Skip to main content

क्रीडा

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - फायनल - भारत विरुद्ध श्रीलंका

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 08/03/2017 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
२ एप्रिल २०११ वानखेडे, मुंबई भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडीयममध्ये वर्ल्डकपचे संयुक्त यजमान असलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यात वर्ल्डकपची फायनल रंगणार होती. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दोन आशियाई संघ समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ होती. सेमीफायनलमध्ये श्रीलंकेने कोलंबोला न्यूझीलंडचा पराभव केला होता तर भारताने मोहालीला पारंपारीक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमधलं आपलं रेकॉर्ड ५-० असं पुढे नेलं होतं.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - सेमीफायनल - भारत विरुद्ध पाकिस्तान

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 07/03/2017 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
३० मार्च २०११ पीसीए, मोहाली चंदीगडमधल्या मोहालीच्या मैदानात 'Mother of all contests' - भारत आणि पाकिस्तान या पारंपारीक कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधली दुसरी सेमीफायनल रंगणार होती. क्वार्टरफायनलला भारताने सलग ३ वेळा वर्ल्डकप जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाला बाहेरचा रस्ता दाखवला होता तर पाकिस्तानने वेस्ट इंडीजचा अक्षरशः खिमा केला होता. या सेमीफायनलमधील विजेत्या संघाची फायनलमध्ये मुंबईला वानखेडेवर श्रीलंकेशी गाठ पडणार होती. क्वार्टरफायनलमध्ये दक्षिण आफ्रीकेला धूळ चारणार्‍या न्यूझीलंडचा श्रीलंकेपुढे मात्रं निभाव लागला नव्हता.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - क्वार्टरफायनल - दक्षिण आफ्रीका विरुद्ध न्यूझीलंड

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 06/03/2017 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
२५ मार्च २०११ शेरे बांगला, मीरपूर बांग्लादेशची राजधानी असलेल्या ढाक्क्यातल्या मीरपूरच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडीयममध्ये दक्षिण आफ्रीका आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्डकपची तिसरी क्वार्टरफायनल रंगणार होती. आदल्या दिवशीच महेंद्रसिंग धोणीच्या भारतीय संघाने क्वार्टरफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपमधली सद्दी संपुष्टात आणल्यामुळे १९९९ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलिया सोडून दुसर्‍या संघाला वर्ल्ड चँपियन होण्याची संधी मिळणार होती. ऑस्ट्रेलियानंतर या वर्ल्डकपचा प्रमुख दावेदार म्हणून अर्थातच दक्षिण आफ्रीकेकडे पाहिलं जात होतं.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - इंग्लंड विरुद्ध आयर्लंड

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 05/03/2017 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
२ मार्च २०११ चिन्नास्वामी, बँगलोर बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये ग्रूप बी मधली इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातली मॅच रंगणार होती. अवघ्या ३ दिवसांपूर्वी याच स्टेडीयमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टाय झालेल्या मॅचची धुंदी अद्याप बँगलोरच्या प्रेक्षकांवरुन उतरलेली नव्हती. हॉलंडविरुद्धं पहिली मॅच कण्हतकुंथत जिंकल्यावर आणि भारताविरुद्धची मॅच टाय झाल्यामुळे इंग्लंडच्या दृष्टीने ही मॅच महत्वाची होती. २०१५ च्या पुढल्या वर्ल्डकपमध्ये टेस्ट स्टॅटस न मिळालेल्या संघांची संख्या मर्यादीत करण्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे आयर्लंडच काय पण इतर असोसिएट संघांमध्येही नाराजी पसरलेली होती.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - भारत विरुद्ध इंग्लंड

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 04/03/2017 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ चा वर्ल्डकप हा १९८७ आणि १९९६ च्या वर्ल्डकपनंतर भारतीय उपखंडात झालेल्या तिसरा वर्ल्डकप. या वर्ल्डकपचं यजमानपद भारत - पाकिस्तान - श्रीलंका आणि प्रथमच बांग्लादेशला बहाल करण्यात आलं होतं, पण २००९ मध्ये श्रीलंकन क्रिकेट संघावर लाहोरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे यजमान म्हणून पाकिस्तानची हकालपट्टी करण्यात आली आणि पाकिस्तानमध्ये होणार्‍या मॅचेस उरलेल्या ३ देशांत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. अपेक्षेप्रमाणेच पाकिस्तानने बराच थयथयाट करुन पाहिला, अगदी आयसीसीला कोर्टाची नोटीसही पाठवली, पण आयसीसीने त्याला अजिबात भीक घातली नाही.

वर्ल्डकप क्लासिक्स - २००७ - वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 03/03/2017 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
२१ एप्रिल २००७ केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन बार्बाडोसच्या ब्रिजटाऊनमधल्या केन्सिंग्टन ओव्हलच्या मैदानात सुपर एटमधली वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातली मॅच खेळली जाणार होती. वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दोन्ही संघांचं आव्हान संपुष्टात आलं असल्याने सेमीफायनलच्या मुकाबल्यावर या मॅचच्या निकालाचा काहीही परिणाम होणार नव्हता. पण वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दोघांच्या दृष्टीने मात्रं ही मॅच महत्वाची होती.

वर्ल्डकप कासिक्स - २००७ - इंग्लंड विरुद्ध श्रीलंका

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 02/03/2017 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
४ एप्रिल २००७ सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडीयम, नॉर्थ साऊंड अँटीगाच्या नॉर्थ साऊंडमधल्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडीयममध्ये सुपर एटमधली इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातली मॅच रंगणार होती. हे स्टेडीयम २००७ च्या वर्ल्डकपसाठी मुद्दाम बांधण्यात आलेलं होतं आणि त्याला व्हिव्हियन रिचर्ड्सचं नाव देण्यात आलं होतं. सुपर एटमधल्या ६ मॅचेस या मैदानात खेळवण्यात येणार होत्या. श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातली मॅच ही या मैदानात खेळवण्यात येत असलेली पाचवी मॅच होती.

वर्ल्डकप क्लासिक्स - २००७ - आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 01/03/2017 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
२००७ चा वर्ल्डकप हा वेस्ट इंडीजमध्ये झालेला पहिला वर्ल्डकप. वेस्ट इंडीजमधल्या बार्बाडोस, जमेका, गयाना, त्रिनिदाद - टोबॅगो, अँटीगा - बर्बुडा, ग्रेनेडा, सेंट कीट्स - नेव्हीस आणि सेंट लुशिया या आठ देशांत वर्ल्डकपच्या मॅचेस खेळवण्यात आल्या होत्या. वर्ल्डकपच्या मॅचेससाठीच्या सुरक्षा नियमांमुळे आणि वेस्ट इंडीयन प्रेक्षकांच्या रसिकतेचं अविभाज्यं अंग असलेल्या ड्रम्स आणि इतर वाद्यांवर बंदी घालण्यात आल्याने वेस्ट इंडीजच्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच नाराजी होती. त्याचबरोबर मॅचच्या तिकीटांच्या किमतीही सामान्यांच्या आवाक्याबाहेर होत्या.

वर्ल्डकप क्लासिक्स - २००३ - दक्षिण आफ्रीका विरुद्ध श्रीलंका

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 28/02/2017 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
३ मार्च २००३ किंग्जमीड, दर्बन क्वा झुलू नाताल प्रांतातल्या दर्बानच्या किंग्जमीड मैदानावर यजमान दक्षिण आफ्रीका आणि श्रीलंका यांच्या पूल बी मधली मॅच होणार होती. दक्षिण आफ्रीकेच्या दृष्टीने ही मॅच अत्यंत महत्वाची होती. ग्रूपमधल्या पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडीजकडून पराभव पत्करावा लागलेल्या दक्षिण आफ्रीकेला नंतर न्यूझीलंडने पावसाने व्यत्यय आलेल्या मॅचमध्ये डकवर्थ - लुईस नियमाच्या आधारे हरवलं होतं.

वर्ल्डकप क्लासिक्स - २००3 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 27/02/2017 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
२ मार्च २००३ सेंट जॉर्जेस पार्क, पोर्ट एलिझाबेथ ईस्टर्न केप प्रांतातल्या पोर्ट एलिझाबेथच्या सेंट जॉर्जेस पार्कच्या मैदानावर पारंपारिक अ‍ॅशेस प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पूल ए मधली मॅच खेळली जाणार होती. ग्रूपमधल्या पहिल्या पाचही मॅचेस जिंकून ऑस्ट्रेलिया आधीच सुपर सिक्समध्ये धडकली होती त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने या मॅचला फारसं महत्वं नव्हतं, पण We want to win everything या वृत्तीने वर्ल्डकपमध्ये उतरलेल्या स्टीव्ह वॉला एकही मॅच गमावणं आणि ते देखिल इंग्लंडसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध हे कधीही मंजूर होणं शक्यं नव्हतं.