गाभा:
. आजचा सकाळ ( २३/१/२०१३ ) . बहुतेक फक्त ठाणे आवृत्ती . शेवटचे पान . टीप टोप प्लाझा ची जाहिरात.
एक वधुपिता आणि त्याची मुलगी. रुबाबदार जोडी. जाहिरात अशी आहे -
'कन्या परक्याचे धन ' मानून
घडवलं व्यक्तिमत्व छान
सासरी करताना वाटे
सार्थ अभिमान
-----------------------------------------------
आता कल्पना करा कि पहिल्या दोन ओळी वधूपिता म्हणत आहे. आणि शेवटच्या दोन ओळी ती मुलगी म्हणतेय !!
अर्थात ती जाहिरात समोर असेल तर खरी मजा समजेल.
इथे त्या लोकांनी "करताना" ऐवजी "पाठवताना" हा शब्द वापरायला पाहिजे होता.
तुम्ही अशा जाहिराती पहिल्या आहेत का ?
प्रतिक्रिया
23 Jan 2013 - 10:14 am | पियुशा
सकाळी सकाळी अतिशय कल्पक अन माहीतीपुर्ण धागा आला बुवा मि.पा. वर ;)
23 Jan 2013 - 10:30 am | गवि
मी शंखपुष्पी सिरपची जाहिरात फार्फार पूर्वी वाचली होती. पण पूर्वी वाचली असली तरी जन्मभरासाठी मेंदूत ठोकली गेली आहे. कोणालातरी थाप वाटेल म्हणून एकदा सांगून गप बसतो. हे शंभर टक्के सत्य आहे:
सीरप शंखपुष्पी प्या आणि समोर वाढा.
23 Jan 2013 - 11:16 am | तिमा
ती जाहिरात पंक्तीतल्या वाढप्यांना उद्देशून असेल!
23 Jan 2013 - 6:26 pm | दादा कोंडके
बाकी, 'बचपन की गलतिया'वाल्या जाहिराती वाचून ते अजून कश्यालातरी उद्देशून असावं असं वाटतं. ;)
23 Jan 2013 - 11:36 am | प्रसाद प्रसाद
टीप टोप प्लाझा ची जाहिरात.
तुम्हाला “टीप टॉप” असे म्हणायचे आहे का?
23 Jan 2013 - 11:39 am | तर्री
फार वर्षापूर्वी एक सिरिअल होती नाव आठवत नाही. त्यामध्ये "कृत्तिका देसाई (?) अभिनेत्री होती.
जाहिराती मध्ये तिचे नाव "कुत्तिका देसाई " असे छापून आले होते.
23 Jan 2013 - 12:03 pm | गवि
नुकतीच एका मॉलमधे ही जाहिरात पाहिली. माझे काहीतरी पूर्वग्रह / गंड असतील आणि त्यामुळे मला ती खटकली असेल अशी शक्यता धरुन काहीच टिप्पणी न करता त्याचा फोटो खाली देतोय. आणखी कोणाला खटकतंय का?
23 Jan 2013 - 12:06 pm | बॅटमॅन
सगळे तिचायला गोर्या रंगामागे धावणारे..ब्लडी स्लेव्ह्ज.
23 Jan 2013 - 12:10 pm | गवि
हेही ठीक कदाचित, पण मला ते नाही खटकलं.. गोरेपणाचं आकर्षण फारच कॉमन असल्याने आपण त्याला निर्ढावलो आहोत :) मला बोचलं ते वेगळंच..
23 Jan 2013 - 12:12 pm | बॅटमॅन
मराठी-इंग्रजी वैग्रे अँगल आहे का?
23 Jan 2013 - 12:14 pm | नगरीनिरंजन
मराठी - अगंबाई - मागासलेले
इंग्रजी - Hi-Fi - म्हंजे भारी.
23 Jan 2013 - 7:58 pm | शुचि
तेच म्हणते मी. मेले "वाघीणीच्या दूधाचे" गुलाम :(
23 Jan 2013 - 12:45 pm | तिमा
जाहिरातदाराला 'सेन्स ऑफ ह्युमर' कमी असावा. नाहीतर त्याने उजवीकडे 'अरेच्चा' असं लिहिलं असतं.
23 Jan 2013 - 2:28 pm | सस्नेह
23 Jan 2013 - 5:41 pm | अग्निकोल्हा
.
24 Jan 2013 - 12:49 pm | नंदन
किंवा तत्सम महागड्या साबण/पावडरीची एक जाहिरात आठवते. चाळीतली, मराठी चेहर्यामोहर्याची बाई "अमुकढमुक इंग्रजी मीडियमच्या शाळेत शिकते. तिथली मुलं काय स्मार्ट असतात!" असं हरखून जाऊन सांगत असते. त्यामागची मानसिकताही तीच.
23 Jan 2013 - 12:12 pm | आदूबाळ
मालिकेत कोणी "माझा विश्वास करा" असं म्हणालं, की "विश्वास केव्हाच पानिपतावर गेला" असं मला म्हणावसं वाटतं... :)
23 Jan 2013 - 12:19 pm | बॅटमॅन
आईच्यान्!!!!! इंग्रजाळलेले आणि हिंदाळलेले यांपैकी कुठल्या मराठीचा जास्त राग येतो ते सांगणे कठीण आहे, दोन्ही प्रकार सारखेच डोक्यात जातात. अशा लोकांचा लै राग येतो. वायझेड साले.
23 Jan 2013 - 1:40 pm | धमाल मुलगा
मी बरेच दिवस झाले शोधतोय, हल्ली मराठी जाहिरातींत ऐकु येणारा/वाचायला मिळणारा 'किटाणू' हा शब्द नक्की कोणत्या मराठीत आहे.
23 Jan 2013 - 1:50 pm | बॅटमॅन
कीटाणू हा शब्द हिंदाळलेल्या मराठीतलाच. पण जीवाणू, विषाणू, वगैरे स्टाईलमध्ये असल्याने खपून गेला तरी एखादवेळेस ठीक असे मला वाट्टे. पण "दिलचस्पी राखतो" छाप मराठी वाचून डोक्यात जातं.
23 Jan 2013 - 2:24 pm | धमाल मुलगा
वाचलो!
मी तुमच्यापेक्षा नशिबवान आहे. ही असली उकिरडा लायकीची भाषा ऐकण्याची वेळ अजुनतरी नाही आली.
23 Jan 2013 - 8:32 pm | रेवती
आणखी एक म्हणजे, मी तुमचे धन्यवाद करतो. बाकी मी आली , गेली, स्वयंपाक करणे म्हणजे जेवण करणे, आनी, पानी याची इतकी सवय झालीये की आता ते फारसं खटकत नाहीच. बरं यावरून काही बोललं तर जातीयता आडवी येते. चुकीचंही बोलायचं आणी वर स्वत:ला कोण समजताही म्हणायचं, त्यापेक्षा चुकत रहा लेको! मेरा क्या जाता है. ;)
24 Jan 2013 - 9:33 am | शैलेन्द्र
मेरा क्या जाता है. smiley
23 Jan 2013 - 12:19 pm | तर्री
विस्तारी करण = विस्तार
सर्वसाधारीकरण = सर्वसाधारणपणे
सबली करण = सबळ करणे
असे काही विचित्र शब्द जाहिराती / बातम्यांमध्ये दिसतात.
