✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जाहिरातीमधील चुकीचे मराठी !!

अ
अभिजित - १ यांनी
Wed, 01/23/2013 - 10:00  ·  लेख
लेख
. आजचा सकाळ ( २३/१/२०१३ ) . बहुतेक फक्त ठाणे आवृत्ती . शेवटचे पान . टीप टोप प्लाझा ची जाहिरात. एक वधुपिता आणि त्याची मुलगी. रुबाबदार जोडी. जाहिरात अशी आहे - 'कन्या परक्याचे धन ' मानून घडवलं व्यक्तिमत्व छान सासरी करताना वाटे सार्थ अभिमान ----------------------------------------------- आता कल्पना करा कि पहिल्या दोन ओळी वधूपिता म्हणत आहे. आणि शेवटच्या दोन ओळी ती मुलगी म्हणतेय !! अर्थात ती जाहिरात समोर असेल तर खरी मजा समजेल. इथे त्या लोकांनी "करताना" ऐवजी "पाठवताना" हा शब्द वापरायला पाहिजे होता. तुम्ही अशा जाहिराती पहिल्या आहेत का ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24432 वाचन

💬 प्रतिसाद (157)

प्रतिक्रिया

सकाळी सकाळी अतिशय कल्पक अन

पियुशा
Wed, 01/23/2013 - 10:14 नवीन
सकाळी सकाळी अतिशय कल्पक अन माहीतीपुर्ण धागा आला बुवा मि.पा. वर ;)
  • Log in or register to post comments

सांगतोच..

गवि
Wed, 01/23/2013 - 10:30 नवीन
मी शंखपुष्पी सिरपची जाहिरात फार्फार पूर्वी वाचली होती. पण पूर्वी वाचली असली तरी जन्मभरासाठी मेंदूत ठोकली गेली आहे. कोणालातरी थाप वाटेल म्हणून एकदा सांगून गप बसतो. हे शंभर टक्के सत्य आहे: सीरप शंखपुष्पी प्या आणि समोर वाढा.
  • Log in or register to post comments

कदाचित

तिमा
Wed, 01/23/2013 - 11:16 नवीन
ती जाहिरात पंक्तीतल्या वाढप्यांना उद्देशून असेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हा हा...

दादा कोंडके
Wed, 01/23/2013 - 18:26 नवीन
बाकी, 'बचपन की गलतिया'वाल्या जाहिराती वाचून ते अजून कश्यालातरी उद्देशून असावं असं वाटतं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

टंकन चुक आहे का?

प्रसाद प्रसाद
Wed, 01/23/2013 - 11:36 नवीन
टीप टोप प्लाझा ची जाहिरात. तुम्हाला “टीप टॉप” असे म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments

कुत्तीका.

तर्री
Wed, 01/23/2013 - 11:39 नवीन
फार वर्षापूर्वी एक सिरिअल होती नाव आठवत नाही. त्यामध्ये "कृत्तिका देसाई (?) अभिनेत्री होती. जाहिराती मध्ये तिचे नाव "कुत्तिका देसाई " असे छापून आले होते.
  • Log in or register to post comments

नुकतीच एका मॉलमधी ही जाहिरात

गवि
Wed, 01/23/2013 - 12:03 नवीन
नुकतीच एका मॉलमधे ही जाहिरात पाहिली. माझे काहीतरी पूर्वग्रह / गंड असतील आणि त्यामुळे मला ती खटकली असेल अशी शक्यता धरुन काहीच टिप्पणी न करता त्याचा फोटो खाली देतोय. आणखी कोणाला खटकतंय का? Image removed.
  • Log in or register to post comments

सगळे तिचायला गोर्‍या रंगामागे

बॅटमॅन
Wed, 01/23/2013 - 12:06 नवीन
सगळे तिचायला गोर्‍या रंगामागे धावणारे..ब्लडी स्लेव्ह्ज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हेही ठीक कदाचित, पण मला ते

गवि
Wed, 01/23/2013 - 12:10 नवीन
हेही ठीक कदाचित, पण मला ते नाही खटकलं.. गोरेपणाचं आकर्षण फारच कॉमन असल्याने आपण त्याला निर्ढावलो आहोत :) मला बोचलं ते वेगळंच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मराठी-इंग्रजी वैग्रे अँगल आहे

बॅटमॅन
Wed, 01/23/2013 - 12:12 नवीन
मराठी-इंग्रजी वैग्रे अँगल आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मला हेसुद्धा खटकलं.

