तारे तोडण्याची स्पर्धा

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
9 Apr 2013 - 6:03 pm

नुकत्याच एका सत्तेतल्या प्रसिध्द नेत्याने दुष्काळाविषयी अश्लाघ्य विधाने करुन तारे तोडले नंतर लाईट जाण्याविषयीही तारे तोडले , मग त्याला उत्तर म्हणुन दुसर्‍या नेत्याने तारे तोडले .

एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे .

असो तर तारे तोडण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांच्या वाक्यांचे हे कलेक्षन !

तळटीप :
१) ज्येष्ट नेत्यांनी वापरलेल्या अश्लाघ्य शब्दांचा वापर टाळावा
२) दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे.
३) जे वाक्य आवडले त्याला +१ द्यावा म्हणजे विजेता कोण हे ठरवता येईल .

कलासुभाषितेविनोदराजकारणविचारप्रतिक्रियाबातमीमतवादप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

9 Apr 2013 - 6:08 pm | प्रसाद गोडबोले

चाऊमेन खाणे हे वाढत्या रेप्स मागील कारण आहे - खाप पंचायत

( आत्तापर्यंत तोडलेला सर्वात मोठ्ठा तारा ...माझ्या मते ! )

आशु जोग's picture

9 Apr 2013 - 10:45 pm | आशु जोग

लोकहो खाप पंचायत बद्दल आपल्याला काय माहिती आहे ?

मेडीया जे दाखवते तेच सत्य मानायला लागलात तर अवघड आहे.

पुढचा मागचा संदर्भ सोडून वक्तव्ये प्रसिद्ध करणे हा मेडीयाचा धंदा आहे
पण
त्यांनी फेकेलेले हाडूक खरे मानून चघळले तर पंचाईत(पंचायत नव्हे) होइल

विकास's picture

10 Apr 2013 - 12:49 am | विकास

तुम्हाला जर यासंदर्भात काही वेगळी माहिती असेल तर अवश्य एक वेगळा धागा काढून सांगा ही विनंती!

तर्री's picture

9 Apr 2013 - 6:28 pm | तर्री

इंडिया इज इंदिरा हे आसाम चे भूतपूर्व मुख्यमंत्री बारुवा यांचे विधान म्हणजे कोंग्रेस मधील लांगूलचालनाची कमाल.

सगळी भाषणबाजी म्हणजे तारेच असतात. किती लक्षात ठेवायचं? तरी सोप्पं म्हणून लक्षात राहिलेलं 'छोटे छोटे शहरोंमे...." आहे. ;)

श्रीरंग_जोशी's picture

9 Apr 2013 - 6:41 pm | श्रीरंग_जोशी

२००५ साली राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणाले होते की, गोडबोले समितीच्या अहवालामुळेच महाराष्ट्र खड्ड्यात गेला. काही वर्षांपूर्वी उर्जा विषयाशी संबंधीत कुठल्यातरी समस्येबद्दल राज्य सरकार ने निवॄत्त केंद्रीय सचिव माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. राज्याची भविष्यातील उर्जा गरज हा त्या समितीला दिलेला विषय नव्हता. अहवालात संदर्भ म्हणून भविष्यातली वीजेची गरज म्हणून ढोबळ आकडेवारी डकवण्यात आली होती.

शरद पवारांचे म्हणणे होते की त्या आकडेवारीच्या आधाराने राज्य सरकारने उर्जा धोरण आखले व ते फसले. राज्यभरात जोरदार भारनियमन सुरू झाले. उर्जा मंत्रालय अर्थातच राष्ट्रवादीकडे होते.

दुसर्‍या दिवशीच्या बहुतांश अग्रलेखांत पवारांवर बरेच सरशंधान झाले होते की एकदाचे मान्य तर केले की महाराष्ट्र खड्ड्यात गेलाय मग तो कसा का गेला असेना? प्रशासकीय अनुभवाच्या बाबतीत राज्याचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवारच म्हणत असतील तर राज्य खड्ड्यात गेले असण्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही.

कापूसकोन्ड्या's picture

9 Apr 2013 - 7:09 pm | कापूसकोन्ड्या

સૌના સાથ સૌના વિકાસ - नरेन्द्र मोदी

સૌના સાથ સૌના વિકાસ - मराठी मध्ये याचा काय अर्थ आहे ?

कापूसकोन्ड्या's picture

9 Apr 2013 - 8:01 pm | कापूसकोन्ड्या

Sauna saath sauna vikas – All together, growth for all!

विजुभाऊ's picture

10 Apr 2013 - 8:45 pm | विजुभाऊ

સૌના સાથ સૌના વિકાસ = सर्वांची साथ सर्वांचा विकास
सौ = सर्व ( मूळ शब्द सहु = सगळे )

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2013 - 7:45 pm | श्रीगुरुजी

>>> एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे .

त्या फ्रान्सच्या राणीचे नाव मेरी अ‍ॅन्टोनेट असे होते. पण तिची आणि आपल्या पुढार्‍यांची तुलना अप्रस्तुत आहे. ती असे काही म्हणाली होती याचा कोणताही पुरावा नाही. ही एक अफवा होती. आणि मुख्य म्हणजे ती जेव्हा असे म्हणाली असे सांगतात तेव्हा तिचे वय १४ वर्षे होते, म्हणजेच त्या वयात तिला फारशी समज नव्हती व आपण काय बोलत आहोत हे तिला समजले नव्हते.

रविवारी ज्यांनी दुष्काळग्रस्तांबाबत किळसवाणे उद्गार काढले त्याचा स्पष्ट पुरावा आहे व त्यांचे वय फ्रान्सच्या राणीच्या जवळपास चौपट आहे व त्यांनी पूर्ण समजूनउमजून हे तारे तोडले आहेत.

"हुकूमशाहीत सगळं सोप्पं असतं. मी हुकूमशहा असेपर्यंत तर नक्कीच." - जॉर्ज डब्ल्यू बुश (ज्यु.)

कापूसकोन्ड्या's picture

9 Apr 2013 - 8:00 pm | कापूसकोन्ड्या

Sauna saath sauna vikas – All together, growth for all!

नव्वद टक्के जनता मूर्ख आहे- उदाहरणार्थ.

प्रसाद गोडबोले's picture

9 Apr 2013 - 8:13 pm | प्रसाद गोडबोले

काटजु सध्या आघाडीवर आहेत काय तर म्हणे
संजयदत्तने गांधीगिरीचा प्रचार केलाय , खुप भोगलय म्हणुन त्याची शिक्षा माफ करा !!

प्रसाद गोडबोले's picture

15 Apr 2013 - 12:23 pm | प्रसाद गोडबोले

पाचवीपर्यंत उर्दूचे शिक्षण सक्तीचे करा
उर्दू ही प्रेम आणि शांतीचा संदेश देणारी भाषा असल्याचे सांगत काटजू म्हणाले, की
उर्दू ही सर्वसामान्यांची भाषा आहे.
मला वाटते, की इंग्रजी, हिंदी आणि उर्दू ही प्रत्येक शाळेत सक्तीची केली पाहिजे.
गुगलही उर्दूतून सुरू झाले पाहिजे.
या भाषेचा वापर मोबाईलवरही टायपिंगसाठी करण्यात आला पाहिजे

६ बॉल ६ सिक्सर !! =))

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Apr 2013 - 4:24 pm | श्री गावसेना प्रमुख

नामांतर कधी करताय्,नवे भ्रमनिराश होतिल

इरसाल's picture

9 Apr 2013 - 8:05 pm | इरसाल

गिरीजा यांना उल्लेखुन नाही याची नोंद घ्यावी.

"श्रीगुरुजी हे नेहमीच पुरावे देवुन लोकांना तोंडावर पाडत असतात."

विकास's picture

9 Apr 2013 - 8:13 pm | विकास

मस्त धागा.

दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे.

हे "तारे तोडणारे विधान" नाही त्यामुळे त्या अर्थाने नाही, पण +१ ! :-)

प्रत्यक्ष तारे तोडण्यासंदर्भात नाही कारण यातील कोणत्याच व्यक्ती तितक्या "लहान" नाहीत/नव्हत्या. पण विखारी टिका करण्याच्या उद्देशाने बोलताना कधी कधी कसे जरा जास्तच बोलले जाते याची काही उदाहरणे आणि काही तारे, पण यातील कुठलेही विधान आणि व्यक्ती वरील स्पर्धेत येऊ शकेल असे वाटत नाही, त्यामुळे निव्वळ अवांतर समजावेत: (आठवणीतून सांगत आहे, दुवा नाही. चूकीचे काही असल्यास अवश्य सांगावेत)

  1. यशवंतराव चव्हाण (का शंकरराव?) आणिबाणीच्या काळात पुलंना "विदुषक" म्हणाले होते.
  2. मला वाटते विधानसभेत "सत्ताधारी - विरोधी" अशी बाचाबाची चालू असताना - एकदा शरद पवार मृणाल गोरेंना पुतना मावशी म्हणाले तर मृणाल गोरे पवारांना "कंस मामा" म्हणाल्या
  3. बाळासाहेब एकदा मृणाल गोरेंवर टिका करताना त्यांना "घॄणाल गोरे" म्हणाले होते, शरद पवारांना कांद्याचे पोते - अजून भरपूर सांगता येईल.
  4. अत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री कन्नमवारांवर टिकेचा भडीमार करताना - कन्नमवार की कंडमवार? असे म्हणले होते.
  5. राजीव गांधींच्या "हमे उन्हे उनकी नानी याद दिलाएंगे" विधानाने पब्लीक हसले होते (अर्थात तो त्यांनी विनोद केला नव्हता ही गोष्ट वेगळी!)
  6. मधू दंडवत्यांसारखी सन्मान्य आणि अजातशत्रू असलेली व्यक्ती एकदा म्हणाली: "हिंदूंपेक्षा मुसलमान हे जास्त भारताशी इमान राखून आहेत. कारण, मेल्यावरही ते मातीत रहातात!" (मला वाटते त्यानंतरच्या लोकसभेच्या निवडणूकीत ते त्यांचा बालेकिल्ला हरले!)
  7. इंदीरा गांधी एकदा वृत्तपत्रात येणार्‍या टिकेसंदर्भात म्हणाल्या होत्या की त्यांना काय किंमत देयची, ती उद्याची रद्दीच आहे. (त्यांच्या हत्येनंतर, त्या बातम्या देणारी वर्तमानपत्रे रद्दीत टाकताना, या वाक्याची खूप आठवण झाली होती).
श्रीरंग_जोशी's picture