23 Jan 2013 - 12:22 pm | गवि
सरकारी जाहिरातींमधे चुकीची रचना असलेल्या भिंतीवरच्या रंगवलेल्या जाहिराती कोल्हापूर्-सातारा-सांगली बेल्टमधे पाहिल्या.
- स्त्रीत्वाचा हा अपमान, मुलगा मुलगी एक समान.. (केवळ इतकीच स्लोगन, पुढेमागे काही नसल्याने अत्यंत उलट चुकीचा अर्थ निघतो)
-निरक्षरांनो साक्षर व्हा.. (असं भिंतीवर मोठ्ठ्या अक्षरात रंगवलेलं..नो कॉमेंट्स)
24 Jan 2013 - 12:07 am | मोदक
-निरक्षरांनो साक्षर व्हा.. (असं भिंतीवर मोठ्ठ्या अक्षरात रंगवलेलं..नो कॉमेंट्स)
तुमचं "नो कमेंट्स" भिडलं हो गवि. :-))
23 Jan 2013 - 12:43 pm | तिमा
सरकारी एमटीएनएल च्या फोन मधून फोन लागला नाही तर "आम्ही क्षमस्व आहोत' अशी उदघोषणा ऐकू येते.
23 Jan 2013 - 12:48 pm | अभ्या..
खरेतर जाहिरातीतील मजकूर (कॉपी) हा त्या भाषेतील जाणकाराकडून लिहून घेतला जातो. पण असे फक्त प्रथितयश जाहिरात कंपन्याना परवडते. तेथे सुध्दा 'काय चाल्लेय, क्स्काय' असे कामचलाऊ मराठी येणारे बिगरमराठी लोक (त्यातल्या त्यात उत्तरभारतीय, लिपीसाधर्म्यामुळे मराठी आपल्याला येते असा समज असणारे आणि दादा कोंडकेंची ओळख नसणारे) हे कॉपी लिहायचे काम करतात. मग अशा चुका होतात.
दुसरा प्रकार म्हणजे बर्याचशा अॅड ह्या ऑनलाईन येतात(बहुतांशी वाहनांच्या उत्तर भारतातून आणि एफेमसीजी च्या दक्षिण भारतातून) तेथील लोकांना भाषेतील बारकाव्याचा अंदाज नसतो. गावांच्या नावाचे तर सर्रास रुपांतर स्पेलिंगवरुन करतात ते पण अतिशय भयानक असते. उदा. पर्बहानी (परभणी), जलाना (जालना), कर्दवादी(कुर्डूवाडी), पंदार्पूर(पंढरपूर), नंदेद(नांदेड).
तिसरे म्हणजे बर्याच लोकल डीटीपी ऑपरेटर्सना पण भाषेचे पुरेसे ज्ञान नसते (त्यात प्रुफरिडींगचा अभाव) त्यांच्या कडून पण अशा चुका होतात. सोलापूरातसुध्दा पत्रिका टाईप करताना इथल्याच डीटीपी ऑपरेटरने सौ. तुळजाभवानी प्रसन्न श्री. गजानन प्रसन्न असे टाईप केलेले बघितले आहे. चूक दाखवल्यावर "सर तुम्हीच तर मनला होताव की लेडीज नावाला सौ लावायचे मनून" हे उत्तर ऐकले आहे.
जाहिरातक्षेत्र हे डेडलाईनवर कायम काम करते. वेळ आणि पैसा वाचवायसाठी अशा गोष्टी घडतात. त्यात अशा चुका होतातच.
परिणाम अशा कुप्रसिध्दीवर नाहीतर पूर्ण कँपेन फेल जाण्यावर होतो. हे भाषेचे आणि योग्य प्रकटनाचे महत्त्व ज्यादिवशी जाहिरातक्षेत्राला कळेल तो सुदिन.
23 Jan 2013 - 1:00 pm | बॅटमॅन
तुमच्यासारख्या सोनारानेच त्यांचे कान टोचायला पाहिजेत तरच हे लोक नीट लक्ष देऊन काम करतील. शुद्ध भाषेचे महत्व काय आहे हे पटवणे या क्षेत्रात तरी पैशाशी निगडित असल्याचे पाहून लोक लक्ष देतील हीच आशा.
23 Jan 2013 - 1:50 pm | योगप्रभू
बॅटमॅन,
हे मार्केट इतके खालच्या थराला गेले आहे, की आता सर्वसामान्यांनी भाषेचे खून पडत असलेले बघण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. भाषांतराच्या व्यवसायात परकी भाषांसाठी प्रतिशब्द उत्तम दर आहे, पण भारतीय भाषांसाठी अक्षरशः कवडीमोल दर देतात आणि त्यातही पुन्हा पाडून मागतात. पैसे वाचल्याच्या नादापुढे भाषेची अचूकता बिनमहत्त्वाची. स्पेशलाइज्ड कॉपीरायटर नेमायचे नाहीत. इंग्रजी चांगले आणि ३-४ प्रादेशिक भाषा जाणतो या बेसिसवर जाहिरात एजन्सीत नोकर्या मिळतात. वर्तमानपत्रे आणि चॅनल्सनाही भाषेच्या चुकांचा फारसा विधीनिषेध नाहीय.
काल एका मराठी वाहिनीवर सतत एकच स्ट्रीप दाखवत होते.
'विठ्ठलाच्या खाजिन्यावर चोरांचा डल्ला'
23 Jan 2013 - 1:59 pm | बॅटमॅन
अवघड आहे :(
23 Jan 2013 - 2:43 pm | धमाल मुलगा
तळजाभवानी सौभाग्यवती आहेच म्हणताना सौ. लावणारच की तो. :-)
डिटीपीवाली पोरं कमी शिकलेली असतात, त्यांच्या चुका एकवेळ समजण्यासारख्या आहेत. लाकोंचं बजेट असलेल्या ( टि.व्ही.साटीच्या वगैरे) जाहिरातींसाठी क्रिएटिव्ह रायटर्स, एडिडर्स अशी खाशी मंडळी असतानाही ासे प्रकार घडतात हे नवल.
जाहिरातक्षेत्रातील अधिक माहितीसाठी अदीजोशी ह्यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.
23 Jan 2013 - 6:39 pm | आदूबाळ
तुम्ही "हिंजेवाडी" विसरलात! ("ज" जांबुवंतातला)
माझ्या एक-दोन हिंजवडीस्थित अशिलांना मी "हिं ज व डी" असं पष्ट म्हणून दाखवलं तर त्यांनी "गावठी साला" असा चेहेरा केला!
23 Jan 2013 - 6:48 pm | अभ्या..
त्या उच्चारी चुका आहेत आणि आधुनिकता दाखवायच्या गंडापायी केलेले अंधानुकरण.
तसे वानवडी च्या स्पेलिंगवरुन सुध्दा छान उच्चार होतो. ;)
मी जी उदाहरणे दिली आहेत ती प्रिंटमिडीयात मोठमोठ्या कंपनीच्या ज्या जाहिराती येतात त्याखाली अधिकृत विक्रेत्याची नावे देतात ती आहेत.
25 Jan 2013 - 5:27 pm | चावटमेला
तुम्ही "हिंजेवाडी" विसरलात! ("ज" जांबुवंतातला)
अगदी अगदी. शिवाय औंध चं ओंध, बावधन चं बवधान, बाणेर चं बानेर, चिंचवड चं चिंचवाड, असले अस्सल भैय्या ष्टाईल चे उच्चार रोज ऐकून पुण्याचं लवकरच पूर्णपणे पूना होवून जाते की काय अशी भीती वाटायला लागलीये.
