✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तारे तोडण्याची स्पर्धा

प
प्रसाद गोडबोले यांनी
Tue, 04/09/2013 - 18:03  ·  लेख
लेख
नुकत्याच एका सत्तेतल्या प्रसिध्द नेत्याने दुष्काळाविषयी अश्लाघ्य विधाने करुन तारे तोडले नंतर लाईट जाण्याविषयीही तारे तोडले , मग त्याला उत्तर म्हणुन दुसर्‍या नेत्याने तारे तोडले . एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे . असो तर तारे तोडण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांच्या वाक्यांचे हे कलेक्षन ! तळटीप : १) ज्येष्ट नेत्यांनी वापरलेल्या अश्लाघ्य शब्दांचा वापर टाळावा २) दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे. ३) जे वाक्य आवडले त्याला +१ द्यावा म्हणजे विजेता कोण हे ठरवता येईल .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
सुभाषिते
विनोद
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिक्रिया
बातमी
मत
वाद
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
21347 वाचन

💬 प्रतिसाद (86)

प्रतिक्रिया

क्रमांक १)

प्रसाद गोडबोले
Tue, 04/09/2013 - 18:08 नवीन
चाऊमेन खाणे हे वाढत्या रेप्स मागील कारण आहे - खाप पंचायत ( आत्तापर्यंत तोडलेला सर्वात मोठ्ठा तारा ...माझ्या मते ! )
  • Log in or register to post comments

लोकहो खाप पंचायत बद्दल

आशु जोग
Tue, 04/09/2013 - 22:45 नवीन
लोकहो खाप पंचायत बद्दल आपल्याला काय माहिती आहे ? मेडीया जे दाखवते तेच सत्य मानायला लागलात तर अवघड आहे. पुढचा मागचा संदर्भ सोडून वक्तव्ये प्रसिद्ध करणे हा मेडीयाचा धंदा आहे पण त्यांनी फेकेलेले हाडूक खरे मानून चघळले तर पंचाईत(पंचायत नव्हे) होइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

वेगळी

विकास
Wed, 04/10/2013 - 00:49 नवीन
तुम्हाला जर यासंदर्भात काही वेगळी माहिती असेल तर अवश्य एक वेगळा धागा काढून सांगा ही विनंती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

इंडिया इज इंदिरा

तर्री
Tue, 04/09/2013 - 18:28 नवीन
इंडिया इज इंदिरा हे आसाम चे भूतपूर्व मुख्यमंत्री बारुवा यांचे विधान म्हणजे कोंग्रेस मधील लांगूलचालनाची कमाल.
  • Log in or register to post comments

सगळी भाषणबाजी म्हणजे तारेच

रेवती
Tue, 04/09/2013 - 18:37 नवीन
सगळी भाषणबाजी म्हणजे तारेच असतात. किती लक्षात ठेवायचं? तरी सोप्पं म्हणून लक्षात राहिलेलं 'छोटे छोटे शहरोंमे...." आहे. ;)
  • Log in or register to post comments

महाराष्ट्र खड्ड्यात गेला

श्रीरंग_जोशी
Tue, 04/09/2013 - 18:41 नवीन
२००५ साली राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणाले होते की, गोडबोले समितीच्या अहवालामुळेच महाराष्ट्र खड्ड्यात गेला. काही वर्षांपूर्वी उर्जा विषयाशी संबंधीत कुठल्यातरी समस्येबद्दल राज्य सरकार ने निवॄत्त केंद्रीय सचिव माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. राज्याची भविष्यातील उर्जा गरज हा त्या समितीला दिलेला विषय नव्हता. अहवालात संदर्भ म्हणून भविष्यातली वीजेची गरज म्हणून ढोबळ आकडेवारी डकवण्यात आली होती. शरद पवारांचे म्हणणे होते की त्या आकडेवारीच्या आधाराने राज्य सरकारने उर्जा धोरण आखले व ते फसले. राज्यभरात जोरदार भारनियमन सुरू झाले. उर्जा मंत्रालय अर्थातच राष्ट्रवादीकडे होते. दुसर्‍या दिवशीच्या बहुतांश अग्रलेखांत पवारांवर बरेच सरशंधान झाले होते की एकदाचे मान्य तर केले की महाराष्ट्र खड्ड्यात गेलाय मग तो कसा का गेला असेना? प्रशासकीय अनुभवाच्या बाबतीत राज्याचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवारच म्हणत असतील तर राज्य खड्ड्यात गेले असण्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही.
  • Log in or register to post comments

तारे

कापूसकोन्ड्या
Tue, 04/09/2013 - 19:09 नवीन
સૌના સાથ સૌના વિકાસ - नरेन्द्र मोदी
  • Log in or register to post comments

સૌના સાથ સૌના વિકાસ - मराठी मध्ये याचा काय अर्थ आहे ?