नगरीनिरंजन
Wed, 01/23/2013 - 12:14 नवीन
मराठी - अगंबाई - मागासलेले इंग्रजी - Hi-Fi - म्हंजे भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तेच म्हणते मी. मेले

शुचि
Wed, 01/23/2013 - 19:58 नवीन
तेच म्हणते मी. मेले "वाघीणीच्या दूधाचे" गुलाम :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

त्या

तिमा
Wed, 01/23/2013 - 12:45 नवीन
जाहिरातदाराला 'सेन्स ऑफ ह्युमर' कमी असावा. नाहीतर त्याने उजवीकडे 'अरेच्चा' असं लिहिलं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

(No subject)

सस्नेह
Wed, 01/23/2013 - 14:28 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

+१

अग्निकोल्हा
Wed, 01/23/2013 - 17:41 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

सर्फ एक्सेल

नंदन
गुरुवार, 01/24/2013 - 12:49 नवीन
किंवा तत्सम महागड्या साबण/पावडरीची एक जाहिरात आठवते. चाळीतली, मराठी चेहर्‍यामोहर्‍याची बाई "अमुकढमुक इंग्रजी मीडियमच्या शाळेत शिकते. तिथली मुलं काय स्मार्ट असतात!" असं हरखून जाऊन सांगत असते. त्यामागची मानसिकताही तीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मालिकेत कोणी "माझा विश्वास

आदूबाळ
Wed, 01/23/2013 - 12:12 नवीन
मालिकेत कोणी "माझा विश्वास करा" असं म्हणालं, की "विश्वास केव्हाच पानिपतावर गेला" असं मला म्हणावसं वाटतं... :)
  • Log in or register to post comments

आईच्यान्!!!!! इंग्रजाळलेले

बॅटमॅन
Wed, 01/23/2013 - 12:19 नवीन
आईच्यान्!!!!! इंग्रजाळलेले आणि हिंदाळलेले यांपैकी कुठल्या मराठीचा जास्त राग येतो ते सांगणे कठीण आहे, दोन्ही प्रकार सारखेच डोक्यात जातात. अशा लोकांचा लै राग येतो. वायझेड साले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

अगदी अगदी

धमाल मुलगा
Wed, 01/23/2013 - 13:40 नवीन
मी बरेच दिवस झाले शोधतोय, हल्ली मराठी जाहिरातींत ऐकु येणारा/वाचायला मिळणारा 'किटाणू' हा शब्द नक्की कोणत्या मराठीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कीटाणू हा शब्द हिंदाळलेल्या

बॅटमॅन
Wed, 01/23/2013 - 13:50 नवीन
कीटाणू हा शब्द हिंदाळलेल्या मराठीतलाच. पण जीवाणू, विषाणू, वगैरे स्टाईलमध्ये असल्याने खपून गेला तरी एखादवेळेस ठीक असे मला वाट्टे. पण "दिलचस्पी राखतो" छाप मराठी वाचून डोक्यात जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हरे रा...म!

धमाल मुलगा
Wed, 01/23/2013 - 14:24 नवीन
वाचलो! मी तुमच्यापेक्षा नशिबवान आहे. ही असली उकिरडा लायकीची भाषा ऐकण्याची वेळ अजुनतरी नाही आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आणखी एक म्हणजे, मी तुमचे

रेवती
Wed, 01/23/2013 - 20:32 नवीन
आणखी एक म्हणजे, मी तुमचे धन्यवाद करतो. बाकी मी आली , गेली, स्वयंपाक करणे म्हणजे जेवण करणे, आनी, पानी याची इतकी सवय झालीये की आता ते फारसं खटकत नाहीच. बरं यावरून काही बोललं तर जातीयता आडवी येते. चुकीचंही बोलायचं आणी वर स्वत:ला कोण समजताही म्हणायचं, त्यापेक्षा चुकत रहा लेको! मेरा क्या जाता है. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मेरा क्या जाता है. smiley

शैलेन्द्र
गुरुवार, 01/24/2013 - 09:33 नवीन
मेरा क्या जाता है. smiley
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

करण....

तर्री
Wed, 01/23/2013 - 12:19 नवीन
विस्तारी करण = विस्तार सर्वसाधारीकरण = सर्वसाधारणपणे सबली करण = सबळ करणे असे काही विचित्र शब्द जाहिराती / बातम्यांमध्ये दिसतात.
  • Log in or register to post comments

सरकारी जाहिरातींमधे चुकीची

गवि
Wed, 01/23/2013 - 12:22 नवीन
सरकारी जाहिरातींमधे चुकीची रचना असलेल्या भिंतीवरच्या रंगवलेल्या जाहिराती कोल्हापूर्-सातारा-सांगली बेल्टमधे पाहिल्या. - स्त्रीत्वाचा हा अपमान, मुलगा मुलगी एक समान.. (केवळ इतकीच स्लोगन, पुढेमागे काही नसल्याने अत्यंत उलट चुकीचा अर्थ निघतो) -निरक्षरांनो साक्षर व्हा.. (असं भिंतीवर मोठ्ठ्या अक्षरात रंगवलेलं..नो कॉमेंट्स)
  • Log in or register to post comments

ह्या ह्या ह्या...

मोदक
गुरुवार, 01/24/2013 - 00:07 नवीन
-निरक्षरांनो साक्षर व्हा.. (असं भिंतीवर मोठ्ठ्या अक्षरात रंगवलेलं..नो कॉमेंट्स) तुमचं "नो कमेंट्स" भिडलं हो गवि. :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सरकारी

तिमा
Wed, 01/23/2013 - 12:43 नवीन
सरकारी एमटीएनएल च्या फोन मधून फोन लागला नाही तर "आम्ही क्षमस्व आहोत' अशी उदघोषणा ऐकू येते.
  • Log in or register to post comments

भाषेचे आणि योग्य प्रकटनाचे महत्त्व

अभ्या..
Wed, 01/23/2013 - 12:48 नवीन
खरेतर जाहिरातीतील मजकूर (कॉपी) हा त्या भाषेतील जाणकाराकडून लिहून घेतला जातो. पण असे फक्त प्रथितयश जाहिरात कंपन्याना परवडते. तेथे सुध्दा 'काय चाल्लेय, क्स्काय' असे कामचलाऊ मराठी येणारे बिगरमराठी लोक (त्यातल्या त्यात उत्तरभारतीय, लिपीसाधर्म्यामुळे मराठी आपल्याला येते असा समज असणारे आणि दादा कोंडकेंची ओळख नसणारे) हे कॉपी लिहायचे काम करतात. मग अशा चुका होतात. दुसरा प्रकार म्हणजे बर्‍याचशा अ‍ॅड ह्या ऑनलाईन येतात(बहुतांशी वाहनांच्या उत्तर भारतातून आणि एफेमसीजी च्या दक्षिण भारतातून) तेथील लोकांना भाषेतील बारकाव्याचा अंदाज नसतो. गावांच्या नावाचे तर सर्रास रुपांतर स्पेलिंगवरुन करतात ते पण अतिशय भयानक असते. उदा. पर्बहानी (परभणी), जलाना (जालना), कर्दवादी(कुर्डूवाडी), पंदार्पूर(पंढरपूर), नंदेद(नांदेड). तिसरे म्हणजे बर्‍याच लोकल डीटीपी ऑपरेटर्सना पण भाषेचे पुरेसे ज्ञान नसते (त्यात प्रुफरिडींगचा अभाव) त्यांच्या कडून पण अशा चुका होतात. सोलापूरातसुध्दा पत्रिका टाईप करताना इथल्याच डीटीपी ऑपरेटरने सौ. तुळजाभवानी प्रसन्न श्री. गजानन प्रसन्न असे टाईप केलेले बघितले आहे. चूक दाखवल्यावर "सर तुम्हीच तर मनला होताव की लेडीज नावाला सौ लावायचे मनून" हे उत्तर ऐकले आहे. जाहिरातक्षेत्र हे डेडलाईनवर कायम काम करते. वेळ आणि पैसा वाचवायसाठी अशा गोष्टी घडतात. त्यात अशा चुका होतातच. परिणाम अशा कुप्रसिध्दीवर नाहीतर पूर्ण कँपेन फेल जाण्यावर होतो. हे भाषेचे आणि योग्य प्रकटनाचे महत्त्व ज्यादिवशी जाहिरातक्षेत्राला कळेल तो सुदिन.
  • Log in or register to post comments

तुमच्यासारख्या सोनारानेच

बॅटमॅन
Wed, 01/23/2013 - 13:00 नवीन
तुमच्यासारख्या सोनारानेच त्यांचे कान टोचायला पाहिजेत तरच हे लोक नीट लक्ष देऊन काम करतील. शुद्ध भाषेचे महत्व काय आहे हे पटवणे या क्षेत्रात तरी पैशाशी निगडित असल्याचे पाहून लोक लक्ष देतील हीच आशा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

उपयोग नाही...

