Skip to main content

विडंबन

....... इथले संपत नाही

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 05/12/2014 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
(कवी ग्रेस आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची जाहीर माफी मागून.) थोडासा वेगळा प्रयत्न आहे, मूळ कवितेतील कमीत कमी शब्द बदलून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय. मूळ कवितेत ५४ शब्द होते. एकूण शब्दसंख्या तशीच ५४ ठेवीत त्यातले फक्त १२ शब्द बदलून उर्वरीत ४२ शब्द तसेच ठेवून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय.

हाबिणंदण

लेखक टवाळ कार्टा यांनी सोमवार, 01/12/2014 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/29625 "काण्या तू ? वहिनी कुठाय" या तुझ्या टोकदार प्रश्नानं तु माझ्या पोटाचं मी मोठ्या कष्टाने पट्ट्याने बान्धलेलं गाठोडं टचकन फुटून गेलं, आणि मला (त्या ललने समोर) कफल्लक बनवण्यात तू पुन्हा एकदा यशस्वी झालास.. अभिनंदन!!!

कधी तू..... (वाहनवेड्याचं व्हर्जन)

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 26/11/2014 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
बहुगुणी यांच्या मायामी बीच ऑटो शो या धाग्यातील फोटो बराच काळ डोळ्यासमोर पिंगा घालत राहिले. वाहनवेड्यासाठी वाहन काय असतं हे वेगळं सांगायला नको. तीच दारू असते, तेच प्रेम असतं, तोच जोश असतो, तेच समाधान असतं. त्याच वरून प्रेरणा घेत सुचलेलं हे विडंबनकाव्य. मूळ गाणं : कधी तू.... चित्रपट : मुंबई पुणे मुंबई कधी तू.... स्टियरिंगवर बसण्याच्या क्षणात कधी तू.... ड्रायव्हिंगच्या वेड्या अनुभवात कधी तू.... रस्ता एक स्ट्रेट, आपलं जणु जेट स्पीडोमीटर वर एकशेसाठ टर्न अप द स्टिरियो, रोल डाउन द विंडो वेगाची मस्ती चाखण्यात कधी तू...
काव्यरस

सीट

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 20/11/2014 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
(कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांची माफी मागून) खचाखच भरलेली बस स्टॉपवर उभी राहून पहा बघ माझी आठवण येते का? हात लांबव, पावलांवर झेलून घे बुटांचे मार इवलसं दुःख पिउन टाक बघ माझी आठवण येते का? रिक्षाने उडणारा धुळीचा लोट अंगावर घे, पदर सांभाळ, हात दाखव इतक करुनही तो नाहीच थांबला तर चालत जा, स्टेशनवर ये तिथे गर्दी उसळलेली असेलच, फलाटावर पाय रोवून उभी रहा सारी गर्दी सरकेल एकाच डब्यात, बघ माझी आठवण येते का? मग चालू लाग, नजरेच्या अगणित सुया टोचून घे चालत रहा टॅक्सी मिळेपर्यंत, ती मिळणार नाहीच, ऑफिसला ये केस सेट करु नकोस, घाम पुसू नकोस, पुन्हा त्याच गॅलरीत ये आता तो तारेवर बसलेला कावळा बघ बघ माझी आठव

कधी कधी

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 17/11/2014 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
हसी तो फसी या हिंदी सिनेमातलं 'ज़हनसीब' हे अत्यंत आवडतं गाणं ऐकत असताना सुचत गेलेल्या ओळी.
काव्यरस

<<<पंगत नव मीपाकराचीं- भाग २

लेखक जेपी यांनी रविवार, 16/11/2014 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग व्यनी वाचुन मी बसल्या जागी उड्या मारायला चालु केल्या. हुर्रे !! मला संपादक मंडळावर तर घेत नाहीत , निदान पंगतीच्या आयोजन मंडळावर तर घेत आहेत. संधि का सोडा ? लगे हात मुविंना होकार कळवला आणी संध्याकाळची वाट पाहु लागलो. ============================================================================= हे व्हिसी ( व्हिडीओ कॉन्फरन्स) करण म्हणजे आवघड काम होत.

(पाठ शिवा हो पाठ शिवा)

लेखक सूड यांनी बुधवार, 12/11/2014 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
पाठ शिवा हो पाठ शिवा वार्धक्यातही वाघ रडवला डाव टाकूनि नवा नवा बन कमळांचे मुदित* सापळे लपायास मज असे मोकळे सत्तांधाला काय का कधी शिवाशिवीचा खेळ नवा? टिकटिकविरहित जरी तव पाऊल अचूक मला पण लागे चाहूल कित्येकांची चळते बुद्धी तुझ्या ऐकता पायरवा उमटू न देईन साद पाऊली सर्रकन जाईन जशी सावली सामावून मज घेईल अलगद हा कमळांचा उभा थवा मालकी घेशील परी कशाची तुझ्या पदांची तुझ्या यशाची पाठलाग मग कुठे संभवे महाराष्ट्र जर तुला हवा !! ;) *मोद-मोदी-मुदित

अजुनी बसून आहे

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 07/11/2014 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल- अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ) अजुनी बसून आहे गुंता मुळी सुटेना उघडे तसेच फेस्बुक लॉगौट..
काव्यरस