✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तारे तोडण्याची स्पर्धा

प
प्रसाद गोडबोले यांनी
Tue, 04/09/2013 - 18:03  ·  लेख
लेख
नुकत्याच एका सत्तेतल्या प्रसिध्द नेत्याने दुष्काळाविषयी अश्लाघ्य विधाने करुन तारे तोडले नंतर लाईट जाण्याविषयीही तारे तोडले , मग त्याला उत्तर म्हणुन दुसर्‍या नेत्याने तारे तोडले . एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे . असो तर तारे तोडण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांच्या वाक्यांचे हे कलेक्षन ! तळटीप : १) ज्येष्ट नेत्यांनी वापरलेल्या अश्लाघ्य शब्दांचा वापर टाळावा २) दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे. ३) जे वाक्य आवडले त्याला +१ द्यावा म्हणजे विजेता कोण हे ठरवता येईल .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
सुभाषिते
विनोद
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिक्रिया
बातमी
मत
वाद
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
21348 वाचन

💬 प्रतिसाद (86)

प्रतिक्रिया

>>> अक्साई चीन हा प्रदेश

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/11/2013 - 12:12 नवीन
>>> अक्साई चीन हा प्रदेश चीनने बळकावल्यावर आपले द्रष्टे पंतप्रधान पंडित नेहरु म्हणाले की "जाऊ द्या. तिथे गवताचे पातेही उगवत नाही". त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?" खिलाडूवृत्ती नसणारे नेहरु ह्या विधानावर चांगलेच संतापले. हे विधान महावीर त्यांगींचे आहे की पिलू मोदींचे याविषयी मला नक्की माहिती नाही. पण सरकारमध्ये मंत्री असणार्‍या कोणाचेही असे म्हणायचे धाडस होणार नाही हे नक्की. "अक्साई चीन या प्रदेशात गवताचे एक पातेही उगवत नाही" असे नेहरूंनी म्हटल्यावर लोकसभेत केले गेलेले मूळ विधान असे होते की, "जर असे असेल तर एखाद्याच्या डोक्यावर अजिबात केस नसतील तर ते डोके छाटले तर चालेल का?". हे विधान नेहरूंना उद्देशून आहे (नेहरूंना टक्कल होते) असा समज करून घेऊन इतर सदस्यांनी हे विधान करणार्‍याला माफी मागायला लावली होती.
  • Log in or register to post comments

डांबर फासून हिमालयात जाईन

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 04/11/2013 - 23:14 नवीन
काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा मी तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन. ओळखा पाहू हे विधान कोणाचे?
  • Log in or register to post comments

>>>> काँग्रेसमध्ये परत

श्रीगुरुजी
Fri, 04/12/2013 - 14:55 नवीन
>>>> काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा मी तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन. "मी एकवेळ संन्यास घेऊन भगवी वस्त्रे नेसून हिमालयात जाईन, पण काँग्रेसमध्ये परत कधीही जाणार नाही" असे ज्या महात्म्याने म्हटले होते त्याच महात्म्याने वरील भीष्मप्रतिज्ञा केली होती. पण नंतर अत्यंत नाईलाजाने देशाला जातीयवाद्यांपासून वाचविण्यासाठी व देशामध्ये धर्मनिरपेक्षता जोपासण्यासाठी या महात्म्याला काँग्रेसमध्ये डेरेदाखल व्हावे लागले.
  • Log in or register to post comments

कोण हे?

मैत्र
Fri, 04/12/2013 - 16:53 नवीन
सरळ लिवा की नाव जर हे जाहीर विधान असेल तर .. आपले शेतीतज्ञ तर नव्हेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

राईट्ट शेतीतज्ञच!

लॉरी टांगटूंगकर
Fri, 04/12/2013 - 20:40 नवीन
मला पण माहिती नव्हतं, गुगलवर "काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा " इतके तीनच शब्द टाईप केले आणि खाली अपेक्षित नाव दिसले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

राईट्ट शेतीतज्ञच!

