेपल नाही कारण टागोरांच्या कविते बाबत पिंकारू पणा करता येत नाही ना ! माझ्या खालच्या यादीतील विषयांवर - माझे धागे आवडत नै तर स्वतंत्रपणे लिहावे ना - एक काडीचे तरी योगदान असते का ? निघतात दुसर्‍यांना धर्मनिरपेक्षता शिकवण्यासाठी . ** भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा ; राष्ट्रीय एकात्मतेतील स्वातंत्र्योत्तर काळातील यशाची बाजू ; 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व ; संस्कृती आणि धर्म यातील गल्लत ; विवीध अभिव्यक्ती कलांमधील, सामाजिक आणि क्रिडा क्षेत्रातील यशवंत मुस्लीमांची व्यक्ती चरीत्रे इत्यादी एक ओळीचे सकारात्मक योगदान नसते. ना मुल्क सारख्या चित्रपटावर केलेल्या टिकेचे आव्हान घेऊ शकतात - ना स्वतंत्रपणे लिहू शकतात बाकीची आव्हाने दूर राहिली. पुरोगाम्यांचा क्रमांक पिंकारुपणात परंपरावाद्यांच्या आधीच लागतो. बरं राजकीय तर राजकीय इथे राहुल गांधींंच्या भाषणाबाबत नुकतीच टिका केली , तिकडे पण फिरकून निदान राहुल गांधींची तरी बाजू घ्यावी तर तेही जमत नाही. म्हणूनच माझ्या कवितेतून प्रश्न विचारलाय तथाकथित पुरोगाम्यांना
..आपल्यातल्या आपल्यांचा होऊ शकला नाहीस त्यांचाही होऊन रहाणे खरेच जमेल का तूला ?...

In reply to by माहितगार

आमच्या इथे एक आजोबा होते, दिसेल त्या मुलाला पकडून ते रोज शुभंकरोती म्हण, गीतापठण कर म्हणून मागे लागायचे. आज्जी आतून म्हणायच्या "अहो, स्वतः तरुणपणात तर काही केलं नाही आणि आता वय झालं आणि मोकळा वेळ आहे म्हणून इतरांच्या मागे लागतंय होय?!" ता.क. - याचा वरच्या मी कुर्बानी का दिली नाही वगैरेंच्या स्पष्टीकरणाशी काहीही संबंध नाही! ;) बाकी नेहमीप्रमाणे तोंडाच्या वाफा दवडलेल्या आहेतच! फक्त "देशद्रोहाच्या आरोप्यांचे गोडवे गाणार्‍या प्रतिसादकांच्या फितुर प्रतिवादांवर" आणि "आपल्यासारखे शेळपटासारखे (देशप्रेम) पातळ करुन फितुरा तू किती गोड फितुरा तू किती गोंडस असे फितुरांचे गोडवे गाण्याचा डाग घेऊन फिरत नाही " असले प्रतिसाद पुन्हा द्याल तर योग्य प्रकारे लायकी काढण्यात येईल. स्वतःला पाहिजे तितका देशभक्त समजा! मला किंवा अन्य कुठल्याही आयडी ला "फितूर" "शेळपट" "फितुरांचे गोडवे गाणारे" विशेषण वापरायचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही! पुन्हा जर असले फालतूपणा केलात तर तिथल्या तिथे दुप्पट जहाल उत्तर मिळेल. आयडी राहो अथवा जाओ!

संपादक मंडळाने याची नोंद घ्यावी कि इथला "माहितगार" हा आयडी माझ्या आयडीला देशद्रोही आणि फितूर ठरवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. अजूनपर्यंत मी बऱ्यापैकी पातळी न सोडता प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला आहे पण हेच पुढे झाले तर माझा नाईलाज असेल. त्यांना योग्य ती समाज देण्यात यावी.

"देशद्रोहाच्या आरोप्यांचे गोडवे गाणार्‍या प्रतिसादकांच्या फितुर प्रतिवादांवर कोणत्याही कारवाईची अपेक्षा संपादकांकडून करत नाही,"
स्वतःला आरोपी आणि संशयित मधला फरक समजण्याचे सामान्यज्ञान तरी आहे का? मी कुठल्या देशद्रोह्यांचे "गोडवे गायले" आहेत ते इथेच दाखवून द्यायचं.

नाहीतर स्पष्ट माफी मागा!

