मला भेटलेले रुग्ण - २

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
24 Jul 2017 - 12:46 pm

मला भेटलेले रुग्ण

त्या बाईंच्या चेहेऱ्यावर ईतकं मोठं प्रश्न चिन्ह होतं की प्रश्न छोटा पडावा !!
बाई : डॉक्टर हा दमा नाही म्हणून सांगा (बोलतांनाही दम लागतोय ) मला दमा नकोय हो....

मी : अहो तपासणी तर करू द्या ना , मगच ठरेल दमा आहे किंवा नाही ... आणि १००% आटोक्यात आणू तुमचा त्रास ..

बाई : मला ते inhaler वगैरे काही नको नुसत्या गोळ्या औषधी द्याल हो... (परत दम लागतोय)

मी : बरं बघू ,रिपोर्टस् आल्यावर ... (आणि लागणाऱ्या तपासणीची चिठ्ठी त्याच्या हातात दिली)

Spirometry ही तपासणी लागते श्वसनविकारांच्या निदानासाठी (त्यावर नंतर सविस्तर लिहीणार आहेच) आणि Xray अश्या केवळ दोनच तपासण्या होत्या ... शेवटची पेशंट होती म्हणून २५ मिनीटातच झाल्या tests...

परत केबिन मधला सीन...

मी : तपासणी दरम्यान तुम्हाला nebuliser द्वारे वाफ दिली औषधाची .. आता थोडं बरं वाटतंय ?

बाई : हो बरच बरं वाटतंय (बोलतांना लागणारा दम एकदम कमी झाला होता !)

मी : हा तुमचा जो काही श्वासाचा त्रास आहे ना तो दमाच आहे ....

बाई : अहो डॉक्टर पण मला दमा नको होता ना !!!

मी : नको होता म्हणजे ( माझ्याकडे काही बोलायलाच उरलं नव्हतं, पण उसनं अवसान आणून पुढे बोललो) अहो दमा आहेच .... आपण त्याची योग्य treatment करूयात..

बाई : बरं ठिक आहे.... मला inhaler तरी नका देऊ मग ...

मी : हे बघा inhaler तर तुम्हाला लागणार आहेच आणि बाकी कोणतही औषध त्याईतकं आराम नाही देऊ शकणार... माझ्या prescription मध्ये सर्वप्रथम inhaler च असणार आहे...

पुढची १० मिनीट्स फक्त inhaler चा वापर का जरूरीचा आहे , side effects कसे टाळायचे, सवय का लागत नाही inhaler ची, शरीरावर अपाय होत नाहीत हे सांगण्यात गेले तरीसुध्दा बाईंच्या चेहेऱ्यावरचा अविश्वास कमी नव्हता झाला....मग मी सगळं prescription लिहून झाल्यावर आमच्या दवाखान्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या patient education program ची वेळ आणि तारिख दिली ....

पेशंट बाहेर पडल्यावर थकलेला मेंदू घेऊन मी पण आवरू लागलो....

________________•________________

ते तिघं जणं केबिन मध्ये बसले होते...

आई म्हणते की हिला २०-२५ दिवसांपासून कोरडा खोकला आहे बरीच औषधं झाली देऊन पण फरक पडत नाहीये, यंदा १०वी वर्ष आहे ना आजारी नको पडायला फार ....(माझी १० वी आठवून शहारे आले !!)

मी आपलं नेहमी प्रमाणे History घेतली आणि पुढच्या तपासण्या करून घ्यायला सांगितलं..

रिपोर्ट्स हातात आल्यावर तिघांना केबिन मध्ये बोलावून रिपोर्टस् समजावून सांगितले आणि inhalers व औषधी आणून घ्यायला सांगीतली... तेव्हाच पेशंटची आई रिपोर्टस् हातात घेऊन म्हणते की काय काय दिलं आहे ? मला क्षणभर कळलंच नाही की प्रश्न काय आहे नेमका ...

मी : inhaler आणि anti-allergic औषधं आहेत ...

पे.आई : त्याचे contents काय आहेत ?

मी : inhalational steroids आणि bronchodilator (श्वासनलिका मोकळी करणारी औषधी)आहेत.

पे.आई : हिचे वडील केमिस्ट्रीचे Phd आहेत आणि मला देखील त्रास आहे म्हणून आम्ही नेहेमी औषधांचे contents बघतो .
आतापर्यंत काहीच न बोललेले पेशंटचे वडील चष्मा काढून prescription वाचू लागले ( माझं handwriting चांगल आहे बरं का , म्हणजे पेशंट वाचू शकतात)
मला लक्षात आलं कि dicussion वेगळ्या दिशेला चाललं आहे.

मी : हि औषधी safe आहेत आणि ईतकंच काय तर WHO नी पण मान्यता दिलेली आहेत...

पे.आई : अहो पण ईतक्या लहान वयात steroids कशाला द्यायची ? ( आता तर हा प्रश्न steroids ना पण पडत असेल)

मी : अहो inhaler मध्ये औषध micrograms मध्ये असतं, जे खायला दिल्या जाणाऱ्या औषधांपेक्षा हजारपटींनी कमी आहे... त्याहूनही महत्वाचं की हे औषध direct श्वासनलिकेत जाऊन ३ऱ्या मिनीटाला काम करणं सुरू करतं... शिवाय रक्तात अतिशय कमी प्रमाणात जातं त्यामुळे side effects फारच नगण्य किंवा negligible आहेत.

पे.आई : मान्य आहे हो ; पण हि बरीच लहान आहे ना ?

मी : माझ्या ३ महिन्याच्या मुलीला खोकला होता तेव्हा मी inhalers वापरूनच कमी केला होता...

आता कुठे थोडं समाधान दिसलं आई वडीलांच्या चेहेऱ्यावर...

मी : आता काय काय पथ्य पाळणार ?
( पेशंटपेक्षा नातेवाईकांचा आवडता भाग)

पे.आई : सांगा बरं हिला काहीच ऐकत नाही ही खाण्याच्या बाबतीत.... (तक्रारीच्या सुरात)

मी : बरोबर करते आहे ती !!

मुलगी एकदम खुश झाली ना ! आणि आई-वडील दोघही परेशान ;))

मी : श्वासाचा त्रास आहे म्हणून तुम्ही दही,भात, आबंट , केळी आणि लिंबू हे सगळंच बंद केलंय (almost सगळे पेशंट करतातच) पण काय फरक पडला ? झाला का खोकला बरा ? दुधानी कफ तयार होतो अस म्हणत दुध बंद केल पण कफ पडायचा काही कमी नाही झाला ना ?

पेशंट आणि आई-वडील सगळेच विचारात पडले होते...।

मी : त्यामुळे हिने सगळं म्हणजे सगळं चालू करायचं , १५ दिवसांनंतर आयस्क्रीम पण ट्राय करायला हरकत नाही !!

पेशंटच्या चेहेऱ्यावरचा आनंद ह्यॅ क्षणी मी मांडू शकत नाही .... शद्बातीत !!

केबीन मधून बाहेर पडतांना पेशंट हसत हसत तर आई-वडील कफ्युजन घेऊन होते....

_________________________________

औषधोपचार

प्रतिक्रिया

हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती.

हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती.

हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती.

हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती.

आनन्दा's picture

24 Jul 2017 - 1:16 pm | आनन्दा

???

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jul 2017 - 9:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

एस एस एस एस... चारदा एस ! भारीच आवडलेले दिसताहेत किस्से ! =))

कोंबडी प्रेमी's picture

24 Jul 2017 - 1:17 pm | कोंबडी प्रेमी

हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती.

हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती.

अत्रन्गि पाउस's picture

24 Jul 2017 - 1:29 pm | अत्रन्गि पाउस

हाभावाआ. पुआथोमोटाहिवि.

देशपांडेमामा's picture

24 Jul 2017 - 1:31 pm | देशपांडेमामा

छान लिहीलय ! आधीच्या भागासारखाच इंटरेस्टिंग आहे

पुभाप्र

देश

हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती.

डॉ श्रीहास's picture

24 Jul 2017 - 1:34 pm | डॉ श्रीहास

काय हे प्रतिसाद .......

जसं जमेल तसं लिहीतोय हो ......

आदूबाळ's picture

24 Jul 2017 - 1:36 pm | आदूबाळ

जबरदस्त! पुभाप्र!

मला दमा नकोय हो....

जी गोष्ट समोर ढळढळीत दिसते आहे ती क्लायंटला 'नको' असणं ही प्रत्येक व्यावसायिकाच्याच्या (प्रोफेशनल सर्व्हिसेस) आयुष्यात नेहेमी घडणारी घटना आहे.

यशवंत पाटील's picture

24 Jul 2017 - 1:38 pm | यशवंत पाटील

किस्से आवडलेले आहेत.

धडपड्या's picture

24 Jul 2017 - 1:44 pm | धडपड्या

हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती.

(उगाच विषयांतराचं पाप नको...)

आता एक डॉक्टरचा किस्सा सांगतो.

मी कॉलेजला असतानाची गोष्ट आहे.
एक मित्र किरकोळ ताप आणि डोकेदुखीने हैराण होता. त्याला घेऊन डॉक्टरकडे गेलो.
लहानशा गावातले छोटेसे क्लिनिक.. त्यामुळे केस पेपर वगैरे भानगड नव्हती.
फारशी गर्दीही नव्हती.
डॉक्टरांनी लगेचच आत बोलावले. तपासले. वेडेवाकडे खाणे आणि अवेळी जेवण यांमुळे पित्त झाले असावे असे सांगितले.
आंम्ही माना डोलावल्या.
डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या.
आंम्ही पैसे किती विचारले...
डॉक्टर साहेबांनी पैशाचा ड्रॉवर उघडून बघितला आणि "३० रूपये" असे सांगितले.

बाहेर पडल्यावर मित्र म्हणाला, "बहुतेक डॉक्टरांनी पिग्मीला कमी पडणारे पैशे आपल्याकडून घेतले"

(पिग्मी म्हणजे एक डेली रिकरींग असते, शक्यतो पतसंस्थेत / लोकल सहकारी बँकेत भरले जाते)

डॉ श्रीहास's picture

24 Jul 2017 - 3:05 pm | डॉ श्रीहास

पेशंट हुशार असतात....

Nitin Palkar's picture

24 Jul 2017 - 8:26 pm | Nitin Palkar

मित्राने केलेले निदान आवडले.

मराठी_माणूस's picture

24 Jul 2017 - 2:05 pm | मराठी_माणूस

पहीला प्रसंग हा तसा सर्व साधारण वाटला. काय सुचीत कारायचे आहे ते समजले नाही.

हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती.

छान लिहिलंय डॉक. असेच अजून लिहीत राहा.

सिरुसेरि's picture

24 Jul 2017 - 2:33 pm | सिरुसेरि

छान लिहिलंय .
----------------बाई : अहो डॉक्टर पण मला दमा नको होता ना !!!-------------------- मस्त किस्सा .

अरिंजय's picture

24 Jul 2017 - 2:39 pm | अरिंजय

तुमचे पेशंट तर भारी आहेतच, तुमची लेखनशैली पण लै भारी आहे.

आणि हो,
हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे
मोठे भाग टाका ही विनंती.

संजय पाटिल's picture

24 Jul 2017 - 2:57 pm | संजय पाटिल

हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती

पिलीयन रायडर's picture

24 Jul 2017 - 8:43 pm | पिलीयन रायडर

हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती. =))

खरंच आवडला हा ही भाग!

पुलेशु. पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jul 2017 - 9:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं किस्से.

मिपावर बर्‍याचदा "आता जरा कमी लेख टाका" अशी विनंती वाचली आहे. त्या पार्श्वभूमीवर जवळ जवळ सगळ्याच प्रतिसादकांकडून "थोडे मोठे भाग टाका ही विनंती" विशेष आहे... अभिनंदन ! आता टाकाच पुढचे मोठे मोठे भाग ! :)

रेवती's picture

24 Jul 2017 - 11:59 pm | रेवती

एसभाऊंशी सहमत..........चारवेळा.

ज्योति अळवणी's picture

25 Jul 2017 - 7:36 am | ज्योति अळवणी

मस्त लिहिता आहात. लवकर टाका पुढचा भाग.

आणि......

हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती.

अनिरुद्ध.वैद्य's picture

25 Jul 2017 - 9:54 am | अनिरुद्ध.वैद्य

डायग्नोस्टीक्समध्ये नाक खुपसणारे पेशंट दिव्य असतात!! अन दुसरे म्हणजे गुगल करुन लक्षणे तपासुन डॉक चं डोकं खाणारे!

माझ्या मित्राला जडलंय हे व्यसन. दरवेळी भेटला की ही तपासणी करुन घे, ते दिसतंय कॅल्शियम कमी नाहि तर अजुन काही कमी.

प्रीत-मोहर's picture

25 Jul 2017 - 12:47 pm | प्रीत-मोहर

thank you so much doctor!! ह्या भागासाठी खूप खूप धन्यवाद!!

डॉ श्रीहास's picture

25 Jul 2017 - 3:01 pm | डॉ श्रीहास

Welcome आणि थॅंकू

किरण कुमार's picture

25 Jul 2017 - 1:15 pm | किरण कुमार

छान आहे , येवू द्या अजून

अरेच्चा! माझे प्रतिसाद इतक्या वेळा का पडताहेत? :-D मोबाईल नेटवर्कची कृपा!

हाही प्रतिसाद वाचायला आवडला. पुप्रप्र आणि थोडे मोठे प्रतिसाद टाका ही विनंती.

;)

डॉ श्रीहास's picture

25 Jul 2017 - 3:21 pm | डॉ श्रीहास

:-))

डॉ श्रीहास's picture

25 Jul 2017 - 2:59 pm | डॉ श्रीहास

ईतके उस्फुर्त प्रतिसाद पाहून अजून लिहीण्याची ईच्छा होते आहे......_/\_

नीलमोहर's picture

25 Jul 2017 - 3:23 pm | नीलमोहर

येऊद्यात अजून,
आणि लहानपणापासून ऐकलंय, मेजॉरिटी विरोधात कधीही जाऊ नये, त्यामुळे,
हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती :)

इरसाल कार्टं's picture

25 Jul 2017 - 8:40 pm | इरसाल कार्टं

येऊद्यात अजून,
आणि लहानपणापासून ऐकलंय, मेजॉरिटी विरोधात कधीही जाऊ नये, त्यामुळे,
हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती :)

स्थितप्रज्ञ's picture

26 Jul 2017 - 8:58 am | स्थितप्रज्ञ

असंही ऐकलंय की जो प्रवाहाच्या विरुद्ध जातो तोच मोठ्ठा होतो....(मला काही मोठ्ठा बिट्ठा व्ह्यचं नाही, त्यामुळे "हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती")!

दम्यात काहीच पथ्य नसतं???
माझा दमा बरा होऊनही माझे वडील मला केळी खाऊ देत नाहीत. मला तुमच्या सारखे डॉ मिळाले असते तर....माझंही "रम्य ते बालपण " असतं.

डॉ श्रीहास's picture

8 Aug 2017 - 8:52 am | डॉ श्रीहास

आजपासून खायला सुरू करा.... सोबतीला पेरू, आवळा आणि लिंबू पण खा ;))

नका काळजी करू .

छानच लिहिताय तुम्ही. सगळे भाग वाचुनच प्रतिसाद देईन म्हणतोय. खुप साध्या सरळ भाषेत लिहिता. वाचायला आवडले.

बादशहा's picture

9 Feb 2020 - 3:00 pm | बादशहा

"हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती"