णमस्कार्स लोक्स ,
असा एकपण माणुस नाही ज्याला एखादी का होईना "सवय" नाही. किंबहूणा ज्याला सवय नाही तो माणुसंच नाही . सवयी तर दारु पिण्याच्या असतात तर सिगारेट फुंकण्याच्या असतात. तंबाखु , दारु , सिगारेट किंवा तत्सम सवयी ह्या व्यसन ह्या प्रकारात मोडतात. काहींना खोटं बोलण्याची सवय असते. काहींना ऑफिसात येऊन शिला जाण्याची सवय असते ( आमच्या हापिसातली फ्रेशरुम सकाळच्या प्रहरी कधीही जा कायम एंगेज्डच असतात ) तर काहिंना उशीरा उठन्याची सवय असते. काही जणांना चार चौघात विना रुमाल तोंडाला लावता शिकायची सवय असते. काहिंना दुसर्याच्या प्लेट मधे हात घालायची सवय असते.