तर्री
Tue, 04/09/2013 - 19:12 नवीन
સૌના સાથ સૌના વિકાસ - मराठी मध्ये याचा काय अर्थ आहे ?
  • Log in or register to post comments

Sauna saath sauna vikas – All together, growth for all!

कापूसकोन्ड्या
Tue, 04/09/2013 - 20:01 नवीन
Sauna saath sauna vikas – All together, growth for all!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

સૌના સાથ સૌના વિકાસ =

विजुभाऊ
Wed, 04/10/2013 - 20:45 नवीन
સૌના સાથ સૌના વિકાસ = सर्वांची साथ सर्वांचा विकास सौ = सर्व ( मूळ शब्द सहु = सगळे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

>>> एकुणच राजकीय लोकांची ही

श्रीगुरुजी
Tue, 04/09/2013 - 19:45 नवीन
>>> एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे . त्या फ्रान्सच्या राणीचे नाव मेरी अ‍ॅन्टोनेट असे होते. पण तिची आणि आपल्या पुढार्‍यांची तुलना अप्रस्तुत आहे. ती असे काही म्हणाली होती याचा कोणताही पुरावा नाही. ही एक अफवा होती. आणि मुख्य म्हणजे ती जेव्हा असे म्हणाली असे सांगतात तेव्हा तिचे वय १४ वर्षे होते, म्हणजेच त्या वयात तिला फारशी समज नव्हती व आपण काय बोलत आहोत हे तिला समजले नव्हते. रविवारी ज्यांनी दुष्काळग्रस्तांबाबत किळसवाणे उद्गार काढले त्याचा स्पष्ट पुरावा आहे व त्यांचे वय फ्रान्सच्या राणीच्या जवळपास चौपट आहे व त्यांनी पूर्ण समजूनउमजून हे तारे तोडले आहेत.
  • Log in or register to post comments

"हुकूमशाहीत सगळं सोप्पं असतं.

आदूबाळ
Tue, 04/09/2013 - 19:47 नवीन
"हुकूमशाहीत सगळं सोप्पं असतं. मी हुकूमशहा असेपर्यंत तर नक्कीच." - जॉर्ज डब्ल्यू बुश (ज्यु.)
  • Log in or register to post comments

Sauna saath sauna vikas – All together, growth for all!

कापूसकोन्ड्या
Tue, 04/09/2013 - 20:00 नवीन
Sauna saath sauna vikas – All together, growth for all!
  • Log in or register to post comments

माननीय न्यायमूर्ति मार्केन्डेय काटजु साहेबांचे कोणतेही वाक्य.

कापूसकोन्ड्या
Tue, 04/09/2013 - 20:04 नवीन
नव्वद टक्के जनता मूर्ख आहे- उदाहरणार्थ.
  • Log in or register to post comments

+१

प्रसाद गोडबोले
Tue, 04/09/2013 - 20:13 नवीन
काटजु सध्या आघाडीवर आहेत काय तर म्हणे संजयदत्तने गांधीगिरीचा प्रचार केलाय , खुप भोगलय म्हणुन त्याची शिक्षा माफ करा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या

काटजु : लेटेस्ट अपडेट

प्रसाद गोडबोले
Mon, 04/15/2013 - 12:23 नवीन
पाचवीपर्यंत उर्दूचे शिक्षण सक्तीचे करा उर्दू ही प्रेम आणि शांतीचा संदेश देणारी भाषा असल्याचे सांगत काटजू म्हणाले, की उर्दू ही सर्वसामान्यांची भाषा आहे. मला वाटते, की इंग्रजी, हिंदी आणि उर्दू ही प्रत्येक शाळेत सक्तीची केली पाहिजे. गुगलही उर्दूतून सुरू झाले पाहिजे. या भाषेचा वापर मोबाईलवरही टायपिंगसाठी करण्यात आला पाहिजे ६ बॉल ६ सिक्सर !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

