✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जाहिरातीमधील चुकीचे मराठी !!

अ
अभिजित - १ यांनी
Wed, 01/23/2013 - 10:00  ·  लेख
लेख
. आजचा सकाळ ( २३/१/२०१३ ) . बहुतेक फक्त ठाणे आवृत्ती . शेवटचे पान . टीप टोप प्लाझा ची जाहिरात. एक वधुपिता आणि त्याची मुलगी. रुबाबदार जोडी. जाहिरात अशी आहे - 'कन्या परक्याचे धन ' मानून घडवलं व्यक्तिमत्व छान सासरी करताना वाटे सार्थ अभिमान ----------------------------------------------- आता कल्पना करा कि पहिल्या दोन ओळी वधूपिता म्हणत आहे. आणि शेवटच्या दोन ओळी ती मुलगी म्हणतेय !! अर्थात ती जाहिरात समोर असेल तर खरी मजा समजेल. इथे त्या लोकांनी "करताना" ऐवजी "पाठवताना" हा शब्द वापरायला पाहिजे होता. तुम्ही अशा जाहिराती पहिल्या आहेत का ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24432 वाचन

💬 प्रतिसाद (157)

प्रतिक्रिया

लोकसत्ता मध्ये ह्या विषयावरील

श्रिया
Wed, 01/23/2013 - 21:41 नवीन
लोकसत्ता मध्ये ह्या विषयावरील एक चांगला लेख वाचण्यात आला होता. दुवा मिळाला आहे.
  • Log in or register to post comments

चांगले काम करताय दुवा मिळणारच

नर्मदेतला गोटा
गुरुवार, 01/24/2013 - 22:45 नवीन
चांगले काम करताय दुवा मिळणारच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया

लोकसत्ता मध्ये ह्या विषयावरील

श्रिया
Wed, 01/23/2013 - 21:42 नवीन
लोकसत्ता मध्ये ह्या विषयावरील एक चांगला लेख वाचण्यात आला होता. दुवा मिळाला आहे. http://www.loksatta.com/daily/20090528/viva03.htm
  • Log in or register to post comments

चांगले काम करताय

नर्मदेतला गोटा
गुरुवार, 01/24/2013 - 23:43 नवीन
चांगले काम करताय दुवा मिळणारच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया

फसणे

रामपुरी
Wed, 01/23/2013 - 22:34 नवीन
फसणे या क्रियापदाचा वापर सुद्धा असाच डोक्यात जाणारा असतो. दुसर्‍या भाषेतले शब्द देवनागरीत लिहिताना झालेल्या चुका समजू शकतो. पण कुणी असं माशी टू माशी भाषांतर केलं की उलटं टांगून मिरच्यांची धुरी द्यायची इच्छा होते. यात स्वतःला "मराठी" म्हणवून घेणारी सगळी वर्तमानपत्रे आघाडीवर आहेत. तशी प्रतिक्रिया लिहिली तरी त्या प्रकशित होत नाहीत आणि पुढच्यावेळी तीच चूक पुन्हा केली जाते. यावर आपण काय करू शकतो काही कळत नाही.
  • Log in or register to post comments

मध्यंतरी पुण्यात असताना

नानबा
Wed, 01/23/2013 - 22:48 नवीन
मध्यंतरी पुण्यात असताना महानगरपालिकेचे रस्त्यांवरचे फलक वाचनात आले.. "वसंधरेची एकच हाक, पर्यावरण रक्षणाचा घ्या ध्यास"... पुणेकरांकडून तरी अशुद्धलेखनाची अपेक्षा नव्हती...
  • Log in or register to post comments

पुणेकरांचा दोष नाही

सूड
Wed, 01/23/2013 - 23:07 नवीन
कोणता तरी मुंबैकर नेमका उकारावरच पान खाऊन थुंकला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

मुंबैकरच असणार तो. सगळे साले

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 01/24/2013 - 00:24 नवीन
मुंबैकरच असणार तो. सगळे साले एकजात हरामखोर....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कश्यावरून तो पेंटर पुणेकर

रेवती
Wed, 01/23/2013 - 23:08 नवीन
कश्यावरून तो पेंटर पुणेकर असेल? आँ? आजकाल कोणालाही कंत्राटे मिळतात असल्या कामांची हे लक्षात यायला हवे आपल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