25 Jan 2013 - 6:31 pm | क्लिंटन
१९९५ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल ऐकत असताना हिंदी चॅनेलवर "मलवान" विधानसभा मतदारसंघाविषयीचा उल्लेख ऐकला.त्याकाळी मी सतत निवडणुकीच्या वातावरणात स्वतःला बुडवून घेत असूनही "मलवान" मतदारसंघ मला माहित कसा नाही याचे मला बराच वेळ आश्चर्य वाटत होते.पण कुठचे काय. नंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की "मलवान" म्हणजे दुसरे तिसरे काही नसून "मालवण" :)
25 Jan 2013 - 8:41 pm | मृगनयनी
बाळासाहेब ठाकर्यांच्या निधनानन्तर सगळ्यांनाच अतीव दु:ख झाले. खरोखर बाळासाहेब महाराष्ट्राला पोरके केले. पण काही अशुद्ध फलकांकडे पाहून हसावे का रडावे.. तेच कळले नाही.. एका फलकावर लिहिले होते,
"साहेब.. तुम्ही गेलात.. पण पोर्क केलं आम्हाला!" ;) साहेबांनी "पोर्क" केलं!!!... हाहा!.. =)) =)) =)) खूपच बीफ' मध्ये लिहिल्या होत्या ओळी!!! ;) =))
25 Jan 2013 - 7:54 pm | आदूबाळ
अजून एक.
माझा एक अमराठी सहकारी मला म्हणाला "ऑडिट के लिए रंजनगाँव जाना है". मला काही कळेना. थोड्या वेळाने कंपनीचं नाव आणि पत्ता पाहिल्यावर उलगडा झाला!
23 Jan 2013 - 12:57 pm | अभ्या..
आणि अजून एक
शब्द ते शब्द असे भाषांतर करणारे सुध्दा बरेच जण असतात. गविंनी उद्धृत केल्याप्रमाणे सीरप शंखपुष्पी प्या आणि समोर वाढा हे खरेतर सीरप शंखपुष्पी पिओ और आगे बढो याचे भाषांतर आहे.
आम्ही याला माशी टू माशी म्हणतो, म्हण्जे दिलेल्या हस्तलिखितावर एखादी माशी मेलेली असली तरी प्रिंटआउटवर एक माशी मारून चिकटावायची.
23 Jan 2013 - 1:00 pm | तर्री
वैद्य पाटणकर आयुर्वेदिक काढा ची जाहिरात एका मित्रास चुकीची वाटली होती. काढा हा प्रकार त्याला माहित नव्हता.
"काय काढा ते ह्यानी लिहिलेच नाही " अशी त्याची तक्रार होती.
23 Jan 2013 - 2:12 pm | संजय क्षीरसागर
भ्रष्टाचाराविरूद्ध अण्णा हजारे उपोषणाला बसून एकेका मंत्र्याला पायउतार करत होते. सत्ता तेंव्हा शिवसेनेकडे होती. बाळासाहेब ज्याम वैतागले, म्हणाले :
`आयला हे उपोषणाला बसतात आणि रोज ह्याला काढा त्याला काढा. हा काय पाटणकर काढा आहे का?
23 Jan 2013 - 1:44 pm | गवि
शिवाय ऑनलाईनच कुठेतरी वाचून मग स्वतःची आठवण धुंडाळली आणि खरंच निघालं:
टूथपेस्टची (कोलगेट) पूर्वीची जाहिरातः "आम (इतर) टूथपेस्ट में नमक जैसे खुरदुरे तत्व होते है जो आप के दांतोंको नुकसान पहुंचा सकता है..." (चूभूदेघे)
त्याच टूथपेस्टची आताची जाहिरात: "क्या आपके टूथपेस्टमें नमक है? कोलगेट विथ अॅक्टिव सॉल्ट"
अर्थात हा सुद्धा टायपो किंवा चुकीच्या शब्दरचनेचा भाग नाही...
25 Jan 2013 - 6:37 pm | सन्जयखान्डेकर
कोलगेट ने दाखवुन दिले की 'दुनिया गोल आहे', आता काही दिवसांनी कोलगेट शेणाची / शेणयुक्त टुथपेस्ट बनवणार ही खात्री बाळगा.
माझी मुलगी मराठी पहिलीत आहे, तिला वर्ग शिक्षकेने लिहुन दिले 'रंगीत कागद चिकटवा' मग 'चिकटवा खोडुन लिहिले 'चिटकवा'.
मला बडवायला माझे कपाळ देखिल सापडले नाही हो.
23 Jan 2013 - 2:30 pm | सस्नेह
आमच्या इथल्या एका मॉलमध्ये 'मेन्स कॉर्नर'ला ही पाटी नेहमी दिसते....

23 Jan 2013 - 2:57 pm | धमाल मुलगा
सदर फलकाचा लेखकु निःसंशय बिहारी असणर. श च स करण्यात त्यांच. हातखंडाच आहे.
23 Jan 2013 - 3:01 pm | गवि
सेव्हिंग क्रीम..?!
चूकच असेल असं नाही... काहीतरी असेल हो बचतीची डिस्काउंट स्कीम वगैरे त्या सेक्शनमधे...
23 Jan 2013 - 2:33 pm | सातबारा
माझ्या अंदाजानुसार ( आता अंदाजच म्हणायचे,कारण मराठी वाहिन्यांवर सुध्दा सर्रास दर्शकच म्हणतात प्रेक्षकांना ), दर्शक म्हणजे दाखवणारा असे लहानपणी तरी होते.
23 Jan 2013 - 2:34 pm | ऋषिकेश
छ्या! या असल्या इश्तिहारंमुळे मी परेशान झालो आहे ;)
23 Jan 2013 - 2:52 pm | अभ्या..
परेशान हा महाराष्ट्रात (मराठवाडा विशेषत:) सर्रास वापरला जाणारा शब्द आहे हो. आम्ही नाही त्यामुळे परेशान. ;)
पण ह्या गोष्टीची दुसरी बाजू अशी की आमच्याकडे पण कर्नाटकातली बराचशी कामे येतात. आणि आम्हाला कन्नड येते या अभिमानाच्या मूळ कन्नड लोक अगदी या धाग्याप्रमाणेच अशाच चिंधड्या उडवतात. त्या त्या भाषेचा लहेजा सांभाळणे सोपी गोष्ट नाही. त्यामुळे जाहिरातक्षेत्राला बदनाम न करता मूळ मराठी लोकच मराठीच्या किती चिंधड्या उडवतात ते पाहावे असे वाटते. (त्यातल्या त्यात आजकालच्या मुलींचे मी आली, मी गेली अगदी डोक्यात जाते)
पंक्चर काढले जाईल हे शुध्द लिहिलेले वाचायला आसुसलेला
23 Jan 2013 - 3:05 pm | बॅटमॅन
सेम!
या एका आशेने किती व्याक्रणप्रेमी हृदये पम्चरवली आहेत काय सांगू ;)
23 Jan 2013 - 5:00 pm | चिरोटा
मध्यंतरी एका बिगर कन्नड भाषिकाने न्यायलयीन अर्जात 'उच्च न्यायालय'ऐवजी 'हुच्च्'(वेडे)न्यायालय' केला होता.
23 Jan 2013 - 6:44 pm | आदूबाळ
Puncture आणि Cold Drink हे शब्द देवनागरीत बोर्डावर रंगवायला रंगार्याचे हात थरथरत असावेत.
पण हेही एकवेळ क्षम्य आहे.
23 Jan 2013 - 7:25 pm | इनिगोय
पंक्चर काढले जाईल हे शुध्द लिहिलेले वाचायला आसुसलेला
तूच चुकीचं लिहिलंयस. ते "पंचर" असं लिहायचं असतं :P
23 Jan 2013 - 8:34 pm | रेवती
नाही हां, पंपचर म्हणतात. ;)
25 Jan 2013 - 2:27 pm | केदार-मिसळपाव
भूचर... खेचर... ह्या पठडीताले...
25 Jan 2013 - 5:32 pm | केदार-मिसळपाव
आमच्या इकडे 'पन्ग्चर' असेही म्हणतात.
23 Jan 2013 - 2:43 pm | बहुगुणी
23 Jan 2013 - 4:04 pm | धमाल मुलगा
तुम्हाला कोणि सांगितलं की मटा हे मराठी वर्तमानपत्र आहे म्हणुन?
मटा हे देवनागरी लिपी वाचता येणार्या सर्वांच्या सोयीसाठी चालवलेलं खटलं आहे.
23 Jan 2013 - 2:46 pm | सूड
आताची नॅनोची अॅड जाम डोक्यात जाते. 'आगे बढा' हे जाहिरातीतल्या पात्राला उद्देशून असलेलं वाक्य त्यांनी त्याच पात्राच्या तोंडून 'पुढे चालला' असं म्हणवून घेतलंय. मध्यंतरी अजित भूरेंनी मुलाखतीत सांगितलं होतं की अशा जाहिरातींसाठी डबिंग करताना हे चूकीचं मराठी आहे असं सांगण्याचा कलाकारांनी प्रयत्न केला तर हेच अप्रूव्ह होऊन आलंय असं सांगण्यात येतं.
23 Jan 2013 - 2:50 pm | एम.जी.
मराठीच्या अभिमानासाठी काढलेल्या चित्रपटात [ मी शिवाजीराजे....] जर " मला गर्व आहे मी मराठी असल्याचा..." असे तद्दन चुकीचे वाक्य म्हणत असतील तर जाहिरात कंपन्यांमधे भाषांतर करणार्या परप्रांतियांकडून कशाला अपेक्षा ठेवायची...?
23 Jan 2013 - 3:13 pm | बाळ सप्रे
बहुतेक गॅरे़जवाले "ऑटो"ऐवजी "अॅटो" लिहितात..
23 Jan 2013 - 8:34 pm | रेवती
एकेठेकाणी 'आमच्या येथे शाखारी व मौसाहारी पदार्थ मिळतील' असे वाचले होते.
23 Jan 2013 - 8:53 pm | अभ्या..
मटण शीख मिळेल. (ते शीग आहे का सीग आहे हे पण माहीत नाही मला)
किरेन, जेसीपी व पोकलँड व ट्रावली भाड्याने मिळेल (क्रेन, जेसीबी व पोक्लेन, ट्रॉली/ट्रेलर)
अयडिंटी फोटो काढून मिळतील.
खास लग्नासाठी नाचणारा घोडा मिळेल.
पंचर, पमचर, पन्चर, पंकचर, पचंर.
सगळं वाचायची आता सवय झालीय :(
23 Jan 2013 - 9:10 pm | खेडूत
शॉक बसर राहिले ना!
23 Jan 2013 - 9:17 pm | पैसा
येथे बॉयलर चिकन मिळेल अशी पाटी पाहिली आहे.
23 Jan 2013 - 3:39 pm | इनिगोय
काल परवाच बांधकाम व्यवसायातल्या कंपनीची जाहिरात वाचली.
"आम्हाला क्रमांक १ चे अग्रगण्य बनवल्याबद्दल आभारी आहोत आम्ही तुमचे"..
आता क्रमांक २ चे अग्रगण्य कोण तेही सांगून टाका म्हणावं!
म्हणजे आपल्याला ब्वा हा शब्द माहीत आहे म्हणून वापरा, पण वाचकांना मात्र तो नक्कीच माहीत नसणार म्हणून अर्थही सांगून टाका.. असा उद्योग वाटला हा. बाकी वाक्यरचनेबाबत तर __/\__..
23 Jan 2013 - 3:41 pm | समीरसूर
आवडला.
मराठीचं हिंदीकरण तर आता अगदी अंगवळणी पडले आहे. हिंदाळलेली मराठी ही ऐकायला खूप विचित्र वाटते. मस्त चिकन बिर्यानीमध्ये अधून-मधून भेंडीच्या फोडी लागाव्यात तशी...
सुविधा - हिंदी शब्द - मराठी प्रतिशब्द सोयी
गुफा - हिंदी शब्द - मराठी प्रतिशब्द गुहा
विदेश - हिंदी शब्द - मराठी प्रतिशब्द परदेश
योगदान - हिंदी शब्द - मराठी प्रतिशब्द माहित नाही
करोड - कोटी
कमी - कमतरता
एका नाटकाचे (मराठी) नाव "या, तुमचीच कमी होती" असे होते. आता बोला! कसलं मराठी नाटक वयात आलं, खड्ड्यात गेलं!! "सासू माझी ढासू" अरे हे काय नाटकाचं नाव झालं? यमक जुळवण्यासाठी काहीही???
बाकी आजकाल मराठी शब्दांचे ज्ञान कमी कमी होत चालले आहे हे खरे.
कार्यालयात एकजण (अर्थात पुणेरी) दुसर्याला म्हणाला, "अरे तो नं, तो जात्याच खोडसाळ आहे; छळवादी आहे नुसता"
तो समोरचा जो मराठी महापुरुष होता त्याच्या चेहर्यावरची बारीकशी सुरकुतीदेखील हलली नाही. तो मट्ठासारखा बघत राहिला. मी माझ्या पुणेरी मित्राला म्हणालो कि बाबा रे त्याला कळलेलं नाहीये तू काय म्हणालास ते, पुन्हा सांग त्याला.
आता बोला.
23 Jan 2013 - 7:40 pm | अमेरिकन त्रिशंकू
योगदान - हिंदी शब्द - मराठी प्रतिशब्द माहित नाही
वाटा
23 Jan 2013 - 8:31 pm | विश्वनाथ मेहेंदळे
योगदान मराठी शब्द नाही ??
25 Jan 2013 - 6:41 pm | सन्जयखान्डेकर
योगदान - हिंदी शब्द - मराठी प्रतिशब्द 'वाटा' असा असावा.
23 Jan 2013 - 3:47 pm | बाळ सप्रे
विमानातील "खुर्चीची पेटी" !!
विमानक्रमांक ऐवजी विमानसंख्या
23 Jan 2013 - 3:47 pm | बॅटमॅन
+१०००००००००००००. हेपण लै प्रचलित आणि डोक्यात जाणारे शब्द एकदम.
23 Jan 2013 - 3:56 pm | गवि
भाषांच्या सरमिसळीविषयी, विशेषतः इतर भाषेतले शब्द घेण्याविषयी तितकंसं तीव्र विरोधी वैयक्तिक मत नसल्याने त्याबाबत पास. :)
23 Jan 2013 - 4:21 pm | अभ्या..
गविंशी सहमतच
शेवटी आलोच जाहिरातीच्या मूळ तत्त्वावर.
इटस अ कम्युनिकेशन. आर्ट फॉर पीपल.
सांगणारा सांगेल, करणारा करेल, समजून घेणारा घेईल समजून. सगळेच ग्राहक असतात.
23 Jan 2013 - 4:30 pm | गवि
हेच...
चुकीचं भाषांतर, विरामचिन्हाच्या चुका, शब्दशः आणि असंवेदनशील भाषांतर, संदर्भ सोडून दोन भाषांतले शब्द एकत्र आणून अनर्थ करणे हे सर्व नक्कीच खटकण्यासारखं वाटतं पण केवळ अन्य भाषेतला बहुसंख्य समकालीनांना समजेल असा शब्द आपल्या भाषेत मिसळणं हे नक्कीच वाईट नाही.
उदा:
अॅडवणे, पेस्टवणे, सीटबेल्ट बांधा म्हणणे, चातुर्यपूर्ण कोट्यांसाठी भाषा मिसळणे (अमूलच्या अॅड्स हे उत्तम उदाहरण..) हे सर्व आवडतं..
23 Jan 2013 - 4:32 pm | बॅटमॅन
गविराज, सरमिसळीबद्दल विशेष प्रतिकूल मत माझेही नाही. बोलताना पाहिजे तसे बोला, पण लिहिताना जरा डोके जागेवर ठेवा, अशा मताचा मी आहे. मुळात अशी हिंदाळलेली मराठी विदर्भ भागातसुद्धा फार आहे असे नाही. डोके जाग्यावर न ठेवता लिहिलेले मराठी पाहिले की डोके फिरते, इतकेच.
23 Jan 2013 - 5:47 pm | मनराव
+१...
23 Jan 2013 - 4:55 pm | चाणक्य
खरं म्हणजे मला हे पण खटकतं. लेखन उडवल्या जाईल च्या ऐवजी लेखन उडवले जाईल, हे जास्त बरोबर वाटत नाही का?
23 Jan 2013 - 5:20 pm | ऋषिकेश
उडवल्या जाईल हे काही प्रान्तात बोललेच नाही तर लिहिलेही जाते (बहुदा सोलापूर वगैरे), त्यामुळे हे सवयीने होऊ शकते. अर्थात हे प्रमाण मराठी नाही, मात्र या संस्थळाचा प्रमाण मराठीचा आग्रहही नाही
बाकी, (विषय काढलाच आहात म्हणून)प्रत्येक संस्थळावर अशा खटकणार्या गोष्टी आहेत. (असा छिद्रान्वेशीपणा करताना) मात्र वृत्तपत्रे व्यावसायिक असतात तर ही सगळीच संस्थळे ही खाजगी आणि हौसेखातर काढली आहेत हे ही ध्यानात घ्यायला हवे.
अवांतरःबाकी, अन्यत्र अनेक संस्थळावर असलेले 'आलेले सदस्य' देखील मला खटकते. त्यापेक्षा मिपावरील 'हजर माणसं' हा शब्दप्रयोग अधिक सुयोग्य वाटते, पण अन्यत्र मी त्याकडे दुर्लक्ष करतो कारण त्या सगळ्याच स्थळांवर वाचण्यासारखे बरेच काही सापडते.
असो.
23 Jan 2013 - 5:32 pm | अभ्या..
अज्याबात नाही. सोलापूरात हेच वाक्य लिहायचे झाले तर उडवण्यात येईल असेच लिहितात.
आणि खटकायच्या बाबतीत : बाहेरच्यांचे खटकते. आपल्या घरातील खटकत नसते हो.
23 Jan 2013 - 6:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आपला तो बाब्या... ;-)
अवांतर :- पूर्वेतिहास बघत हे सगळे प्रतिसाद उडवल्या जाऊ शकतात..
23 Jan 2013 - 5:37 pm | बॅटमॅन
उडवल्या जाईल वगैरे मी विदर्भ-मराठवाड्यात ऐकलेले आहे. पच्चिम म्हाराष्ट्रात नै बोलत लोकं तसं.
23 Jan 2013 - 5:51 pm | चाणक्य
याचे भान आहेच. आणि मिपा वर वाचण्यासरखे भरपूर आहे याचीही जाणीव आहे. म्हणून तर ठाण मांडून आहे ईथे. छिद्रान्वेषीपणा करायचा हेतू नव्हता. असो.
23 Jan 2013 - 6:00 pm | सूड
उडवल्या जाईल बद्दल काही बोलू नका बरं. त्याच्याविरुद्ध बोलणार्यांचे प्रतिसाद 'उडवल्या' जातात असा स्वानुभव आहे.
23 Jan 2013 - 7:43 pm | अमेरिकन त्रिशंकू
उपस्थित सदस्य
23 Jan 2013 - 5:37 pm | अभ्या..
आणि याच बाबतीत आपले ज्येष्ठ मिपाकर श्री. पेठकर काकांनी मला खूप छान सांगितले होते.
त्यांच्या मते आपले आपण शुध्द लिहिणे हेच सर्वात उत्तम.
त्यांचे निर्दोष मराठी लेखनातून सुध्दा बरेच काही शिकण्यासारखे आहे.
23 Jan 2013 - 5:45 pm | प्रभाकर पेठकर
'झी २४ तास' ने काल एका गोष्टीचा 'पर्दाफार्श' केला आणि बातमीवर 'झी २४ तास इम्पॅक्ट' असा शिक्का मारून बातमी दाखविली जाते. असो.
'आलेलो', 'गेलेलो' हे तर इतकं इतकं वापरलं जातं की तेच शुद्ध आहे असं माझं मत बनत चाललं आहे. तेही असो.
डेटॉलच्या जाहिरातीत ५-६ वर्षांची मुले क्रिकेट खेळत असतात त्यांचा चेंडू बाजूलाच बांधकाम चाललेल्या इमारतीच्या पाण्याच्या हौदात पडतो. त्या घाणेरड्या पाण्यात उतरायला कोणी तयार नसतं पण एक मुलगा धाडकन उडी मारतो (पाणी कमरे इतकंच खोल असतं) आणि चेंडू बाहेर काढतो. कारण का तो रोज आंघोळीच्या पाण्यात डेटॉल टाकून की डेटॉलच्या साबणाने अंग धूत असतो. त्याला जंतू संसर्ग होऊच शकत नाही. आता प्रश्न असा आहे हे चलचित्र दूरदर्शनवर पाहून दुसर्या एखाद्या मुलाने (तो डेटॉल वापरत असेल किंवा नसेल) एखाद्या हौद्यात उडी घेतली आणि पाण्याची पातळी ७-८ फुट असेल आणि त्या मुलाला पोहता येत नसेल तर काय अनर्थ होईल? चुकीची जाहिरात पाहून एखाद्या लहानग्याचा जीव जाऊ शकतो.
डेटॉलच्याच दुसर्या एका जाहिरातीत त्याच वयाच्या मुलांचा क्रिकेट खेळताना चेंडू एका बाजूला उभ्या असलेल्या ट्रक खाली जातो. एक मुलगा लगेच ट्रक खाली घुसून तो चेंडू बाहेर काढतो. ट्रक खालच्या धुळीची, जळलेल्या तेलाची, वंगणाची त्याला काळजी नसते कारण तो डेटॉलने आंघोळ करत असतो. परंतु, तो मुलगा ट्र्क खाली असताना ट्रक सुरू झाला असता तर??
जाहिरातींच्या ह्या धोकादायक परिणामांना जबाबदार कोण? एका शीतपेयासाठी तरूण मुलं मुली ह्या इमारतीवरून त्या इमारतीवर उड्या मारत, दोरीला लटकत आणि पत्र्याच्या नळकांडीतून ७-८ मजली इमारतीवरून खाली येतात. 'आज काही तुफानी करूया' म्हणणारी ही मुलं काय किंवा अक्षयकुमार काय, शीत पेयं काय किंवा रहदारीतून वेगाने आणि वेडीवाकडी मोटरसायकल चालविणार्या त्या जाहिरातीतील तरूण काय सर्वजणांना धोकादायक खेळ खेळायला प्रवृत्त करताना दिसतात. खाली एक बारीक सूचना टाकली की ह्यातील सर्व स्टंट दृष्ये सराईत, पटाईत आणि व्यावसायिक कलाकारांनी केली आहेत आपण प्रयत्न करू नये, की जाहिरातदाराची जबाबदारी संपली?
भाषेच्या शुद्धतेबरोबरच आचरणाची शुद्धताही तितकीच (किंबहुना जास्त) महत्त्वाची.
23 Jan 2013 - 6:00 pm | अनन्न्या
माझी पुतणी शाळेतून सायकलने घरी येते, काल घरी आल्यावर ती म्हणाली, मी मिठाईच्या दुकानाशी आल्यावर डचमळले, कोणत्या रस्त्याने येऊ तेच कळेना!!
23 Jan 2013 - 6:20 pm | अनन्न्या
मराठीच्या शिक्षिकेने मुलांना वर्गात सांगितले, वडील हा नपुसकलिंगी शब्द आहे. घरी मुलाने पेपर सोड्वताना तोच पर्याय लिहीला. मी त्याला समजावले, त्यावर त्याचे बाईंनी दिलेले स्पष्टीकरण- ते वडील म्हणजे नपुसकलिंगीच!! दुसय्रा दिवशी शाळेत गेले. बाईंचे म्हणणे ते ज्या साठी वापरतो ते शब्द नपुसकलिंगीच!! आदरार्थी बहुवचन त्यांना पटले नाही. 'व्याकरण आम्हीही शिकलोय हो!! काय पण एकेक पालक आहेत!!' एवढे ऐकून परत आले.
23 Jan 2013 - 6:23 pm | सूड
'व्याकरण आम्हीही शिकलोय हो!! काय पण एकेक पालक आहेत!!'
हे असलं ऐकून तुम्ही परत आलात? शाळेत मुख्याध्यापक वैगरे प्रकार असतो त्याचीही जाणीव जरा त्या शिक्षिकेला होऊ द्यायचीत की !!
23 Jan 2013 - 6:27 pm | अनन्न्या
मी फक्त शिक्षकांच्या उत्तम? व्याकरणाचा नमुना सांगितला.
23 Jan 2013 - 7:36 pm | बॅटमॅन
काय मूर्ख बाई आहे, मुख्याध्यापकांकडून समजावलेत ते उत्तम. अशा बायांचा त्रास शालेय जीवनात मलाही काहीवेळेस सहन करावा लागला आहे.
23 Jan 2013 - 6:24 pm | दादा कोंडके
कालच 'मटा'त कुणीतरी 'भडास काढली' आणि 'कुण्याच्यातरी गाण्यावर तरुणाई थिरकत होती' ची बातमी होती.
23 Jan 2013 - 7:30 pm | इनिगोय
मटावरचीच भडास काढायला गेलं तर एका धाग्याचं पोटेन्शियल आहे त्यात!
23 Jan 2013 - 8:39 pm | रेवती
२०१३च्या कालनिर्णय क्यालेंडरवर जानेवारी महिन्यातली जाहिरात पाहिल्यास 'का पत्नीच्या यशाच्या मागे पतीचा हात असू शकत नाही' असे काहीतरी लिहिले आहे. एका बाजूला दिया और बाती हम असेही आहे. म्हणजे ही एखाद्या मालिकेची जाहिरात असावी असे वाटते.
23 Jan 2013 - 9:02 pm | राही
आजकाल 'घडवणे'किंवा 'करणे' ऐवजी 'रचणे' हे क्रियापद वापरले जाते. उदा.इतिहास रचला,रेकॉर्ड रचले इ.
23 Jan 2013 - 9:16 pm | पैसा
ते फार पूर्वीपासून वापरात आहे ना ग! "आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी" इ. आहे ना!
23 Jan 2013 - 11:26 pm | राही
जे पूर्वीपासून वापरात आहे ते योग्य अर्थाने म्हणजे कन्स्ट्रक्ट या अर्थाने आहे. नगररचना, मंदिररचना हे शब्द योग्य आहेत. पण इतिहासाच्या बाबतीत तो घडतो किंवा घडवला जातो. रचला जात नाही. तेच विक्रम किंवा रेकॉर्डच्या बाबतीत. नवा विक्रम केला, आधीचा तोडला हे ठीक वाटते.
25 Jan 2013 - 5:40 pm | पैसा
कविता रचली हे ठीक वाटते, इमारत रचली हेही बरोबर. पण "एखादी कथा रचून सांगतोय" म्हटलं की कल्पनेतलं सांगतोय असाच अर्थ घेतला जातो. इतिहास रचला म्हटले तर तो इतिहास रहात नाही खरे तर!
25 Jan 2013 - 8:59 pm | ईन्टरफेल
आजकाल रचलेला इतिहासच वाचला जातो ! रहि ताई ...............
23 Jan 2013 - 9:41 pm | श्रिया
लोकसत्ता मध्ये ह्या विषयावरील एक चांगला लेख वाचण्यात आला होता. दुवा मिळाला आहे.
24 Jan 2013 - 10:45 pm | नर्मदेतला गोटा
चांगले काम करताय
दुवा मिळणारच
23 Jan 2013 - 9:42 pm | श्रिया
लोकसत्ता मध्ये ह्या विषयावरील एक चांगला लेख वाचण्यात आला होता. दुवा मिळाला आहे.
http://www.loksatta.com/daily/20090528/viva03.htm
24 Jan 2013 - 11:43 pm | नर्मदेतला गोटा
चांगले काम करताय
दुवा मिळणारच
23 Jan 2013 - 10:34 pm | रामपुरी
फसणे या क्रियापदाचा वापर सुद्धा असाच डोक्यात जाणारा असतो. दुसर्या भाषेतले शब्द देवनागरीत लिहिताना झालेल्या चुका समजू शकतो. पण कुणी असं माशी टू माशी भाषांतर केलं की उलटं टांगून मिरच्यांची धुरी द्यायची इच्छा होते. यात स्वतःला "मराठी" म्हणवून घेणारी सगळी वर्तमानपत्रे आघाडीवर आहेत. तशी प्रतिक्रिया लिहिली तरी त्या प्रकशित होत नाहीत आणि पुढच्यावेळी तीच चूक पुन्हा केली जाते. यावर आपण काय करू शकतो काही कळत नाही.
23 Jan 2013 - 10:48 pm | नानबा
मध्यंतरी पुण्यात असताना महानगरपालिकेचे रस्त्यांवरचे फलक वाचनात आले..
"वसंधरेची एकच हाक, पर्यावरण रक्षणाचा घ्या ध्यास"... पुणेकरांकडून तरी अशुद्धलेखनाची अपेक्षा नव्हती...
23 Jan 2013 - 11:07 pm | सूड
कोणता तरी मुंबैकर नेमका उकारावरच पान खाऊन थुंकला असेल.
24 Jan 2013 - 12:24 am | विश्वनाथ मेहेंदळे
मुंबैकरच असणार तो. सगळे साले एकजात हरामखोर....
23 Jan 2013 - 11:08 pm | रेवती
कश्यावरून तो पेंटर पुणेकर असेल? आँ?
आजकाल कोणालाही कंत्राटे मिळतात असल्या कामांची हे लक्षात यायला हवे आपल्या.
23 Jan 2013 - 11:50 pm | आदूबाळ
अहो कधी कधी काय होतं, उकारांच्या जागेवर कोणीतरी रंगाचा ब्रश मारतो आणि असल्या गमती होतात. उदा. सिंहगड रस्त्यावर एका ठिकाणी "वडगाव बदक" असं लिहिलं आहे!
23 Jan 2013 - 11:54 pm | आदूबाळ
सूड आणि रेवतीचे प्रतिसाद आधी पाहिले नव्हते. सगळे पुणेकर आपल्या पेंटरांची लाज वाचवायला धावले याची मजा वाटली!
24 Jan 2013 - 12:12 am | रामपुरी
पेंटरांची लाज वाचवली तरी "सकाळ" उघडं टाकून बसतो की रोज...
24 Jan 2013 - 12:14 am | सूड
सगळे आले तर हा धागा पाचशे प्रतिसाद ओलांडेल, काय समजलांत !!
24 Jan 2013 - 12:18 pm | बॅटमॅन
वाटलंच असं होणार म्हणून!! पुणेकर कुठले!
24 Jan 2013 - 8:40 pm | रेवती
तुम्हाला प्रतिसाद समजला नाही.
23 Jan 2013 - 11:10 pm | लाल टोपी
चला आपणसर्व मिळून कचरायुक्त (कचरामुक्त) लोणावळा शहर करु अशी जहिरात वाचल्याचे आठवते आहे
23 Jan 2013 - 11:54 pm | बॅटमॅन
पुणे-बंगळूरू , अर्थात एनेच - ४ वरती, सातार्याच्या अलीकडे एक माईल स्टोन म्हणून हाटेल आहे, शिवनेरी बसेस तिथेच थांबतात. तिथे "अनोखे प्रदर्शन" असे लिहिण्याऐवजी "अनोळखी प्रदर्शन" लिहिलेय =))
24 Jan 2013 - 8:52 am | नानबा
अहो सुज्ञ पुणेकरांनो, हा फलक रस्त्यापासून निदान २०-२५ फूट उंचावर होता, रस्त्याच्या कडेला नाही. एवढ्या उच्च प्रतिचे पुणेकरच आहेत हो, मुंबईकर बिचारा सामान्य माणसासारखा रस्त्याच्या कडेला थुंकेल, पुणेकरांइतक्या उंचीवर आम्ही कुठले पोचणार?
बाकी पुणेकरांना त्यांच्या चुका दाखवल्यानंतर त्यांचा होणारा तिळपापड समजण्यासारखा आहे....
24 Jan 2013 - 12:55 pm | सूड
>>बाकी पुणेकरांना त्यांच्या चुका दाखवल्यानंतर त्यांचा होणारा तिळपापड समजण्यासारखा आहे
मुंबैकरांनी ट्रेनमध्ये आधी मराठीत भांडायला शिका, मग पुण्याच्या चुका काढायला या. कसें? नाही म्हणजे पुणेकर जर तुमच्या चुका काढू लागले तर ती धरणी पोटात घेईल तर बरं अशी गत होईल.
24 Jan 2013 - 1:01 pm | गवि
चाराठ महिन्यांत बाटलास मेल्या.. काय फसवून साबुदाणा खिचडी नायतर मस्तानी घातलनीत की काय तुझ्या अन्नपाण्यात पुणेकरांनी ?!
24 Jan 2013 - 1:04 pm | अभ्या..
अहो गविराज,
बाटगा जास्तच कडवा असतो म्हणतात ना? ;)
24 Jan 2013 - 1:55 pm | बॅटमॅन
हेच खरं. मोर पुणेरी दॅन पुणेकर्स व्हायचा प्रयत्न केल्याबद्दल सुडक्याचा तीव्र निषेध. ;)
24 Jan 2013 - 2:08 pm | सूड
सदाशिवात तिसर्यांदा मस्तानी प्यायल्यापासनं हे असं होतंय.
25 Jan 2013 - 6:44 pm | किसन शिंदे
तुमच्याशी शंभर टक्के सहमत हो गवि. पुण्याला राहायला लागल्यापासून असलंच काही बाही बरळत असतो हा सुड. ;)
24 Jan 2013 - 11:45 pm | नर्मदेतला गोटा
> समुद्र पोटात घेइल तर बरं
24 Jan 2013 - 10:03 am | श्री गावसेना प्रमुख
हा एकंदरीत बंबैय्या मराठी/हिंदीचा परीपाक असु शकतो
24 Jan 2013 - 12:39 pm | पिलीयन रायडर
अजुन एक...
मी सिद्धिविनायकला गेली....मी गिरगावला गेली..
अरे.. सिद्धिविनायकाला...
हिंदी मध्ये विभक्ती लावल्यावर शब्द आकारन्त होत नाही..मराठीत होतो... (असचं काहीसं मला शिकल्याच आठवतय..)
हिंदाळलेली मराठी...
24 Jan 2013 - 10:39 pm | शिशिर
परवाच एका राजकीय सभेत उद्घोषकाने उच्चारलेले वाक्य " आलेल्या सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत...." आलेले आणि उपस्थित एकच की हो. टी. व्ही वर इंटरव्यू घेताना मरठी पत्रकार.." आता तुमच्या पुढच्या भविष्याच्या काय योजना आहेत...?" हे पुढच आणि मागच भविष्य म्हणजे काय...?
25 Jan 2013 - 6:26 am | बोलघेवडा
मुंबईतील लोकं मी गेली/आली अस म्हणतात.
तसच आपण एखाद्याला म्हणतो कि "एखादा गाणं म्हण बर!"
तर मुम्बई त हेच वाक्य "एखादं गाणं बोल बर!" अस म्हणतात. गाणं असं कधी "बोललं" जात का?
तसच एखादी निर्जीव गोष्ट कितीला "भेटली" अस विचारतात. एक साधा नियम का लक्षात घेत नाहीत?
वस्तू "मिळतात/सापडतात", आणि माणस/व्यक्ती "भेटतात".
आणखीन एक नवीनच सापडल. ते म्हणजे एखाद्या क्रियापदाचे एक वेगळाच रूप जे मराठीत अस्तित्वातच नाही.
वापरले - "वापरल्या"(???) गेले आहे. खुद्द मिपा च्या धोरणात असे वाक्य आहे. "मात्र कुठल्याही जात, धर्म, वंश, लिंग, भाषा द्वेशासाठी मिसळपाव कधीच वापरल्या जाणार नाही."
25 Jan 2013 - 10:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शुद्ध मराठी, अशुद्ध मराठी हे मला नेमकं कळत नाही. चुकीचे शब्द, बरोबर शब्द, हेही मला कळत नाही.
पण, सर्वांना समजेल असं लिहिलं म्हणजे झालं असं वाटतं. :)
[शब्दातून आशय पोहचला की झालं. हे माझं जालावरील प्राचीन मत आहे] :)
-दिलीप बिरुटे
25 Jan 2013 - 11:26 am | बाळ सप्रे
आशय पोहोचवण्याचे शब्द हे एकमेव नसले तरी महत्वाचे माध्यम आहे. शब्दांच्या योग्य वापराने आशय पोहोचण्याची/ आपले म्हणणे इतरांना समजण्याची शक्यता वाढते हे नक्की!!
25 Jan 2013 - 12:25 pm | योगप्रभू
प्रा, डॉ. बिरुटे यांनी विनोदासाठी वरील प्रतिक्रिया लिहिली असेल तर काही म्हणणे नाही.
गंभीरपणे बोलत असतील तर मग 'आनंदी-आनंद' आहे.
25 Jan 2013 - 2:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
होय, मी गंभीरपणेच बोललो आहे.
>>>गंभीरपणे बोलत असतील तर मग 'आनंदी-आनंद' आहे.
आपल्या मताचा मी आदर करतो. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
25 Jan 2013 - 6:56 pm | योगप्रभू
माझे मत केवळ आपल्या पहिल्या वाक्यासंदर्भात आहे, इतकेच नमूद करतो.
25 Jan 2013 - 8:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> माझे मत केवळ आपल्या पहिल्या वाक्यासंदर्भात आहे, इतकेच नमूद करतो.
बरं.....!!! कळतच नै म्हणजे एकदमच अडाणी असं नै हो. ''अमूक अमूक चूक कसं आणि धमूक धमूक बरोबर कसं''
या अर्थाने म्हणतो. उदा. ओसाड गावातल्या आमच्या या गावगप्पा पाहा आणि ही चर्चाही मजेदार होती.
-दिलीप बिरुटे
26 Jan 2013 - 2:19 am | योगप्रभू
सर,
तुमास्नी आडानी म्हनून आमाला पाप पदरात घ्यायाचं न्हाई.
पन तुमी सुरवातच येकदम 'माला काई सुद्द-आसुद्द, चूक-बरुबर कळत न्हाई' आशी क्येली तवा म्या तीन्ताड उडालोच. कसं हाय, आमच्याकडं पाटलाखालोखाल मान साळंतल्या गुर्जींचा आस्तुया. आमच्या पोरांना 'सुद्द काय आन् आसुद्द काय' हे तुमी न्हाई तर कोन शिकिवनार?' राग मानू नका मास्तर.
25 Jan 2013 - 3:09 pm | अभ्या..
एक जाहिराती तयार करणारा म्हणून मी प्राडॉ साह्यबांशी अगदी १०० % सहमत आहे
25 Jan 2013 - 7:15 pm | श्रीरंग_जोशी
महाराष्ट्रात मराठी भाषा अनेक वेगवेगळ्या शैलीत वापरली जाते. स्वतःची सोडून इतरांच्या शैलीला अशुद्ध म्हणणे हे काही बरे नाही.
मला देखील एकेकाळी म्हणाला/म्हणाली ऐवजी म्हणला/म्हणली असे ऐकून खूप विचित्र वाटायचे पण हळू हळू सवय झाली.
25 Jan 2013 - 4:18 pm | चावटमेला
मराठीवर हिंदीचा प्रभाव असण्यावर कोणताच आक्षेप नाही. पण ह्या हिंदी सिनेमांमधून हिंदीची जी भ्रष्ट आवृत्ती सादर करतात आणि त्यामुळे आपले लोक तिचाच वापर करत अस्सल मराठ्मोळ्या शब्दांना जी कायमची तिलांजली देतात हे मात्र डोक्यात जाते. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर आपले अस्सल मराठी शब्द भाऊजी, दाजी हे कुठेतरी हरवून त्यांची जागा अगदी सहजपणे 'जीजू' ह्या कपाळाची शीर उडविणार्या शब्दाने घेतली आहे.
25 Jan 2013 - 4:20 pm | बॅटमॅन
जीजू हा शब्द ऐकला की लै सटकते, १००००००००००% सहमत. भ्रष्ट लेकाचे.
25 Jan 2013 - 4:44 pm | अभ्या..
आणि दिदी?
मला तर दिदी म्हणले की फक्त त्या ब्रम्हाकुमारीच आठवतात. ;)
25 Jan 2013 - 5:10 pm | बॅटमॅन
दीदी, भैया, इ. शब्द तसेच, पण तुलनेने कमी डोक्यात जातात. बाकी हे उत्तरभारतीय म्हंजे कहर लोक आहेत. आईबद्दल बोलताना "मम्मी" म्हणतात, "माँ" हा शब्द फक्त शिवीसाठी राखीव ठेवणारे हे मूर्खागमनी लोक आहेत. हे लोण आपल्याकडे तुलनेने कमी आहे म्हणून बरंय.
25 Jan 2013 - 5:25 pm | दादा कोंडके
सहमत.
दिदी, भैया आणि जिजू म्हणणार्यांच्या बैलाला हो!
25 Jan 2013 - 7:00 pm | श्रीरंग_जोशी
दादा - बैलाला 'पो' असे म्हणतात 'हो' नाही.
25 Jan 2013 - 7:08 pm | बॅटमॅन
ते पो वैग्रे तमिऴमध्ये म्हणतात हो, इथे बैलाला होच म्हंतात. नैतर शेणाचा वैग्रे असेल तर पो, अदर्वाईज हो, नो?
25 Jan 2013 - 7:42 pm | श्रीरंग_जोशी
मी महाराष्ट्रातल्या मराठीचा संदर्भ दिलाय. माझ्या लहानपणी होळी पेटल्यावर गर्दी पांगली की अमुक तमुक च्या बैलाचा पो म्हणण्यास चढाओढ लागत असे...
(पो = शेणाचा गोळा)
25 Jan 2013 - 7:49 pm | बॅटमॅन
संदर्भ बरोबर पण इथे लागू नै होत. तुम्ही म्हणताय "बैलाचा पो" तर दादा म्हणताहेत "बैलाला हो".
25 Jan 2013 - 8:16 pm | श्रीरंग_जोशी
म्हणताना अमुक अमुकच्या बैलाला पो असेच म्हंटले जाते. इथे लिहिताना कर्मणी प्रयोगात लिहिल्याने बेलाचा लिहिले...
महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकार मराठी बोलली जाते. या निमित्ताने माझ्या ज्ञानात भरच पडली..
25 Jan 2013 - 7:36 pm | रेवती
अगदी सहजपणे 'जीजू' ह्या कपाळाची शीर उडविणार्या शब्दाने घेतली
भयानक सहमत. एकवेळ त्या मनुष्याला नावाने हाक मारा पण जीजू नक्कोच! माझ्या भावाच्या प्रचंड फ्याशनेबल मेव्हणीने त्याला घरी आली असताना जीजू म्हटल्यावर त्याने " मला दादा म्हण, भाऊजी म्हण, नावाने हाक मार पण जीजू नको." असे सांगितले. तिने "ह्या, भाऊजी वगैरे कसंतरीच वाट्टं." म्ह्णून नावाने हाक मारायला सुरुवात केली.
27 Jan 2013 - 12:45 am | लई भारी
आवर्जून 'आलं' म्हणून सांगितलं तरी मराठी भाजीवाले देखील 'अद्रक'चं म्हणतात.