मला भेटलेले रुग्ण - ७

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
16 Aug 2017 - 9:43 am

http://www.misalpav.com/node/40563

सकाळची OPD सुरू झाली तोच अमोल चा फोन आला (psychiatrist आहे हा) ... "अरे एक पेशंट पाठवतोय depression ची केस आहे , पण सतत दम लागतोय म्हणे अगदी बसल्या बसल्या पण "....

"बरं , बघून सांगतो " म्हणून मी फोन ठेवला आणि कामाला लागलो.. २ तासांनंतर ती पेशंट आणि तिचा नवरा आले , प्राथमिक तपासणी केली आणि श्वसनक्षमतामापन तपासणी ( spirometry ) साठी पाठवलं ..... अर्धा तासानंतर रिपोर्ट आल्यावर प्रिस्क्रीपशन लिहीण्याआधी दोघांना बोलावलं आणि स्पष्ट सांगीतलं काहीच औषध देत नाहीये कारण की हा दमा तर नाहीच पण श्वासाची क्षमता हवी त्यापेक्षा जास्तच आहे ... त्यावर आश्चर्ययुक्त चेहेऱ्यानी पेशंटनी विचारलं "दमा नाही तर मग दम का लागतोय ? "...... मी explain केलं "अहो depression च्या अनेक symptoms / लक्षणापैकी एक आहे दम लागल्यासारखं होणं, तुमचे हार्टचे पण सगळे रिपोर्ट्स नाॅर्मल आलेत असं तुम्हीच म्हणालात ना , आता फफ्फुसाचे पण नाॅर्मलच आहेत त्यामुळे काळजी करू नका; depression ची ट्रिटमेन्ट घ्या नियमीत आणि बाहेर या त्यातून ..."

दोघांच्याही चेहेऱ्यावर मंद स्मित झळकत होतं.... "येतो डाॅक्टर" निघतांना पेशंटचा नवरा म्हणाला .... मी क्षणभर थांबून म्हणलो " नका येऊ ..... माझी गरजच नाही तुम्हाला , तुमच्या डॉक्टरांना तसं कळवून देईन मी " .....

असे क्वचितच प्रसंग येतात जेव्हा मला म्हणता येतं कि नका येऊ परत आणि तरिही मला त्यात आनंद वाटतो.....

________________•________________

८ वर्षांपासून सर्दीचा त्रास आहे... अनेक ठिकाणी फिरून आलेला पेशंट समोर बसून त्रासलेल्या चेहेऱ्यानी सांगत होता ...

सतत नाक गळतंय, सारख्या शिंका येताहेत,नाकाचा फुर्र फुर्र आवाज येतो , डोळे चुरचुरत असतात अश्या विवीध तक्रारींनी ग्रासलेला हा भाऊ रडकुंडीला आलेला होता ....

ॲलर्जी टेस्ट करतांना मला पेशंटसोबत १०-१२ मिनीट्स जास्त मिळतात आणि त्यादरम्यान बऱ्याच गोष्टींचा खुलासा करता येतो किंवा सविस्तर बोलणं होतं...

अश्याच एका टेस्ट दरम्यान हा पेशंट सांगत होता की सर्दीसारखी साधारण गोष्ट कश्याप्रकारे एखाद्या माणसाला नामोहरम करू शकते .... गेल्या ८ वर्षात किमान १०-१२ ठिकाणी ईलाजासाठी फिरला होता , सतत होणाऱ्या सर्दीमुळे मन:स्वास्थ्य ढळू लागलं होतं आणि पेशंटला depression येऊ लागलं होतं आणि सर्दीचा त्रास वाढतच चालला होता ... ह्यॅ तक्रारी मी रोजच ऐकतो पण सर्दीचे पेशंट (खासकरून जुनी सर्दी) हे अगदी कंटाळून गेलेले असतात त्याचा आत्मविश्वास कमी झालेला असतो , चिडचीड वाढलेली असते .......आणि समोरचा माणुस हे समजूच शकत नाही की साधी सर्दी तर आहे त्यात काय एवढं असा अविर्भाव असतो वरून !! त्यामुळे असे पेशंट बऱ्याच धीराने आणि संयमाने बघावे लागतात .... मी त्याच्या सर्दीला आटोक्यात आणणार आहेच पण सर्दीमुळे आलेलं depression हाताळणं जास्त गरजेचं होतं .........

टेस्ट झाली , रिपोर्ट दिला... जातांना पेशंटनी विचारलं "किती वर्षं झालीत तुम्हाला प्रॅक्टीस ला ?" ......... त्याला अपेक्षित उत्तर होतं १५-१६ वर्षं ...... माझ्या चेहेऱ्यावरचं स्मितं मला जाणवलं ...