9 Apr 2013 - 8:32 pm | श्रीरंग_जोशी

सेनाप्रमुख शरद पवारांना मैद्याचे पोते म्हणाले होते कांद्याचे नव्हे.

त्यावर उत्तर म्हणून शरद पवार सेनाप्रमुखांना 'मैद्याचेच पोते पण रिकामे' असे म्हणाले होते :-).

यावरून खालिल चर्चा आठवली :-)
राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने

विकास's picture

9 Apr 2013 - 8:42 pm | विकास

दुरूस्तीबद्दल धन्यवाद!

अधिराज's picture

9 Apr 2013 - 9:23 pm | अधिराज

शीला दीक्षित यांनी दरमहा सहाशे रुपये,पाचजणांच्या कुटुंबाला पुरायला काय हरकत आहे, असे म्हटले होते.

पिवळा डांबिस's picture

9 Apr 2013 - 10:01 pm | पिवळा डांबिस

"बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है!" - आराराबा पाटील
"आधी केला ताश्कंद, नंतर केला सिमला; आता बोंबला!!!" - बाळासाहेब ठाकरे
:)

आशु जोग's picture

9 Apr 2013 - 10:50 pm | आशु जोग

मिसळीवरच्या लोक्सच्या स्वाक्षर्‍या
हेही एक तारे तोडणेच ...

पण मिपावर राजकारणी लोक नसावेत (असा अंदाज आहे) :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Apr 2013 - 2:51 am | निनाद मुक्काम प...

वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष ऐका

युवराज म्हणतात.
राजकारण तुमच्या शर्ट मध्ये आहे आणि पॅन्ट मध्ये पण आहे प्रत्यक्ष ऐका. पुढचे वाक्य तर समजतच नाही शर्ट मध्ये आहे आणि पॅन्ट मध्ये

बाकी सर्व जाउ दे.
माननिय विश्व बन्धू गुप्ता, ज्या गोष्टित आपल्यालाithe काहीही ??ट सुद्धा कळत नसताना कसे तारेत तोडावेत? काहीही
मिपा वर बरेच क्लाउड कॉम्प्युटिंग चे तद्न्य आहेत त्यांनि यावर मत नोंदवावे
१.सिम वरचि माहिती ब्याटरी मध्ये जाते,
२.पावसामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग काम करत नाही.
अशी वाक्ये वाचून डोक्याम्ध्ये दही जाउन विरजण लागले आहे.

असो मजा करा.

प्रसाद गोडबोले's picture

10 Apr 2013 - 2:20 pm | प्रसाद गोडबोले

२.पावसामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग काम करत नाही

=)) =)) =))

विकास's picture

10 Apr 2013 - 7:48 pm | विकास

आत्ता हसून घ्या लेको! पण पावसाळ्यात समजेल तुमच्या क्प्म्युटींगवर क्लाऊडमधून कसे पाणी पडते ते. ;)

आशु जोग's picture

11 Apr 2013 - 11:48 am | आशु जोग

क्लाऊडचा सर्वर ढगांच्यावर ठेवावा

पावसामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग काम करत नाही.

=)) =)) =)) =)) =)) =))

बापरे, डोक्यातल्या दह्याचे बाष्पीभवन होऊन जो पाऊस पडेल त्यामुळे अंतर्गत वायरिंग काम करेना झालेय.

चिरोटा's picture

10 Apr 2013 - 2:05 pm | चिरोटा

निर्णय न घेणे हा सुद्धा निर्णय असतो.Not taking decision is also a decision.
पी. व्ही. नरसिंहराव.

विकास's picture

10 Apr 2013 - 7:50 pm | विकास

पण याला तारे तोडणे म्हणता येणार नाही... "बोले तैसा चाले ... " म्हणावे लागेल. ;)

विजुभाऊ's picture

10 Apr 2013 - 8:48 pm | विजुभाऊ

" ये जो सरकार है ये हमारे पानीमेसे बिजली निकालती है और वो पानी फिर खेती को देती है. इसलीये हम गरीब रहते है".........देवीलाल

विकास's picture

10 Apr 2013 - 9:00 pm | विकास

"Indian Railways is the responsibility of Lord Vishwakarma. So is the safety of passengers... It is His duty, not mine. I have been forced to don His mantle," रेल्वेचे वाढत गेलेया अपघातांसंदर्भात, तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव

प्रदीप's picture

12 Apr 2013 - 9:39 pm | प्रदीप

.

मैत्र's picture

10 Apr 2013 - 9:01 pm | मैत्र

राजू शेट्टी यांच्या विरोधात दादांनी भाषण केले होते गेल्या निवडणूकांमध्ये की - तुम्ही मतं दिलीत तर आम्ही विकास करू म्हणजे दूध संघ, साखर कारखाने, सोयी, रस्ते वगैरे.. मतं प्रभागाप्रमाणे समजतात आता. मतं न मिळता विकास करण्याचं काही कारण नाही. जे मतदारसंघ आम्हाला निवडून देतील त्यांचाच आम्ही विकास करू..
आम्ही काही सोशल वर्क करत नाही. राजकारण करतो."

नेमके शब्द माझ्या लक्षात नाहीत. शोधलं तर कदाचित मिळतील.. पण असं विधान केलं आणि त्यांचा उमेदवार दणकून पडला होता इतकं आठवतंय..

श्रीरंग_जोशी's picture

10 Apr 2013 - 9:03 pm | श्रीरंग_जोशी

एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवू - तत्कालिन विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपिनाथ मुंडे.
कर्नाटकसोबतचे पाणीवाटप करात कृष्णेच्या पाण्यात बुडवू - तत्कालिन उपमुख्यमंत्री आर आर पाटिल (हे प्रथम नाव का वापरत नाही? राघोबा वगैरे असे आहे का?)

विकास's picture

10 Apr 2013 - 9:07 pm | विकास

मुंडे की बाळासाहेब? (दोघांची भुमिका तीच होती, पण हे विशिष्ठ वाक्य मला वाटते बाळासाहेबांचे होते).

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2013 - 9:00 pm | श्रीगुरुजी

>>> एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवू - तत्कालिन विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपिनाथ मुंडे.

मार्च १९९५ मध्ये युती सरकार सत्तेवर आल्यावर एनरॉनबरोबरचा करार रद्द करून एनरॉन प्रकल्प खरोखरच अरबी समुद्रात बुडविला होता. त्यामुळे एनरॉनच्या रिबेका थॉमस भारतात येऊन बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी व इतर संबंधितांना भेटल्यावर व कराराच्या काही कलमांचे पुनर्लेखन झाल्यावर प्रकल्प समुद्रातून बाहेर काढला. करार रद्द करण्यापूर्वी वीजेचा दर प्रति युनिट रू. २.४० इतका मान्य केलेला होता. पण नव्याने करार केल्यावर यात २० टक्के सूट देऊन प्रति युनिट रू. १.९२ इतका मान्य केला गेला. करार कसा पुन्हा जिवंत झाला, करारात कोणत्या नवीन अटी घातल्या व नंतर हा प्रकल्प का रखडला याची फारशी कल्पना नाही. पण केलेल्या घोषणेप्रमाणे निदान काही काळ तरी हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडविला होता हे नक्की.

श्रीरंग_जोशी's picture

12 Apr 2013 - 9:03 pm | श्रीरंग_जोशी

घोषणेप्रमाणे काही काळ हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवला होताच!!

एन्रॉन दिवाळखोरीत गेली नसती तर हे प्रकरण (आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले होते) महाराष्ट्राला फारच महागात पडले असते असे तज्ञ लोकांनी म्हंटले होते तेव्हा.

श्रीरंग_जोशी's picture

10 Apr 2013 - 9:09 pm | श्रीरंग_जोशी

मला तरी स्पष्ट आठवते की हे विधान मुंडे यांचेच होते. त्या काळात ते ऐन भरात होते.

दाऊदच्या मुसक्या बांधून त्याला भारतात आणू अशी घोषणा पण त्यांचीच.

श्रीरंग_जोशी's picture

10 Apr 2013 - 9:22 pm | श्रीरंग_जोशी

युती शासनाच्या काळात विरोधी पक्षांच्या मोर्चात एक घोषणा असायची...

महाराष्ट्रात दोनच गुंडे,
जोशी मुंडे, जोशी मुंडे!!

माझ्या वर्गात हजेरीच्यावेळी माझ्या नंतर मुंडे आडनाव असलेल्या वर्गमित्राचे नाव होते. हजेरी घेता घेता एक सर म्हणाले होते जोशी-मुंडे इथेही एकत्रच का? :-).

तुमच्या वर्गात "कुलकर्णी", "कामत" वगैरे नव्हते वाटतं...

