Skip to main content

विडंबन

< मिसळपाव वरील १० वैशिष्ठपुर्ण बाबी >

लेखक प्यारे१ यांनी शनिवार, 16/08/2014 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
१. "मिपा" हे नाव झणझणीत पणा मुळे पडले आणि मिसळ व पाव एकञ येउन " मिसळपाव". २. काथ्याकूट हा खेळ मिपावर उदयास आला. ३. कोडाईकनाल, कृष्णमूर्ती आणि गरम पाण्याचे कुंड हे मिसळपाव वरील 'जे न देखे रवि' ह्या काव्य विभागात निर्माण झाले. ४. 'टेम्पोत बसवणे, चपला घालणे' वगैरे वाक्प्रचार मिसळपाव वर सुरु झाले. ५. जगातलं पहिलं धागा विश्लेषण वर मिसळपाव वर सुरु झालं. ४३४ प्रतिसादांच्या एका धाग्यापासुन आदूबाळ ह्यांनी त्याचं विश्लेषण केलं गेलं. ६. आजची खादाडी हा खेळ श्री विसोबा खेचर (तात्या) यांनी तयार केला आणि त्याचे खरे नाव आजची बायडी आहे. त्यामध्ये खादाडीचा उपयोग केलातर पोटोबाचे समाधान होत असे असा समज असे.

विडंबन - धोबिचा कुत्रा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 26/07/2014 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
बिभीषणाने दिला होता रावणाला हो दगा. बदल्यात त्याला मिळाली सुवर्ण लंकेची हो गादी. गादी साठी त्याने पक्ष आपला सोडला. विसरला होता तो त्रेता नाही कलयुग आहे हो. घरात त्याला आता प्रवेश नाही मिळाला. घाटा वरचा राजा तो नाही झाला. घर का ना घाट का धोबिच्या कुत्र्या सारखा भुंकत-भुंकत आता भटकतो गल्ली बोळ्यात.

बडबड गीत

लेखक भिंगरी यांनी बुधवार, 23/07/2014 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक बडबड गीत ............. बरं का ग मंदा काय झालं एकदा, ताई आमची चिरत होती खसाखसा कांदा . कांदा राहिला हातात विळी गेली बोटात विळी वरुन उठली, नाचत सुटली. धक्क्याने मोराम्ब्याची बरणीच फुटली. हाय हाय हाय काचेवरती पाय. काच गेली पायात आता करू तरी काय? बाबा हसले खो खो खो आई हसली खी खी खी ताईला आले रडू आईने दिला लाडू ---------------------------------------- आणि हे 'बेताल बरबाद गीत' ............. बऱ का गं जनता काय झालं एकदा मंत्री आमचे मोडत होते पटापटा कायदा. कायदा राहिला बुकात शिक्षा झाली कोकणात. हाय हाय हाय माझ्या पोराचे काय? पत गेली आता करू तरी काय? पदावरून उठले भांडत सुटले धक्क्
काव्यरस

कुंथुनी .. काय घेता??? मोकळे होता..मिळे स्वर्ग!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 06/07/2014 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
ढुश्श..-क्लेमर :- ज्यांना हलकं फुलकच खाल्लेलं पचतं..अश्यांनी सदर लेखन वाचू/चावू नये. उद्या सकाळी त्रास-झाल्यास आंम्ही जबाबदार (रहाणार) नाही! आणि हो..स्मायल्या'ही बर्‍याच आहेत,त्या सह न करत वाचावे.कारण आंम्हास स्मायल्या न लावल्या शिवाय,लेख-होत नाही..(तिकडल्या-प्रमाणेच! *lol* ) त्यामुळे णाविलाज! *biggrin* ................................ सद्ध्या पांजाबीफुड,चमचमीत आहार असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ.खारीक* खा पटापटा.) असे बलवंत(मंजे हेल्थकाँशस हो!) लोकांचे सुरु असते.

पुरुषांचं डायेटिंग -- माझा अनुभव

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 25/06/2014 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा (अनघाताई, कृपया ह घ्यावे.) बायकांचं डायेटिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच्या वाढत्या ढेऱ्या हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष बायकांनी केलेल्या स्वैपाकावर चरत आले आहेत. पुराणात नाही का , भोजनावळीचे आयोजन पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना आहाराचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये.

नि व ड नु क

लेखक जयनीत यांनी शनिवार, 31/05/2014 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हाले नवीन शाळा बांधून देनार हायेत दोन मजल्याची! अन धाव्वी नंतरच्या पोरांसाठी कॉलेज पन उघडनार अजून काय काय होणार हाय सांगू? दवाखाना, धरन! नाल्या गटारं आता सार्खी उघडी वागडी नाय -हानार सा-या रस्ते सडका पक्क्या होनार हायत एकदम चकाचक!! सा-याईले पक्के मकान अन प्रत्येकाले काम काय पन भारी अस्ते नाय का? निवडनुक!!!

लटके आरोप ताठ मान !!

लेखक माहितगार यांनी शनिवार, 24/05/2014 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
मच्छरांनो :) ससुलापंत दिसतो कसा ? जजाने कोठडीत ठेवलाय जसा ! ससुल्या गडी करतो कडी, काढीन म्हणतो न्यायाची खोडी ! तुमचं न्यायालय हवं कशाला ? मी चावलो, तो गुन्हेगार झाला ! गुन्हेगाराला चावून, काय गून्हा केला ? प्रसिद्धीत रहायचय पुन्हा त्याला ! तक्रार यांची, त्यांचेच चूक चावल्याने भागते लालसेची भूक ! ससुलाल नाटक करतो छान, लटके आरोप ताठ मान !! :)
काव्यरस

मंत्रालयात 'आग'-बाई

लेखक माहितगार यांनी बुधवार, 21/05/2014 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचे पहिले नाव मंत्रालयात भूलाबाई भूलाबाईच्या माहेरी विरोधी नणंदा, सत्तेतल्या भावजया घरात नव्हतं मुनीमाशिवाय तिसरं कोणी मंत्रालयातबसून लोणी, खाल्लं कोणी खाल्लं कोणी तेच खाल्ल वहिनींनी वहिनींनी.... आता माझा दादा येईलग येईलग दादासोबत सभागृहात बसीनग/बसेनग दादा तुझी बायको चोरटी चोरटी असू दे माझी चोरटी चोरटी कायद्याचे हात आहेत लाबं मत्रांलयातलयात फायलींना लागलेली आग पाहून येतो थांब भूलाबाई गेल्या काढाया सासरची रुष्टी पाठी विसरल्या भूलाबाई माहेरच्या गोष्टी

कलगीतुरा- भाग ५

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 19/05/2014 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीच्या भागांची लिंक खाली देत आहे. कलगीतुरा- भाग १ कलगीतुरा- भाग २ कलगीतुरा- भाग ३ कलगीतुरा- भाग ४ "त्यादिवशी तू तुझ्या दोस्ताला माझ्याकडे घेऊन आला. त्याचे कमिशन ठरल्यानंतर त्यानी तुला लगेच कटवला. मला म्हटला दिग्याला मी लगेच कटवला कारण तीन तिघाडा काम बिघाडा नको.

<<< हा मिपाचा विजय >>>

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 16/05/2014 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही काही काळापूर्वी http://misalpav.com/node/27418 ह्या काकू द्वारे गणपा खरंच मिपाशेफ बनतील का असा एक सर्व्हे घेतला होता. तेव्हा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात 'गणपा' चा प्रचार काही जणांनी केला. त्यांच्या विरुद्ध देखील काही लोक बोलले. आज ह्या ठिकाणी निकालाच्या प्रसंगी गणपा जिंकून आलेला आहे. सगळ्या मिपाकरांनी गणपा लहरी आहे- आपलं- गणपा लहर आहे हे मान्य केलं आहे. तरी देखील गणपा जिंकला म्हणजे सगळं साध्य झालं असं होत नाही. त्याला बर्‍याच पा कृ शिकायच्या आहेत, बनवून दाखवायच्या आहेत, सुगरणींच्या सल्ल्यांमधून नेमकेपणा आणायचा आहे.