Skip to main content

विडंबन

( ओळखलत का साहेब मला?)

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 07/11/2014 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
ओळखलत का साहेब मला?’ परत आला कोणी, कपडे होते फाटलेले पण, मधाळ त्याची वाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, ‘पक्षामध्ये फुट पडली, आलो तिकडे राहुन’. कार्यकर्त्यांसह आम्हाला, चार आश्वासने भेटली, स्वबळावर सत्ता येता, आमची वाट लावली . पक्ष सोडला, चूक झाली, होते नव्हते ते गेले, निवडणूक होईपर्यंत त्यांनी, फक्त राबवून घेतले कार्यकर्त्यांना घेउन संगे, साहेब आता लढतो आहे राहिलेली कामे पुर्ण करून, मतदारसंघ घडवत आहे खुर्चीकडे लक्ष जाताच हसत हसत उठला ‘पद नको साहेब ’, जरा एकटेपणा वाटला. आलेल्या लाटेत खुर्ची गेली, तरी मोडला नाही कणा, पक्षात परत घेउन तुम्ही, फक्‍त लढ म्हणा (लढाऊ ) सैनीक ७/१

(दोन दिवस मुंबईत गेले,दोन दिल्लीत गेले)

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 04/11/2014 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
कवी नारायण सुर्वे यांची क्षमा मागून..... (मुळ काव्य : दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे) ------------------------------------------------------ दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले हिशोब करतो आहे आता, किती पैसे भुरर्कन उडाले शेकडो वेळा फोन आला, इमेल आले, बोलणी सुरु झाली मंत्रीपदाच्या भरोशावर जिंदगी बर्बाद झाली जे होते माझे चिन्ह , जनतेकडेच गहाण राहिले कधी झेंडा उंचावलेले हात, कलम झालेले पाहिले दरवेळी बंडखोर वळविले असे नाही,पण असेही क्षण आले तेव्हा शत्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले. भोळ्या जनतेचा विचार हरघडी केला अन नेता झाल

मिपादेवीची विनवणी?

लेखक आनन्दा यांनी गुरुवार, 30/10/2014 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक शतकी धागे पाहुनि, नावे मजला ठेवू नका। मीच विनविते हात जोडुनी उगाच मजला छळू नका।। जिलब्यांचा अतिदिव्य वारसा मिसळपाविनो तुम्हा मिळे। उणे कुणाचे दिसता किंचित दवंडी द्याया विसरू नका।| व्हा ज्ञानाचे वाढपी तुम्ही, जिलबीमारा करीत रहा । कलम चालवा सालभर तरी सण शिमग्याचा आणु नका।| जिलब्यांच्या उत्साहावरती कधीच विरजण घालू नका। टीआरपीच्या धाग्यांवरती मागे कोणी राहू नका।| जिलबी पाडा, काकू पाडा, जमले तर मग लेखही पाडा। पण काकूचे काश्मीर करताना बर्फामध्ये पडू नका।| मिपा आपुले करा नामांकित परी, इतरा नावे ठेवू नका। डु आयडी ने लिहिता लिहिता वरिजनलला विसरू नका ।| कंपू पेरा अपुल्या भवती, पिंक पिंकेने रंगतसे।

मांद्यपर्वातील भैरवी

लेखक अवतार यांनी रविवार, 19/10/2014 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
पळता पळता वाटे अदृश्य राहिली वाट मी चढतो आहे कधीचा हा आयुष्याचा घाट ठिणगीच्या स्पर्शाने राखेत पेटते आग पृथ्वीच्या भाग्याचा का नक्षत्रांना राग? सूर्यास्ताच्या साक्षीने वणवा पेटवतो आज ओल्या जखमेवर आता का सुटली आहे खाज? दाटून मेघ येता मणक्यात चमकते वीज गोठून भावना गेल्या अन मेंदू झाला फ्रीज ! मज ठाऊक नाही कोठे ह्या आभाळाचा अंत मी उद्या निघालो आहे पोचेन कालपर्यंत ! कवी --- (विदाऊट) ट्रेस

