बॅलन्स - समतोल - संतुलन - ईक्विलिब्रियम हा सृष्टीचा नियम आहे. एकीकडे झीज झाली की दुसरीकडे भर पडतच असते, कुठे थंडी पडली तर अजून कुठे उष्णतेची लाट आलेली असते. इतकंच काय एखाद्या घरी आज जेवणात मीठ कमी पडलं तर कुणाकडे जेवण खारट झालेलंच असतं.
आज जरी कंटाळ्यातून असं गूढ गहन बोलत असलो तरी ह्या फिलोसॉफीचा शोध मला काही वर्षापूर्वीच लागला होता. "धूम ३" बघत होतो आणि एकदम न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडावं तसा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. "राम और श्याम"घ्या "सीता और गीता", "चालबाज", "अप्पू राजा", "कमीने", "किशन कन्हैय्या" अगदी "शर्मिली" सुद्धा.