नामांतर कधी करताय्,नवे

श्री गावसेना प्रमुख
Mon, 04/15/2013 - 16:24 नवीन
नामांतर कधी करताय्,नवे भ्रमनिराश होतिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

खालील प्रतिसाद

इरसाल
Tue, 04/09/2013 - 20:05 नवीन
गिरीजा यांना उल्लेखुन नाही याची नोंद घ्यावी. "श्रीगुरुजी हे नेहमीच पुरावे देवुन लोकांना तोंडावर पाडत असतात."
  • Log in or register to post comments

चांगला धागा..

विकास
Tue, 04/09/2013 - 20:13 नवीन
मस्त धागा.
दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे.
हे "तारे तोडणारे विधान" नाही त्यामुळे त्या अर्थाने नाही, पण +१ ! :-) प्रत्यक्ष तारे तोडण्यासंदर्भात नाही कारण यातील कोणत्याच व्यक्ती तितक्या "लहान" नाहीत/नव्हत्या. पण विखारी टिका करण्याच्या उद्देशाने बोलताना कधी कधी कसे जरा जास्तच बोलले जाते याची काही उदाहरणे आणि काही तारे, पण यातील कुठलेही विधान आणि व्यक्ती वरील स्पर्धेत येऊ शकेल असे वाटत नाही, त्यामुळे निव्वळ अवांतर समजावेत: (आठवणीतून सांगत आहे, दुवा नाही. चूकीचे काही असल्यास अवश्य सांगावेत)
  1. यशवंतराव चव्हाण (का शंकरराव?) आणिबाणीच्या काळात पुलंना "विदुषक" म्हणाले होते.
  2. मला वाटते विधानसभेत "सत्ताधारी - विरोधी" अशी बाचाबाची चालू असताना - एकदा शरद पवार मृणाल गोरेंना पुतना मावशी म्हणाले तर मृणाल गोरे पवारांना "कंस मामा" म्हणाल्या
  3. बाळासाहेब एकदा मृणाल गोरेंवर टिका करताना त्यांना "घॄणाल गोरे" म्हणाले होते, शरद पवारांना कांद्याचे पोते - अजून भरपूर सांगता येईल.
  4. अत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री कन्नमवारांवर टिकेचा भडीमार करताना - कन्नमवार की कंडमवार? असे म्हणले होते.
  5. राजीव गांधींच्या "हमे उन्हे उनकी नानी याद दिलाएंगे" विधानाने पब्लीक हसले होते (अर्थात तो त्यांनी विनोद केला नव्हता ही गोष्ट वेगळी!)
  6. मधू दंडवत्यांसारखी सन्मान्य आणि अजातशत्रू असलेली व्यक्ती एकदा म्हणाली: "हिंदूंपेक्षा मुसलमान हे जास्त भारताशी इमान राखून आहेत. कारण, मेल्यावरही ते मातीत रहातात!" (मला वाटते त्यानंतरच्या लोकसभेच्या निवडणूकीत ते त्यांचा बालेकिल्ला हरले!)
  7. इंदीरा गांधी एकदा वृत्तपत्रात येणार्‍या टिकेसंदर्भात म्हणाल्या होत्या की त्यांना काय किंमत देयची, ती उद्याची रद्दीच आहे. (त्यांच्या हत्येनंतर, त्या बातम्या देणारी वर्तमानपत्रे रद्दीत टाकताना, या वाक्याची खूप आठवण झाली होती).
  • Log in or register to post comments

कांद्याचे नव्हे मैद्याचे पोते

श्रीरंग_जोशी
Tue, 04/09/2013 - 20:32 नवीन
सेनाप्रमुख शरद पवारांना मैद्याचे पोते म्हणाले होते कांद्याचे नव्हे. त्यावर उत्तर म्हणून शरद पवार सेनाप्रमुखांना 'मैद्याचेच पोते पण रिकामे' असे म्हणाले होते :-). यावरून खालिल चर्चा आठवली :-) राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

धन्यवाद!

