Skip to main content

विडंबन

....जाऊ दे मला !

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 20/10/2007 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. प्रदीप कुलकर्णी यांच्या जाऊ दे मला या नितांत सुंदर गजलेचे विडंबन. श्री. प्रदीप कुलकर्णी हे अत्यंत प्रतिभावान गझलकार . आम्ही त्यांच्या गझलांचे चाहते. त्यांची जाऊ दे मला ! ही गझल वाचताच आमच्यातला दिड वर्ष सुस्तावलेला गझलकार खडबडून जागा झाला. आणि हे औधत्य आमच्या हातून घडले. सोड माझा हात... जाऊ दे मला ! मी जरी वाह्यात... जाऊ दे मला ! बायको रागावते हल्ली सखे फार झाली रात... जाऊ दे मला ! भेटण्याआधी तिला थुंकून द्या तोबरा तोंडात... जाऊ दे मला ! जेन्ट्स की लेडीज हे सांगू नका वाजताहे वात...
Taxonomy upgrade extras

माझा आवडता प्राणी: "गाढव"

लेखक हरिप्रसाद यांनी सोमवार, 15/10/2007 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
तसे मला सगळेच प्राणी आवडतात पण लांबुनच बघायला ते ठिक वाटतात. पण या सर्व प्राण्यांमध्ये "गाढव " हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे. गाढवाला २ डोळे, २ कान, ४ पाय व १ शेपूट असते. त्याच्या अंगावर काहि वेळा पट्टे मारलेले दिसतात. त्यावेळी ते मला झेब्र्यासारखे वाटते. आपण रस्ता नेहमी झेब्रा क्रोसिंग वरुनच क्रोस करवा. झेब्रा हा प्राणी प्रामुख्याने जंगलात आढळतो. पण आजकाल मुळी जंगलच आढळत नाही. त्यामुळे झेब्रा कुठे असतो ते मला माहित नाही.

(...देहात माझ्या ! )

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 11/10/2007 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता...देहात माझ्या ! ...देहात माझ्या ! लालसर हे फोड काही उपटले देहात माझ्या ! खाजण्याचे एक वादळ उसळले देहात माझ्या...! नजर मजला लागली ही सांग रे आता कुणाची... केवढ्या वेगात झाली वाढ देही पुटकुळ्यांची ! कांजिणे खाजाळलेले उगवले देहात माझ्या...! फोड झाले एवढे की लपवण्या उरले न काही... पाठ नाही राहिली अन् सोडले तोंडास नाही... हे असे फोडत्व सारे पसरले देहात माझ्या ! प्रार्थनेने थांबलेना,ना दाद देई औषधाला...

...मला आठवण आहे !

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 05/10/2007 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता ......तुझी आठवण आहे ! ...मला आठवण आहे ! ..................................... अधी ड्राय डे आणि भरिला हे एकाकीपण आहे ...हाच दिलासा! घरी मित्राच्या खूप साठवण आहे ! मित्राकडे जाण्यास निघालो... प्रवास करतो आहे मंद पावले टाकीत पण हा ट्राफिक सरतो आहे सुरा पाहण्यासाठी अगदी व्याकुळ झालो आहे दूर वरूनी प्रवास करूनी इथे पोहचलो आहे भरले प्याले ! भरून प्याले सुरा चाखतो आहे... अखंड येथे हा मदिरेचा झरा वाहतो आहे समीप बॉटल घेऊन बसलो नको दुरावा आहे ! थकलो आता !

विरंगुळा

लेखक सहज यांनी गुरुवार, 04/10/2007 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या हॉट टॉपिक "स्त्री वादा"वर एका चर्चेत तिकडे पलीकडे रामायणातील एका प्रसंगात सीता, बिचार्‍या लक्ष्मणाला काहीतरी वाईट बोलली ("लंपट माणसा! राम मेला तर मी तुला मिळेन अशी अभिलाषा बाळगतोस"?) असा उल्लेख आला आहे. आता नेमके आठवत नाही पण एका लेखात (बहुदा 'अंतू बर्वा' मध्ये असावे ) पु.लं नी पण प्रतिकूल परिस्थितीत विनोदाचे कवच वापरून तोंड कसे द्यायचे हे दाखवले आहे.. इतके अपमानास्पद बोलणे ऐकायला लागले तर आपण विनोदाने ते माईल्ड कसे करू शकू ?माझ्या डोक्यात उठलेले हे विचार आणि त्यावर सूचलेले हे स्फूट..जरा दोन घटका करमणूक. ह.घ्या. हे सर्व काल्पनिक आहे, कशाशी साम्य असल्यास निव्वळ योगायोग समजावा.

मळमळ

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 26/09/2007 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अमोल शिरसाट यांची सुरेख गझल दरवळ कशी समजली माझी वळवळ मलाच होते ठाउक केवळ. सहन कराया कळ प्रसवाची भगवंता दे आध्यात्मिक बळ कथा वाचता सर्वा पटले .... ही कोणाची आहे मळमळ . प्रतिसादाने उठले वादळ इथे अचानक झाली खळबळ! कितीक द्यावी स्पष्टीकरणे... हा नाही हो माझा दरवळ कसे विसरलो अपुले मी वय... मला लागला का आहे चळ? मला माउली म्हणते आता भोग आपल्या कर्माचे फळ मरशिल मेल्या "केश्या" आता लावून पाय *डीला पळ

आताशा मी ग्लास रिकामे मदिरेचे करतो

लेखक केशवसुमार यांनी रविवार, 23/09/2007 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मनोगतावर हे विडंबन आधी प्रकाशित झालेआहे. आमची प्रेरणा संदीप खरे यांची अप्रतिम कविता आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो. जाग नको मज कसलीही अन् ताप नको आहे जाणीव कुठली?

रेशमाच्या बाबांनी

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 20/09/2007 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम आमच्या परमस्नेही विसोबा खेचरांचे आणि समस्त मिसळपाव पंचायतिचे हे संकेत स्थळ चालू केल्याबद्दल मनापासुन आभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.. आम्ही सभासद व्हायच्या आधीच आमच्या नावांने इथे शिमगा चालू असलेला बघून आम्ही धन्य झालो..असो.. सध्या जालावर आम्हाला फारसा चांगला कच्चा माल मिळत नसल्यामुळे आमची गोची झाली आहे..म्हणून वेळ काढायला .. जालावर मराठी गाणी ऐकत होतो .