हॉटेल शिवीभोजन थाळी

हॉटेल शिवीभोजन थाळी मालक: हॅ हॅ हॅ. मालक: सोन्या, नालायका बघ रे, गिर्‍हाईक आलं. हॅ हॅ हॅ या या या. बसा बसा बसा. मालक: सोन्या रांडीच्या, पाच नंबरचे कळकटलेले टेबल आरशासारखे पुस, अन गिर्‍हाईकाला काय लागते ते पुस. हॅ हॅ हॅ. मालक: सोन्या नरसाळ्या, अरे माझा कडमड्या मोबाईल कुठे आहे? त्या पेताड भाजीवाल्याची भाजी आली नाही अजून. त्याच्या *डीत जास्त माज आलेला आहे. निट वेळेवर भाजी सप्लाय करत नाही तर मग मी थाळीत काय *ट देवू काय? मालक: सापडला रे मोबाईल. माझ्याच *डीखाली होता रे तो सोन्या शिंदळीच्या. तु गिर्‍हाईकाला तुझे पाणी पाज.

दुष्ट दुष्ट बायको!

पारंपरिक बायकांच्यात, एक गोष्ट कॉमन असते. आई झाल्यावर त्यांच्यातली, बायको बरीचशी मरते. सगळ लक्ष मुलांकडे, त्यांचं सुख पहिलं! नवरा म्हणजे शंकराची पिंडी, वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं! ''अग तुला काही होतय का ? मी स्वंयपाक करू का ? " " तुम्ही स्वयं - पाक'च करता! तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) "कशाला मरतेस?

सँडविच ढोकळा

नमस्कार. खूप दिवसात पाककृती टाकायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आज माझी एक अत्यंत आवडती पाककृती इथे सादर करायचीच हे ठरविले होते. आज तुम्हाला मी सँडविच ढोकळ्याची पाककृती सांगणार आहे. साहित्य - तयार इडलीचे पीठ ३ वाटी बेसन पीठ २ वाटी सायट्रिक अॅसिड १/२ चमचा+१चमचा मीठ+२ चमचे साखर+१वाटी पाणी हे सर्व विरघळून १ वाटी साधे पाणी २ चमचे खायचा सोडा हिरवी खोबर्याची चटणी (जरा तिखट) कडीपत्ता, सुक्या मिरच्या,फोडणी चे साहित्य कोथिंबीर सजावटी करीता तेल ५-६ चमचे तयारी कृती- या ढोकळ्याचे तीन भाग असतात. पांढरा ढोकळा, चटणी व पिवळा ढोकळा.

(जळवे)

तमाम मिपाकरांच्या (माझ्या सहित) ,भोचक व वरकरणी मदतीआड त्रस्त पिडणार्या नातेवाईकांना समर्पित ********** हेच ते पिडणारे पळवे जळवे ज्यां(च्या)मुळे तुझे जगणं काळजीने पोखरून ठेवलेस!! पाठिंबा वा संमती असती तर हे जळवे शक्तिने तांडून लगेच दृष्टी आड घालून विस्मृतीत टाकले असते... ना ही कुतरओढ कसोटी भाळी असती... ना भोचक डोळे खुपसून (देत) न संपणार्या टिकेलासुद्धा सोसत राहिले असते.... ना टोमण्यातून तुझ्या भळजखमा टोकरत राहिले असते.... नाहीतर, माझ्या प्रिया, सगळ्यांना आप्त ( नातलग) निवडायची संधी पसाभर देता, तर विधात्याचे काय जाते?

(दाराआडची आई)

पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

सिम्पल इज ब्यूटिफुल !!! - बंडू गोरे भोजनालय, वाई

लेखनप्रकार
महाबळेश्वरला २-३ दिवस ग्रील्ड सँडविच, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि पंजाबी जेवणावर यथेच्छ ताव मारल्यावर कधी एकदा पुण्याला घरी जाऊन वरण -भात खातोय असं होतं. असंच एकदा ट्रीप संपवून सकाळी उशिरा पुण्याला परत जायला निघालो. संकष्टी चतुर्थी होती म्हणून वाटेत वाईला महागणपतीच्या दर्शनाला थांबलो. १ वाजून गेला होता आणि एव्हाना पोटात कावळे चांगलेच कोकलत होते. चौकशी केल्यावर 'बंडू गोरे खानावळीत' घरगुती जेवण मिळतं असं समजलं. मंदिरापासून अगदी जवळ आहे म्हणून तिकडे मोर्चा वळवला. ‘खानावळ’ ह्या नावाला अजिबात न शोभणारी स्वछता आणि टापटीप दिसत होती.

पूर्णब्रह्माचा अपमान!!

बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे. त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं. मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो. हॉटेल ला जायचं ठरवलं, पण रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे गूगल मॅप वर सर्च केलं. आणि तिथूनच नाट लागायला सुरुवात झाली.

हिरव्या/ कच्च्या टोमॅटोची चटणी

साहित्य- 2 चमचे तेल 7-8 छोटे हिरवे टोमॅटो 4 चमचे तीळ भाजून 3 चमचे शेंगदाणे भाजून 2 लसूण पाकळ्या 1 चमचा मीठ 2 चमचे गुळ पावडर 2-3 तिखट हिरव्या मिरच्या फोडणीसाठी 2-3 चमचे तेल, मोहरी,जिरे,हिंग कृती- 2-3 चमचे तेलामध्ये हिरव्या मिरच्या व लसूण घाला. मग टोमॅटोच्या फोडी घालून एक वाफ आणा. तेलात टोमॅटो मिरची व लसूण घालणे आता त्यात गूळ व मीठ घालून मध्यम आचेवर शिजवत ठेवा. गूळ व मीठ घाला पाणी घालण्याची गरज नाही. टोमॅटोच्या पाण्यात टोमॅटो शिजतो.

मेथी पिठले

साहित्य - १वाटी बेसन २मीरची चीरून १०-१२ लसूण ठेचुन १०-१२ पाने कढीपत्ता २ चमचे कांदा लसूण मसाला मीठ , तेल व फोडणीसाठी साहित्य अंदाजे साहित्य बेसनमध्यये पाणी व मीठ घालून खूप पातळ करावें. २-३ चमचे तेलात मीरची, कांदा व निम्मा लसुण घालावा फोडणी आता त्यात मेथीची पाने घालावी मेथी घाला आता थोडी हळद घालून बेसनाचे पाणी घालावे व झाकण ठेऊन मंद आचेवर १०-१२ मी शिजत ठेवावे.
Subscribe to पारंपरिक पाककृती