अहो कधी कधी काय होतं,

आदूबाळ
Wed, 01/23/2013 - 23:50 नवीन
अहो कधी कधी काय होतं, उकारांच्या जागेवर कोणीतरी रंगाचा ब्रश मारतो आणि असल्या गमती होतात. उदा. सिंहगड रस्त्यावर एका ठिकाणी "वडगाव बदक" असं लिहिलं आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

सूड आणि रेवतीचे प्रतिसाद आधी

आदूबाळ
Wed, 01/23/2013 - 23:54 नवीन
सूड आणि रेवतीचे प्रतिसाद आधी पाहिले नव्हते. सगळे पुणेकर आपल्या पेंटरांची लाज वाचवायला धावले याची मजा वाटली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हे हे हे

रामपुरी
गुरुवार, 01/24/2013 - 00:12 नवीन
पेंटरांची लाज वाचवली तरी "सकाळ" उघडं टाकून बसतो की रोज...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

सगळे?

सूड
गुरुवार, 01/24/2013 - 00:14 नवीन
सगळे आले तर हा धागा पाचशे प्रतिसाद ओलांडेल, काय समजलांत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

वाटलंच असं होणार म्हणून!!

बॅटमॅन
गुरुवार, 01/24/2013 - 12:18 नवीन
वाटलंच असं होणार म्हणून!! पुणेकर कुठले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

तुम्हाला प्रतिसाद समजला नाही.

रेवती
गुरुवार, 01/24/2013 - 20:40 नवीन
तुम्हाला प्रतिसाद समजला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

शहर स्वच्छता अभियानामध्ये....

लाल टोपी
Wed, 01/23/2013 - 23:10 नवीन
चला आपणसर्व मिळून कचरायुक्त (कचरामुक्त) लोणावळा शहर करु अशी जहिरात वाचल्याचे आठवते आहे
  • Log in or register to post comments

पुणे-बंगळूरू , अर्थात एनेच -

बॅटमॅन
Wed, 01/23/2013 - 23:54 नवीन
पुणे-बंगळूरू , अर्थात एनेच - ४ वरती, सातार्‍याच्या अलीकडे एक माईल स्टोन म्हणून हाटेल आहे, शिवनेरी बसेस तिथेच थांबतात. तिथे "अनोखे प्रदर्शन" असे लिहिण्याऐवजी "अनोळखी प्रदर्शन" लिहिलेय =))
  • Log in or register to post comments

अहो सुज्ञ पुणेकरांनो, हा फलक

नानबा
गुरुवार, 01/24/2013 - 08:52 नवीन
अहो सुज्ञ पुणेकरांनो, हा फलक रस्त्यापासून निदान २०-२५ फूट उंचावर होता, रस्त्याच्या कडेला नाही. एवढ्या उच्च प्रतिचे पुणेकरच आहेत हो, मुंबईकर बिचारा सामान्य माणसासारखा रस्त्याच्या कडेला थुंकेल, पुणेकरांइतक्या उंचीवर आम्ही कुठले पोचणार? बाकी पुणेकरांना त्यांच्या चुका दाखवल्यानंतर त्यांचा होणारा तिळपापड समजण्यासारखा आहे....
  • Log in or register to post comments

आधी मराठीत भांडायला शिका !!

सूड
गुरुवार, 01/24/2013 - 12:55 नवीन
>>बाकी पुणेकरांना त्यांच्या चुका दाखवल्यानंतर त्यांचा होणारा तिळपापड समजण्यासारखा आहे मुंबैकरांनी ट्रेनमध्ये आधी मराठीत भांडायला शिका, मग पुण्याच्या चुका काढायला या. कसें? नाही म्हणजे पुणेकर जर तुमच्या चुका काढू लागले तर ती धरणी पोटात घेईल तर बरं अशी गत होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

चाराठ महिन्यांत बाटलास मेल्या

गवि
गुरुवार, 01/24/2013 - 13:01 नवीन
चाराठ महिन्यांत बाटलास मेल्या.. काय फसवून साबुदाणा खिचडी नायतर मस्तानी घातलनीत की काय तुझ्या अन्नपाण्यात पुणेकरांनी ?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कडवा

अभ्या..
गुरुवार, 01/24/2013 - 13:04 नवीन
अहो गविराज, बाटगा जास्तच कडवा असतो म्हणतात ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हेच खरं. मोर पुणेरी दॅन

बॅटमॅन
गुरुवार, 01/24/2013 - 13:55 नवीन
हेच खरं. मोर पुणेरी दॅन पुणेकर्स व्हायचा प्रयत्न केल्याबद्दल सुडक्याचा तीव्र निषेध. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

काय ते कळत नाहीय !!

