नुकत्याच भारतात झालेल्या आणि भारताने विजेतेपद राखलेल्या कब्बडी विश्वचषकानिमित्त मनात आलेले विचार खरडतोय. मिपा वर हा माझा लेखाचा पहिलाच पर्यटन.चू.भू. द्यावी घ्यावी :)
"जिता दिल इंडिया का , अब जीत गये दुनिया,
प्रेम के साथ देखो, जिती है इंडिया , जिती है इंडिया, जिती है इंडिया!!"
टीम इंडियाचा कबड्डी संघ विश्वचषक उंचावत असताना ह्या जिंगलचे पार्श्वसंगीत वाजत होते.त्या आधी अंतिम सामना जिंकल्यावर हिंदी समालोचक अपना खेल, अपना देश, अपना कप असे काहीसे उत्साहात ओरडत होता. मनात विचार आले की किती खऱ्या आहेत ह्या गोष्टी ..