Skip to main content

नृत्य

कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं.

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 24/07/2009 10:29 या दिवशी प्रकाशित केले.

खूप वर्षांपूर्वी माझ्या बरोबर लॉस एंजेलिस येथे एक चिनी स्त्री सहकारी काम करीत होती. पेली ली नाव तिचं. तिच्या सुरूवातीच्या काळात तिच्याशी इंग्लिश मध्ये संवाद साधणं म्हणजे एक कसरतच होती (आजही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.) मला माझ्या वरिष्ठांनी सांगितलं की मला हवं असल्यास तिला कामावरून कमी करून व्यवस्थित इंग्लिश बोलणारा/री दुसरी कोणी व्यक्ती टेक्निशिअन म्हणून मला हवी असल्यास ते व्यवस्था करतील.

लय आणि ताल शरिरातून व्यक्त करणे

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 30/06/2009 11:06 या दिवशी प्रकाशित केले.

लय आणि ताल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्या शरिरात व्यक्त होताना त्यांचा घनिष्ठ संबंधही आहे.

तालाबद्दल तात्यांनी लेख लिहिला, त्यात त्यांनी आठवण करून दिली हृदयाच्या ठोक्यांमधला ताल हा आपल्या सर्वांमध्येच असतो. पुढे या ठिकाणीच मी वसंतराव देशपांड्यांची एक ध्वनिफीत ऐकली, त्यात त्यांनी सांगितले की हृदयाच्या ठोक्यातून येणारी अचल लय असते, तिच्यातून बदलती लयकारी येऊ शकत नाही - कारण हृदयाची लय अचानक बदलली तर जीव घाबरा होतो, सौंदर्यानुभव येत नाही.

"दिलाचा दिलवर भेटला..."

लेखक शरदिनी यांनी सोमवार, 01/06/2009 00:13 या दिवशी प्रकाशित केले.

वाटंला डोळे जीव थकला
धनी कधी हो येता घरला
साजण माझ्या स्वप्नीच आला
मला दिलाचा दिलवर भेटला

तगमग जिवाची होतेया भारी
रात सरली कधी येतेया स्वारी
वृंदगान : मर्दानी तोरा हसतोय छान
हिच्चा नवरा शारूख खान

माझा डोळाच पटकन लागला
मला दिलाचा दिलवर भेटला

नणदेचा दादला डोळा मारी
इष्टेटीवरती नज्जर सारी
वृंदगान : बटाटे डोळे टमाटे कान
नण्देचा नवरा इर्फ़ान खान

हा ठेवा मी जपून ठेवला
मला दिलाचा दिलवर भेटला

कवितांचे मंचीय (नृत्य - नाट्यात्मक) अविष्कार :

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 29/05/2009 18:07 या दिवशी प्रकाशित केले.

हे कवितांचे मंचीय अविष्कार करायची फ़ॆशन कधीपासून आलीय बुवा?
पावसाच्या कविता, निसर्गाच्या कविता, झाडांच्या कविता...

मिसळपाव प्रतिष्ठान..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 26/05/2009 14:18 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी,

संगीत, साहित्य, व कला आदींना वाहिलेली 'मिसळपाव प्रतिष्ठान' या विश्वस्त संस्थेची आम्ही नोंदणी केली आहे. आई अंबाबाई, पंढरीचा विठोबा आणि लालबागचा राजा यांच्या कृपाशीर्वादामुळे येत्या गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही 'मिसळपाव प्रतिष्ठान' या संस्थेचा शुभारंभ करत आहोत!

वरील देवतांच्या कृपेमुळे जगभरातून अनेकानेक दानशूर मराठमोळ्या मंडळींचे मदतीचे हात पुढे आले आहेत, येताहेत, त्यातूनच मिसळपाव प्रतिष्ठान ही संस्था उभी राहणार आहे!

मिसळपाव प्रतिष्ठानची ध्येयधोरणे व उद्दिष्टे -

जेष्ठ नृत्यांगना रोहिणी भाटे यांना भावपुर्ण श्रध्दांजली

लेखक मिंटी यांनी शुक्रवार, 10/10/2008 11:13 या दिवशी प्रकाशित केले.

जेष्ठ नृत्यांगना रोहिणी भाटे यांना श्रध्दांजली........

जगप्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे (वय ८३) यांचे आज (शुक्रवारी) पहाटे साडे तीन वाजता निधन झाले.

गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्या मागे मुलगा कॅप्टन सनत कुमार, सुन शमा असा परिवार आहे. दुपारी दीड वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. रोहिणीताईंनी नेत्रदान केले होते.

कलेचा बाजार....

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 21/09/2008 17:40 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी,

मी एकंदरीतच दूरदर्शन आणि त्यावरचे रिऍलिटी शोज फारच कमी पाहातो, किंबहुना पाहातच नाही. आज साला सन्डे होता. दुपारी जेवल्यावर सहज म्हणून दूरदर्शन संच सुरू केला. ष्टार प्लस वाहिनीवर कुठलीशी एक जोडी एका ध्वनिमुद्रणावर नाचत होती. प्रेक्षक मंडळी बसली होती. तीन परिक्षक तो नाच बघत होते. (नंतर मला कळले की त्या कार्यक्रमाचे नाव 'आजा माहिवे..' असे होते.)

"अच्छा! म्हणजे नृत्याच्या कुठल्याश्या स्पर्धा सुरू दिसताहेत. बघुया तरी..!"

(प्रवाह)

लेखक बिनडोक बनी यांनी गुरुवार, 11/09/2008 20:02 या दिवशी प्रकाशित केले.

आर्यचाणक्य यांच्या प्रवाहात मीही हात धुवून घेतले.. ;)

मिसळपाववर कोरडे बसण्यापेक्षा
मी जेव्हा मिसळीच्या डोहात बुडी मारली...
तेव्हा मलाच माहीत नव्हते मी काय करायचा प्रयत्न करतोय?

कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा वाचनावरती पहुडलो
तर कधी वाळके पान होऊन वाद्-प्रतिवादात गुरफटलो
कधी शब्द वेचले तर कधी काव्य शोधले
कधी निसटणारी प्रतिक्रिया हातात घेतली
तर कधी भांडणाने बोटे बरबटली
पण तरीही मला कळले नाही की मी काय करतोय?

मी .हरवते ........त्याची कथा

लेखक वैशाली हसमनीस यांनी शुक्रवार, 13/06/2008 13:14 या दिवशी प्रकाशित केले.

मी ,वैशाली हसमनीस,वय ५९,शिक्शक म्हणून सेवामुक्त,मुलगा व सून गेल्या महिन्यात नोकरीनिमित्त मलेशियात दाखल झाले.मीही उत्साहात त्याच्याबरोबरच मलेशियात आले.गुड्।घेदुखीने बेजार पण मन मात्र ताज ,सर्व काही बघण्यास उत्सुक,अश्या अवस्थेत कोलालंपूरला गेलो.जेंटीगला जाण्यासाटी पूदुराया बस स्थानकावर पोहोचलो.बसाआरक्श्णाकरिता मुलगा गेला,त्याच्या मागोमाग सूनही मला सांगून गेली.मी पायदुखीमुळे मागे मागे चालत राहिले.बसस्थानकावर खूप गर्दी होती.त्यामुळे मला मुलगा व सून कोटेही दिसेनात.त्यांनाही मी दिसेना.ते मला शोधू लागले व मीही त्या दोघाना.बराच वेळ गेला .माझ्याभोवती चार पाच माणसे जमली.ती काहीतरी विचारीत होती.पण ती