_________________________________

औषधोपचार

प्रतिक्रिया

नेहमी प्रमाणेच छान पण....दुसरा किस्सा थोडा अपूर्ण वाटतो.

डॉ श्रीहास's picture

16 Aug 2017 - 10:08 am | डॉ श्रीहास

Depression मुळे (जाणवणारे पण नसलेले) आजार आणि आजारांमुळे येणारं depression असा काहीसं जोडण्याचा प्रयत्न केलाय..

सुबोध खरे's picture

16 Aug 2017 - 10:24 am | सुबोध खरे

depression किंवा नैराश्य हा सहज सर्वत्र आढळणारा आजार आहे आणि दुर्दैवाने भारतात त्याबद्दल समाजामध्ये जागृती फार कमी असून मनोविकार तज्ज्ञांची सुद्धा फार कमतरता आहे. विविध राज्यांमध्ये ७७% -९० % कमतरता आहे.
पहा
Recently conducted world mental health surveys indicate that major depression
is experienced by 10-15% people in their lifetime
and about 5% suffer from major
depression in any given year. Lifetime prevalence of all depressive disorders taken
together is over 20%, that is one in five individuals.
In Indian context, a recent large sample survey with rigorous methodology reported
an overall prevalence of 15.9% for depression,
which is similar to western figures.
There is some suggestion that perhaps the prevalence of depression has increased over
past few decades.
In India, the average nationaldeficit of psychiatrists has been estimated to be 77%,
approaching over 90% in several
states.
http://japi.org/september_2014/09_ra_depressive_disorders.pdf
AIIMS च्या मनोविकार तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनाचा हा गोषवारा

डॉ श्रीहास's picture

16 Aug 2017 - 10:31 am | डॉ श्रीहास

२०२० मध्ये जगात सगळ्यात जास्त मानसिक आजारांचे रुग्ण भारतात असतील....

Nitin Palkar's picture

16 Aug 2017 - 11:01 am | Nitin Palkar

२०२० मध्ये जगात सगळ्यात जास्त.... हा निष्कर्ष भारतीय संस्थांनी, भारतीय परिस्थितीवर आधारित निकषांवर केलेल्या सर्वेक्षणावर आधारित आहे का?

डॉ श्रीहास's picture

16 Aug 2017 - 5:29 pm | डॉ श्रीहास

मी माझ्या सायकॅट्रीस्ट मित्राशी बोललो ,Depression & related diseases हे जगात नं.२ वर आहे disability (समानार्थी शब्द नाही सुचला) बाबतीत... प्रथम क्रमांकावर ischemic heart disease (हृदय विकार) आहेत आज.... २०२० मध्ये १ नंबर वर depression असेल , undiagnosed & untreated केसेस फारच मोठ्याप्रमाणावर आहेत सध्या.... मी जी कमेंट केलेली आहे त्यावर सध्यातरी ठोस पुरावा नाही मिळाला ..पण आंतरराष्ट्रीय संशोधन / international studies तरी हेच आकडे दाखवत आहेत...
WHO चं या वर्षाचं ब्रिद वाक्य : Depression,let's talk !!

अप्पा जोगळेकर's picture

16 Aug 2017 - 11:54 am | अप्पा जोगळेकर

नैराश्य बहुधा प्रत्येकच माणसाला येत असते. म्हणजे अपयश नाहीच असे लोक किती असतील ?
हे मी अशासाठी विचारत आहे कारण परिचयातील काही व्यक्तींना 'चिडचिडा, तापट स्वभाव आहे' असे लेबल आपण मनातल्या मनात चिकटवलेले असते.
जर ती व्यक्ती डिप्रेशनने आजारी असेल तर तिला मदत करण्याऐवजी असे लेबल लावणे तरी थांबेल.

सुबोध खरे's picture

16 Aug 2017 - 12:13 pm | सुबोध खरे

दुःख आणि नैराश्य( आजार) यातील फरक
सध्या शब्दात( भाषांतर करायचा कंटाळा आला आहे).
The Difference Between Sadness and Depression

Sadness is a normal human emotion. We’ve all experienced it and we all will again. Sadness is usually triggered by a difficult, hurtful, challenging, or disappointing event, experience, or situation. In other words, we tend to feel sad about something. This also means that when that something changes, when our emotional hurt fades, when we’ve adjusted or gotten over the loss or disappointment, our sadness remits.

Depression is an abnormal emotional state, a mental illness that affects our thinking, emotions, perceptions, and behaviors in pervasive and chronic ways. When we’re depressed we feel sad about everything. Depression does not necessarily require a difficult event or situation, a loss, or a change of circumstance as a trigger. In fact, it often occurs in the absence of any such triggers. People’s lives on paper might be totally fine—they would even admit this is true—and yet they still feel horrible.

Depression colors all aspects of our lives, making everything less enjoyable, less interesting, less important, less lovable, and less worthwhile. Depression saps our energy, motivation, and ability to experience joy, pleasure, excitement, anticipation, satisfaction, connection, and meaning. All your thresholds tend to be lower. You’re more impatient, quicker to anger and get frustrated, quicker to break down, and it takes you longer to bounce back from everything.
How people struggling with depression are often expected to "snap out of it," and are told "it’s all in your head," or "choose to be happy!" Such sentiments reflect a deep misunderstanding of depression. It only makes the person with depression feel worse.
https://www.psychologytoday.com/blog/the-squeaky-wheel/201510/the-import...

सुबोध खरे's picture

16 Aug 2017 - 12:14 pm | सुबोध खरे

मूळ सुंदर लेखाला फाटे फुटू नयेत म्हणून फक्त दुवा दिला आहे जिज्ञासूंनी वाचून पहा.

अत्रे's picture

16 Aug 2017 - 9:59 am | अत्रे

छान.
सर्दी बद्दल दोन प्रश्न -

१. बऱ्याचदा सकाळी थंड हवामानात सर्दी का होते? आणि दुपार होताच ही सर्दी निघून का जाते?

२. सर्दी वर अजूनही कोणतीच लस का नाही? नेहमीसाठी या त्रासापासून सुटका नाही मिळणार का?

सुबोध खरे's picture

16 Aug 2017 - 10:11 am | सुबोध खरे

जुनी म्हण आहे
सर्दीवर औषध घेतलं तर आठवड्याभरात बरी होते
नाही घेतलं तर "पूर्ण सात दिवस " लागतात
अर्थात हे सर्व नेहमीच्या सर्दी साठी
ऍलर्जीमुले होणारी सर्दी औषधोपचार न केल्यास फार त्रास देऊ शकते.

डॉ श्रीहास's picture

16 Aug 2017 - 10:28 am | डॉ श्रीहास

ॲलर्जीची सर्दी आणि दमा यावर लिखाण करत आहे... लवकरच ह्यॅ आणि अश्यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तर एकत्रीत पणे देईन

प्रशांत's picture

16 Aug 2017 - 11:10 am | प्रशांत

वाट पाहतोय... डॉक

रच्याकन हा ही भाग आवडला.

मोदक's picture

16 Aug 2017 - 12:54 pm | मोदक

+११

पुढील लेखमालेची वाट पहात आहे.

राजाभाउ's picture

16 Aug 2017 - 5:03 pm | राजाभाउ

+११ आसेच म्हणतो.

स्थितप्रज्ञ's picture

16 Aug 2017 - 12:54 pm | स्थितप्रज्ञ

येउद्या लौकर.

प्रीत-मोहर's picture

16 Aug 2017 - 2:21 pm | प्रीत-मोहर

याची खूप वाट बघत आहे , फार वाट पहायला लावु नका डॉ़ :)

धडपड्या's picture

16 Aug 2017 - 10:14 am | धडपड्या

मस्त वाटलं वाचून...

सहृदयता अशीच जपून ठेवा...

मराठी_माणूस's picture

16 Aug 2017 - 10:58 am | मराठी_माणूस

असे क्वचितच प्रसंग येतात जेव्हा मला म्हणता येतं कि नका येऊ परत आणि तरिही मला त्यात आनंद वाटतो.....

हे वाचुन छान वाटले.

मनिमौ's picture

16 Aug 2017 - 11:57 am | मनिमौ

येऊदे

भ ट क्या खे ड वा ला's picture

16 Aug 2017 - 12:48 pm | भ ट क्या खे ड वा ला

असे डॉक्टर मिळणं हे भाग्यच पेशंटचे ..
दुसरा भाग अजुन थोडा विस्तृत हवा होता .

डॉ श्रीहास's picture

16 Aug 2017 - 5:51 pm | डॉ श्रीहास

दुसरा अनुभव मला शब्दात मांडता येतच नव्हता... प्रयत्न केला .... कधी कधी अश्या गोष्टी घडतात , ज्या शब्दांमधे गुफतांना त्याची intensity संपुन जाते _/\_

स्थितप्रज्ञ's picture

16 Aug 2017 - 12:50 pm | स्थितप्रज्ञ

असे क्वचितच प्रसंग येतात जेव्हा मला म्हणता येतं कि नका येऊ परत आणि तरिही मला त्यात आनंद वाटतो.....

"हॉस्पिटलमधून निघताना येते नाही जाते म्हणावं" - 'ती फुलराणी' (किंवा 'बेबी', नीटस आठवत नाही) मधला हा डायलॉग आठवला.

दुसऱ्या अनुभवाबद्दल सविस्तर बोलेन तुमच्याशी...

नितीन पाठक's picture

16 Aug 2017 - 2:11 pm | नितीन पाठक

डॉक,
नेहमी प्रमाणे एक छान अनुभव वाचायला मिळाला.
मस्त.
मी अजून एक सुचवतो .....
या लेखमाले (म्हणजे मला भेटलेले रुग्ण ) बरोबर, तुम्ही मला भेटलेले रूग्णांचे नातेवाईक अशी अजून एक लेखमाला सुरू करा. माझ्या मते ती जास्त रंगतदार होईल ........

स्थितप्रज्ञ's picture

16 Aug 2017 - 3:01 pm | स्थितप्रज्ञ

अनुमोदन

शैलेन्द्र's picture

16 Aug 2017 - 2:52 pm | शैलेन्द्र

दोन्ही अनुभव छान, आवडले

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Aug 2017 - 3:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालली आहे मालिका !

दुसर्‍या भागाच्या शेवटाबद्दल अनेक जणांनी संभ्रम दाखवला आहे यासाठी, त्याबद्दल काही...

जातांना पेशंटनी विचारलं "किती वर्षं झालीत तुम्हाला प्रॅक्टीस ला ?" ......... त्याला अपेक्षित उत्तर होतं १५-१६ वर्षं ...... माझ्या चेहेऱ्यावरचं स्मितं मला जाणवलं ... याचा सोप्या मराठीत अर्थ असा...

डॉक्टरांनी रुग्णाची अ‍ॅलर्जी टेस्ट करताना पेशंटशी गप्पा मारता मारता, (अ) वैद्यकीय उपयोगाची माहिती काढून घेतली (हा तपासणीचा भाग झाला) आणि (आ) पेशंटला बोलता करून त्याच्या मनावरचा भार कमी केला (हा मानसिक उपचाराचा भाग झाला). (संदर्भ : ॲलर्जी टेस्ट करतांना मला पेशंटसोबत १०-१२ मिनीट्स जास्त मिळतात आणि त्यादरम्यान बऱ्याच गोष्टींचा खुलासा करता येतो किंवा सविस्तर बोलणं होतं... आणि ...आणि समोरचा माणुस हे समजूच शकत नाही की साधी सर्दी तर आहे त्यात काय एवढं असा अविर्भाव असतो वरून !! त्यामुळे असे पेशंट बऱ्याच धीराने आणि संयमाने बघावे लागतात .... मी त्याच्या सर्दीला आटोक्यात आणणार आहेच पण सर्दीमुळे आलेलं depression हाताळणं जास्त गरजेचं होतं .........) जुनाट दुखणे असलेल्या रुग्णाला, "आपल्या त्रासाबद्दल कोणाला ममत्व आहे आणि ती व्यक्ती वेळ देऊन आपले म्हणणे ऐकते आहे", हा अनुभवच बराचसा दिलासा आणि आराम देऊन जातो.

डॉक्टरांच्या या कौशल्यामुळे (व रुग्णाच्या मनात पूर्वानुभवांबरोबर त्याची मनोमन सहज तुलना झाल्यामुळे) रुग्णाला "या डॉक्टरांच्या मागे नक्कीच दशकांमध्ये मोजता येण्याजोगा अनुभव असावा" असे वाटले असावे. म्हणून त्याच्या तोंडी सहजपणे, "किती वर्षं झालीत तुम्हाला प्रॅक्टीस ला ?" हा प्रश्न आला. मात्र, वरचे सर्व पाहता, सरळ उत्तर न देता, विनयाने व जरा आडवळणाने* त्यांनी "माझ्या चेहेऱ्यावरचं स्मितं मला जाणवलं ..." असं लिहिले आहे...

याचा माझ्या मते अर्थ असा की, डॉक्टरांची प्रॅक्टीस १० वर्षांपेक्षा कमी आहे. अश्या वेळेस रुग्णाकडून अशी विचारणा होणे ही ज्ञानाचे आणि व्यवसायकौशल्याचे एक सुखद सर्टिफिकेट असते (डॉक्टरांचे ते स्मित याचाच पुरावा आहे) ! ही झाली माझी समजूत. खरे खोटे डॉ श्रिहासच सांगू शकतील. :)

===================

* : विनय व संयमित लिखाण या दोन प्रशंसनिय गुणांबद्दल डॉक्टरांना २००% गुण !

अवांतर : Time guarantees only gray hair (if there are any left) and nothing else ! अर्थातच, कोणाच्या वयावरून किंवा त्याच्या अनुभवांच्या वर्षांवरून त्याचे कौशल्य मोजणे बर्‍याचदा चुकीचे ठरते... विशेषतः उच्च कौशल्यांच्या बाबतीत तरी !

ज्योति अळवणी's picture

16 Aug 2017 - 4:11 pm | ज्योति अळवणी

दमा, पाठ-मान दुखणे(स्पॉंडिलिसिस/स्लिपडिस्क) हे आजार अनेकदा मानसिक ताणामुळे असतात; अस वाचलं आहे. गेल्या वर्षी मला मान आणि पाठदुखीचा त्रास जवळ जवळ दीड महिना होत होता. फिजिओथेरपिस्ट रोज ट्रीटमेंट देत होती. काही दिवसात ती माझी मैत्रीण झाली तेव्हा गप्पांच्या ओघात त्यावेळी कामाचा आणि घरच्या टेन्शनचा खूप त्रास होतो आहे असे मी सांगताच ती म्हणाली म्हणूनच दीड महिना रोज ट्रीटमेंट घेऊन उपयोग होत नाहीये. तू एकतर विचार करणे बंद कर किंवा ट्रीटमेंट बंद कर. कारण मनावर ओझे असेल तर ट्रीटमेंट चा उपयोग होत नाही.

डॉ श्रीहास's picture

16 Aug 2017 - 5:44 pm | डॉ श्रीहास

दमा,संधिवात,हायपरटेन्शन (हाय बिपी), मधूमेह असे आटोक्यात आणण्यासारखे आजार बळावू शकतात....
काय करता येईल
१.न लाजता किंवा वाईट न वाटून घेता मानसोपचारतज्ञांचा सल्ला घेणे .... stress management साठी .... मनावरचा ताण शरीराच्या आजारपणाला exponentially वाढवतो म्हणून professional help घेणे गरजेचे ठरते ..
२.नियमीत व्यायाम करा (तुमच्या आजारांना साभाळून) डॉक्टराच्या सल्ल्यानीच.... endorphins (feel good harmones) तुमच्या मानसिक ताणाला पळवून लावतील .
३.विचार बंद करता येत नाहीत.... हृदयाला तु ठोके बंद ठेव असं म्हटल्यासारखं आहे !!

सिरुसेरि's picture

16 Aug 2017 - 5:05 pm | सिरुसेरि

छान माहिती . आनंदमधल्या डॉ . बाबुमोशायची आठवण झाली .

किरण कुमार's picture

16 Aug 2017 - 6:27 pm | किरण कुमार

नेहमीप्रमाणे छान

" नका येऊ ..... माझी गरजच नाही तुम्हाला असे डॉक्टर आवडतात ब्वा
पुलेशू

स्वच्छंदी_मनोज's picture

16 Aug 2017 - 7:07 pm | स्वच्छंदी_मनोज

इतर भागांसारखा हा पण भाग मस्तच. असे पॉझीटीव्ह एनर्जीने पेशंटला ट्रीट करणारे डॉक असतील तर कुठल्याही पेशंटला आवडतीलच..
पुढील भाग जरा दमाने टाकलात तरी चालेल पण तिन चार अनुभवांचा टाका..

असे पॉझीटीव्ह एनर्जीने पेशंटला ट्रीट करणारे डॉक असतील तर कुठल्याही पेशंटला आवडतीलच.

+1111111111

आणि असे डॉक्टर आमचे मित्र आहेत हे सांगायला तर अजूनच आवडतं आम्हाला.. :)

अभ्या..'s picture

16 Aug 2017 - 7:27 pm | अभ्या..

डॉ. श्रीहास हे एक लैच भारी व्यक्तिमत्व आहे.

देशपांडेमामा's picture

18 Aug 2017 - 6:27 pm | देशपांडेमामा

हेच टंकायला आलो होतो !

देश

अंजनेय's picture

17 Aug 2017 - 3:54 pm | अंजनेय

डॉक्टर छान लिहले आहे. लेख आवडला.

अभिजीत अवलिया's picture

18 Aug 2017 - 10:24 am | अभिजीत अवलिया

सगळे भाग आवडले.