आमच्या इथल्या न्यायालयांवर पूर्ण विश्वास आहे जेव्हा निर्णय येईल आणि जेव्हा सिद्ध होईल कोणी देशद्रोही आहे तेव्हाच मी ते मानेन! कुठल्या ऐकीव माहितीच्या आधारे मी (तुमच्यासारखे) कोणालाही जज करत नाही.

In reply to by शब्दबम्बाळ

ओ माहितगार! तीन चार दिवस झाले...

प्रतिसाद दाखवा नाहीतर स्पष्ट माफी मागा!

आणि दोन्ही जमत नसेल तर वाचकांना कळेलच की माहितगार हा आयडी "फितुर" "शेळपटासारखे (देशप्रेम)" असे आणि इतर शब्द वापरून कशा पिंका टाकतोय ते!

In reply to by शब्दबम्बाळ

१) वरची सर्व चर्चा तपासून घ्या चर्चेला व्यक्तिगत वळण देण्यास आपण स्वतःच सुरवात करण्याचा दोष आपल्याकडेच आहे हे दिसून येईल. २) देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या प्रतिसादांना 'फालतू' म्हणण्याची जुर्रत आपल्या कडुन घडली याचा अपणास सोईस्कर विसर पडला असेल तर पुनाश्च निदर्शनस आणतो. ३) झेपत नसेल तर भारतीय देशप्रेमींशी वाकड्याने न जाणे श्रेयस्कर असते. ४) देशप्रेमींच्या देशप्रेमास 'फलतू' ठरवून कुणाच्या स्वतःच्या देशप्रेमावर सावट आले असेल तर असे सावट स्वतःचे देशप्रेम व्यक्त करुनच दूर होऊ शकते. देशप्रेमींवर धाक धपटशहा करुन नव्हे ५) ज्यांना स्वतःच्या देशाची माफी मगण्याची लाज वाटते त्यांनी इतरांना माफ्या मागत फिरु नये.

In reply to by माहितगार

गेट वेल सून मामू! नाही सापडला ना प्रतिसाद! मुखवटे गळून पडू लागले कि खरा चेहरा नीट दिसतो... बाकी आत्तापर्यंतच्या आयुष्यात कधी कोणी आमच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे उगवले नव्हते आणि कोणाला पुरावे देण्याची गरज लागली नव्हती. हा पक्ष सत्तेत आल्यावरच हि जमात कुठून पैदा झालीये काय माहित?! (त्यांना सत्तेत आणण्यात माझाही हातभार आहेच म्हणा) बर आणि असले लोक स्वतः काय दिवे लावतात हे खालचा व्हिडीओ बघून कळेलच! :D जेव्हा चर्चा भरकटायची असेल तेव्हा मग असले मुद्दे उकरून काढायचे आणि मी कसा देशभक्त आणि तू कसा देशद्रोही हे कीबोर्ड बडवून सिद्ध करायला लागायचे हेच काही लोकांचे उद्योग असतात! img