सूड
गुरुवार, 01/24/2013 - 14:08 नवीन
सदाशिवात तिसर्‍यांदा मस्तानी प्यायल्यापासनं हे असं होतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

चाराठ महिन्यांत बाटलास मेल्या

किसन शिंदे
Fri, 01/25/2013 - 18:44 नवीन
चाराठ महिन्यांत बाटलास मेल्या.. काय फसवून साबुदाणा खिचडी नायतर मस्तानी घातलनीत की काय तुझ्या अन्नपाण्यात पुणेकरांनी ?!
तुमच्याशी शंभर टक्के सहमत हो गवि. पुण्याला राहायला लागल्यापासून असलंच काही बाही बरळत असतो हा सुड. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

> समुद्र पोटात घेइल तर बरं

नर्मदेतला गोटा
गुरुवार, 01/24/2013 - 23:45 नवीन
> समुद्र पोटात घेइल तर बरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हा एकंदरीत बंबैय्या मराठी

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 01/24/2013 - 10:03 नवीन
हा एकंदरीत बंबैय्या मराठी/हिंदीचा परीपाक असु शकतो
  • Log in or register to post comments

अजुन एक...

पिलीयन रायडर
गुरुवार, 01/24/2013 - 12:39 नवीन
अजुन एक... मी सिद्धिविनायकला गेली....मी गिरगावला गेली.. अरे.. सिद्धिविनायकाला... हिंदी मध्ये विभक्ती लावल्यावर शब्द आकारन्त होत नाही..मराठीत होतो... (असचं काहीसं मला शिकल्याच आठवतय..) हिंदाळलेली मराठी...
  • Log in or register to post comments

मराठी

शिशिर
गुरुवार, 01/24/2013 - 22:39 नवीन
परवाच एका राजकीय सभेत उद्घोषकाने उच्चारलेले वाक्य " आलेल्या सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत...." आलेले आणि उपस्थित एकच की हो. टी. व्ही वर इंटरव्यू घेताना मरठी पत्रकार.." आता तुमच्या पुढच्या भविष्याच्या काय योजना आहेत...?" हे पुढच आणि मागच भविष्य म्हणजे काय...?
  • Log in or register to post comments

मुंबईतील लोकं मी गेली/आली अस

बोलघेवडा
Fri, 01/25/2013 - 06:26 नवीन
मुंबईतील लोकं मी गेली/आली अस म्हणतात. तसच आपण एखाद्याला म्हणतो कि "एखादा गाणं म्हण बर!" तर मुम्बई त हेच वाक्य "एखादं गाणं बोल बर!" अस म्हणतात. गाणं असं कधी "बोललं" जात का? तसच एखादी निर्जीव गोष्ट कितीला "भेटली" अस विचारतात. एक साधा नियम का लक्षात घेत नाहीत? वस्तू "मिळतात/सापडतात", आणि माणस/व्यक्ती "भेटतात". आणखीन एक नवीनच सापडल. ते म्हणजे एखाद्या क्रियापदाचे एक वेगळाच रूप जे मराठीत अस्तित्वातच नाही. वापरले - "वापरल्या"(???) गेले आहे. खुद्द मिपा च्या धोरणात असे वाक्य आहे. "मात्र कुठल्याही जात, धर्म, वंश, लिंग, भाषा द्वेशासाठी मिसळपाव कधीच वापरल्या जाणार नाही."
  • Log in or register to post comments

अर्रे वा. मस्त चर्चा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/25/2013 - 10:56 नवीन
शुद्ध मराठी, अशुद्ध मराठी हे मला नेमकं कळत नाही. चुकीचे शब्द, बरोबर शब्द, हेही मला कळत नाही. पण, सर्वांना समजेल असं लिहिलं म्हणजे झालं असं वाटतं. :) [शब्दातून आशय पोहचला की झालं. हे माझं जालावरील प्राचीन मत आहे] :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आशय पोहोचवण्याचे शब्द हे

बाळ सप्रे
Fri, 01/25/2013 - 11:26 नवीन
आशय पोहोचवण्याचे शब्द हे एकमेव नसले तरी महत्वाचे माध्यम आहे. शब्दांच्या योग्य वापराने आशय पोहोचण्याची/ आपले म्हणणे इतरांना समजण्याची शक्यता वाढते हे नक्की!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंदी-आनंद आहे....

योगप्रभू
Fri, 01/25/2013 - 12:25 नवीन
प्रा, डॉ. बिरुटे यांनी विनोदासाठी वरील प्रतिक्रिया लिहिली असेल तर काही म्हणणे नाही. गंभीरपणे बोलत असतील तर मग 'आनंदी-आनंद' आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंभीरपणेच म्हणतो आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/25/2013 - 14:56 नवीन
होय, मी गंभीरपणेच बोललो आहे. >>>गंभीरपणे बोलत असतील तर मग 'आनंदी-आनंद' आहे. आपल्या मताचा मी आदर करतो. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

ते मत पहिल्या वाक्यासाठी आहे...

योगप्रभू
Fri, 01/25/2013 - 18:56 नवीन
माझे मत केवळ आपल्या पहिल्या वाक्यासंदर्भात आहे, इतकेच नमूद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैच शब्दशः अर्थ घेतलेला दिसतो...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/25/2013 - 20:53 नवीन
>>> माझे मत केवळ आपल्या पहिल्या वाक्यासंदर्भात आहे, इतकेच नमूद करतो. बरं.....!!! कळतच नै म्हणजे एकदमच अडाणी असं नै हो. ''अमूक अमूक चूक कसं आणि धमूक धमूक बरोबर कसं'' या अर्थाने म्हणतो. उदा. ओसाड गावातल्या आमच्या या गावगप्पा पाहा आणि ही चर्चाही मजेदार होती. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

तसं न्हाई वो सर...

योगप्रभू
Sat, 01/26/2013 - 02:19 नवीन
सर, तुमास्नी आडानी म्हनून आमाला पाप पदरात घ्यायाचं न्हाई. पन तुमी सुरवातच येकदम 'माला काई सुद्द-आसुद्द, चूक-बरुबर कळत न्हाई' आशी क्येली तवा म्या तीन्ताड उडालोच. कसं हाय, आमच्याकडं पाटलाखालोखाल मान साळंतल्या गुर्जींचा आस्तुया. आमच्या पोरांना 'सुद्द काय आन् आसुद्द काय' हे तुमी न्हाई तर कोन शिकिवनार?' राग मानू नका मास्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत

अभ्या..
Fri, 01/25/2013 - 15:09 नवीन
शब्दातून आशय पोहचला की झालं.
एक जाहिराती तयार करणारा म्हणून मी प्राडॉ साह्यबांशी अगदी १०० % सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

श्रीरंग_जोशी
Fri, 01/25/2013 - 19:15 नवीन
महाराष्ट्रात मराठी भाषा अनेक वेगवेगळ्या शैलीत वापरली जाते. स्वतःची सोडून इतरांच्या शैलीला अशुद्ध म्हणणे हे काही बरे नाही. मला देखील एकेकाळी म्हणाला/म्हणाली ऐवजी म्हणला/म्हणली असे ऐकून खूप विचित्र वाटायचे पण हळू हळू सवय झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हिंदी सिनेमाकरण

चावटमेला
Fri, 01/25/2013 - 16:18 नवीन
मराठीवर हिंदीचा प्रभाव असण्यावर कोणताच आक्षेप नाही. पण ह्या हिंदी सिनेमांमधून हिंदीची जी भ्रष्ट आवृत्ती सादर करतात आणि त्यामुळे आपले लोक तिचाच वापर करत अस्सल मराठ्मोळ्या शब्दांना जी कायमची तिलांजली देतात हे मात्र डोक्यात जाते. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर आपले अस्सल मराठी शब्द भाऊजी, दाजी हे कुठेतरी हरवून त्यांची जागा अगदी सहजपणे 'जीजू' ह्या कपाळाची शीर उडविणार्‍या शब्दाने घेतली आहे.
  • Log in or register to post comments

जीजू हा शब्द ऐकला की लै सटकते

बॅटमॅन
Fri, 01/25/2013 - 16:20 नवीन
जीजू हा शब्द ऐकला की लै सटकते, १००००००००००% सहमत. भ्रष्ट लेकाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

आणि दिदी?

