Skip to main content

विडंबन

मुपीवरील माझ्या निवडक प्रतिक्रिया

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 11/08/2015 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
मुपीवरील माझ्या निवडक प्रतिक्रिया १. मैत्री म्हणजे मैत्री असते, तुमची काय अन आमची काय...जवळपास सेमच असते. सिगारेट देऊन, तयार सबमिशन-फाईल घ्यायचं, साध सरळ बार्टर असतं, काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात? मैत्रीच्या दृष्टीने थिल्लर वाटतात? असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे ! तरीसुद्धा, मैत्री म्हणजे मैत्री असते, तुमची काय अन आमची काय...जवळपास सेमच असते.

मिसळपावातील भय

लेखक पाटीलअमित यांनी शुक्रवार, 07/08/2015 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
संपुर्ण मिसळपावात निरव शांतता होती,मात्र डू(आईडी) हातात पाटी घेऊन तिच्या शोधात निघाला होता, कोण होती ती! ती एक संपादकीय शक्ती होती ,की दुसरी कुणी जीने संपुर्ण मिसळपावाला शतशब्दग्रस्त करुन सोडले होते.अचानक डू ला समोरुन एक शत(शब्द) पावली जातांना दिसली तो हळुच तिचा पाठलाग करु लागला अचानक ती पावली गुल झाली आणि पुढच्याच क्षणी डू च्या अंगावर कुणी तरी पाठीमागुन हात टाकला ... ..
काव्यरस

आमची 'कर्म'फळे

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी गुरुवार, 06/08/2015 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
नुक्ताचं बुवांना भेटलो. त्याचा आफ्टरइफेक्ट =)) आमचा पेर्णास्त्रोत:माझी मुक्ताफळे मुळ कवितेचा आशय खरचं खुप सुंदर आहे. पण हाताची खाज अगदीच नं आवरली गेल्याने धागाकर्त्याची माफी मागुन.
काव्यरस

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

(वाया) (मयपूर कथा)

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 04/08/2015 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
*** आमची प्रेर्ना शनिवारच्या रात्री मस्त तीर्थ-प्रसाद चापून, वाँकिंग झॉँबी मँरेथॉन करता करता साधारणपणे मला अर्ध्याएक मिनिटे (काल सापेक्ष असतो, चुभुघ्याद्या.) सोफ्यावरच अमळसा डोळा लागला तोच, कोणितरी मला हलविल्यासारखे जाणवू लागले. मला माझे डोळे बंद असताना पण सर्व दिसत होते. पण तरीही अंगात उठण्याची ताकद नव्हती, हालचाल करू शकत नव्हतो ...ओरडावंस वाटलं पण तोंडातुन शब्दच फुटत नव्हते. कोणितरी माझ्या घशातून बाहेर यायला पहात आहे असे वाटत होते.

‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’-मी जालावर लेखकू का झालो

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 27/07/2015 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
दोन-तीन दिवस अगोदर मला माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला. ‘पटाईतजी सच सच बताओ आपने इंटरनेट पर लिखना क्यों शुरू किया’. त्याने विचारलेल्या प्रश्न ऐकून मी विचारात पडलो. मी अंतर्जालावर लिहिणे का सुरु केले? नकळत समर्थांचे वचन आठवले. समर्थ म्हणतात, ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’. प्रत्येक नश्वर जीवाला अमर व्हावेसे वाटते. मृत्यू लोकात शरीराने कुणीच अमर होऊ शकत नाही. पण कीर्तिरूपाने आपण अमर होऊ शकतो. माझ्या मनात ही अमर होण्याची इच्छा दडलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी काही राजा हरिश्चंद्र नाही, तरी ही मला उमगलेले सत्य मी माझ्या मित्राला सांगितले.....
काव्यरस

आमचाही पाउस.....

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 26/07/2015 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच. काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले. फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...

बोळे

लेखक सोंड्या यांनी रविवार, 19/07/2015 04:27 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा . . . ज्यांचे असे त्यांचेच का तुंबतात बोळे सनी सिंहीणीस न्याहाळून का निघतात बोळे चालू करा पारायणे पीतपुस्तकांची असूनही सविताभाभी का अडकतात बोळे दिवस वर्षांचे युगांचे जन्मोजन्मीचे कोणासवे नाते बरे जपतात बोळे शिवली वेस यौवनाची कधी काळी आठवून ती यांचे घट्ट होतात बोळे तू जरा आता काळवंडून ये ललने रुपास दिपून यांचे आत सरतात बोळे यांना पाहुन हलकेच तु हस सखे निकोप वाढीस यांच्या रुततात बोळे (आगामी जिलबी साठी शिर्षक "बोळा रुते कुणाचा" इच्छूकांनी लवकरात लवकर जिलबी पाडावी)

डिस्टिलेशन (शंबर लंबरी कथा)

लेखक सोंड्या यांनी गुरुवार, 16/07/2015 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा तो अगदी घामेजून गेला होता! ! त्याने नवसागर, काळा गुळ, मोहाची फुलं, युरिया, जुन्या बॆट-या हे सगळे जिन्नस वापरून काहीतरी बनवीले होते. उत्सुकता म्हणून त्याने ते बोटावर ओतुन जाळावर धरलं. भपकन पेटणारा तो द्रव जबरी वास मारत होता. त्यांच्या धंद्याच्या उसुलात प्रत्येक बाटलीला "बूच" लावने आवश्यक होतं. त्याच्या जवळच काम करणार्या मित्राला त्याने विचारलं "दादूस...मांझा माल खपल ना...." "हेच्या आसला हेच्या बेंबट्या.... कं बोलतोस कं तू....हा तर पयल्या धारंचा माल हं.... खपलाच पायजे बोल.... उद्या गटारी आमोशा हं....