Skip to main content

जाहिरातीमधील चुकीचे मराठी !!

लेखक अभिजित - १ यांनी बुधवार, 23/01/2013 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
. आजचा सकाळ ( २३/१/२०१३ ) . बहुतेक फक्त ठाणे आवृत्ती . शेवटचे पान . टीप टोप प्लाझा ची जाहिरात. एक वधुपिता आणि त्याची मुलगी. रुबाबदार जोडी. जाहिरात अशी आहे - 'कन्या परक्याचे धन ' मानून घडवलं व्यक्तिमत्व छान सासरी करताना वाटे सार्थ अभिमान ----------------------------------------------- आता कल्पना करा कि पहिल्या दोन ओळी वधूपिता म्हणत आहे. आणि शेवटच्या दोन ओळी ती मुलगी म्हणतेय !! अर्थात ती जाहिरात समोर असेल तर खरी मजा समजेल. इथे त्या लोकांनी "करताना" ऐवजी "पाठवताना" हा शब्द वापरायला पाहिजे होता. तुम्ही अशा जाहिराती पहिल्या आहेत का ?

वाचने 24573
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

In reply to by अभ्या..

दीदी, भैया, इ. शब्द तसेच, पण तुलनेने कमी डोक्यात जातात. बाकी हे उत्तरभारतीय म्हंजे कहर लोक आहेत. आईबद्दल बोलताना "मम्मी" म्हणतात, "माँ" हा शब्द फक्त शिवीसाठी राखीव ठेवणारे हे मूर्खागमनी लोक आहेत. हे लोण आपल्याकडे तुलनेने कमी आहे म्हणून बरंय.

In reply to by अभ्या..

सहमत. दिदी, भैया आणि जिजू म्हणणार्‍यांच्या बैलाला हो!

In reply to by दादा कोंडके

दादा - बैलाला 'पो' असे म्हणतात 'हो' नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

ते पो वैग्रे तमिऴमध्ये म्हणतात हो, इथे बैलाला होच म्हंतात. नैतर शेणाचा वैग्रे असेल तर पो, अदर्वाईज हो, नो?

In reply to by बॅटमॅन

मी महाराष्ट्रातल्या मराठीचा संदर्भ दिलाय. माझ्या लहानपणी होळी पेटल्यावर गर्दी पांगली की अमुक तमुक च्या बैलाचा पो म्हणण्यास चढाओढ लागत असे... (पो = शेणाचा गोळा)

In reply to by श्रीरंग_जोशी

संदर्भ बरोबर पण इथे लागू नै होत. तुम्ही म्हणताय "बैलाचा पो" तर दादा म्हणताहेत "बैलाला हो".

In reply to by बॅटमॅन

म्हणताना अमुक अमुकच्या बैलाला पो असेच म्हंटले जाते. इथे लिहिताना कर्मणी प्रयोगात लिहिल्याने बेलाचा लिहिले... महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकार मराठी बोलली जाते. या निमित्ताने माझ्या ज्ञानात भरच पडली..

In reply to by चावटमेला

अगदी सहजपणे 'जीजू' ह्या कपाळाची शीर उडविणार्‍या शब्दाने घेतली भयानक सहमत. एकवेळ त्या मनुष्याला नावाने हाक मारा पण जीजू नक्कोच! माझ्या भावाच्या प्रचंड फ्याशनेबल मेव्हणीने त्याला घरी आली असताना जीजू म्हटल्यावर त्याने " मला दादा म्हण, भाऊजी म्हण, नावाने हाक मार पण जीजू नको." असे सांगितले. तिने "ह्या, भाऊजी वगैरे कसंतरीच वाट्टं." म्ह्णून नावाने हाक मारायला सुरुवात केली.

बाकी अशा अशुध्द शब्दांसाठी मटा तर एक नंबर हाय. :D काही महिन्यांपुर्वी बहुतेक नवरात्रात ठाण्यातल्या चिंतामणी ज्वेलर्सची झायरात करताना कुष्मांड हा शब्द त्यांनी कुशमांड असा टाकल्यांच चांगलं आठवतंय.

In reply to by किसन शिंदे

आपले टिव्ही चॅनेलही या बाबतीत फार मागे नाहीत.विलासराव देशमुखांचे निधन झाल्यानंतर अशाच एका मराठी चॅनेलवर विलासरावांबरोबर २० पेक्षा जास्त वर्षे काम केलेल्या त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याला बोलावले होते.मुलाखत घेणाऱ्याने त्या सहकाऱ्याला विचारले--"तुमच्यावर विलासरावांचे सहकारी म्हणून त्यांच्याबरोबर अनेक वर्षे काम करायचा प्रसंग आला.....". असा प्रश्न विचारायच्या "प्रसंगी" हा "प्रसंग येणे" हा वाक्प्रचार अगदी चुकीचा आहे हे त्या मुलाखत घेणाऱ्याच्या गावीही नव्हते. :(

शॉक अ‍ॅब्सॉर्बर हा अजून एक असा शब्द जो मी कधीही देवनागरीमध्ये व्यवस्थित लिहीलेला पाहिला नाही. प्रत्येक गॅरे़जवाला आपापल्या पद्धतीने त्याचं बारसं करतो. कधी तो शॉकप्सर असतो, कधी शॉकॉप्सर असतो, तर कधी शॉक अबसरबर.... :)

In reply to by नानबा

मराठी भाषेत रुढ झालेला 'शॉकप्सर' 'शॉकप' हा वरीजनल 'शॉकअ‍ॅब्सॉर्ब' आहे, हे आज मला माझ्या वयाच्या [असो] या वर्षी कळले. धन्स. -दिलीप बिरुटे

मराठी पेपरात ERP प्रोडक्टची जाहिरात होती, त्यात एक वाक्य होते: 'शेतात सिद्ध झालेले!' त्यांना 'Proven in field' म्हणायचे असेल :D