<दबंग>

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 16/10/2014 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
लिहीतानाच हसायला येत आहे, कारण 'मुद्दाम' लिहितोय. ---दबंग--- हुडहुड दबंग हुडहुड दबंग ये आरोळी थेटरात मग अनेक शिट्ट्या एका वेळी पोलिसाच्या वेशामध्ये सल्लूभाई थेटर फुल्ल प्रेक्षक मुग्ध त्याच्या पायी बघतो पिक्चर बाजूला मी डोके ठेवुनि येते गम्मत मारामारी ऐसी बघुनि मनोरंजना कमी न पडती सल्लूभाई अन भार्येचा हट्टच असता इलाज नाही -------------- -----------

विंचू चावला

लेखक फुंटी यांनी गुरुवार, 16/10/2014 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
मतदान झाल ,निकाल लागला ,आलं सरकार आलं सरकार , तयाला माझा नमस्कार अग, ग ..... विंचू चावला देवा रे देवा ..... विंचू चावला आता काय मी करू ..... विंचू चावला अग, ग ..... विंचू चावला आर आर आबा , बा .....

कळकट कंदील जीवनावरील महाभाष्य

लेखक शरद यांनी बुधवार, 15/10/2014 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
कंदील कळकट ..जीवनावरील महाभाष्य कवीवर्य समीरसूर यांच्या या महान कवितेवर लिहावयाचे भाग्य मला लाभले, धन्य, धन्य झालो मी ! ज्यांचे नावच इतके काव्यमय, त्यांचे काव्य महान असणारच. समीरसूर म्हणजे वेळूच्या बनातून वारा वहातो तेव्हा येणारा मधूर आवाज, वाह वाह. वेळू हा शब्द वेणूपासून आला असे म्हटले म्हणजे यमुनाकाठच्या कुंजवनातील बासरीचे मधुर स्वर व त्यावर जीव ओवाळणार्‍या गोजिर्‍या गोपी आठवतात.

<पतंग>

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 15/10/2014 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

त्या गेंड्याची दोन पावले - (विडंबन)

लेखक विदेश यांनी सोमवार, 13/10/2014 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
' (चाल - या डोळयांची दोन पाखरे ..) त्या गेंड्याची दोन पावले, फिरतील तुमच्या भवती - पाठलाग ती सदैव करतील, फक्त मताच्यासाठी ..... वर्तन तुमचे, हात असे हो त्या गेंड्याचा थारा सहवासातून हवाच त्याला, नित्यच तुमचा नारा तुमचा परिचय त्यास हो आंदण, बिलकुल मताचसाठी .. भाव देतही असतील काही, पैसा अडक्यातुनी एका मताचसाठी तुमचे धरतील कर दोन्ही आहेत डोळे, क्षणैक प्रीती, ते तर खुर्चीवरती .. .
काव्यरस

माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी....

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 13/10/2014 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी गाणी म्हटली की कुठून सुरुवात करावी असा प्रश्न पड्तो. ढोबळमानाने ’पैल तो गे काऊ पासून सुरुवात करुन.. अंगनी माझ्या मनीच्या मोर नाचु लागला इथपर्यंत अनेक मराठी गाण्यांनी आपल्याला भरभरुन आनंद दिला आहे. संत,पंत आणि तंत (शाहिरी) काव्यात मराठी ओवी,अभंग, लावण्या आणि कवितांची गाणी कधी झाली हे आपल्या लक्षातही आलं नाही. मराठीतील ही सर्व गाणी अतिशय सुंदर अशी फुलली आहेत. कोणतं गाणं सुरेख असं म्हणायला गेलो की बोटाच्या चुटकीतून प्रत्येक सुंदर असं गाणं निसटून जातं. एकच एक गाणं आपल्याला आवडतं असं कधी म्हणता येत नाही.