काही युद्धे शस्त्र न वापरता शब्दाने जिंकता येतात.
" मामाजी, या ऑफिसवर. 'माणसे' येउन पोचलीत. शेठ नंबर १ चा फोन आला.
शेठ नंबर दोन ना फोन द्या.
काही सुचना देउन मी शेठ्च्या ऑफिसवर पोचलो. अंगावर खास झब्बा आणि लेंगा घालुन मी ऑफिसवर पोचलो. मला बघताच दोन्ही शेठ उठुन उभे राहीले आणि मुख्य खुर्ची माझ्या साठी रिकामी केली.
"आवो, प्रभुभाई", शेठ नंबर म्हणाले.(सुचने प्रमाणे)
पोल्ट्री इंडस्ट्री मधे सर्वे सर्वा असलेल्या शेठ ना ही कृती करताना मरणोपरान्त वेदना झाल्या असतील ह्याची मला कल्पना होती. पण काय करणार प्रसंगच तसा होता.
टेबलवर पुढे ३ माणसे होती. एक पांढरी पँट, पांढरा शर्ट, पांढरे बुट.