विकास
Tue, 04/09/2013 - 20:42 नवीन
दुरूस्तीबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

शीला दीक्षित यांनी दरमहा

अधिराज
Tue, 04/09/2013 - 21:23 नवीन
शीला दीक्षित यांनी दरमहा सहाशे रुपये,पाचजणांच्या कुटुंबाला पुरायला काय हरकत आहे, असे म्हटले होते.
  • Log in or register to post comments

"बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे

पिवळा डांबिस
Tue, 04/09/2013 - 22:01 नवीन
"बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है!" - आराराबा पाटील "आधी केला ताश्कंद, नंतर केला सिमला; आता बोंबला!!!" - बाळासाहेब ठाकरे :)
  • Log in or register to post comments

मिसळीवरच्या लोक्सच्या

आशु जोग
Tue, 04/09/2013 - 22:50 नवीन
मिसळीवरच्या लोक्सच्या स्वाक्षर्‍या हेही एक तारे तोडणेच ...
  • Log in or register to post comments

पण मिपावर राजकारणी लोक नसावेत

आदूबाळ
Tue, 04/09/2013 - 22:56 नवीन
पण मिपावर राजकारणी लोक नसावेत (असा अंदाज आहे) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष ऐका

निनाद मुक्काम …
Wed, 04/10/2013 - 02:51 नवीन
वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष ऐका
  • Log in or register to post comments

राजकारण तुमच्या शर्ट मध्ये आहे आणि पॅन्ट मध्ये पण आहे

कापूसकोन्ड्या
Wed, 04/10/2013 - 12:07 नवीन
युवराज म्हणतात. राजकारण तुमच्या शर्ट मध्ये आहे आणि पॅन्ट मध्ये पण आहे प्रत्यक्ष ऐका. पुढचे वाक्य तर समजतच नाही शर्ट मध्ये आहे आणि पॅन्ट मध्ये
  • Log in or register to post comments

विश्व बन्धु गुप्ता-- अकलेचे तारांगण क्लाउड कॉम्प्युटिंग

कापूसकोन्ड्या
Wed, 04/10/2013 - 13:36 नवीन
बाकी सर्व जाउ दे. माननिय विश्व बन्धू गुप्ता, ज्या गोष्टित आपल्यालाithe काहीही ??ट सुद्धा कळत नसताना कसे तारेत तोडावेत? काहीही मिपा वर बरेच क्लाउड कॉम्प्युटिंग चे तद्न्य आहेत त्यांनि यावर मत नोंदवावे १.सिम वरचि माहिती ब्याटरी मध्ये जाते, २.पावसामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग काम करत नाही. अशी वाक्ये वाचून डोक्याम्ध्ये दही जाउन विरजण लागले आहे. असो मजा करा.
  • Log in or register to post comments

हा हा हा

प्रसाद गोडबोले
Wed, 04/10/2013 - 14:20 नवीन
२.पावसामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग काम करत नाही
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या

आत्ता

विकास
Wed, 04/10/2013 - 19:48 नवीन
आत्ता हसून घ्या लेको! पण पावसाळ्यात समजेल तुमच्या क्प्म्युटींगवर क्लाऊडमधून कसे पाणी पडते ते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

परवा इल्ला

आशु जोग
गुरुवार, 04/11/2013 - 11:48 नवीन
क्लाऊडचा सर्वर ढगांच्यावर ठेवावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

पावसामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग

बॅटमॅन
Wed, 04/10/2013 - 14:42 नवीन
पावसामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग काम करत नाही.
=)) =)) =)) =)) =)) =)) बापरे, डोक्यातल्या दह्याचे बाष्पीभवन होऊन जो पाऊस पडेल त्यामुळे अंतर्गत वायरिंग काम करेना झालेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या

निर्णय

चिरोटा
Wed, 04/10/2013 - 14:05 नवीन
निर्णय न घेणे हा सुद्धा निर्णय असतो.Not taking decision is also a decision. पी. व्ही. नरसिंहराव.
  • Log in or register to post comments

पण

विकास
Wed, 04/10/2013 - 19:50 नवीन
पण याला तारे तोडणे म्हणता येणार नाही... "बोले तैसा चाले ... " म्हणावे लागेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

" ये जो सरकार है ये हमारे

विजुभाऊ
Wed, 04/10/2013 - 20:48 नवीन
" ये जो सरकार है ये हमारे पानीमेसे बिजली निकालती है और वो पानी फिर खेती को देती है. इसलीये हम गरीब रहते है".........देवीलाल
  • Log in or register to post comments

लालू

विकास
Wed, 04/10/2013 - 21:00 नवीन
"Indian Railways is the responsibility of Lord Vishwakarma. So is the safety of passengers... It is His duty, not mine. I have been forced to don His mantle," रेल्वेचे वाढत गेलेया अपघातांसंदर्भात, तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव
  • Log in or register to post comments

मस्तच!

प्रदीप
Fri, 04/12/2013 - 21:39 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

दादा

मैत्र
Wed, 04/10/2013 - 21:01 नवीन
राजू शेट्टी यांच्या विरोधात दादांनी भाषण केले होते गेल्या निवडणूकांमध्ये की - तुम्ही मतं दिलीत तर आम्ही विकास करू म्हणजे दूध संघ, साखर कारखाने, सोयी, रस्ते वगैरे.. मतं प्रभागाप्रमाणे समजतात आता. मतं न मिळता विकास करण्याचं काही कारण नाही. जे मतदारसंघ आम्हाला निवडून देतील त्यांचाच आम्ही विकास करू.. आम्ही काही सोशल वर्क करत नाही. राजकारण करतो." नेमके शब्द माझ्या लक्षात नाहीत. शोधलं तर कदाचित मिळतील.. पण असं विधान केलं आणि त्यांचा उमेदवार दणकून पडला होता इतकं आठवतंय..
  • Log in or register to post comments

एन्रॉन

श्रीरंग_जोशी
Wed, 04/10/2013 - 21:03 नवीन
एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवू - तत्कालिन विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपिनाथ मुंडे. कर्नाटकसोबतचे पाणीवाटप करात कृष्णेच्या पाण्यात बुडवू - तत्कालिन उपमुख्यमंत्री आर आर पाटिल (हे प्रथम नाव का वापरत नाही? राघोबा वगैरे असे आहे का?)
  • Log in or register to post comments

नक्की कोण?

विकास
Wed, 04/10/2013 - 21:07 नवीन
मुंडे की बाळासाहेब? (दोघांची भुमिका तीच होती, पण हे विशिष्ठ वाक्य मला वाटते बाळासाहेबांचे होते).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

>>> एन्रॉन प्रकल्प अरबी

श्रीगुरुजी
Fri, 04/12/2013 - 21:00 नवीन
>>> एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवू - तत्कालिन विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपिनाथ मुंडे. मार्च १९९५ मध्ये युती सरकार सत्तेवर आल्यावर एनरॉनबरोबरचा करार रद्द करून एनरॉन प्रकल्प खरोखरच अरबी समुद्रात बुडविला होता. त्यामुळे एनरॉनच्या रिबेका थॉमस भारतात येऊन बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी व इतर संबंधितांना भेटल्यावर व कराराच्या काही कलमांचे पुनर्लेखन झाल्यावर प्रकल्प समुद्रातून बाहेर काढला. करार रद्द करण्यापूर्वी वीजेचा दर प्रति युनिट रू. २.४० इतका मान्य केलेला होता. पण नव्याने करार केल्यावर यात २० टक्के सूट देऊन प्रति युनिट रू. १.९२ इतका मान्य केला गेला. करार कसा पुन्हा जिवंत झाला, करारात कोणत्या नवीन अटी घातल्या व नंतर हा प्रकल्प का रखडला याची फारशी कल्पना नाही. पण केलेल्या घोषणेप्रमाणे निदान काही काळ तरी हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडविला होता हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

बरोबर आहे

श्रीरंग_जोशी
Fri, 04/12/2013 - 21:03 नवीन
घोषणेप्रमाणे काही काळ हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवला होताच!! एन्रॉन दिवाळखोरीत गेली नसती तर हे प्रकरण (आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले होते) महाराष्ट्राला फारच महागात पडले असते असे तज्ञ लोकांनी म्हंटले होते तेव्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मुंडेच

