Skip to main content

विडंबन

तुझ्या कळा माझ्या कळा

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 07/01/2016 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
(हास्पीटलातल्या दोन पेशण्टा चा स.न्वाद/ मनोगत ) तुझ्या कळा माझ्या कळा गुंफू कळान्च्या माळा ताई (सिस्टर ना ती) आणखि कोणाला मज रे दादा (वॉर्डबॉय) नाठाळा तु़ज बी पी (ब्लड प्रेशर) मज अ‍ॅलर्जी आणिक डायबीटीस दोघाना वेध लागले घरच्याना 'निरोप' मिळेल का आम्हाला तुजे ई सी जी माझे सी ई टी रीपोर्ट येइल कधी नॉर्मला नाहीच आला तर घोटाळा सान्गा तिकडच्या आर एम ओ ला तुला ग्लुको़ज डीस्परीन मला बॉटल नळ्यान्चा वेटोळा आणिक रेचक दोघाना नाही चालला तर एनीमा आला इथे खुप कण्टाळा लेकी-मूले नेतील का घरा दीस अखेरचे काढायला नातवान्बरोबर खेळायला (चु भू द्या घ्या ) मूळ गाणे "तुझ्या गळां, माझ्या गळां गुंफू मोत्यांच्
काव्यरस

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 05/01/2016 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ... झाडांच्या सावलीत राणीच्या बागेत ने-चर वॉक श्रवणोत्सुक नेत्र वेगळ्या कोनातून मनोरा पाहणारे Appreciation टॉक चिंचेची अन चिनाराची झाडे कुट-कुटली, पुर्व-पश्चिम दक्षीण-उत्तर, गाभुळलेले, हिरवे चढ उतार झेलत हळूवार-मौन कधी जोरदार वाहत्या वार्‍यासंगे बोलके तुषार वळणे डौलदार नजाकत लवलव गवताची पाती झुलता झंकार फुलपाखरे किती चमकदार पक्षीगाती मंजुळ मनाचे तराणे कळ्या फुलतात हळूवार प्रतिक्षा त्या खास किटकांची फुलांचे परागीभवन फळांच्या आशा कधी निराशा

पुढाऱ्याचे प्रेम

लेखक सप्तरंगी यांनी सोमवार, 04/01/2016 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम या थिम वर एक गद्य-पद्य लिहायचे होते त्यात मी ' पुढाऱ्याचे प्रेम ' वर लिहायचे ठरवले.

कुठं कुठं जाऊ मी सांगायला?

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 04/01/2016 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : "कुठ कुठ जायाच हनिमूनला" ही प्रसिद्ध ठसकेबाज लावणी! कुठं कुठं जाऊ मी सांगायला? अहो भरल्या जवानीत 'सर' तुम्ही मला हेरलं हेरलं ते हेरलं अन् जॉबच् माझ्या ठरलं ख्रिसमस झाला, "न्यू" इयर झालं आता फक्त ऑफिस की हो उरलं! मार्केटींग, मॅनेजमेंट, निवांत एच.आर. कोण नाही पर्वा करायला कुठं कुठं जाऊ मी सांगायला? थोडं तरी इन्क्रिमेण्ट करायला! रात्रभर एकटा बसू कसा? क्लायंटला अडचण सांगू कसा? बाकीचे सारे, प्रोफेशनल खरे जातात टायमात ते घरला! कुठं कुठं जाऊ मी सांगायला? जमेल तेवढं खेचून मी काम नाही केला आजिबात आराम सकाळ

सातवा वेतन आयोग – मरा बाबू सव्वा लाख का

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 03/01/2016 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
(कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत). सातव्या वेतन आयोगाची रिपोर्ट आली. वेतन आयोगाने सरकारी कर्मचार्यांना निराशच केले. घरभाडे न घेणाऱ्या लाला दुखी चंद (LDC)च्या पगारात तर चक्क बामुश्कील १ टक्का वाढ झाली आहे. विम्याची रकम वजा केल्यास फक्त ५ रुपये. इतरांच्या बाबतीत जास्तीस्जास्त ४ टक्का. [(http://www.

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 02/01/2016 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

लेखक DEADPOOL यांनी रविवार, 27/12/2015 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १

हवाबाणहरडेचघळ

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 23/12/2015 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणेमधल्या हळूवार भावना या कवितेतही जपायचा प्रयत्न केला गेल्या आहे. तरी सुध्दा अतिसंवेदनाशील वाचकांनी कृपया खालील काव्य वाचू नये. होणार्‍या परीणामास मंडळ जबाबदार रहाणार नाही.

अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !! बरं का ! हॅप्पी न्यू यीअर !!

लेखक माहितगार यांनी बुधवार, 23/12/2015 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग स्वप्नात झाले होते पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!) पंतप्रधान मोदींचे सचीव !! :) क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग त्यांनी विचारले गेले वर्ष भर काय केले ? ओबामां फोनु आला डू यु नो अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ओह मिपाकरांना आमचा निरोप द्या ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !!

घेई छंद

लेखक तिमा यांनी शनिवार, 19/12/2015 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
घेई छंद हे लोकप्रिय गाणे, हीच प्रेरणा. आस्तिक-नास्तिक या खेळांत, बघा, खेळकरपणे घेता येत असेल तर! मतिमंद, भक्तिधुंद प्रिय ज्या,वृथानंद प्रभूपूजना दंग कर्मठांध, हा संग मिटता मनचक्षुबल होई बंदी हा मृदुंग परि सोडिना फांस भजनांत हा गुंग
काव्यरस