लॉरी टांगटूंगकर
Fri, 04/12/2013 - 20:46 नवीन
मला पण माहिती नव्हतं, गुगलवर "काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा " इतके तीनच शब्द टाईप केले आणि खाली अपेक्षित नाव दिसले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

"बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे

खबो जाप
Fri, 04/12/2013 - 15:40 नवीन
"बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है!" - आराराबा पाटील आल टेम फेवरेट …… एव्हढ्या साठी कि असा माणूस आपली आजोळचा आहे ह्याची लाज वाटते, वर लोक चिडवतात काय आजोळी गेला होतात आबा भेटले का ? तंबाखू खातात का ? नसतील सांगा परत चालू करा तोंड बंद राहते त्याने …. ह्या ह्या ह्या …. आता बोला ह्यावर मी काय म्हणू ………
  • Log in or register to post comments

-१

श्रीरंग_जोशी
Fri, 04/12/2013 - 17:57 नवीन
ग्रामविकास खात्यात होते तेव्हा त्यांनी खरंच चांगले काम केले होते उदा. गाडगेबाबा ग्राम स्वच्छता योजना. त्यामुळे त्यांचा हुरूप वाढला अन तंटामुक्त गाव योजना सुरू केली ती मात्र पूर्ण फसली. गृहमंत्री पदासाठी त्यांचे व्यक्तिमत्वच साजेसे नाही त्याला ते तरी काय करणार? बाकी त्यांचे नाव काय आहे हे कदाचित माहित असावे आपल्याला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप

>>> बाकी त्यांचे नाव काय आहे

श्रीगुरुजी
Fri, 04/12/2013 - 20:47 नवीन
>>> बाकी त्यांचे नाव काय आहे हे कदाचित माहित असावे आपल्याला? रावसाहेब रामराव पाटील उपाख्य आर आर पाटील उपाख्य आबा पाटील
  • Log in or register to post comments

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Fri, 04/12/2013 - 20:49 नवीन
लपवण्याइतके काही वाईट नाव नाही. जरा त्यांच्या प्रकृतीला शोभणारे वाटत नाही एवढेच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

"मी जर मते मागायला आलो तर मला

श्रीगुरुजी
Fri, 04/12/2013 - 20:51 नवीन
"मी जर मते मागायला आलो तर मला जोड्याने मारा" असे एक प्रख्यात शेतकरी नेते म्हणाले होते. त्यानंतर जेव्हा ते खरंच निवडणुकीला उभे राहिले तेव्हा एक कार्यकर्ता आपली पादत्राणे घेऊन त्यांना मारायला गेला. तेव्हा त्यांनी,"मी निवडणुकीला उभे राहणार नाही असे म्हणालो नव्हतो. मी जर मते मागायला आलो तर मला जोड्याने मारा असे म्हणालो होतो. मी निवडणुकीला उभा आहे, पण मते मागणार नाही" असा युक्तीवाद त्यांनी केला होता. कोण हे नेते ओळखा पाहू?
  • Log in or register to post comments

शरद जोशी असावेत

श्रीरंग_जोशी
Fri, 04/12/2013 - 20:54 नवीन
यांनीच शेतकरी संघटनेने राष्ट्रवादीत सामील होणे म्हणजे महासागराने गटारात सामील होणे असे म्हंटले होते. याप्रमाणेच स्व. विलासराव देशमुख यांच्याबरोबर वाद झाल्यावर राष्ट्रवादी म्हणजे गरीबाची झोपडी असे शरद पवार म्हणाले होते :-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

वाजपेयी हा पक्षाचा मुखवटा

पिंपातला उंदीर
Fri, 04/12/2013 - 21:02 नवीन
वाजपेयी हा पक्षाचा मुखवटा असून खरे नेते हे अडवाणी आहेत दाऊद ला आम्ही मुस्क्या बांधून फरफटात भारतात आणू नरेंद्र मोदी यानी राजधर्मच पालन कराव
  • Log in or register to post comments

यात नक्की

विकास
Fri, 04/12/2013 - 21:22 नवीन
यात नक्की तारे तोडलेत असे म्हणण्यासारखे काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

यातलं कुठलं विधान कोणी केलं आहे?

