मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

परबुभाई

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
काही युद्धे शस्त्र न वापरता शब्दाने जिंकता येतात. " मामाजी, या ऑफिसवर. 'माणसे' येउन पोचलीत. शेठ नंबर १ चा फोन आला. शेठ नंबर दोन ना फोन द्या. काही सुचना देउन मी शेठ्च्या ऑफिसवर पोचलो. अंगावर खास झब्बा आणि लेंगा घालुन मी ऑफिसवर पोचलो. मला बघताच दोन्ही शेठ उठुन उभे राहीले आणि मुख्य खुर्ची माझ्या साठी रिकामी केली. "आवो, प्रभुभाई", शेठ नंबर म्हणाले.(सुचने प्रमाणे) पोल्ट्री इंडस्ट्री मधे सर्वे सर्वा असलेल्या शेठ ना ही कृती करताना मरणोपरान्त वेदना झाल्या असतील ह्याची मला कल्पना होती. पण काय करणार प्रसंगच तसा होता. टेबलवर पुढे ३ माणसे होती. एक पांढरी पँट, पांढरा शर्ट, पांढरे बुट. बरोबर 'अजीत 'बरोबर असतात तशी गुंड सदृश दोघेजण. त्यातल्या एकाने जा़किट घातलेले. आणि ते फुगीर दिसत होते. ____________________________ भुमिकेत कसे शिरायचे ह्याचे शिक्षण मला भक्ती ताई, सतिश दुभाषी , रोहीणी ताई हत्तंगडी कडुन मिळाले. आमच्या हॉस्पिटल च्या खाली स्टील्ट पार्कींग मधे नाटकाच्या तालमी होत. रात्री ८ नंतर हा विरंगुळा असायचा. विजया ताई, सई परांजपे ह्याच्या दिग्दर्शनाचे कसब जवळुन बघायला मिळाले. ' ती फुलराणी' च्या तालमीत सतिश दोस्तच झाला. दादर ला ग्रेट पंजाब मधे बसुन पिटर स्कॉट रिचवताना सतिश ने एकदा भुमिकेची पण ऑफर दिली होती . तालमीला भाई काका यायचे. त्यांच्या कडे ४ वेळ सुमारे अर्ध्या तासाच्या गप्पा झाल्या होत्या. भाई काका आमच्या साहेबांना फार मानत होते. "मिनिमम वर्ड्स अँड मॅक्सिमम इफ्फेक्ट " चे काही धडे भाईकाकांनी शिकवले. ____________________________ पोल्ट्रीमधे काही राडा झाला, की मला मांडवली ला बोलवत. त्यामुळे माझे टोपण नाव "मामाजी "असे पडले होते. असाच एकदा शेठच्या फार्मवर गेलो असताना तिथे मक्याच्या गाड्या लागल्या होत्या. फार्म फार मोठा होता. सुमारे आठ ट्रक लाईनीने मका उतरवुन देत होते. मी खाली उतरलेल्या एका पोत्यात हात घातला. मला जोरदार चटका बसला. मी लगेच शेठला हाक मारली. त्यांना परिस्थिती समजावली. व्यापार्‍याने सुक्या मक्याबरोबर ओला मका घुसडला होता. आणि ३ दिवसाच्या प्रवासात पोत्यात फंगस निर्माण झाला होता. ३० दिवसाच्या वाढलेल्या कोंबड्यामधे मरतुक वाढली असती. आता सर्व ८०० पोती तपासणे किंवा गाड्या परत पाठवणे हाच एक पर्याय होता. नविन गाड्या येइपर्यंत एवढ्या खाद्याचा साठा फार्मवर नव्हता. मी सर्व पोती तपासुन सुमारे ३०० पोती रिजेक्ट केली. ट्रक वाले मका परत घ्यायला तयार नव्हते. त्यांना दुसरे भाडे घ्यायचे होते. मी ड्रायवर समोर झालेल्या गोष्टीचा पंचनामा करुन लेखी कागद्पत्राची नोंद केली. त्याच व्यापार्‍याकडुन आधी अशाच ८ गाड्या आल्या होत्या. ज्या शेड्मधे ह्या गाड्यांचे फिड गेले त्यात सुमारे एक किलोच्या २००० कोंबड्या एका आठवड्यानंतर दगावल्या. पोस्ट मॉर्टेम मधे खाद्यातल्या फंगस मुळे मृत्यु असा रिपोर्ट आला. आता प्रश्न आला होता तो मक्याच्या १६ गाड्यांच्या पेमेंट चा. साधारण ८ महीने प्रकरण रंगल्यावर व्यापार्‍याने एका भाईला वसुलीची सुपारी दिली. ____________________________ मी खुर्ची वर स्थानापन्न झालो. मला ऑफिसमधल्या माणसाने चहा आणला. ज्याने चहा दिला तो बाहेर जाताना पायाला हात लाउन गेला.( सुचने प्रमाने इमेज बिल्डींग) सुमारे अर्धा तास बोलणी होउन सुद्धा प्रकरण सुटेना. मी गप्प होतो. "आप फैसला करो प्रभुभाइ आप ने कहा वो फायनल हमारे लिये" शेठ नंबर दोन म्हणाले. " इनके फैसले से क्या होता है. हमे पैसा नही मिला तो घोडा दबायेंगे, निकल जायेंगे. हमको फरक नही पडता" पांढरा शर्ट आता मला माझी भुमिका निभावायची होती. "घोडा दबानेवाले बात नही करते, दबा देते है. अल्ला ताला की मेहेरबानी से हमे इतनी अकल है. ये पैसा नही देनकी बात नही है. कितना देने की बात है. और सबसे पहिले आप जिस के लिये ये वसुली आये हो उसे तो बुलावो." मी "वो तो नगर मे है' पांढरा शर्ट मी जरा मोठ्याने हसलो. "क्या बात कर रहे हो, थाना के किसी होटलमे पडा रहेगा. आज वसुली होने का बाद आपका कमिशन लेनेके लिये क्या नगर जाओगे"? मै ने इस लाइन मे २० साल निकाले है. येडा समझ रहे हो क्या? इथे मी अर्धी बाजी मारली होती. व्यापारी १५ मिनिटात येउन पोचला. सर्व तांत्रीक बाजु समजवल्यावर त्याने ३ लाख सोडायचे कबुल केले. आणखी एक यशस्वी मांडवली पुर्ण झाली. आधी ठरल्या प्रमाणे दोन्ही पार्टीनी आनंदवनासाठी दहा हजार रुपये काढले. जाताजाता: " कभी आपका नाम सुना नही. आप किसके साथ जुडे हो. अभ्भी मै ने आर्थर रोड मे हमारे भाई से बात की, वो भी बोल रहे है की परबु भाई का नाम सुना नही.