श्रीरंग_जोशी's picture

10 Apr 2013 - 11:59 pm | श्रीरंग_जोशी

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला घडलेला प्रसंग आहे.
पहिल्या दिवशी प्रत्येकाने आपले नाव लिहून कागद सरकवला होता त्यावर योगायोगाने तो क्रम आला.
अन पुढचे काही दिवस गुरूजींनी त्या कागदावरच हजेरी घेतली.

रमेश आठवले's picture

11 Apr 2013 - 5:29 am | रमेश आठवले

सध्या गुजरातच्या राज्यपाल कमला बेनिवाल आहेत. यापूर्वी त्या राजस्तान मध्ये काँग्रेसच्या मंत्री मंडलात होत्या. त्यांच्या कडे जल संवर्धन खाते होते. त्यावेळी बेनिवाल यांनी असे विधान केले होते
-राजस्तान मध्ये पडणार्या पाऊसाचा प्रत्येक थेंब हा राजस्तान सरकारच्या मालकीचा आहे.-

हुप्प्या's picture

11 Apr 2013 - 6:51 am | हुप्प्या

अक्साई चीन हा प्रदेश चीनने बळकावल्यावर आपले द्रष्टे पंतप्रधान पंडित नेहरु म्हणाले की "जाऊ द्या. तिथे गवताचे पातेही उगवत नाही".
त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?" खिलाडूवृत्ती नसणारे नेहरु ह्या विधानावर चांगलेच संतापले.
मला वाटते ताऊ देवीलाल ह्यांनी हरियाणाच्या शेतकर्‍यांना उद्देशून असे म्हटले की हल्ली तुमच्या शेतात पूर्वीसारखे पीक येत नाही कारण पंजाबचे सरकार त्या पाण्यातली वीज काढून घेते आणि नि:सत्त्व पाणी तुम्हाला देते!

तर्री's picture

11 Apr 2013 - 11:28 am | तर्री

त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?"
हे विधान माझ्या मते पिलू मोदींचे आहे.
बें.नाथ पै, राम मनोहर लोहिया, फिरोज गांधी बडे बुजुर्ग , विद्वान नेते हे नेहरूंचे कट्टर विरोधक होते. आपले दुर्दैव की त्यांना पोलिटिकल स्पेस मिळाली नाही.
नेहरूंनी आपल्या चमच्यांचे , इंदिराबैनी आपल्या सुमार जी हुजूरस मर्थकांचे , राजीवजींनी आपल्या डून स्कूल च्या वाह्यात मित्रांचे आणि सोनियांनी हया ४ ही जमातीचे ऐकून राज्य केले आणि देशाची काशी केली.

बॅटमॅन's picture

11 Apr 2013 - 11:40 am | बॅटमॅन

+१.

मीही हे विधान पिलू मोदींचे आहे असेच वाचलेय.

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2013 - 12:12 pm | श्रीगुरुजी

>>> अक्साई चीन हा प्रदेश चीनने बळकावल्यावर आपले द्रष्टे पंतप्रधान पंडित नेहरु म्हणाले की "जाऊ द्या. तिथे गवताचे पातेही उगवत नाही". त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?" खिलाडूवृत्ती नसणारे नेहरु ह्या विधानावर चांगलेच संतापले.

हे विधान महावीर त्यांगींचे आहे की पिलू मोदींचे याविषयी मला नक्की माहिती नाही. पण सरकारमध्ये मंत्री असणार्‍या कोणाचेही असे म्हणायचे धाडस होणार नाही हे नक्की.

"अक्साई चीन या प्रदेशात गवताचे एक पातेही उगवत नाही" असे नेहरूंनी म्हटल्यावर लोकसभेत केले गेलेले मूळ विधान असे होते की, "जर असे असेल तर एखाद्याच्या डोक्यावर अजिबात केस नसतील तर ते डोके छाटले तर चालेल का?". हे विधान नेहरूंना उद्देशून आहे (नेहरूंना टक्कल होते) असा समज करून घेऊन इतर सदस्यांनी हे विधान करणार्‍याला माफी मागायला लावली होती.

श्रीरंग_जोशी's picture

11 Apr 2013 - 11:14 pm | श्रीरंग_जोशी

काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा मी तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन.

ओळखा पाहू हे विधान कोणाचे?

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2013 - 2:55 pm | श्रीगुरुजी

>>>> काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा मी तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन.

"मी एकवेळ संन्यास घेऊन भगवी वस्त्रे नेसून हिमालयात जाईन, पण काँग्रेसमध्ये परत कधीही जाणार नाही" असे ज्या महात्म्याने म्हटले होते त्याच महात्म्याने वरील भीष्मप्रतिज्ञा केली होती. पण नंतर अत्यंत नाईलाजाने देशाला जातीयवाद्यांपासून वाचविण्यासाठी व देशामध्ये धर्मनिरपेक्षता जोपासण्यासाठी या महात्म्याला काँग्रेसमध्ये डेरेदाखल व्हावे लागले.

मैत्र's picture

12 Apr 2013 - 4:53 pm | मैत्र

सरळ लिवा की नाव जर हे जाहीर विधान असेल तर ..
आपले शेतीतज्ञ तर नव्हेत?

लॉरी टांगटूंगकर's picture

12 Apr 2013 - 8:40 pm | लॉरी टांगटूंगकर

मला पण माहिती नव्हतं, गुगलवर "काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा " इतके तीनच शब्द टाईप केले आणि खाली अपेक्षित नाव दिसले :)

लॉरी टांगटूंगकर's picture

12 Apr 2013 - 8:46 pm | लॉरी टांगटूंगकर

मला पण माहिती नव्हतं, गुगलवर "काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा " इतके तीनच शब्द टाईप केले आणि खाली अपेक्षित नाव दिसले :)

खबो जाप's picture

12 Apr 2013 - 3:40 pm | खबो जाप

"बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है!" - आराराबा पाटील
आल टेम फेवरेट …… एव्हढ्या साठी कि असा माणूस आपली आजोळचा आहे ह्याची लाज वाटते,
वर लोक चिडवतात काय आजोळी गेला होतात आबा भेटले का ? तंबाखू खातात का ? नसतील सांगा परत चालू करा तोंड बंद राहते त्याने …. ह्या ह्या ह्या …. आता बोला ह्यावर मी काय म्हणू ………

श्रीरंग_जोशी's picture

12 Apr 2013 - 5:57 pm | श्रीरंग_जोशी

ग्रामविकास खात्यात होते तेव्हा त्यांनी खरंच चांगले काम केले होते उदा. गाडगेबाबा ग्राम स्वच्छता योजना.

त्यामुळे त्यांचा हुरूप वाढला अन तंटामुक्त गाव योजना सुरू केली ती मात्र पूर्ण फसली. गृहमंत्री पदासाठी त्यांचे व्यक्तिमत्वच साजेसे नाही त्याला ते तरी काय करणार?

बाकी त्यांचे नाव काय आहे हे कदाचित माहित असावे आपल्याला?

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2013 - 8:47 pm | श्रीगुरुजी

>>> बाकी त्यांचे नाव काय आहे हे कदाचित माहित असावे आपल्याला?

रावसाहेब रामराव पाटील उपाख्य आर आर पाटील उपाख्य आबा पाटील

श्रीरंग_जोशी's picture

12 Apr 2013 - 8:49 pm | श्रीरंग_जोशी

लपवण्याइतके काही वाईट नाव नाही. जरा त्यांच्या प्रकृतीला शोभणारे वाटत नाही एवढेच!!

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2013 - 8:51 pm | श्रीगुरुजी

"मी जर मते मागायला आलो तर मला जोड्याने मारा" असे एक प्रख्यात शेतकरी नेते म्हणाले होते. त्यानंतर जेव्हा ते खरंच निवडणुकीला उभे राहिले तेव्हा एक कार्यकर्ता आपली पादत्राणे घेऊन त्यांना मारायला गेला. तेव्हा त्यांनी,"मी निवडणुकीला उभे राहणार नाही असे म्हणालो नव्हतो. मी जर मते मागायला आलो तर मला जोड्याने मारा असे म्हणालो होतो. मी निवडणुकीला उभा आहे, पण मते मागणार नाही" असा युक्तीवाद त्यांनी केला होता.

कोण हे नेते ओळखा पाहू?

श्रीरंग_जोशी's picture

12 Apr 2013 - 8:54 pm | श्रीरंग_जोशी

यांनीच शेतकरी संघटनेने राष्ट्रवादीत सामील होणे म्हणजे महासागराने गटारात सामील होणे असे म्हंटले होते.

याप्रमाणेच स्व. विलासराव देशमुख यांच्याबरोबर वाद झाल्यावर राष्ट्रवादी म्हणजे गरीबाची झोपडी असे शरद पवार म्हणाले होते :-).

पिंपातला उंदीर's picture

12 Apr 2013 - 9:02 pm | पिंपातला उंदीर

वाजपेयी हा पक्षाचा मुखवटा असून खरे नेते हे अडवाणी आहेत

दाऊद ला आम्ही मुस्क्या बांधून फरफटात भारतात आणू

नरेंद्र मोदी यानी राजधर्मच पालन कराव

विकास's picture

12 Apr 2013 - 9:22 pm | विकास

यात नक्की तारे तोडलेत असे म्हणण्यासारखे काय आहे?

शेवटचं वाक्य बहुतेकांना माहीत आहे. पण वाजपेयी यांनी यात तारे तोडलेत असं वाटत नाही.
कदाचित गुजरात मध्ये काहीच घडलं नाही असं म्हणणं याला तारे तोडणे नक्की म्हणता येईल.. पण याला तर नाही.

इतर दोन कोणाचे उद्गार आहेत.. विशेषतः पहिलं वाक्य तेही सांगा..

श्रीरंग_जोशी's picture

12 Apr 2013 - 9:57 pm | श्रीरंग_जोशी

पहिलं विधान गोविंदाचार्यांचं आहे. बहुधा त्यांनीच काही महिन्यांपूर्वी दिग्विजयसिंह पंतप्रधानपदासाठी लायक व्यक्तिंपैकी एक आहे असे पण म्हंटले.

दुसरं गोपिनाथरावांचं १९९५ च्या वि.स. निवडणूकीपूर्वी

रमेश आठवले's picture

13 Apr 2013 - 8:01 am | रमेश आठवले

https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=XDzMpS_rVqI
. गुजरात मध्ये दंगली चालू असताना दिलेल्या भेटीत वाजपायी नेमके काय म्हणाले ते वर दिलेल्या तू नळीच्या धाग्यात ऐकता येईल . मोदी त्यांच्या शेजारी बसलेले आहेत. वाजपायी यांनी मोदीना 'राजधर्माचे पालन करावयास सांगितले' असे विरोधी पक्ष आणि मोदी द्वेष्टे पत्रकार आणि वाहीन्या वारंवार सांगत असतात.
हिटलर चा प्रसार माध्यमाचा मुख्य गोबेल्स होता. त्यांनी असे विधान केलेले आहे की जर आपण एक खोटी बातमी वारंवार ठासून सांगतली तर लोकाना ती बातमी खरी वाटू लागते. तसेच काही ह्या बातमीचे झाले आहे,

श्रीरंग_जोशी's picture

12 Apr 2013 - 9:21 pm | श्रीरंग_जोशी

युतीशासनाच्या काळात गोपिनाथ मुंडे यांनी एकाचवेळी गृह व उर्जा ही खाती लिलया सांभाळली.

१९९८ मध्ये अमरावतीला पोलिस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन गृहमंत्री या नात्याने त्यांच्या हातून होते.

तेव्हा भाषण देताना गृह खात्यावरून उर्जा खात्यावर कसे गेले ते मुंडेनाही कळले नाही. अन माझ्या कारकिर्दीत लोड शेडींग कमी झाले हे म्हणण्याचा अवकाश तडक वीजपुरवठा खंडीत झाला. नशीब जनरेटरची व्यवस्था होती नाही तर गोपिनाथरावांनी वीजेचा विषय पुन्हा भाषणात कधी काढला नसता..

प्रदीप's picture

12 Apr 2013 - 9:49 pm | प्रदीप

मार्गरेट थॅचर तिखट बोलण्याबद्दल प्रसिद्ध होत्या. येथे देत असलेले अवतरण, नक्की 'तारे तोडणे' ह्या क्यॅटेगरीत येत नाही, पण अशा तिखट बोलण्याचा एक, बर्‍यापैकी बोलबाला झालेला, नमुना आहे.

त्यांच्याच कॉंझर्व्हेटीव्ह पक्षातील जॉन व्हिटींगडेल ह्या 'बॅकबेंचर' खासदारास एकदा त्या उद्वेगाने म्हणाल्या होत्या, "The trouble with you, John, is that your spine does not reach your brain".

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Apr 2013 - 4:19 am | निनाद मुक्काम प...

तुमचा दाउद तर आमचा अरुण
झक मारली आणि ह्यांना पुरस्कार दिला.

श्रीरंग_जोशी's picture

13 Apr 2013 - 4:25 am | श्रीरंग_जोशी

पटत नव्हतं तर ठोकशाहीवाल्यांकडून पुरस्कार स्विकारलाच कशाला?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Apr 2013 - 7:41 pm | निनाद मुक्काम प...

हा पुरस्कार महाराष्ट्रीयन जनतेच्या करातून त्यांनी निवडलेल्या सरकार कडून घेतला.
आता हे सरकार ज्यांचे देशपांडे सारख्या नागरिकांचे प्रतिनिधित्व करते ,तेव्हा देशपांडे ह्यांना पुरस्कार स्वीकारायला काहीच वावगे नव्हते , त्याचवेळी आपल्या सरकारवर टीका करण्याचा त्याचा अधिकार सुद्धा त्यामुळे नाकारला जात नाही ,
ह्या प्रकारावर फटकळ नानाने एका साहित्य संमेलनात
हा तुमचा अधिकार नाही असे सुनावले होते ,
मात्र त्यांच्यानंतर मी असे बोललोच नाही असा राजकारणी कावा केला.
हाच प्रसंग लक्षात ठेवून राज ह्यांनी नाना ला ह्यावेळी तरी टिक रे असा टोला हाणला होता.

श्रीरंग_जोशी's picture

15 Apr 2013 - 11:39 pm | श्रीरंग_जोशी

ते विधान नानाने नाट्य संमेलनात केले होते.

पु.लं. आमचे दैवत आहे त्याविषयी असे बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही याखेरीज बाळासाहेब या दैवताची प्रतिमा आमच्या हृदयात आहे तिलाही धक्का लावण्याचा तुम्हाला अधिकार नाही.