श्रीरंग_जोशी
Wed, 04/10/2013 - 21:09 नवीन
मला तरी स्पष्ट आठवते की हे विधान मुंडे यांचेच होते. त्या काळात ते ऐन भरात होते. दाऊदच्या मुसक्या बांधून त्याला भारतात आणू अशी घोषणा पण त्यांचीच.
  • Log in or register to post comments

यावरून आठवले

श्रीरंग_जोशी
Wed, 04/10/2013 - 21:22 नवीन
युती शासनाच्या काळात विरोधी पक्षांच्या मोर्चात एक घोषणा असायची... महाराष्ट्रात दोनच गुंडे, जोशी मुंडे, जोशी मुंडे!! माझ्या वर्गात हजेरीच्यावेळी माझ्या नंतर मुंडे आडनाव असलेल्या वर्गमित्राचे नाव होते. हजेरी घेता घेता एक सर म्हणाले होते जोशी-मुंडे इथेही एकत्रच का? :-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

तुमच्या वर्गात "कुलकर्णी",

आदूबाळ
Wed, 04/10/2013 - 23:38 नवीन
तुमच्या वर्गात "कुलकर्णी", "कामत" वगैरे नव्हते वाटतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

तसे नाही

श्रीरंग_जोशी
Wed, 04/10/2013 - 23:59 नवीन
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला घडलेला प्रसंग आहे. पहिल्या दिवशी प्रत्येकाने आपले नाव लिहून कागद सरकवला होता त्यावर योगायोगाने तो क्रम आला. अन पुढचे काही दिवस गुरूजींनी त्या कागदावरच हजेरी घेतली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

पाण्याची मालकी

रमेश आठवले
गुरुवार, 04/11/2013 - 05:29 नवीन
सध्या गुजरातच्या राज्यपाल कमला बेनिवाल आहेत. यापूर्वी त्या राजस्तान मध्ये काँग्रेसच्या मंत्री मंडलात होत्या. त्यांच्या कडे जल संवर्धन खाते होते. त्यावेळी बेनिवाल यांनी असे विधान केले होते -राजस्तान मध्ये पडणार्या पाऊसाचा प्रत्येक थेंब हा राजस्तान सरकारच्या मालकीचा आहे.-
  • Log in or register to post comments

गवताचे पातेही उगवत नाही!

हुप्प्या
गुरुवार, 04/11/2013 - 06:51 नवीन
अक्साई चीन हा प्रदेश चीनने बळकावल्यावर आपले द्रष्टे पंतप्रधान पंडित नेहरु म्हणाले की "जाऊ द्या. तिथे गवताचे पातेही उगवत नाही". त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?" खिलाडूवृत्ती नसणारे नेहरु ह्या विधानावर चांगलेच संतापले. मला वाटते ताऊ देवीलाल ह्यांनी हरियाणाच्या शेतकर्‍यांना उद्देशून असे म्हटले की हल्ली तुमच्या शेतात पूर्वीसारखे पीक येत नाही कारण पंजाबचे सरकार त्या पाण्यातली वीज काढून घेते आणि नि:सत्त्व पाणी तुम्हाला देते!
  • Log in or register to post comments

पिलू मोदी

तर्री
गुरुवार, 04/11/2013 - 11:28 नवीन
त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?" हे विधान माझ्या मते पिलू मोदींचे आहे. बें.नाथ पै, राम मनोहर लोहिया, फिरोज गांधी बडे बुजुर्ग , विद्वान नेते हे नेहरूंचे कट्टर विरोधक होते. आपले दुर्दैव की त्यांना पोलिटिकल स्पेस मिळाली नाही. नेहरूंनी आपल्या चमच्यांचे , इंदिराबैनी आपल्या सुमार जी हुजूरस मर्थकांचे , राजीवजींनी आपल्या डून स्कूल च्या वाह्यात मित्रांचे आणि सोनियांनी हया ४ ही जमातीचे ऐकून राज्य केले आणि देशाची काशी केली.
  • Log in or register to post comments

+१.

बॅटमॅन
गुरुवार, 04/11/2013 - 11:40 नवीन
+१. मीही हे विधान पिलू मोदींचे आहे असेच वाचलेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा