Skip to main content

विडंबन

गॅलरीतला [तिसरा] पालापाचोळा

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/12/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
घरात माणसे कमी अन लोक वाढतात तेव्हा गॅलरीची 'एक्स्ट्रा रूम' होते! घरात नव्याला सूज येते अन जुन्याचे कुपोषण होते तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो! घरात वाचणारे कमी अन वाचाळ जास्त होतात तेव्हा गॅलरीचा रद्दीखाना होतो! घरात आवाज कमी अन गोंगाट जास्त होतो तेव्हा गॅलरीत 'सायलेंट झोन' येतो! घरात हवे ते कमी अन नको ते जास्त येते तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते! घरात दिवस कमी अन रात्री जास्त होतात तेव्हा गॅलरीत बोन्साय वाढतात (?) घरात, घर कमी अन भिंती वाढतात तेव्हा गॅलरीला काचा बसतात, फक्त स्वतः चीच प्रतिमा दाखवणाऱ्या ! .

गॅलरीतला [हसरा] पालापाचोळा

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 11/12/2015 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
अस्सल (आणि उच्चही) शिवकन्या यांची माफी मागून.. ============================ कुंठीत धाग्यात्,कोण रिंगणात? थुई थुई नाचे मोर्,पिसारा पुढे,मागे बाकी काही नाही! नाचर्या पावसात, कोण रस्त्यात? थांबते गाडी, रिकामी सीटे, बाकी प्रवासी कुणी नाही! चेहरा मनात, कोण आरश्यात? अलवार हसू, खुलते ध्यान, बाकी याद कसली नाही! गमेना मित्रांत, कोण दिवसा स्वप्नांत? लटका राग, मोहक हसू , बाकी ठावे काही नाही! तपत्या उन्हात, कोण उरात? गम्मत गुज,आठवण शिरशिरी, बाकी मग कुणी नाही! लपवलेल्या अर्थात, कशी रुजुवात? शोधेल कुणी, वाचेल कुणी, बाकी वाचन नाखु पाही ================

नास्तिक

लेखक सुमित_सौन्देकर यांनी गुरुवार, 10/12/2015 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
असलो जरी मी नास्तिक तरी देवालाच दोष देत मी रडतो कुणासोबत मंदिरात जाता विश्वास नसून पाया पडतो.... नाही विश्वास भूता-खेतावर म्हणत मी टेम्भा मिरावतो ऐकट पडलो की मात्र अंधाराला खुप घाबरतो... खर खोट सिद्ध करायला मीही शप्पत घेतो नजर लावली कुणी म्हणून मीही दूषण देतो... स्वतावर आहे भरोसा तरी शिंक आली की थांबतो नस्तिक्तेच व्याख्यान मात्र अभिमानाने सांगतो... सण संपता निरोप घेता मीही होतो बर भाऊक आहेच खर का मी नास्तिक ते त्या इश्वरालाच ठाउक...
काव्यरस

म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 06/12/2015 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
चांदोबा असतोच तसा आजन्म उपाशी तुपात पडलीयेना त्याच्या माशी ! तुपरोटी तो कसला खातो चिरेबंदी गाण्यातली अंगाई ऐकत मामा होऊन भटकत राहतो ! निंबोणीच्या झाडात गंधर्व होऊन विराणी कुठलीशी गात राहतो. बाबा ?, की आईनेच चांदोबाचा भागाकार केला, म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ? * माझ्या उपरोक्त विडंबनास खरे तर एका पेक्षा अधिक शीर्षके सुचत होती, तुम्हाला काही चपखल शीर्षक सुचलेतर प्रतिसादातून जरुर नोंदवा. * उपरोक्त विडंबन खालील बडबड गीताचे आहे : चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी मामाच्या वाड्यात येऊन जा तूपरोटी खाऊन जा तुप

नारी नारी (हिशम अब्बास) या गाण्याचं विडंबन

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 01/12/2015 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
नारी नारी (हिशम अब्बास) या गाण्याचं विडंबन भारी भारी ब्लॉग दुवा भारी भारी *३ भारी भारी; भारी आमचे भाऊ भारी भारी; बॅनर बिनर लावू रस्त्यारस्त्यावर आमच्या भाऊंची हवा भारी की नाय (हबीबी दा) दिसतो तो म्हणतो भाऊ तुम्हीच हवा भारी की नाय (हबीबी दा) भारी भारी; भारी आमचे भाऊ भारी भारी; बॅनर बिनर लावू भाऊंचा नाद कुण्णी करतो का बघा भारी की नाय (हबीबी दा) करतो तो करतो पण तो उरतो का बघा भारी की नाय (हबीबी दा) भारी भारी; भारी आमचे भाऊ भारी भारी; बॅनर बिनर लावू भाउंची गाडी ऑडी चमचमत्या चैनी रेबॅनचा गॉगल आणि

बाबा तू चुकला रे

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 01/12/2015 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
(हल्ली कुणीही उठतो आणि शिक्षणाला नावे ठेवतो. मी शिकलो नाही, अभ्यास केला नाही, पिरेड केले नाही, शिक्षणात ढ होतो हे सार अभिमानाने सांगतो.

'पावली' (विडंबन)

लेखक DEADPOOL यांनी रविवार, 29/11/2015 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा- महाकाव्य!!! १०० चा टाकटायम टाकला तवा ती पावली! पाच भार साखळ घितली तवा ती पावली! १५दिवस कालीजमधी मारल्या चकरा, तवा ती पावली! आवडून घेतला तिचा नकरा, तवा ती पावली! तिचा बा माराया धावला! आपला पण जीव कावला! पण बाची मुस्काटात घीतली! तवा ती पावली! लगीन कराया सांगितलं माझ्यासंगं, तवा ती नाय पावली! आनं तिच्यापाय माझ्याकड, नाय रायली 'पावली'!

ती धावली ...... (विडंबन)

लेखक दमामि यांनी रविवार, 29/11/2015 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना प्रसंग कुठलाही असो ,दूध उतू जाण्याचा, ट्रेन वा बस पकडण्याचा , कुत्रा मागे लागण्याचा किंवा व्यायामाचा. जेव्हा बायका (विशेषत: वजनदार बायका .) धावतात तेव्हा तो देखावा अगदी हृदयंगम वगैरे असतो यावर कुणाचे दुमत नसावे. ( गज़लेचे वजन शेवटच्या शेरात असल्याने प्रेरणेत नसूनही तो घुसडला आहे, त्या बद्दल संदीपजींची माफी) "टनाची" होती बंदी, ती धावली कुणा वाटे न का संधी?
काव्यरस

दमामिने माझी कविता पळवली

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 28/11/2015 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
दमामिने माझी कविता पळवली तेव्हा आत्मा जिलबीच्या घाण्यावर झाऱ्या काढून ऊभा होता मी बॅट्याला म्हटलं प्याऱ्या कुठाय? त्यावर ढगात नजर लावून तो म्हणाला सगळंच हुकलंय अगदी 'पातेल्या'चीही राख झालीय आता परा बिका मुविच्या भाऊगर्दीत टाऱ्याला शोधतोय. घावलीच एखादी जिलबी तर त्यावर मीठ टाकुन खातोय. मात्रं टेंपोत बसलेला राकु म्हणाला फुसकीच्या, कधीपासून 'कळ' बडवतोय? घे की आवरतं.

लंगोट तुझा ना राहिला, ना अस्थीही तुझ्या राहिल्या

लेखक माहितगार यांनी शनिवार, 28/11/2015 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा १ प्रेरणा २ प्रेरणा ३ आणि कदाचित अत्यल्प प्रभाव अशा चार चार कवि आणि कवितांची माफी मागून हि भूछत्री विडंबन जिलबी वाचक सेवेत सादर. लंगोट तुझा ना राहिला ना अस्थीही तुझ्या राहिल्या ना याद तुझी राहिली, ना कर्म तुझे राहिले चरत होतास तू या जगी पोट आणि पोपटी वासना स्वप्नांचा खेळ ठेऊनी पोपट मैना उडाले ततक्षणा यातनांची ती राख तुझ्या पंचप्राणांनी का वाहिली ? आहुती देऊनीही तुझे येथे काही ना राहील