In reply to by शब्दबम्बाळ

पहिली गोष्ट पहिले, ज्यांना आपली देशभक्ती पातळ असल्याचा उघडपणे अभिमान वाटतो त्यांच्याशी उपहासातले नातेही नाकारतो. आपण आपल्या प्रतिसादाच्या शेवटी जे भारत द्वेष्ट्यां प्रार्थनेचे सॅम्युएल जॉनसन यांचे वाक्य दिले आहे, 'पॅट्रीयॉटीझम इज लास्ट रेफ्युज ऑफ स्काउंड्रेल' त्याचा मराठी अनुवाद, 'देशभक्ती हा नीच लोकांचा शेवटचा आश्रय आहे' असा होतो. आणि अशा भारतद्वेष्ट्या प्रार्थनेचा मतितार्थ "...पंचमहासत्ता र्शेजी केले शत्रु श्रेष्ठजाण । या विचारें पावलें समाधान । फितुरी परदास्य सुखसंपन्न । झाले की जी मायाबाप ॥ ऎशा देश फुको चालावे । देशीय पुनरपि नाहीं उभावे । कोनाची धरती कोन जन्माचे मायबाप, जगावे खळगीचे ऐश्वर्य । ऎक्यपण कसले, परकेप्रेम अन फितुर दास जन्मांतरी तुमीचच जी मायबाप ॥५॥ जोहार परकीयासी फितुरांचा जोहार !! .." असा होत असावा.
....मी कसा देशभक्त आणि तू कसा देशद्रोही हे कीबोर्ड बडवून सिद्ध करायला लागायचे हेच काही लोकांचे उद्योग असतात!... आणि त्याच्या आधीचे आपल्या प्रतिसादातील वाक्य .....बाकी आत्तापर्यंतच्या आयुष्यात कधी कोणी आमच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे उगवले नव्हते आणि कोणाला पुरावे देण्याची गरज लागली नव्हती....
उलटा ** कोतवल को डाटे' स्टाईलमध्ये, सॅम्युएल जॉनसनच्या देशभक्तांनाच 'नीच' संबोधणार्‍या वाक्यावरील आपल्या दृढ विश्वासातून कुणी आपणच आपली महती सिद्ध करत असेल तर अजून कोणते पुरावे हवेत. जेव्हा साशंकता येतात तेव्हा खोकल्याची उबळ झटकून देशाची माफी मागावी आणि 'वंदे मातरम' म्हणावे.
... त्या आधी .......हा पक्ष सत्तेत आल्यावरच हि जमात कुठून पैदा झालीये काय माहित?! ...
'....हा पक्ष सत्तेत आल्यावरच हि जमात कुठून पैदा झालीये काय माहित?! ...' असा विचार मनात आणणार्‍या, देशप्रेम पातळ असलेल्यांनो, या सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम माय भूमीत, देशप्रेम पातळ असलेल्यांना विदेशी हितसंबंधांचा दंश होऊन वैचारीक फितूरी येते तेव्हा तेव्हा गाढे देशप्रेम असलेले जन आणि जमाती या भारतीय मातीतून पैदा होतात. केवळ अमुक पक्ष सत्तेत आला म्हणून नव्हे, देशप्रेम पातळ असलेल्यांना ओळखून किमान आधे मधे तरी गाढ्या देशप्रेमींना हा देश पुढे आणून त्यांच्यावर विश्वास ठेवतो.
...(त्यांना सत्तेत आणण्यात माझाही हातभार आहेच म्हणा)....
आपल्या वाक्याचा अर्थ -प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे असेल ते- आपल्यालाच ठाऊक असणार पण जे असेल ते , आपण सत्तेत आणलेल्या माणसाचे हे भाषण ऐका आणि देशाचे गौरवगान करणार्‍यांची जाणीवपुर्वक बदनामी करणार्‍या माध्यमांनी भरवलेल्या काळाच्या उबळीपासून वेळेत सावध होण्याचा प्रयत्न करुन पहावा. (बाकी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कोणत्याही पद्धतीने कोणतेही सरकार सत्तेत आणण्यात आमचा कोणताही सहभाग नाही हा आमचा कुणासच मत नव्हते हा आमचा डिसक्लेमर - आम्ही मुखवटे चढवत नाही आणि वैचारीक सातत्यही आहे, आमच्या लेखनाच्या पूर्ण वाचन आणि आकलनात कुणी कमी पडत असेल तर खेदपुर्वक शुभेच्छाच देऊ शकतो.)
....बर आणि असले लोक स्वतः काय दिवे लावतात हे खालचा व्हिडीओ बघून कळेलच! ....
देशप्रेम व्यक्त करण्याच्या महत्वाचे आकलन न होण्यात तर वैचारीक फितुरांची गोची होते आणि त्यांची त्यांना लक्षात येत नाही. 'वंदे मातरम' किंवा 'भारतमाता की जय' 'जय हिंद' असे दोन तीन शब्द म्हणण्याची तयारी तेही आपापल्या भाषेत पुरेसे आहे, आणि आपण दिलेल्या युट्यूब लिंकेत त्या मंत्र्याची ती तयारी आहे ही फार मोठी गोष्ट आहे हे देशप्रेम पातळ असलेल्यांना समजणार नाही हे ओघाने आलेच. बरे होण्याची गरज असलेले देशप्रेमींनाच आजारी म्हणतात ह्यावर हसावे की रडावे कळणे मुश्कील आहे. आपण बरे व्हाल की नाही कल्पना नाही पण आपल्याला चांगली देशप्रेमाचे धडे देणारी सून मिळो ही शुभेच्छा. आणि आपणास देशप्रेमी सून मिळाली तर देशप्रेमाच्या खालील युट्यूब तिच्यासाठी.

