मला भेटलेले रूग्ण - ११

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
19 Oct 2017 - 5:59 pm

http://www.misalpav.com/node/41281

ह्या आजीबाई दुसऱ्यांदा आल्या होत्या (खरं तर नातीनी बळजबरीनी आणलेलं ) ... मी विचारलं का नाही आल्या ?औषधं संपल्यावर बंद करायची नव्हती ती पण बंद केलीत... नात म्हणाली "फारच जिद्दी आहे आजी अजिबात ऐकत नाही आणि आजही बळेच घेऊन आले नाहीतर आलीच नसती.."

ह्या आजींना Vitiligo (मराठीत कोड असं वाईट नाव आहे) असल्यानी बाहेर पडणं लोकांच्या प्रश्नार्थक नजरांना तोंड देणं नको वाटत होतं , हे त्यांनी जरी नाही सांगितलं तरी कळणं अवघड नव्हतं... मी त्यांच्या कोडामुळे पांढरे डाग असलेल्या आणि सुरकुतलेल्या हातावर हात ठेवत ऐवढच बोललो... " एवढीच जिद्द दाखवायची असेल तर नियमित औषधं घेऊन दाखवा ना !! तुमच्यामुळे घरच्यांना का त्रास व्हावा ?" ...
ह्यावर आजी हलकेच हसल्या आणि मी औषधं लिहायला सुरू केलं :)

___________________•_____________

ही बाई केबिन मध्ये आल्या आल्या पाय धरते , असं करू नका म्हटलं तरी .... गेल्या ४ वर्षांपासून ईलाज घेते आहे अगदी नियमीत चार महिन्यांनी येतेच , फार काही बोलत नाही ( विचारलेल्या प्रश्नांव्यतिरीक्त) ...

बोलता बोलता बोलून गेली एकदा ..दादा ऊस तोडीला जायचं आहे , तिथं त्रास वाढतो धुळीमुळं त्रास वाढतो म्हणून उसने पैसे आणलेत तपासणी आणि औषधांसाठी...

तेव्हापासून मी ह्या पेशंटला जमेल तेवढी औषधांची सॅम्पल देतो ... खास गोष्ट अशी की ही पेशंट कधीही फी मध्ये concession मागत नाही आणि सॅम्पल देखील नाही...

का कोण जाणे अश्या पेशंटबद्दल नेहेमीच एक कुतुहल/आदर/कणव असते मनात..... _/\_

_________________•_______________

MDR TB .... टिबी चं भयंकर रूप कारण ह्याची ट्रिटमेन्ट चालते ३-३.५ वर्षे !! शिवाय बरे होण्याची शक्यता तशी कमीच....

तर ही गोष्ट आहे अश्या पेशंटची जो ह्या आजारातून बरा झाला .... मी नुकतीच प्रॅक्टीस सुरू केली होती आणि आमच्या दवाखान्यातच ट्रिटमेन्ट चालू होती ह्यांची आणि तब्बल साडेतीन वर्षे ईलाज घेतल्यावर आजार बरा झाला पण तोपर्यंत फुफ्फुसावर बराच परिणाम झालेला होता आणि टिबीनंतरचा दमा (Post TB obstructive airway disease) उद्भवलेला होता आणि पुढे नियमीत ईलाज घेणं भाग आहे....
हे काका बरेचदा बोलून जातात "डॉक्टर अहो मोठे सर आणि तुम्ही वाचवलंत हो मला टिबीपासून , फार आभरी आहे हो तुमचा ..."
मी त्यावर एवढच म्हणतो " काका तुम्ही साडेतीन वर्षे औषधं घेतलीत , त्या आधी सहा महीने सामान्य टिबीचा कोर्स पुर्ण केलात ... ह्या सगळ्यात काकू तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहील्या म्हणून MDR टिबीमधून बाहेर पडू शकलात , आम्ही निदान आणि ईलाज ह्यावर लक्ष दिलं एवढचं.... खरं तर तुमचं उदाहरण देता येतं बरेच पेशंटस् ना की बघा बरे होऊ शकता जर केवळ औषध नियमीतपणे घेतलं तर !!"

तेव्हा काका हसून मान डोलावतात आणि निघतात ....

_______________•_________________

हा पेशंट आला तेव्हा ईतका त्रासात होता की बोलणं जमत नव्हतं , सोबतचे नातेवाईक माहिती देत होते ... तपासल्या नंतर १० दिवसांची औषधं दिली आणि सांगून ठेवलेलं कि २ दिवसात बरं नाही वाटलं तर ॲडमिट करायचं कारण दम्याची ॲटॅकची सुरवात आहे पुढे कदाचीत ICU मध्येच जावं लागू शकतं....
बरोबर १० व्या दिवशी परत आले आणि सर्व तपासण्या झाल्यावर पेशंटच्या सोईनी २ किंवा ३ महिन्यांनी या म्हटलं..

हा पेशंट नियमीतपणे २ महिन्यानंतर येतोच , मी एकदा म्हणून पाहिलं की " आप अभी ४-६ महिने बाद आया करो । आपको हर २ महिने आने की जरूरत नही है। वैसेभी मेरी फिस और आने जाने का भाडे के पैसे मे आपको १ महिने कि दवा अा सकती है ... आपका फायदा है ।"
पेशंट म्हणाला "डाक्टर साब पैसे का मसला नही है , पहले दिन जब आप के पास आया था ना उस दिन मौत को करीब से देखा था मैंने... इसलीए मै तो आऊंगा २ महिने को ही और मेरे पास हमेशा १ महिने की दवा जादा रहती है।"

मला काही बोलण्यासारखं नव्हतंच पण त्या पेशंट च्या डोळ्यात जे दिसलं ते ईथे मी मांडू शकणार नाही _/\_

________________•________________

हा पेशंट दुसऱ्यांदा आला ते डायरेक्ट २ वर्षांनीच , आधीची फाईल हरवलेली , खुपच त्रास वाढलेला ......

मी बिपी घेतांना रागावण्यासाठी म्हणून बोललो "काय सांगीतलं होतं पहिल्यांदा आला होतात तेव्हा ? " ...
पेशंट उत्तरला "गंभीर दमा आहे ,औषधं सोडू नका ...."

"तरिही सोडलीत औषधं, शिवाय फाईल देखील हरवून टाकलीत .... दम्याच्या ॲटॅकची वाट बघताय का ?"... sarcasm होता माझ्याबोलण्यात ...

"ॲटॅक आला तर संपून जाईल एकदाचं ..." सहजपणे बोलून गेला पेशंट
गेला आणि दचकून मी बघतच राहिलो त्याच्याकडे .......

_________________________________

आरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रणप्रकटनविचारलेखअनुभवसल्लामाहितीप्रश्नोत्तरेआरोग्य

प्रतिक्रिया

डॉ श्रीहास's picture

19 Oct 2017 - 6:09 pm | डॉ श्रीहास

मागच्या भागात बरेच जणांनी थांबू नका असं म्हटलं .. आपण सर्वांनी दाखवलेल्या प्रेमापोटी हा आजचा भाग आणि गंमत म्हणजे ज्या दिवशी दहावा भाग लिहून संपादीत झाला त्याच दिवशी हे पेशंट्स दाखवून गेले ....

स्थितप्रज्ञ's picture

19 Oct 2017 - 7:01 pm | स्थितप्रज्ञ

वाचायला आवडेल

mayu4u's picture

19 Oct 2017 - 6:17 pm | mayu4u

सुंदर लिहिता तुम्ही! असेच लिहीत रहा! पु ले शु आणि पु भा प्र.

बाजीप्रभू's picture

19 Oct 2017 - 7:22 pm | बाजीप्रभू

हेही अनुभव आवडले.. पु ले शु

नेहमी प्रमाणेच वाचनीय! अनेकदा अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग पडणारे लेखन. पुलेशु. पुभाप्र.

शलभ's picture

19 Oct 2017 - 8:15 pm | शलभ

__/\__

डॉक.. भारी सुरू आहे लेखमाला..!!

एस's picture

19 Oct 2017 - 10:43 pm | एस

वाचतोय. लिहीत रहा.

प्रमोद देर्देकर's picture

20 Oct 2017 - 9:33 am | प्रमोद देर्देकर

वाचतो आहे.
प्रत्येक प्रसंगात तुम्हाला जे जाणवत (तुमच्या भावना )आहे तेही जरा लिहीत जा.
मालिका अजुन वाचनीय होईल.

डॉ श्रीहास's picture

20 Oct 2017 - 5:37 pm | डॉ श्रीहास

प्रमोदजी प्रतिसादासाठी धन्यवाद.... माझ्या भावना फार तोकड्या पडतात हो... मी नशिबवान आहे , मला ही लोक भेटून जातात आणि काहीतरी शिकायला मिळतं त्यातून ..... मी फक्त अनुभव कथन करू शकतो _/\_.

अत्रन्गि पाउस's picture

20 Oct 2017 - 12:26 pm | अत्रन्गि पाउस

शून्य प्रतिक्रिया आल्या तरी १११ भाग कराच ...
कारण वाचून एक सुन्न होत मन

डॉ श्रीहास's picture

20 Oct 2017 - 5:45 pm | डॉ श्रीहास

साहेब मी एक सामान्य माणूस आहे हो ... लोकांनी वाचलं ,प्रतिक्रिया दिल्या की तेवढंच बरं वाटतं.... तुम्ही द्या हो प्रतिक्रीया , अगदी नाही आवडलं तर सांगा तसं स्पष्ट , थांबवावसं वाटलं तर बेफिकीर होऊन सांगा ... पण सांगाच _/\_

मुद्दा असा कि सिरीज फार भारी चालू आहे ...ती तशीच चालू ठेवा ...आवडलेल्या आहेतच आणि म्हणून हा प्रेमाचा आग्रह ...

डॉ श्रीहास's picture

20 Oct 2017 - 10:00 pm | डॉ श्रीहास

आभारी आहे ..... लोभ असू द्या :))

नाखु's picture

20 Oct 2017 - 1:09 pm | नाखु

धुराळी धाग्यातच प्रतिक्रिया द्यायला आवडते ते इथं येणार नाहीत म्हणून म्हणून तुम्ही लिखाण थांबवु नका

असे अस्सल अनुभव फार कमी प्रमाणात लिहिले जातात

नितवाचक नाखु पांढरपेशा बिनसुपारीवाला

इरसाल कार्टं's picture

20 Oct 2017 - 7:04 pm | इरसाल कार्टं

लिहीत राहा.

सिरुसेरि's picture

20 Oct 2017 - 7:20 pm | सिरुसेरि

खुप माहितीपुर्ण अनुभव . पुभाप्र . पुलेशु .

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Oct 2017 - 11:27 pm | अमरेंद्र बाहुबली

आवडला. व प्रत्येक भाग वाचतोय.

चौकटराजा's picture

22 Oct 2017 - 9:54 am | चौकटराजा

आजकाल बहुतेक वैद्यकीय व्यावसायिकाना कमीतकमी बोलण्याचे व्रत पाळावे लागते. बाहेर अनेक पेशंट ताटकळून बसलेले असतात. घरी बायकापोरं वाट पहात असतात. कमीतकमी वेळात जास्त पेशंट (हो काही वेळेस) " उरकायचे" असतात. अशामध्ये आपण वेगळे दिसता. पैशाचे महत्व एकूणच दुनियेत वाढत आहे. त्यामुळे ते डॉ. लोकांमधे आले तर नवल नाही. तरीही एक संवेदनशील माणूस तुमच्यात जागा आहे हे पाहून मस्त वाटले.

सविता००१'s picture

22 Oct 2017 - 12:10 pm | सविता००१

अतिशय छान लेखमाला आहे तुमची डॉक्टर. कशी कोण जाणे पण वाचायची राहून गेली होती.

आज हा भाग वाचल्यानंतर पूर्ण लेखमाला आधी वाचून काढली आणि एकदमच एकत्रित प्रतिसाद देतेय.

अजिबात थांबू नका हो. फार सुरेख लिहिताय आणि त्यातून रुग्ण - एक मनुष्य किती वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो हे ही कळतय आणि तुम्हीही एक डॉक्टर म्हणून किती सह्रुदयी आहात हेही कळतय, जे सध्या कदाचित दुर्मिळ आहे.

लिहिते रहा हो. आवडतंय वाचायला.

राजाभाउ's picture

24 Oct 2017 - 6:09 pm | राजाभाउ

डॉक तुम्ही तुमच्या कडे आलेल्या पेशंटना केवळ पेशंट नाही तर माणुस म्हणुन भेटता, त्या अनुभवांकडे अत्यंत डोळसपणे पाहता. तुमच्याकडील माणुसपणाचा हा झरा असाच अखंडपणे वहात राहो.
हां आणि स्पष्ट सांगतो ते लिहीण्याचे बंद करायचे नाव सुद्धा काढु नका हो (हा आमचा आपला प्रेमाचा आग्रह हां. ह.घ्या).

सप्तरंगी's picture

24 Oct 2017 - 6:38 pm | सप्तरंगी

तुम्ही फार त्रोटक पण नेमकं लिहिता , तरीही तुमच्या तुमच्या रुग्णांबद्दलच्या सहसंवेदना / empathie आम्हाला जाणवतात आणि आम्हीही ते फील करू लागतो.

सप्तरंगी's picture

24 Oct 2017 - 6:41 pm | सप्तरंगी

empathy

मालिका फार चांगली चालली आहे. माणसं वाचता येतात तुम्हाला आणि थोडक्या शब्दात पण नीट उलगडून सांगताय तुम्ही!! वैद्यकीय माहितीही मिळते आहे. लिहित रहा ही आग्रहाची विनंती. _/\_

छान अनुभव लेखन .....

एकतर तुम्ही मिपा कर आहात म्हणून असे ड़ॉ आहात
किंवा
असे ड़ॉ आहात म्हणून मिपा कर आहात :)

डॉ श्रीहास's picture

22 Feb 2018 - 11:31 pm | डॉ श्रीहास

हा हा हा.... कमेंट आवडली बरं

पुन्हा एकादा सगळे लेख वाचुन काढले. मस्त वाटले . shashu धागा वर काढल्या बद्दल धन्यवाद.
डॉक, लेखमाला पुन्हा सुरु करावी ही अग्रहाची विनंती

डॉ श्रीहास's picture

22 Feb 2018 - 11:34 pm | डॉ श्रीहास

आज बरेच दिवसांनी मिपावर फिरकलो आणि लेख डोक्यात होताच ... त्यात तुमची कमेंट वाचून सलग २ तास बसून लिखाण/टायपिंग केलं....

आभारी आहे _/\_

एस's picture

23 Feb 2018 - 4:09 am | एस

बादवे डॉक, तुम्ही ऍलर्जीसंबंधी लिहिणार होतात तेही लिहा लगे हाथो.

शलभ's picture

23 Feb 2018 - 2:01 pm | शलभ

+१
डॉक तुमचा रेडीयो वर प्रोग्राम झालेला तो ही लेख रुपाने येऊ द्या किंवा त्या ध्वनीफिती नवीन धागा काढून त्यात टाका.