योगप्रभू
Wed, 01/23/2013 - 13:50 नवीन
बॅटमॅन, हे मार्केट इतके खालच्या थराला गेले आहे, की आता सर्वसामान्यांनी भाषेचे खून पडत असलेले बघण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. भाषांतराच्या व्यवसायात परकी भाषांसाठी प्रतिशब्द उत्तम दर आहे, पण भारतीय भाषांसाठी अक्षरशः कवडीमोल दर देतात आणि त्यातही पुन्हा पाडून मागतात. पैसे वाचल्याच्या नादापुढे भाषेची अचूकता बिनमहत्त्वाची. स्पेशलाइज्ड कॉपीरायटर नेमायचे नाहीत. इंग्रजी चांगले आणि ३-४ प्रादेशिक भाषा जाणतो या बेसिसवर जाहिरात एजन्सीत नोकर्‍या मिळतात. वर्तमानपत्रे आणि चॅनल्सनाही भाषेच्या चुकांचा फारसा विधीनिषेध नाहीय. काल एका मराठी वाहिनीवर सतत एकच स्ट्रीप दाखवत होते. 'विठ्ठलाच्या खाजिन्यावर चोरांचा डल्ला'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अवघड आहे

बॅटमॅन
Wed, 01/23/2013 - 13:59 नवीन
अवघड आहे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

तळजाभवानी सौभाग्यवती आहेच

धमाल मुलगा
Wed, 01/23/2013 - 14:43 नवीन
तळजाभवानी सौभाग्यवती आहेच म्हणताना सौ. लावणारच की तो. :-) डिटीपीवाली पोरं कमी शिकलेली असतात, त्यांच्या चुका एकवेळ समजण्यासारख्या आहेत. लाकोंचं बजेट असलेल्या ( टि.व्ही.साटीच्या वगैरे) जाहिरातींसाठी क्रिएटिव्ह रायटर्स, एडिडर्स अशी खाशी मंडळी असतानाही ासे प्रकार घडतात हे नवल. जाहिरातक्षेत्रातील अधिक माहितीसाठी अदीजोशी ह्यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

गावांच्या नावाचे तर सर्रास

आदूबाळ
Wed, 01/23/2013 - 18:39 नवीन
गावांच्या नावाचे तर सर्रास रुपांतर स्पेलिंगवरुन करतात ते पण अतिशय भयानक असते. उदा. पर्बहानी (परभणी), जलाना (जालना), कर्दवादी(कुर्डूवाडी), पंदार्पूर(पंढरपूर), नंदेद(नांदेड).
तुम्ही "हिंजेवाडी" विसरलात! ("ज" जांबुवंतातला) माझ्या एक-दोन हिंजवडीस्थित अशिलांना मी "हिं ज व डी" असं पष्ट म्हणून दाखवलं तर त्यांनी "गावठी साला" असा चेहेरा केला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

उच्चार

अभ्या..
Wed, 01/23/2013 - 18:48 नवीन
त्या उच्चारी चुका आहेत आणि आधुनिकता दाखवायच्या गंडापायी केलेले अंधानुकरण. तसे वानवडी च्या स्पेलिंगवरुन सुध्दा छान उच्चार होतो. ;) मी जी उदाहरणे दिली आहेत ती प्रिंटमिडीयात मोठमोठ्या कंपनीच्या ज्या जाहिराती येतात त्याखाली अधिकृत विक्रेत्याची नावे देतात ती आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

तुम्ही "हिंजेवाडी" विसरलात! ("ज" जांबुवंतातला)