अभ्या..
Fri, 01/25/2013 - 16:44 नवीन
आणि दिदी? मला तर दिदी म्हणले की फक्त त्या ब्रम्हाकुमारीच आठवतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दीदी, भैया, इ. शब्द तसेच, पण

बॅटमॅन
Fri, 01/25/2013 - 17:10 नवीन
दीदी, भैया, इ. शब्द तसेच, पण तुलनेने कमी डोक्यात जातात. बाकी हे उत्तरभारतीय म्हंजे कहर लोक आहेत. आईबद्दल बोलताना "मम्मी" म्हणतात, "माँ" हा शब्द फक्त शिवीसाठी राखीव ठेवणारे हे मूर्खागमनी लोक आहेत. हे लोण आपल्याकडे तुलनेने कमी आहे म्हणून बरंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+१

दादा कोंडके
Fri, 01/25/2013 - 17:25 नवीन
सहमत. दिदी, भैया आणि जिजू म्हणणार्‍यांच्या बैलाला हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हो नाही पो

श्रीरंग_जोशी
Fri, 01/25/2013 - 19:00 नवीन
दादा - बैलाला 'पो' असे म्हणतात 'हो' नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

ते पो वैग्रे तमिऴमध्ये

बॅटमॅन
Fri, 01/25/2013 - 19:08 नवीन
ते पो वैग्रे तमिऴमध्ये म्हणतात हो, इथे बैलाला होच म्हंतात. नैतर शेणाचा वैग्रे असेल तर पो, अदर्वाईज हो, नो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

कानडी मध्ये हो असेल कदाचित

श्रीरंग_जोशी
Fri, 01/25/2013 - 19:42 नवीन
मी महाराष्ट्रातल्या मराठीचा संदर्भ दिलाय. माझ्या लहानपणी होळी पेटल्यावर गर्दी पांगली की अमुक तमुक च्या बैलाचा पो म्हणण्यास चढाओढ लागत असे... (पो = शेणाचा गोळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

संदर्भ बरोबर पण इथे लागू नै

बॅटमॅन
Fri, 01/25/2013 - 19:49 नवीन
संदर्भ बरोबर पण इथे लागू नै होत. तुम्ही म्हणताय "बैलाचा पो" तर दादा म्हणताहेत "बैलाला हो".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

'बैलाला पो' असेच म्हंटले जाते..

श्रीरंग_जोशी
Fri, 01/25/2013 - 20:16 नवीन
म्हणताना अमुक अमुकच्या बैलाला पो असेच म्हंटले जाते. इथे लिहिताना कर्मणी प्रयोगात लिहिल्याने बेलाचा लिहिले... महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकार मराठी बोलली जाते. या निमित्ताने माझ्या ज्ञानात भरच पडली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदी सहजपणे 'जीजू' ह्या

रेवती
Fri, 01/25/2013 - 19:36 नवीन
अगदी सहजपणे 'जीजू' ह्या कपाळाची शीर उडविणार्‍या शब्दाने घेतली भयानक सहमत. एकवेळ त्या मनुष्याला नावाने हाक मारा पण जीजू नक्कोच! माझ्या भावाच्या प्रचंड फ्याशनेबल मेव्हणीने त्याला घरी आली असताना जीजू म्हटल्यावर त्याने " मला दादा म्हण, भाऊजी म्हण, नावाने हाक मार पण जीजू नको." असे सांगितले. तिने "ह्या, भाऊजी वगैरे कसंतरीच वाट्टं." म्ह्णून नावाने हाक मारायला सुरुवात केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

आणि 'अद्रक'?

लई भारी
Sun, 01/27/2013 - 00:45 नवीन
आवर्जून 'आलं' म्हणून सांगितलं तरी मराठी भाजीवाले देखील 'अद्रक'चं म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा