अनुष्टुप/अनुष्टुभ सराव - हलकीफुलकी काव्यपूर्ती
गंमत म्हणून हा धागा. शाळेत गाळलेल्या जागा भरायचो तसंच. खाली अर्धवट लिहिलेली ओळ आहे - ती अनुष्टुप छंदामध्ये पूर्ण करता येते का बघा. दिलेल्या उदाहरणात माफक बदल केलात तरी चालेल. शब्द आकलनीय राहीपर्यंत लघु गुरु मध्ये स्वातंत्र्य आहे. बाष्कळपणाचे स्वागत.
.
आकृतिबंध पहिल्यांदा संदर्भासाठी देतोय. अधिक माहितीसाठी हा धागा पहा www.misalpav.com/node/47283
.
पुढची पातळी - काव्यशक्तीला ताण द्यायचा असेल तर एखाद्या गुरु अक्षराऐवजी दोन लघु अक्षरं वापरून बघा.
.
(आकृतिबंध - XXXX लगागागा XXXX लगालगा)
1) पावसाने _ _ _ _ _ _ _ _ _ साठले ('पाणचट' उदाहरण - पावसाने हद्द केली, तळे हे काय साठले!)
२) चहाच्या _ _ _ _ _ _ _ _ _ काय ही!
३) रस्त्यावरी _ _ _ _ _ _ _ _ _ _ नसे
४) महारोगांवरी _ _ _ _ _ _ _ _ कुठे?
५) घरी _ _ _ _ _ _ झालो मी _ _ _ _ _
६) जिथे जावे तिथे _ _ _ _ _ _ _ __ _
७) स्वतःची उदाहरणं तयार करा आणि इतरांना पूर्ण करण्यासाठी द्या!
.
लिहून झालं की भीमरूपीच्या चालीत गाता येतंय ना हे नक्की पडताळून बघा.
वाचने
9929
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
यातील फार काही कळत नाही. एक
In reply to यातील फार काही कळत नाही. एक by दुर्गविहारी
कलिंद नंदिनी
In reply to यातील फार काही कळत नाही. एक by दुर्गविहारी
कलिंद नंदिनी
फार पुर्वी
In reply to फार पुर्वी by निनाद
थोडा पेपर फोडतो
जमेना
हे पहा
थोडा पेपर फोडतो
छान.
बघा हे जमते आहे का?
प्रणील पर्जन्याचे प्रावरण
पावसाने पावसाला, पावसातच गाठले धगधगीत धरणीला, हायसे मग वाटले सरसरुनी सर आली, चिंब सारे भिजले झडझडून झड झाली, रान हे झिम्माडले चातकाने चोच भरुनी, जिवनामृत चाखिले कोवळासा कोंब करीतो, नयन अपूले किलकिले, भुमीवरती भुछत्राने, छत्र कैसे उघडीले प्रदोशकाली पश्चिमेला, इंद्रधनुकले प्रगटले टपटपीत टाकळा अन, अघाडा दुर्वा फुले पायवाटेच्या कडेने, पाय चूंबू लागले जिवतीचा जीव हरखे, पाहूनी हे सोहळे जीवनाने जीवनाला, शुभाशीष ऐसे दिले पैजारबुवा, प्रावरणIn reply to बघा हे जमते आहे का? by ज्ञानोबाचे पैजार
अय्यो!! माऊली साष्टांग दंडवत
In reply to बघा हे जमते आहे का? by ज्ञानोबाचे पैजार
@ ज्ञानोबाचे पैजार : सुरेखच !
In reply to बघा हे जमते आहे का? by ज्ञानोबाचे पैजार
एकच नंबर माऊली, धन्य आहात.
In reply to बघा हे जमते आहे का? by ज्ञानोबाचे पैजार
माऊली, रचिले कैसे।
In reply to माऊली, रचिले कैसे। by अनन्त्_यात्री
छोटीशी टिप्पणी तरीपण छंदबद्ध.
In reply to बघा हे जमते आहे का? by ज्ञानोबाचे पैजार
सुरेख
लोकशाही साठ वर्षे नांदली होती
In reply to लोकशाही साठ वर्षे नांदली होती by Gk
अनिष्ट अनुष्ट्भ
In reply to लोकशाही साठ वर्षे नांदली होती by Gk
एकदम बसलं आहे!