Skip to main content

विडंबन

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

(डोसा इथला संपत नाही)

लेखक धन्या यांनी बुधवार, 01/10/2014 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
कविवर्य ग्रेस यांची क्षमा मागून... डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्‍याची हिरवी चटणी प्यायलो दुर्गाची कॉफी आपण, पचकन पाणी थुंकाया तो मिठा पान कलकत्त्याचा, तोंड रंगवूनी गेला मस्तानीच्या आरक्त गळ्याची, आठवण झाली मला पोथीत माणसे अवघी, सांगती कथा ती कुणाची हे संपता संपत नाही, गुर्‍हाळ त्या साधूवाण्याचे डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते विशेष सुचना: शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही.

काय रे देवा… (संदीप खरे यांची माफी मागून )

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 26/09/2014 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
आता पुन्हा निवडणुका येणार तेच उमेदवार हात जोडत येणार मग आपण खोटं खोटं हसणार मग मधेच डोक्यात प्रश्न येणार हे आज इथे कशाला येणार ? काय रे देवा.… मग तो पडलेला प्रश्न विचारता नाही येणार मग आम्ही तो गिळणार मग गिळूनही तो पुन्हा विचारावासा वाटणार मग समोरच्या उमेदवाराच्या डोळ्यातही तो दिसणार तो निर्लज्ज असेल तर त्यावर हसणार त्याच्याही मनाला टोचत असेल तर नजर चुकवणार मग नसताच बघितलं तसं तर बरं झालं असतं असं वाटणार आणि ह्या सगळ्याशी त्याचं काहीच देणं घेणं नसणार मग त्यावेळी नेमकी दुसरी प्रचारटोळी येणार मग त्यात मागच्या वेळी निवडून दिलेला उमेदवार असणार मग त्याने तेव्हा बरीच आश्वासनं दिलेली

देर न हो जाये

लेखक भावना कल्लोळ यांनी शनिवार, 20/09/2014 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
खालील घटना पुर्णपणे काल्पनिक असुन तो कुणाशी खरच साधर्म राखत असेल तर फक्त मनातले मनात हसुन घ्यावे, खालील लेखन निव्वळ मनोरंजनासाठी लिहिला गेला आहे. त्यात लेखिकेला कोणताही मानसिक आजार झालेला नाही यांची कृपया नोंद घ्यावी. स्थळ : इंजिनीअरिंग कॉलेज होस्टेल. वेळ : सकाळची . संख्यने जास्त असलेल्या आणि सुविधा कमी असलेल्या होस्टेल मधला काल्पनिक प्रसंग. नीरु : ए वश्या बाहेर ये, इथे आतल्या चिकनची पुरण व्हायची वेळ आली आहे. अभी : अरे तो कसला येतोय लवकर, आता महाआवाहन करा त्याला.

< थेट्रातली मज्जा >

लेखक यसवायजी यांनी बुधवार, 17/09/2014 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रेर्नास्तान ------------------ बारका हुतो तवा आज्जाबरबर चंद्रमा थेट्रात जायला मला कद्दीच आवडलं न्हाई, पण त्यो वडत मला घेऊन जायचा. दर शुक्करवारी बच्च्चनचा पिच्चर हमखास लागायचा. दोन-तीन तास तर बसायचं हाय तिथं, पर आज्जाला आधी एवढा वेळ का लागायचा मला त्या टायमाला कद्दीच समजलं न्हाई. त्यो आधी आसपासची जागा बघायचा, कुठं थुकलंय का? *गून्, *तून ठेवलंय का बघायचा. मग रुप्पयाचा एक बंदा घेऊन लाकडी शीटच्या पट्ट्यामधनं फिरवायचा. भौतेक ढेकनं मारत हुता. मग तरुनभारत पेपर शीटवर हातरायचा तवा कुठं तेच्याच शीटवर मला जर्रा जागा मिळायची टेकवायला.

(चला ऑफीस आले आता...)

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 09/09/2014 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे मी बनेन ट्रोल सारे नुस्ते करा स्क्रोल मी वाट्टेल तसे पिंकायचे तुम्ही पकडापकडी खेळायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे|| मी संपादक बनेन सुचना देत सुटेन मी काहिंना ब्यान करायचे मग बंड तुम्ही पुकारायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे|| मी एकोळी टाकेन नंतर मजा बघेन तुम्ही भरपूर बॅशिंग करायचे तरी मी पयलाच म्हणायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे|| नुस्तेच फटू टाकेन तया प्रवासवर्णन म्हणेन तुम्ही तया भरपूर लाईकवायचे अजून येऊ द्या म्हणायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे|| मी मोदीद्वेष्टा व्हायचे तुम्ही समर्थक बनायच
काव्यरस

गणपती गेले (एकदाचे) गावाला !

लेखक सवंगडी यांनी मंगळवार, 09/09/2014 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती गेले (एकदाचे) गावाला ! गणेशोत्सव संपला न भो एकदाचा. व्हय असंच म्हणायची यळ व्हो पुणेकरांना याचा लै च राग येईन. पन तेचं काय मी मनाव घेत न्हाय. पन आज कसं सकाळ सकाळ शांत वाटतय. गेले धा दिस लई जाम झालं व्हत. या धा दिसात आमच्छ्या मंडळानी लई कामं केले. लोकांकडून लई पावत्या फाडल्या. पुण्याचे लोक लई डेंजर बरका… पैशे देताच न्हाईत. (महाराष्ट्र ब्यांक कॉलनी मध्ये पैसा माघायची टाप न्हाय आमची) पन केले जमा २ एक लाख. हा पन खर्च पन केला बरका. काल संध्याकाळ पासून राती २ वाजेपथूर एक ढोल ताशा पथक अन्ह्ल. तेन्ल्हाच अर्धा लाख गेले. नेक्ष्ट इअर साठी पैशे नको का ?

सरडा- काही क्षणिका काही म्हणी

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 07/09/2014 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात सरड्यांचे अच्छे दिन आलेले आहे, सरडे या झाडावरून त्या झाडावर उडी मारीत आहे. (१) जेंव्हा त्यांच्या झाडावर होता तेंव्हा सरडा भ्रष्टाचारी होता. जेंव्हा सरडा अमुच्या झाडावर आला आमच्याच सारखा इमानदार झाला. (२) जिभेच्या स्वाद पायी मधुर फळांची मैत्री जोडी. अहंता स्वताची त्यागुनी सरडा झाला रंगनिरपेक्षी. काही म्हणी:
  1. जिथे सरडा, तिथे सत्ता
  2. उंदीर आणि सरडा, बुडते जहाज सोडती
  3. सरडा येई घरा, तोच दिवाळी दसरा
  4. सरड्याचे अनुकरण करा, सत्तेचे सुख भोगा.

तपस्या

लेखक जयनीत यांनी बुधवार, 27/08/2014 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
अमका सांगतो एक तमक्याचे ठोकताळे दुसरेच खमका करतो दावा छातीठोक घडते प्रत्यक्षात वेगळेच प्रारब्ध माझे अधर अनिश्चित खडतर काळ प्रतीक्षेचा नाही विचलीत मी अपराजित प्रण मनात घोर तपस्येचा फळतील माझे प्रयत्न भगीरथ घेईन वेध भविष्याचा शोध सुरुच सतत अविरत सिद्धहस्त ज्योतिष्याचा

बाबूंचे अच्छे दिन आले

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 18/08/2014 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
(बाह्य दिल्लीत राहणारे काही बाबू जाणा-येण्याचा वेळ ही ८ तासात सामावून घायचे. आता कार्यालयात १० तास काम करावे लागतो आणि शिवाय जायला यायला दीड-दोन तास लागतातच. १५ मिनिटे उशीर झाला कि अर्धी सुट्टी कट.