चावटमेला
Fri, 01/25/2013 - 17:27 नवीन
तुम्ही "हिंजेवाडी" विसरलात! ("ज" जांबुवंतातला) अगदी अगदी. शिवाय औंध चं ओंध, बावधन चं बवधान, बाणेर चं बानेर, चिंचवड चं चिंचवाड, असले अस्सल भैय्या ष्टाईल चे उच्चार रोज ऐकून पुण्याचं लवकरच पूर्णपणे पूना होवून जाते की काय अशी भीती वाटायला लागलीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मालवणचे मलवान

क्लिंटन
Fri, 01/25/2013 - 18:31 नवीन
शिवाय औंध चं ओंध, बावधन चं बवधान, बाणेर चं बानेर, चिंचवड चं चिंचवाड.........
१९९५ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल ऐकत असताना हिंदी चॅनेलवर "मलवान" विधानसभा मतदारसंघाविषयीचा उल्लेख ऐकला.त्याकाळी मी सतत निवडणुकीच्या वातावरणात स्वतःला बुडवून घेत असूनही "मलवान" मतदारसंघ मला माहित कसा नाही याचे मला बराच वेळ आश्चर्य वाटत होते.पण कुठचे काय. नंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की "मलवान" म्हणजे दुसरे तिसरे काही नसून "मालवण" :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

बाळासाहेब ठाकर्‍यांच्या

मृगनयनी
Fri, 01/25/2013 - 20:41 नवीन
बाळासाहेब ठाकर्‍यांच्या निधनानन्तर सगळ्यांनाच अतीव दु:ख झाले. खरोखर बाळासाहेब महाराष्ट्राला पोरके केले. पण काही अशुद्ध फलकांकडे पाहून हसावे का रडावे.. तेच कळले नाही.. एका फलकावर लिहिले होते, "साहेब.. तुम्ही गेलात.. पण पोर्क केलं आम्हाला!" ;) साहेबांनी "पोर्क" केलं!!!... हाहा!.. =)) =)) =)) खूपच बीफ' मध्ये लिहिल्या होत्या ओळी!!! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

अजून एक.

आदूबाळ
Fri, 01/25/2013 - 19:54 नवीन
अजून एक. माझा एक अमराठी सहकारी मला म्हणाला "ऑडिट के लिए रंजनगाँव जाना है". मला काही कळेना. थोड्या वेळाने कंपनीचं नाव आणि पत्ता पाहिल्यावर उलगडा झाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

शब्द ते शब्द

अभ्या..
Wed, 01/23/2013 - 12:57 नवीन
आणि अजून एक शब्द ते शब्द असे भाषांतर करणारे सुध्दा बरेच जण असतात. गविंनी उद्धृत केल्याप्रमाणे सीरप शंखपुष्पी प्या आणि समोर वाढा हे खरेतर सीरप शंखपुष्पी पिओ और आगे बढो याचे भाषांतर आहे. आम्ही याला माशी टू माशी म्हणतो, म्हण्जे दिलेल्या हस्तलिखितावर एखादी माशी मेलेली असली तरी प्रिंटआउटवर एक माशी मारून चिकटावायची.
  • Log in or register to post comments

वैद्य पाटणकर आयुर्वेदिक काढा ...

तर्री
Wed, 01/23/2013 - 13:00 नवीन
वैद्य पाटणकर आयुर्वेदिक काढा ची जाहिरात एका मित्रास चुकीची वाटली होती. काढा हा प्रकार त्याला माहित नव्हता. "काय काढा ते ह्यानी लिहिलेच नाही " अशी त्याची तक्रार होती.
  • Log in or register to post comments

यावरनं आठवलं

संजय क्षीरसागर
Wed, 01/23/2013 - 14:12 नवीन
भ्रष्टाचाराविरूद्ध अण्णा हजारे उपोषणाला बसून एकेका मंत्र्याला पायउतार करत होते. सत्ता तेंव्हा शिवसेनेकडे होती. बाळासाहेब ज्याम वैतागले, म्हणाले : `आयला हे उपोषणाला बसतात आणि रोज ह्याला काढा त्याला काढा. हा काय पाटणकर काढा आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

शिवाय ऑनलाईनच कुठेतरी वाचून

गवि
Wed, 01/23/2013 - 13:44 नवीन
शिवाय ऑनलाईनच कुठेतरी वाचून मग स्वतःची आठवण धुंडाळली आणि खरंच निघालं: टूथपेस्टची (कोलगेट) पूर्वीची जाहिरातः "आम (इतर) टूथपेस्ट में नमक जैसे खुरदुरे तत्व होते है जो आप के दांतोंको नुकसान पहुंचा सकता है..." (चूभूदेघे) त्याच टूथपेस्टची आताची जाहिरात: "क्या आपके टूथपेस्टमें नमक है? कोलगेट विथ अ‍ॅक्टिव सॉल्ट" अर्थात हा सुद्धा टायपो किंवा चुकीच्या शब्दरचनेचा भाग नाही...
  • Log in or register to post comments

दुनिया गोल आहे.

सन्जयखान्डेकर
Fri, 01/25/2013 - 18:37 नवीन
कोलगेट ने दाखवुन दिले की 'दुनिया गोल आहे', आता काही दिवसांनी कोलगेट शेणाची / शेणयुक्त टुथपेस्ट बनवणार ही खात्री बाळगा. माझी मुलगी मराठी पहिलीत आहे, तिला वर्ग शिक्षकेने लिहुन दिले 'रंगीत कागद चिकटवा' मग 'चिकटवा खोडुन लिहिले 'चिटकवा'. मला बडवायला माझे कपाळ देखिल सापडले नाही हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आमच्या इथल्या एका मॉलमध्ये

सस्नेह
Wed, 01/23/2013 - 14:30 नवीन
आमच्या इथल्या एका मॉलमध्ये 'मेन्स कॉर्नर'ला ही पाटी नेहमी दिसते.... Image removed.
  • Log in or register to post comments

बिहारी...

धमाल मुलगा
Wed, 01/23/2013 - 14:57 नवीन
सदर फलकाचा लेखकु निःसंशय बिहारी असणर. श च स करण्यात त्यांच. हातखंडाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

सेव्हिंग क्रीम..?!

गवि
Wed, 01/23/2013 - 15:01 नवीन
सेव्हिंग क्रीम..?! चूकच असेल असं नाही... काहीतरी असेल हो बचतीची डिस्काउंट स्कीम वगैरे त्या सेक्शनमधे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आणि हे लोकं प्रेक्षकांना दर्शक का म्हणतात ?

सातबारा
Wed, 01/23/2013 - 14:33 नवीन
माझ्या अंदाजानुसार ( आता अंदाजच म्हणायचे,कारण मराठी वाहिन्यांवर सुध्दा सर्रास दर्शकच म्हणतात प्रेक्षकांना ), दर्शक म्हणजे दाखवणारा असे लहानपणी तरी होते.
  • Log in or register to post comments

छ्या! या असल्या इश्तिहारंमुळे

ऋषिकेश
Wed, 01/23/2013 - 14:34 नवीन
छ्या! या असल्या इश्तिहारंमुळे मी परेशान झालो आहे ;)
  • Log in or register to post comments

इश्तिहारंमुळे मी परेशान

अभ्या..
Wed, 01/23/2013 - 14:52 नवीन
परेशान हा महाराष्ट्रात (मराठवाडा विशेषत:) सर्रास वापरला जाणारा शब्द आहे हो. आम्ही नाही त्यामुळे परेशान. ;) पण ह्या गोष्टीची दुसरी बाजू अशी की आमच्याकडे पण कर्नाटकातली बराचशी कामे येतात. आणि आम्हाला कन्नड येते या अभिमानाच्या मूळ कन्नड लोक अगदी या धाग्याप्रमाणेच अशाच चिंधड्या उडवतात. त्या त्या भाषेचा लहेजा सांभाळणे सोपी गोष्ट नाही. त्यामुळे जाहिरातक्षेत्राला बदनाम न करता मूळ मराठी लोकच मराठीच्या किती चिंधड्या उडवतात ते पाहावे असे वाटते. (त्यातल्या त्यात आजकालच्या मुलींचे मी आली, मी गेली अगदी डोक्यात जाते) पंक्चर काढले जाईल हे शुध्द लिहिलेले वाचायला आसुसलेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

(त्यातल्या त्यात आजकालच्या

बॅटमॅन
Wed, 01/23/2013 - 15:05 नवीन
(त्यातल्या त्यात आजकालच्या मुलींचे मी आली, मी गेली अगदी डोक्यात जाते)
सेम!
पंक्चर काढले जाईल हे शुध्द लिहिलेले वाचायला आसुसलेला
या एका आशेने किती व्याक्रणप्रेमी हृदये पम्चरवली आहेत काय सांगू ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा