मला भेटलेले रुग्ण - ४

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
4 Aug 2017 - 9:22 am

http://www.misalpav.com/node/40426

सीन न. १

तुमच्या मुलाला दमा आहे , असं म्हणायचा अवकाश आईच्या डोळ्यात पाणी आणि काळजीत पडलेला बाप विचारतो " कोणत्या टेस्टस् लागतील अजून ?"
"कितीही खर्च आला तरी सांगा आम्ही करायला तयार आहोत !!"

"कोणतीही टेस्ट सांगा आम्ही तयार आहोत , काही बाकी ठेवू नका ...."

मी म्हणतो "अहो गरज होती तेवढ्या झाल्यासगळ्या आता काही करायची गरज नाही , तुम्ही काळजी करू नका ; १००% फरक पडेल ... तेवढे inhalers चालू ठेवा नियमीत "

सीन नं. २
म्हातारे वडील आणि मुलगा ,
"तुमच्या वडीलांना दमा आहे आणि ह्या काही तपासण्या व इन्हेलर्स लागणार आहेत त्यांना" असं मी सांगितल्यावर मुलगा त्रासिक चेहेऱ्यानी वडीलांकडे बघत म्हणतो " सध्या १५-२० दिवसांचं औषध गोळ्या द्या , नंतर येऊन करू सगळं"

वडीलांच्या चेहेऱ्याकडे पाहण्याची हिम्मत माझ्यात नसते ; मी कागदावर १५ दिवसांची ट्रिटमेंट लिहातांना विचार करत असतो कि ह्यातील सर्वात स्वत औषध घेतलं जाईल आणि पेशंट बहूदा परत येणार नाही.........

मी उसनं अवसान आणून इंटरकॉम वर पुढचा पेशंट पाठवायला सांगतो

_________________________________

औषधोपचार

प्रतिक्रिया

... झालं दुसरा किस्सा वाचून!

धडपड्या's picture

4 Aug 2017 - 9:39 am | धडपड्या

चांगलं चालू आहे...
कितीही त्रयस्थ भूमिका घ्यायचं ठरवलं, तरी अश्या काही घटणा चरा उमटवूनच जातात काळजावर....

थोडे मोठे भाग लिहीलेत, जरा गॅप घेऊन, तरी चालेल...

प्रीत-मोहर's picture

4 Aug 2017 - 12:04 pm | प्रीत-मोहर

:(

कपिलमुनी's picture

4 Aug 2017 - 12:19 pm | कपिलमुनी

अजून मोठे भाग असतील तत् वाचायला मजा येईल

खरे आहे. बहुतेकदा लोकांचा दृष्टिकोन अशा स्वरूपाचा असतो. बादवे डॉक, हे इनहेलर वगैरे फार महाग का असतात? किमान दोन ते तीन प्रकारचे इनहेलर असतात. प्रत्येक औषधाच्या प्रत्येक ब्रँडचे वेगळे इनहेलर. एका जेनेरिक किंवा कॉमन इनहेलरने काम भागवत का नाहीत औषधकंपन्या?

ज्याक ऑफ ऑल's picture

4 Aug 2017 - 12:41 pm | ज्याक ऑफ ऑल

जे का भांजली खांजणी
तुका साक्ष उरला दोन्ही !!

आपण फक्त पाहणे या व्यतिरिक्त काहीही करू शकत नाही.
खरं तर ही बोच टोचत राहते .. पण शेवटी "गती" ... कोणाला चुकली नाही !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Aug 2017 - 1:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

केवळ अशा अनुभवांमुळेच, "डॉक्टरमध्ये रुग्णांबद्दल अनुकंपा (sympathy) असणे जितके जरूर आहे, तितकेच त्याने सहअनुभूती (empathy) टाळण्यास शिकणे जरूर आहे." असे म्हणतात.

भ ट क्या खे ड वा ला's picture

5 Aug 2017 - 8:19 am | भ ट क्या खे ड वा ला

एका डॉक्टर मित्राने असेच सांगितले होते पुर्वी ..

ज्योति अळवणी's picture

4 Aug 2017 - 1:06 pm | ज्योति अळवणी

Ohhhh

sagarpdy's picture

4 Aug 2017 - 2:35 pm | sagarpdy

मस्त लिहिताय.
आधी म्हणलं कि मोठे भाग टाका. पण असे २-३ पण संबंधित किस्सेच मस्त वाटताहेत.

अत्रन्गि पाउस's picture

4 Aug 2017 - 2:49 pm | अत्रन्गि पाउस

काळजाला पीळ पाडणारे !!

परिंदा's picture

4 Aug 2017 - 5:06 pm | परिंदा

दमा म्हटले की कधीच बरा न होणारा रोग किंवा खोकून खोकून माणसाला पोखरवणारा रोग असा समज आहे.
हे कितपत खरे आहे?

arunjoshi123's picture

4 Aug 2017 - 5:28 pm | arunjoshi123

छान मालिका.

डॉक सुरेख लिहिता हो. पण असले काही वाचले की कसंतरीच होतं. :(

डॉ श्रीहास's picture

5 Aug 2017 - 12:53 am | डॉ श्रीहास

एस दादा व परिंदा भाऊ यांची उत्तर एका मोठ्ठा लेख किंवा लेखमाला फक्त दमा आणि समज गैरसमज अशी देऊ ईच्छीतो.... थोडा वेळ घेऊन परत येईन....

अरिंजय's picture

5 Aug 2017 - 12:46 pm | अरिंजय

उत्सुकतेने वाट बघत आहे.

भ ट क्या खे ड वा ला's picture

5 Aug 2017 - 8:22 am | भ ट क्या खे ड वा ला

छान लिहिता आहात ..
थोडं विस्ताराने लिहा ..
पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत ..

भ ट क्या खे ड वा ला's picture

5 Aug 2017 - 8:23 am | भ ट क्या खे ड वा ला

छान लिहिता आहात ..
थोडं विस्ताराने लिहा ..
पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत ..

पुढील लेखाची वाट पाहतोय!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Aug 2017 - 4:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगलं लिहिताय. वाचतोय. येऊ द्या अजून.

-दिलीप बिरुटे

संजय पाटिल's picture

6 Aug 2017 - 5:00 pm | संजय पाटिल

किस्सा चांगला म्हणावा की वाईट...
अशा दूविधेत!!!

डॉ श्रीहास's picture

22 Mar 2018 - 4:27 pm | डॉ श्रीहास

वाईटच म्हणावा लागेल.