मला भेटलेले रूग्ण - ११
http://www.misalpav.com/node/41281
ह्या आजीबाई दुसऱ्यांदा आल्या होत्या (खरं तर नातीनी बळजबरीनी आणलेलं ) ... मी विचारलं का नाही आल्या ?औषधं संपल्यावर बंद करायची नव्हती ती पण बंद केलीत... नात म्हणाली "फारच जिद्दी आहे आजी अजिबात ऐकत नाही आणि आजही बळेच घेऊन आले नाहीतर आलीच नसती.."
ह्या आजींना Vitiligo (मराठीत कोड असं वाईट नाव आहे) असल्यानी बाहेर पडणं लोकांच्या प्रश्नार्थक नजरांना तोंड देणं नको वाटत होतं , हे त्यांनी जरी नाही सांगितलं तरी कळणं अवघड नव्हतं... मी त्यांच्या कोडामुळे पांढरे डाग असलेल्या आणि सुरकुतलेल्या हातावर हात ठेवत ऐवढच बोललो... " एवढीच जिद्द दाखवायची असेल तर नियमित औषधं घेऊन दाखवा ना !! तुमच्यामुळे घरच्यांना का त्रास व्हावा ?" ...
ह्यावर आजी हलकेच हसल्या आणि मी औषधं लिहायला सुरू केलं :)
___________________•_____________
ही बाई केबिन मध्ये आल्या आल्या पाय धरते , असं करू नका म्हटलं तरी .... गेल्या ४ वर्षांपासून ईलाज घेते आहे अगदी नियमीत चार महिन्यांनी येतेच , फार काही बोलत नाही ( विचारलेल्या प्रश्नांव्यतिरीक्त) ...
बोलता बोलता बोलून गेली एकदा ..दादा ऊस तोडीला जायचं आहे , तिथं त्रास वाढतो धुळीमुळं त्रास वाढतो म्हणून उसने पैसे आणलेत तपासणी आणि औषधांसाठी...
तेव्हापासून मी ह्या पेशंटला जमेल तेवढी औषधांची सॅम्पल देतो ... खास गोष्ट अशी की ही पेशंट कधीही फी मध्ये concession मागत नाही आणि सॅम्पल देखील नाही...
का कोण जाणे अश्या पेशंटबद्दल नेहेमीच एक कुतुहल/आदर/कणव असते मनात..... _/\_
_________________•_______________
MDR TB .... टिबी चं भयंकर रूप कारण ह्याची ट्रिटमेन्ट चालते ३-३.५ वर्षे !! शिवाय बरे होण्याची शक्यता तशी कमीच....
तर ही गोष्ट आहे अश्या पेशंटची जो ह्या आजारातून बरा झाला .... मी नुकतीच प्रॅक्टीस सुरू केली होती आणि आमच्या दवाखान्यातच ट्रिटमेन्ट चालू होती ह्यांची आणि तब्बल साडेतीन वर्षे ईलाज घेतल्यावर आजार बरा झाला पण तोपर्यंत फुफ्फुसावर बराच परिणाम झालेला होता आणि टिबीनंतरचा दमा (Post TB obstructive airway disease) उद्भवलेला होता आणि पुढे नियमीत ईलाज घेणं भाग आहे....
हे काका बरेचदा बोलून जातात "डॉक्टर अहो मोठे सर आणि तुम्ही वाचवलंत हो मला टिबीपासून , फार आभरी आहे हो तुमचा ..."
मी त्यावर एवढच म्हणतो " काका तुम्ही साडेतीन वर्षे औषधं घेतलीत , त्या आधी सहा महीने सामान्य टिबीचा कोर्स पुर्ण केलात ... ह्या सगळ्यात काकू तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहील्या म्हणून MDR टिबीमधून बाहेर पडू शकलात , आम्ही निदान आणि ईलाज ह्यावर लक्ष दिलं एवढचं.... खरं तर तुमचं उदाहरण देता येतं बरेच पेशंटस् ना की बघा बरे होऊ शकता जर केवळ औषध नियमीतपणे घेतलं तर !!"
तेव्हा काका हसून मान डोलावतात आणि निघतात ....
_______________•_________________
हा पेशंट आला तेव्हा ईतका त्रासात होता की बोलणं जमत नव्हतं , सोबतचे नातेवाईक माहिती देत होते ... तपासल्या नंतर १० दिवसांची औषधं दिली आणि सांगून ठेवलेलं कि २ दिवसात बरं नाही वाटलं तर ॲडमिट करायचं कारण दम्याची ॲटॅकची सुरवात आहे पुढे कदाचीत ICU मध्येच जावं लागू शकतं....
बरोबर १० व्या दिवशी परत आले आणि सर्व तपासण्या झाल्यावर पेशंटच्या सोईनी २ किंवा ३ महिन्यांनी या म्हटलं..
हा पेशंट नियमीतपणे २ महिन्यानंतर येतोच , मी एकदा म्हणून पाहिलं की " आप अभी ४-६ महिने बाद आया करो । आपको हर २ महिने आने की जरूरत नही है। वैसेभी मेरी फिस और आने जाने का भाडे के पैसे मे आपको १ महिने कि दवा अा सकती है ... आपका फायदा है ।"
पेशंट म्हणाला "डाक्टर साब पैसे का मसला नही है , पहले दिन जब आप के पास आया था ना उस दिन मौत को करीब से देखा था मैंने... इसलीए मै तो आऊंगा २ महिने को ही और मेरे पास हमेशा १ महिने की दवा जादा रहती है।"
मला काही बोलण्यासारखं नव्हतंच पण त्या पेशंट च्या डोळ्यात जे दिसलं ते ईथे मी मांडू शकणार नाही _/\_
________________•________________
हा पेशंट दुसऱ्यांदा आला ते डायरेक्ट २ वर्षांनीच , आधीची फाईल हरवलेली , खुपच त्रास वाढलेला ......
मी बिपी घेतांना रागावण्यासाठी म्हणून बोललो "काय सांगीतलं होतं पहिल्यांदा आला होतात तेव्हा ? " ...
पेशंट उत्तरला "गंभीर दमा आहे ,औषधं सोडू नका ...."
"तरिही सोडलीत औषधं, शिवाय फाईल देखील हरवून टाकलीत .... दम्याच्या ॲटॅकची वाट बघताय का ?"... sarcasm होता माझ्याबोलण्यात ...
"ॲटॅक आला तर संपून जाईल एकदाचं ..." सहजपणे बोलून गेला पेशंट
गेला आणि दचकून मी बघतच राहिलो त्याच्याकडे .......
_________________________________
Book traversal links for मला भेटलेले रूग्ण - ११
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मागच्या भागात बरेच जणांनी
१११वा भाग पण
_/\_
हेही अनुभव आवडले..
नेहमी प्रमाणेच वाचनीय
__/\__
डॉक.. भारी सुरू आहे लेखमाला..
वाचतोय. लिहीत रहा.
वाचतो आहे.
प्रमोदजी प्रतिसादासाठी
शून्य प्रतिक्रिया
साहेब मी एक सामान्य माणूस आहे
सॉरी जरा क्रिप्टीक झाला आधीच प्रतिसाद
आभारी आहे ..... लोभ असू द्या
ज्यांना
नेहमीप्रमाणे वाचनीय...
खुप माहितीपुर्ण अनुभव .
आवडला. व प्रत्येक भाग वाचतोय.
धन्यवाद ...!
फार सुरेख
डॉक तुम्ही तुमच्या कडे
तुम्ही फार त्रोटक पण नेमकं
empathy
मालिका फार चांगली चालली आहे.
एकतर तुम्ही मिपा कर आहात.........
हा हा हा.... कमेंट आवडली बरं
पुन्हा एकादा सगळे लेख वाचुन
आज बरेच दिवसांनी मिपावर
बादवे डॉक, तुम्ही
+१