In reply to by माहितगार

त्याचा मराठी अनुवाद, 'देशभक्ती हा नीच लोकांचा शेवटचा आश्रय आहे' असा होतो.
सॅम्युएल जॉनसनच्या देशभक्तांनाच 'नीच' संबोधणार्‍या वाक्यावरील
अरेरे... आता हे मनोरंजक पातळीवरून विनोदीपातळीच्याही खाली घसरायला लागले की हो. लोक कुठल्या वाक्याचा काय अर्थ लावतील हे सांगणे अशक्यच आहे म्हणायचे. :) अहो ते "देशभक्ती" हा नीच लोकांचा शेवटचा आश्रय आहे असे वाक्य आहे हो. ते वाक्य देशभक्तांबाबत कसे काय असेल? ते नीच लोकांबाबत आहे ना? म्हणजे ज्या लोकांना आपला मुद्दा धड सिद्ध करता येत नाही तरीही तो त्यांना काहीही करून इतरांच्या मानगुटीवर बसवायचाच असतो तेव्हा तसे करण्यासाठी ते देशभक्तीचा ढोल शक्य तितक्या मोठ्याने वाजवतात असा काहीसा अर्थ मला तरी माहिती होता आजवर. कशाचा संबंध कुठे लागेल काही सांगता येत नाही बाबा. असो, चालूद्यात. जय महाराष्ट्र, जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय, विश्वची माझे घर... :)

In reply to by थॉर माणूस

....म्हणजे ज्या लोकांना आपला मुद्दा धड सिद्ध करता येत नाही तरीही तो त्यांना काहीही करून इतरांच्या मानगुटीवर बसवायचाच असतो तेव्हा तसे करण्यासाठी ते देशभक्तीचा ढोल शक्य तितक्या मोठ्याने वाजवतात....
एखादा मुद्दा देशभक्तीने सिद्ध होत नसेल तर त्या मुद्यावर टिका करा, देशभक्ताच्या देशभक्तीवर टिका करण्याचे प्रयोजन दिसत नाही. एखाद्या वाक्याचा लक्ष्यार्थ वाच्यार्थापेक्षा वेगळा असू शकतो हे तत्वतः मान्य, पण वाक्यातील 'भावार्थ' नावाचा प्रकार असतो , हे 'भावार्थ' वाक्याचे वजन वाच्यार्थाकडे आहे की लक्ष्यार्थाकडे आहे हे ठरवत असावेत. एका बोटाच्या थुंकीचा वास, दुसर्‍या बोटावरची थुंकी दाखवून जात नाही. कुणि कसेही मोजले तरी -'नीच लोकांचा शेवटचा आश्रय देशभक्ती आहे' असा बदल केला तरी-, सॅम्युएल जॉनसनचे वाक्यातील भावार्थ खर्‍या खुर्‍या देशभक्तांनाही 'नीच'च संबोधतो; किंवा किमान स्तरावर, 'नीच लोक स्वतःस देशभक्त समजतात' असे म्हणत कळत-नकळत, देशभक्त म्हणवणार्‍यां प्रामाणिक देशभक्तांनाही नीचलोकांच्या पारड्यात तोलतो किंवा कसे. आपल्या युक्तीवादात संबंधांची गल्लत होत असली तरी, "जय महाराष्ट्र, जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय, विश्वची माझे घर" स्विकारत मनमोकळा संवाद साधलात त्यासाठी अनेक आभार. :)

In reply to by माहितगार

मागा जी , मेमन साठी रात्री न्यायालय उघडायला लावणारे , अफजल गुरू ला शाहिद घोषित करून भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणारे , 60 वर्ष दाढ्या कुरवाळून जम्मू काश्मीर मधील हिंदू ना देशोधडीला लावणाऱ्या रागा च्या अल्पसंख्याक संकरित घराण्याची वकिली करणारे , 8 / 10 मुलं असतांना 2 मुलं असून इमानदारीने टॅक्स भरणाऱ्या लोकांच्या पैशातून गॅस सबसिडी घेणारे , आसाम / बांगलादेश मध्ये घुसखोरी करून त्या राज्याची राजकीय , आर्थिक परिस्थिती कोलमडून पडण्यास कारणीभूत ठरणारे आणि दाऊद /सिमी /लष्करे तैययब च्या स्लीपर सेल ला पोसणारे यांच्या आणि त्यांची वकिली करणाऱ्या कडून तुम्ही देशभक्ती ची अपेक्षा करताय ? कमाल आहे राव तुमची . अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाखाली देशाचे वाटोळे करण्यास उत्सुक असलेली ही जमात टॅक्सपेयर च्या पैशातून उच्चशिक्षण घेऊन देश आणि देशातील जनतेचीच मारायला निघाले आहेत . फुकट भेटणाऱ्या उच्च शिक्षणातून देशाची सेवा करणे दूर स्वतःची आर्थिक प्रगती तरी करायला पाहिजे पण नाही उलट उच्च शिक्षणाचा उपयोग देशविघातक कारवाया मध्ये करतात . कुठलाच पक्ष परिपूर्ण असू शकत नाही , म्हणून भाजपच्या ही चुका होत असतील पण भाजप वाले देशद्रोही गद्दार लोकांना पाठीशी घालणार नाही आणि याच कारणासाठी विरोधकांनी कितीही कोल्हेकुई करू द्या सामान्य मतदार निवडणुकीत उमेदवाराची जात न बघता भाजप च्या पाठीमागे खंबीर उभा असतो .

In reply to by ट्रम्प

सहमत आहे, देशद्रोहींना देशप्रेमाबाबत तडजोद होत नाही हे सुनावत, राष्ट्रवादी राष्ट्रप्रेमी सकारात्मक राजकीय दबावाची योगदानाच्या भूमिकेचे स्वतःचे महत्व नक्कीच आहे. देश विघटनाचे समर्थन करणार्‍यांपेक्षा, बाकी हजार उणिवा असलेले देशप्रेमी परवडतील.

In reply to by माहितगार

विद्यमान सरकारवर तिखट टीका करणे हे मान्य आहे. नोटबंदी, जीएसटी, विफल झाले मोदी सरकार हे साफ अयशस्वी आहे हे कुणाचे वैयक्तिक मत असू शकते तो लोकशाहीचा भाग आहे. परंतु फुटीरतावाद्यांना साथ देणे, देशद्रोह्यांची भलामण करणे हे अजिबात मान्य होणार नाही. पुरोगामी म्हणवण्यासाठी असल्या हलकट लोकांची साथ देणारे लोक सुद्धा देशद्रोहीच आहेत.

In reply to by सुबोध खरे

सौ टके की बात ! डॉ. सुबोधजी, देशप्रेम हृदयात बाळगणार्‍या आणि देशप्रेम व्यक्त करण्यास न लाजलेल्या प्रत्येकास, त्या प्रत्येकात देशप्रेम जागवलेल्या प्रत्येकास माझे शत शत प्रणाम ! ज्यांना देशप्रेमव्यक्त करण्यासही लाज वाटते असे आपलेच फितुर बांधव पाहीले की, आपल्या मनात देशप्रेमाची ज्योत जागवणार्‍यांबद्दलचा आदर शतगुणित होतो. देशप्रेम जागवणार्‍यांचे महत्व अधिक ठळक होते. फितुरांना सामील होणार्‍या देशबांधवांना देशप्रेमाची महती समजावून देण्यात आपण कमी पडतो आहोत याचा दुसरीकडे नाही म्हटले तरी अल्पसा खेदही वाटतो. देशप्रेमाची भाषा बोलताना त्वेश जागा झाला नाही, दगाबाजांशी संवाद करताना शब्दात कठोरता आली नाही तर ते देशप्रेम कसलं ? एखादा माठ नीट भाजलेला आहे की नाही ते त्यावर लाकडाने टपली मारुनच तपासले जाते, संत मुक्ताईने संत नामदेवांची शब्दशः अशी परिक्षा घेतली तशी देशप्रेमाचे मडके नीट भाजलेले आहे की नाही याची परीक्षा घेण्यात काही वावगे नाहीच प्रसंगी अशी कठोरताच देशाला सुरक्षीत ठेवत असते. आपण म्हणता तसे प्रांजळ्पणे सांगतो, माझा अलमोस्ट लिहून तयार असलेला पुढचा लेख परंपरावादातील काही नाजूक भूमिकांची चिकित्सा करणार आहे. पण अशी कोणतीही चिकित्सा करतो म्हणजे मला देशप्रेम व्यक्त करण्याची लाज वाटणे शरमेचे ठरेल, हे तथाकथित पुरोगाम्यांना समजत नसेल असे नाही पण संकुचित-हित्संबंध आणि राजकीय भूमिकांचे चष्मे एवढे प्रीय झालेले असतात की संत मुक्ताई प्रमाणे प्रसंगी टपली मारुन काजवे चमकवले जात नाहीत तो पर्यंत सूताचा गूणही देणे अवघड असावे.