मैत्र
Fri, 04/12/2013 - 21:42 नवीन
शेवटचं वाक्य बहुतेकांना माहीत आहे. पण वाजपेयी यांनी यात तारे तोडलेत असं वाटत नाही. कदाचित गुजरात मध्ये काहीच घडलं नाही असं म्हणणं याला तारे तोडणे नक्की म्हणता येईल.. पण याला तर नाही. इतर दोन कोणाचे उद्गार आहेत.. विशेषतः पहिलं वाक्य तेही सांगा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

गोविंदाचार्य

श्रीरंग_जोशी
Fri, 04/12/2013 - 21:57 नवीन
पहिलं विधान गोविंदाचार्यांचं आहे. बहुधा त्यांनीच काही महिन्यांपूर्वी दिग्विजयसिंह पंतप्रधानपदासाठी लायक व्यक्तिंपैकी एक आहे असे पण म्हंटले. दुसरं गोपिनाथरावांचं १९९५ च्या वि.स. निवडणूकीपूर्वी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

वाजपायी उवाच

रमेश आठवले
Sat, 04/13/2013 - 08:01 नवीन
https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=XDzMpS_rVqI . गुजरात मध्ये दंगली चालू असताना दिलेल्या भेटीत वाजपायी नेमके काय म्हणाले ते वर दिलेल्या तू नळीच्या धाग्यात ऐकता येईल . मोदी त्यांच्या शेजारी बसलेले आहेत. वाजपायी यांनी मोदीना 'राजधर्माचे पालन करावयास सांगितले' असे विरोधी पक्ष आणि मोदी द्वेष्टे पत्रकार आणि वाहीन्या वारंवार सांगत असतात. हिटलर चा प्रसार माध्यमाचा मुख्य गोबेल्स होता. त्यांनी असे विधान केलेले आहे की जर आपण एक खोटी बातमी वारंवार ठासून सांगतली तर लोकाना ती बातमी खरी वाटू लागते. तसेच काही ह्या बातमीचे झाले आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

गोपिनाथ मुंडे अन उर्जा खाते

श्रीरंग_जोशी
Fri, 04/12/2013 - 21:21 नवीन
युतीशासनाच्या काळात गोपिनाथ मुंडे यांनी एकाचवेळी गृह व उर्जा ही खाती लिलया सांभाळली. १९९८ मध्ये अमरावतीला पोलिस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन गृहमंत्री या नात्याने त्यांच्या हातून होते. तेव्हा भाषण देताना गृह खात्यावरून उर्जा खात्यावर कसे गेले ते मुंडेनाही कळले नाही. अन माझ्या कारकिर्दीत लोड शेडींग कमी झाले हे म्हणण्याचा अवकाश तडक वीजपुरवठा खंडीत झाला. नशीब जनरेटरची व्यवस्था होती नाही तर गोपिनाथरावांनी वीजेचा विषय पुन्हा भाषणात कधी काढला नसता..
  • Log in or register to post comments

तिखट

प्रदीप
Fri, 04/12/2013 - 21:49 नवीन
मार्गरेट थॅचर तिखट बोलण्याबद्दल प्रसिद्ध होत्या. येथे देत असलेले अवतरण, नक्की 'तारे तोडणे' ह्या क्यॅटेगरीत येत नाही, पण अशा तिखट बोलण्याचा एक, बर्‍यापैकी बोलबाला झालेला, नमुना आहे. त्यांच्याच कॉंझर्व्हेटीव्ह पक्षातील जॉन व्हिटींगडेल ह्या 'बॅकबेंचर' खासदारास एकदा त्या उद्वेगाने म्हणाल्या होत्या, "The trouble with you, John, is that your spine does not reach your brain".
  • Log in or register to post comments

तुमचा दाउद तर आमचा अरुण

निनाद मुक्काम …
Sat, 04/13/2013 - 04:19 नवीन
तुमचा दाउद तर आमचा अरुण झक मारली आणि ह्यांना पुरस्कार दिला.
  • Log in or register to post comments

ठोकशाही

श्रीरंग_जोशी
Sat, 04/13/2013 - 04:25 नवीन
पटत नव्हतं तर ठोकशाहीवाल्यांकडून पुरस्कार स्विकारलाच कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

हा पुरस्कार महाराष्ट्रीयन

निनाद मुक्काम …
Sat, 04/13/2013 - 19:41 नवीन
हा पुरस्कार महाराष्ट्रीयन जनतेच्या करातून त्यांनी निवडलेल्या सरकार कडून घेतला. आता हे सरकार ज्यांचे देशपांडे सारख्या नागरिकांचे प्रतिनिधित्व करते ,तेव्हा देशपांडे ह्यांना पुरस्कार स्वीकारायला काहीच वावगे नव्हते , त्याचवेळी आपल्या सरकारवर टीका करण्याचा त्याचा अधिकार सुद्धा त्यामुळे नाकारला जात नाही , ह्या प्रकारावर फटकळ नानाने एका साहित्य संमेलनात हा तुमचा अधिकार नाही असे सुनावले होते , मात्र त्यांच्यानंतर मी असे बोललोच नाही असा राजकारणी कावा केला. हाच प्रसंग लक्षात ठेवून राज ह्यांनी नाना ला ह्यावेळी तरी टिक रे असा टोला हाणला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

नानाचे विधान

श्रीरंग_जोशी
Mon, 04/15/2013 - 23:39 नवीन
ते विधान नानाने नाट्य संमेलनात केले होते. पु.लं. आमचे दैवत आहे त्याविषयी असे बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही याखेरीज बाळासाहेब या दैवताची प्रतिमा आमच्या हृदयात आहे तिलाही धक्का लावण्याचा तुम्हाला अधिकार नाही. असे काहीसे ते होते. नेमके शब्द असेच असतील असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

महाराष्ट्रमधले सगळे 'पुल'

पिंपातला उंदीर
Sat, 04/13/2013 - 09:29 नवीन
महाराष्ट्रमधले सगळे 'पुल' मोडकलीस आले आहेत- शिव्राळ भाषा सम्राट
  • Log in or register to post comments

तुमचा आयडी हॅक झालाय का?

श्री गावसेना प्रमुख
Sat, 04/13/2013 - 10:45 नवीन
तुमचा आयडी हॅक झालाय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

अरेच्या

रमताराम
Sun, 04/14/2013 - 12:26 नवीन
'इंडियात बलात्कार होतात, भारतात नाही.' हे सुप्रसिद्ध विधान नुकतेच ऐकले ते कुणाला कसे आठवले नाही ब्वॉ. (या या, ही वॉज मिसकोटेड, मिस-अन्डरस्टुड... बट सो सेज एवरिवन हू पुट्स हिज फुट इन हिज माउथ.)
  • Log in or register to post comments

धागा

मैत्र
Sun, 04/14/2013 - 13:42 नवीन
यावर एक बराच खल करणारा धागा निघाला होता आणि ते विधान कसं संदर्भ सोडून उचलून माध्यमांनी विपर्यास केला होता हे त्यावर सिद्ध झालं होतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

मज्जा!

पैसा
Mon, 04/15/2013 - 23:27 नवीन
अगदी ऐतिहासिक विधानांच्या संकलनाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

अजुन एक..

मुक्त विहारि
Tue, 04/16/2013 - 00:11 नवीन
माझ्या नावाचा जप केलात तर, बलात्कार होणार नाही आणि जर झालाच तर, तो माणुस ,नपुंसक होईल आणि ते सगळ्या जगाला समजेल.
  • Log in or register to post comments

हा बेक्कार होता..

मैत्र
Wed, 04/17/2013 - 11:52 नवीन
ते भाषण नात्यातल्या एका गृहस्थांनी आवर्जुन पहायला लावलं. त्यांची भारावलेली मुद्रा आणि आपल्या १५-१६ वर्षाच्या मुलीला केलेला उपदेश की हे पहा आणि जप कर वगैरे.. इतकं इतकं डोक्यात गेलं सगळं.. अत्यंत कहर प्रकार आहे सगळा.. खरोखर त्या दिवशी या गोष्टींना "अंध" श्रद्धा का म्हणतात ते समजलं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ह्याहीपेक्षा

प्रसाद गोडबोले
Wed, 04/17/2013 - 13:17 नवीन
तुम्ही निर्मल बाबा चा दरबार नाही का पाहीला ? ते तर ह्याही पेक्षा॑ कहर आहेत ... हा एक तोडलेला तारा पहा भक्त :"बाबा , ऑफीसमे प्रमोशन नही हो रहा " बाबा : बेटा तुम समोसे के साथ कोनसी चटनी खाते हो ? हरी या लाल ? भक्त : मुझे लाल चटनी अच्छी लगती है . बाबा :इसी वजह से कृपा अडी हुई है .कोई बात नही ... आजसे हरी चटनी खाया करो . कृपा बढ जायेगी . भक्त : :% असाच बाकी दरबारात उल्का वर्षावच सुरु असतो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

चड्डी कहा से खरीदते हो?

प्यारे१
Wed, 04/17/2013 - 16:28 नवीन
चड्डी कहा से खरीदते हो? बाबाजी रोडसाईडवाली दुकान से इसीलिये किर्पा अडी है, शोरुम/ मॉल से खरीदा करो ... किर्पा आनी शुरु ओ जाएगी! बाबा में बाबा निर्मल बाबा! (कशाचाही चालीवर वाचा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

भारतात बलात्कार होतच नाहीत-ते

बॅटमॅन
Wed, 04/17/2013 - 15:16 नवीन
भारतात बलात्कार होतच नाहीत-ते इंडियात होतात. (कोण विधानकर्ता ते सांगणे न लगे) भांडारकर तो झाँकी है, शनिवारवाडा बाकी है | (इथेही तेच लागू)
  • Log in or register to post comments

इंडीया इज बिगर द्यान युरोप अ‍ॅन्ड अनेरिका - साक्षात युवराज !

तर्री
Wed, 04/17/2013 - 16:14 नवीन
इंडीया इज बिगर द्यान युरोप अ‍ॅन्ड अनेरिका - साक्षात युवराज !
  • Log in or register to post comments

जीभ छाटू, हात तोडू...

वामन देशमुख
Wed, 04/17/2013 - 17:52 नवीन
"मराठा तितुका मेळवावा! गुणदोषांसहित स्वीकारावा! दलित भटका ओबीसी! अमराठा अवघा ठेचावा! सोयरिकी उच्च! आरक्षणी मागास सांगावा! ब्राह्मणद्वेष दाखवावा! मराठादेश घडवावा!" "जीभ छाटू, हात तोडू, राजकारणातून उखडून टाकू, वाजवा टाळी हाकला माळी, वाजवा तुतारी हाकला वंजारी, अट्रॉसिटी ऍक्‍ट रद्द करा’’
  • Log in or register to post comments

कालचा तारा ...

तर्री
गुरुवार, 04/18/2013 - 09:04 नवीन
शकील अहमद ह्यानी काल बंगलोर स्फोटानंतर अकलेचे मुरलेले तारे तोडले आहेत. "बॉम्ब स्फोटा मुळे भाजपा ला फायदा होईल"
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा