Skip to main content

विडंबन

शेअर्स मार्केट म्हणजे काय रे भाऊ

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शनिवार, 10/10/2015 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
शेअर मार्केट म्हणजे काय रे भाऊ? छोटू आणि गोटू या दोन भावांचा संवाद छोटू--शेअर मार्केट म्हणजे काय रे भाऊ? गोटू--अरे शेअर मार्केट म्हणजे किनई ,एक प्रकारचा बाजार असतो, जिथं एक माणूस तंयाचं डोकं ठिकाणावर नसल्यासारखं सतत कांहीतरी विकत घेतो,थोड्या वेळानं तीच वस्तु डबल विकतो किंवा त्याचया उलटहि करतो,दुसरा, तिसरा ,चौथाहि हेच करतो.ना इथं प्रत्यक्षात कोणी माल वा पैसे रोख देतो वा घेतो. छोटू--म्हणजे वेड्यांचा बाजार काय रे भाऊ? जिथे एकजण म्हणतो मी ताजमहाल विकत घेतला, दुसरा म्हणतो पण मी कुठे विकला? गोटू--अरे नव्हे नव्हे!शेअर मार्केट म्हणजे एक प्रकारचा

(एक विडंबन_व्हॅलेंटाईन डे)

लेखक तर्राट जोकर यांनी शुक्रवार, 09/10/2015 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
संप्रेरक प्रपोज केले मला काल तू सॉरी पण तू खरंच फालतू विसरून जाण्या कुणा सांगतो दु:ख तुझे ते चुलीत घाल तू धीर ना तुला घडीभराचा गडी अजून तू लहान खुराचा उतावीळ बस पळण्या पाहिले ठोकली कुठे अजून नाल तू प्रेमाच्या कथा मनमानी अहंकाराची त्यास जोडणी लाजवाब हा नखरा घेऊन उलटी चालतो बघ चाल तू कशास धरली होती आशा जर उडवता येइना त्या माशा एकतर्फी हे मनोरथ ओढून स्वतःशी फसवले रे कमाल तू फसले नाही तुझ्या जालाशी म्हणून कैदाशीण का आज मी होतास फिरत तेव्हा मागे मागे म्हणशी अप्सरा, म्हणशी माल तू कवी: बुर्राट ठोकर (त.जो.)

मोकलाया दाही दिश्या ते भटकाया दाही दिश्या : एक प्रवास

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 06/10/2015 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
(ढेस्क्लेमर: या लेखातून माझा कुणालाही हिणवण्याचा अथवा दुखावण्याचा हेतू नाही. याउलट 'हसण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी हसणे' हा माझा हास्य'बाना' सर्वांपर्यंत पोचविण्याचा एक किंचीतसा प्रयत्न आहे! तरीही कुणाला माझ्या लेखातील/काव्यातील काही जागांना आक्षेप असल्यास कळवावे, दुरूस्ती किंवा तो भाग काढून टाकण्यासाठी संमंना सांगून प्रयत्न केला जाईल!) न्मसर्कार म्हणडलि! तर महाराजा, शीर्षक आणि पहिली ओळ वाचून पुढे काय वाचायला मिळणार आहे याचा एक अंदाज मिपाकरांना आलाच असेल! तुम्ही बरोबर विचार करताय, सदर लेख "त्याच" काव्यचमत्काराला वाहिलेली एक शब्दांजली आहे.

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 05/10/2015 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की २४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला.

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 02/10/2015 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.

जुळयांचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 02/10/2015 09:11 या दिवशी प्रकाशित केले.

जुळयाचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

जुळे १: सासं नसूनही तबला तू सकल मिपाचा झमेला तू धाग्यवरील सैरभैर (चि)चुंद्र अन्... सुप्त बोक्याची जागा तू मोकळाढाकळा रांगडा तू रे सुमडीत सोपान डोम ही तू ज्वर धाग्याचे आरोळी कधी तू कधी फसलेली चारोळी तू मिपात असूनही..

पायजमा

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 01/10/2015 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
(शाळेमध्ये असताना शांता शेळके यांची "पैठणी" खुपच आवडली होती. त्याचेच हे विडंबनामृत. लाभ घ्यावा. चुभुद्याघ्या) फडताळात एक गठुडं आहे, त्याच्या खाली अगदी तळाला जिथे आहेत् भरपुर चिंध्या मफलर चड्डी घोंगडं नाडा त्यातच आहे अस्ताव्यस्त बावरुन पसरलेला एक पायजमा चटेरीपटेरी फुलबॉटम रंग त्याचा काळपट भुरटा माझ्या आज्ज्याने लग्नामध्ये हा पायजमा घातला होता पडला होता सा-यांच्या पाया कमरेवर खेचत हाच पायजमा पायजमाच्या अवती भवती दरवळणारा उग्र वास जाणीवे नेणीवेची ओळख अजिबातच नाही त्यास चिकन मटन खेकड्यांतुन वरपत गेल्या किती गटारी पायजम्याने पाहीले ना शाकाहारी...

अकबर बिरबल (मोत्यांची शेती)

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 28/09/2015 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचा भाग: अकबर बिरबल (मेहुण्याची शिफारस) -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- अकबर बिरबल (मोत्यांची शेती) -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- [दृश्य: अकबराच्या लाडक्या बेगमच्या महालातील सुंदर शयनकक्ष.

।।गंगास्मरण।। ( अर्थात राम तेरी गंगा मैली)

लेखक दमामि यांनी शनिवार, 26/09/2015 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा तू उर्वशी तू मर्यादा , गीता रिता ज्युली शांती तुझीच सारी अनंत रूपे, यास्मिन किंवा मंदाकिनी ती अग्निरथी तू दुग्धदायिनी, तुलाच नमितो कपूर राजीव, हरहर गंगे तुलाच स्मरती "बॅाली"वुडचे भक्त चिरंजीव स्नानार्थं जलपातगामिनी तुझ्या पल्लुचे कडे निसरडे…. कितीक आले गेले भुलले तुझ्या दर्शने शांत गळाले प्रणयसंगम तूनळी रंजन तिथेच फिरते चक्र निरंतन विशालसुंदर आम्र निरंतर तिथे विरावे माझे अंतर प्रणयसलिला मुक्ता कांता ये वेगे, जा घेऊन मजला मम तीर्थाचा तुला दिलासा, जीवास थकल्या होई विसावा तू उर्वशी तू मर्यादा........... अज्ञ
काव्यरस

<विखुरलेला चखणा>

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 24/09/2015 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा www.misalpav.com/node/32919 हल्ली कमीच झालंय माझं बारमध्ये जाणं गेलोच तर हरपुन जात हळुहळु दुनियेचं भान. हल्ली कमीच झालंय तसं रात्र रात्र तळमळणं, मला बघुन मालकानं कमी केलयं उधाऱ्या देणं. हल्ली कमीच झालंय आता मला मोगराबाईनं खुणावणं, तिलाही झालंय सवयीचं गुपचूप पाकीट मारणं. हल्ली कमीच झालंय घरी ऊशिरा येणं. मलाच कसं नाही जमलं असं अवेळी लवकर येणं. हल्ली कमीच केलंय मी ऐकणं माझ्याच मनाच, तुझ्याकडे तरी आलंय का गं पार्सल माझं चखण्याच? (वोडका का रम काय सुचना)