असे काहीसे ते होते. नेमके शब्द असेच असतील असे नाही.

पिंपातला उंदीर's picture

13 Apr 2013 - 9:29 am | पिंपातला उंदीर

महाराष्ट्रमधले सगळे 'पुल' मोडकलीस आले आहेत- शिव्राळ भाषा सम्राट

श्री गावसेना प्रमुख's picture

13 Apr 2013 - 10:45 am | श्री गावसेना प्रमुख

तुमचा आयडी हॅक झालाय का?

रमताराम's picture

14 Apr 2013 - 12:26 pm | रमताराम

'इंडियात बलात्कार होतात, भारतात नाही.' हे सुप्रसिद्ध विधान नुकतेच ऐकले ते कुणाला कसे आठवले नाही ब्वॉ. (या या, ही वॉज मिसकोटेड, मिस-अन्डरस्टुड... बट सो सेज एवरिवन हू पुट्स हिज फुट इन हिज माउथ.)

मैत्र's picture

14 Apr 2013 - 1:42 pm | मैत्र

यावर एक बराच खल करणारा धागा निघाला होता आणि ते विधान कसं संदर्भ सोडून उचलून माध्यमांनी विपर्यास केला होता हे त्यावर सिद्ध झालं होतं..

पैसा's picture

15 Apr 2013 - 11:27 pm | पैसा

अगदी ऐतिहासिक विधानांच्या संकलनाबद्दल धन्यवाद!

मुक्त विहारि's picture

16 Apr 2013 - 12:11 am | मुक्त विहारि

माझ्या नावाचा जप केलात तर, बलात्कार होणार नाही

आणि

जर झालाच तर, तो माणुस ,नपुंसक होईल आणि ते सगळ्या जगाला समजेल.

मैत्र's picture

17 Apr 2013 - 11:52 am | मैत्र

ते भाषण नात्यातल्या एका गृहस्थांनी आवर्जुन पहायला लावलं. त्यांची भारावलेली मुद्रा आणि आपल्या १५-१६ वर्षाच्या मुलीला केलेला उपदेश की हे पहा आणि जप कर वगैरे..
इतकं इतकं डोक्यात गेलं सगळं.. अत्यंत कहर प्रकार आहे सगळा..
खरोखर त्या दिवशी या गोष्टींना "अंध" श्रद्धा का म्हणतात ते समजलं..

प्रसाद गोडबोले's picture

17 Apr 2013 - 1:17 pm | प्रसाद गोडबोले

तुम्ही निर्मल बाबा चा दरबार नाही का पाहीला ?

ते तर ह्याही पेक्षा॑ कहर आहेत ... हा एक तोडलेला तारा पहा

भक्त :"बाबा , ऑफीसमे प्रमोशन नही हो रहा "
बाबा : बेटा तुम समोसे के साथ कोनसी चटनी खाते हो ? हरी या लाल ?
भक्त : मुझे लाल चटनी अच्छी लगती है .
बाबा :इसी वजह से कृपा अडी हुई है .कोई बात नही ... आजसे हरी चटनी खाया करो . कृपा बढ जायेगी .
भक्त : :%

असाच बाकी दरबारात उल्का वर्षावच सुरु असतो =))

प्यारे१'s picture

17 Apr 2013 - 4:28 pm | प्यारे१

चड्डी कहा से खरीदते हो?
बाबाजी रोडसाईडवाली दुकान से
इसीलिये किर्पा अडी है, शोरुम/ मॉल से खरीदा करो ... किर्पा आनी शुरु ओ जाएगी!

बाबा में बाबा निर्मल बाबा!
(कशाचाही चालीवर वाचा)

भारतात बलात्कार होतच नाहीत-ते इंडियात होतात. (कोण विधानकर्ता ते सांगणे न लगे)

भांडारकर तो झाँकी है, शनिवारवाडा बाकी है | (इथेही तेच लागू)

इंडीया इज बिगर द्यान युरोप अ‍ॅन्ड अनेरिका - साक्षात युवराज !

वामन देशमुख's picture

17 Apr 2013 - 5:52 pm | वामन देशमुख

"मराठा तितुका मेळवावा! गुणदोषांसहित स्वीकारावा!
दलित भटका ओबीसी! अमराठा अवघा ठेचावा!
सोयरिकी उच्च! आरक्षणी मागास सांगावा!
ब्राह्मणद्वेष दाखवावा! मराठादेश घडवावा!"

"जीभ छाटू, हात तोडू, राजकारणातून उखडून टाकू,
वाजवा टाळी हाकला माळी, वाजवा तुतारी हाकला वंजारी,
अट्रॉसिटी ऍक्‍ट रद्द करा’’

तर्री's picture

18 Apr 2013 - 9:04 am | तर्री

शकील अहमद ह्यानी काल बंगलोर स्फोटानंतर अकलेचे मुरलेले तारे तोडले आहेत.
"बॉम्ब स्फोटा मुळे भाजपा ला फायदा होईल"