वाचने 5051 वाचनखूण प्रतिक्रिया 24

सहज 16/07/2009 - 11:53
परबु भाई जिंदाबाद! मास्तर तुमचं व्यक्तीचित्र लिहायचे म्हणजे क्रमशः मालीकाच लिहायला लागणार की वो.

In reply to by सहज

महेश हतोळकर 16/07/2009 - 12:18
गुरुजी! १. कुटुंब नियोजन २. कौटुंबीक आणि व्यक्तीगत समस्यांवर समुपदेशन आणि मार्गदर्शन ३. शालेय गुणवर्धनपर समुपदेशन ४. व्यवसाय मार्गदर्शनपर समुपदेशन ५. कुक्कुट पालन मार्गदर्शन ६. व्यवसायिक समस्यांवर मांडवली. ७. ८. ९. आहे का च्यालेंज घेणारं कोणी. ----------------------------------------------------------------- तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे. -----------------------------------------------------------------

In reply to by महेश हतोळकर

टारझन 16/07/2009 - 14:05
"आवो, प्रभुभाई", शेठ नंबर म्हणाले.
ह्या वाक्यावरून "आवो तात्यासाब" ह्या रोशणी ताईंच्या वाक्याची आठवण झाली, सबब वाक्य हृदयाला भिडले !! मास्तर बाकी चालू द्या .. लेखणाला क्व्लालिटी राहू द्या !!

In reply to by बेसनलाडू

Nile 16/07/2009 - 12:41
आयला लईच भारी की वो! आता गुर्जींची टवाळी करायची म्हणजे आली का पंचाईत? डायरेक्ट सुपारीच की वो! -अडकीत्ता.

मदनबाण 16/07/2009 - 12:06
एकदम वंट्टास...बोले तो एकदम बोल्तीच बंद :D भाय आपके ये बंदे पर अपनी हमेशा क्रीपा बनाये रखना !!! (मदन चिकना)..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

अवलिया 16/07/2009 - 12:15
साला ये आजकल मिपापे भोत नये नये लोक आके लिखके जाते है कुच्च समजता नही. ये विनायक प्रभु नाम तो पैले कब्बी देखा नही था बोर्ड पे... चलो ठिक है.. भोत आते जाते है... ये भी आया होगा कहीसे... लिख रहा है लिखने दो.. अच्छा लिखता है तबतक ठिक है ... जादा चपर चपर करेगा तो गेम बजायेंगे साले का! अवांतर - मास्तर, जय हो ! --अवलिया ============================= रामायण महाभारत घडायला स्त्रीची गरज आहे असे नाही, आजकाल सही ते काम करते. ;)

मांडवली बादशाह __/\__ जाताजाता: " कभी आपका नाम सुना नही. आप किस संस्थळ के साथ जुडे हो. अभ्भी मै ने शेअर मार्केट रोड मे हमारे अवलिया भाई से बात की, वो भी बोल रहे है की परबु भाई का नाम सुना नही. ©º°¨¨°º© पराभाई ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

ज्ञानेश... 16/07/2009 - 12:33
लई भारी अनुभव. कभी आपका नाम सुना नही. आप किसके साथ जुडे हो. =)) (अवांतर- तुम्हाला कसे कळले, तो व्यापारी जवळपास आहे, नगरला नाही म्हणून?) "Great Power Comes With Great Responssibilities"

मांडवली बादशाह __/\__ गुरुजी धन्य आहात मास्तर आता हे मांडवलीचे धंदे पण केलेत? ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

लै भारी , बाप्पा लै भारी ! अवांतर : अपुनका भोत पैसा फसेला है इधर उधर, मांडवली बाश्शा कुछ मदद करिंगा क्या? बोलेतो अपुनभी फाडेगा ना चेक आनंदवनके वास्ते ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

वाटाड्या... 16/07/2009 - 19:04
हा आणि असले धंदे बंद केलेत तेच बरं आहे. घाणीत पाय घातला की आपल्याच पायाला घाण लागते, घाणीला काही फरक पडत नाही. बाय द वे, आनंदवनाला म्हणजे आपल्या आमट्यांच्या आनंदवनासाठी मदत केली की काय? तस असेल तर मात्र चांगलं काम केलंत... - वाभाई..(आमची कुठंच भाईगिरी णाही)...:)

चतुरंग 16/07/2009 - 19:16
जय हो परबूभाई! ०-०== (साष्टांग नमस्कार) (नाटकाच्या तालमी बघून झालेलं शिक्षण कुठं उपयोगी पडलं ते बघून चाट पडलो!) (नाटकी)चतुरंग

In reply to by चतुरंग

टारझन 16/07/2009 - 20:15
०-०==
अरे बापरे ,,, कमरेचा भरपूर याम केला काय हो काका ? एवढी पातळ ? ०=:== (माझा ही दंडवत)