जडणघडण

नमस्कार,

मिसळपाव वर अधिकाधिक सोयी उपलब्ध करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अनेकांच्या ते लक्षात आले असेलही. तरीही येथे नव्या सोयी बद्दल माहिती दिली जाईल. तसेच काही अडचणी असल्यास त्या सुद्धा येथे मांडल्यास हरकत नाही.

नव्या सोयींमध्ये:

वाचनखुणा - याच्या मदतीने मिसळपाव वरचे तुमच्या आवडीचे लेख एका स्वतंत्र पानावर यादी करून ठेवू शकाल. हे पान फक्त तुम्हालाच दिसेल.

माझे लेखन - तुम्ही स्वतः केलेले लेखन या पानावर दिसेल.

संपादक - या आधी संपादक प्रतिक्रिया देताना दिसत नव्हता. आता तो दिसेल आणि त्यात नवीन सोयी दिल्या आहेत. अक्षररंगाची सोय अद्याप बाकी आहे.

आणि काही सोयी लवकरच....

जड्णघडण

नविन सोयींबद्दल धन्यवाद.

आणी एक सुचना: कृपया, एखादा लेख किंवा, पूर्ण चर्चा उडवल्यास त्या बद्दल सुचना प्रसारित करावी.
ही सुचना धोरण, अथवा, सुचना या सदरा खाली असावी.
जेणेकरुन, दुसर्‍या दिवशी, लेख अथवा चर्चा न दिसल्यास गोंधळ उडणार नाही.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

अल्पकाळ विश्रांती...

नमस्कार,
संकेतस्थळाच्या कामाकरीता बुधवार दिनांक २०-०२-०८ ला भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ०९ ते १२ या वेळे दरम्यान संकेतस्थळ अल्पकाळासाठी विश्रांती घेईल.

संकेतस्थळाला सलग दिवसभर विश्रांती देण्याऐवजी काही तासांचा टप्पा घेऊन पुन्हा तसेच पुर्ववत करावे अशी योजना आहे. म्हणजे संकेतस्थळ उपलब्ध नसल्याने सदस्यांची अडचण होणार नाही.

जरूरी भासल्यास हाच कार्यक्रम गुरूवार ला सुध्दा याच वेळी याच प्रकारे होईल. संकेतस्थळाचे आरोग्य उत्तम रहावे म्हणून हा सारा खटाटोप. भारतात ही वेळ सोईची असली तरी भारताबाहेर मात्र भर दिवसा ही वेळ आहे याचे भान आहे. या गैरसोई बद्दल दिलगीर आहोत.

सहकार्य अपेक्षीत आहे. सूचनांचे नेहमी प्रमाणे स्वागतच आहे.

चित्र

मिपावर चित्र टाकायचे म्हणजे ते कुठेतरी अधोरभारित (upload) करा आणि तिथून त्याचा दुवा इथे द्या असा द्रविडीप्राणायाम करावा लागतो. त्याऐवजी मिपावर ब्राऊझची सोय असती तर बरे झाले असते.

"ल "या अक्षराचे वळण असे करता येईल ?

"ल "या अक्षराचे वळण असे करता येईल ?

lalaa
शक्य असेल तर जरुर करा.

अर्धच॑द्र

'acting' or 'action' ह्यातील पहिले अक्षर मराठीतून लिहिताना 'अ' वर अर्धच॑द्राकृती मात्रा देता येत नाही..तरी योग्य ती सुधारणा करावी..

दाढेसाहेब,

दाढेसाहेब,

E = ऍ

Ekshan = ऍक्शन

EkTiMg = ऍक्टिंग

अप्रकाशित ठेवा.

एखाद्या विषयावर लेखन करायचे असेल आणि वेळे अभावी लेख अर्धवट राहत असेल तर नवीन सोय आहे.
लेखन चौकटीच्या खाली अप्रकाशित ठेवा नावाची चौकट आहेत. त्यावर टिचकी मारून तो पर्याय निवडा व लेख पुर्वपरिक्षण झाल्यावर प्रकाशित करा.

त्यानंतर त्या पानावर एक पिवळ्या चावीचं चित्र येईल. तुम्हाला हा लेख प्रकाशित झालेला दिसेलही पण काळजी नको हा लेख फक्त तुम्हालाच दिसतोय , इतर सदस्यांना नाही. ह्याची खात्री तुम्ही गमन करून अतिथी म्हणून वाचून करू शकता.

नेहमी प्रमाणे काही त्रुटी असतील किंवा अडचणी , सुचना आदींचे स्वागत आहे.

वा वा सरपंच!

अहो ह्या सोयीची मी किती दिवस वाट पहात होतो म्हणून सांगू?
सध्या मला जीमेल वर लेखन साठवून ठेवावे लागत होते तो प्रश्न मिटला.
छान आता ही सोय वापरुन बघतो लगेचच!

चतुरंग

अरे पण रंगा,

अजून चाचणी स्वरुपात आहे रे, त्यामुळे सेफ्टी म्हणून अजून जीमेलवरही साठवत जा रे.

मी थोडं थोडं लिहून झालं की वर्डवर कॉपी पेस्ट करून सेव्ह करून ठेवतो.

असो,

नीलकांतचं कौतुक आहे, तो त्याचे कामधंदे सांभाळून मिपाकरता खूप काही करतो आहे! मुख्य म्हणजे मराठी संस्थळांची मक्तेदारी ॐकारच्या गमभनने आणि नीलकांत, चित्तर, शशांक सारख्या लोकांनी संपुष्टात आणली याचा आनंद खूप मोठा आहे!

तात्या.

निलंबन, सदस्यत्त्व रद्द करणे

सदस्यांनी स्वतःचे सदस्यत्त्व काही काळापुरते निलंबित किंवा केवळ वाचनमात्र ठेवणे, रद्द करणे यासंबंधी प्रणालीत सोई उपलब्ध आहेत का?
(जिज्ञासू)बेसनलाडू

सभसदत्वाबद्दल..

किंवा केवळ वाचनमात्र ठेवणे,

लॉगईन करूनदेखील फक्त 'वाचनमात्र राहणे' हे सभासदांच्याच हातात आहे. दरम्यानच्या काळात पोष्टहापिस आणि खरडीचा लाभही त्याला मिळतच राहील. त्याबाबतही कुणशी काही संपर्क न ठेवता केवळ अन् केवळ वाचनमात्र रहायचं असेल तर लॉगईन करायचीदेखील गरज नाही. पाहुणे स्वरुपात इथे येऊनदेखील वाचनमात्र राहता येईल!

रद्द करणे यासंबंधी प्रणालीत सोई उपलब्ध आहेत का?

सभासदत्व रद्द करयच्या बाबतीत दोन गोष्टी करता येतील,

१) सभासदत्व तात्पुरते रद्द करावयाचे असल्यास,

सरपंचाना, विसोबा खेचरांना किंवा जनरल डायर यांना व्य नि पाठवून किंवा खरड पाठवून तसे कळवावे म्हणजे संबंधित खाते 'ब्लॉक' होईल!

२) सभासदत्व कायमचे रद्द करावयाचे असल्यास,

सरपंचाना, विसोबा खेचरांना किंवा जनरल डायर यांना व्य नि पाठवून किंवा खरड पाठवून तसे कळवावे म्हणजे संबंधित खाते डिलीट होईल!

मिपावर लिहिण्यार्‍यांचे, प्रतिसाद देऊन सक्रीय सहभागी होणार्‍यांचे, फक्त वाचनमात्र राहू इच्छिणार्‍यांचे, लॉगईन न करता पाहुणे म्हणून येऊ इच्छिणार्‍यांचे, सभासदत्व तात्पुरते रद्द करू इच्छिणार्‍यांचे, सभासदत्व कायमस्वरुपी बंद करू इच्छिणार्‍यांचे, थोडक्यात सर्वांचेच सहर्ष आणि मनापासून स्वागत आहे!

तात्या.

तात्पुरते रद्द करणे

यात तात्पुरते 'ब्लॉक' केलेले खाते त्याच सदस्याच्या विनंतीवरून पुन्हा चालू करणे अंतर्भूत आहे, असे गृहीत धरतो.
माहितीबद्दल अनेक आभार.
(आभारी)बेसनलाडू

अप्रकाशित साहित्याबद्दल...

अप्रकाशित करून साठवलेलं साहित्य, सरपंच आणि अधिकार दिल्यास संपादकांना पाहता येतं.

हे मुद्दमहून सांगण्याचं कारण असं की ज्यांना ते साहित्य प्रकाशित व्हायच्या आधी सरपंचाने सुध्दा पाहू नये असं वाटतं त्यांनी ही सोय वापरू नये.

तसेच आपला महत्वाची व्यक्तीगत माहिती सुध्दा येथे अप्रकाशित आहे म्हणून ठेऊ नये. ही सुचना.

त्या लेखकाव्यतिरिक्त कोणालाच ते दिसणार नाही अशी सोय

अप्रकाशित साहित्याबाबत नाही का करता येणार?
नाहीतर ही सोय वापरली जाणे अवघड आहे.
कोणालातरी आपले अप्रकाशित साहित्य दिसते आहे हे, कोणीतरी आपली दैनंदिनी परवानगीविना वाचते आहे, हे समजण्यासारखे अस्वस्थ करणारे आहे.

चतुरंग

कौल सुविधा.

नमस्कार,
आज मिसळपाव वर नव्याने कौल सुविधा देण्यात येत आहे. याचा फायदा घेऊन तुम्ही इतर लोकांचं एखाद्या विषयावर मत घेऊ शकता.

कौल बनवतांना तुम्हाला एक प्रश्न देणे आवश्यक आहे सोबतच काही संभाव्य उत्तर पर्याय द्यावे लागतील.
काही अडचण असल्यास येथे विचारावे.

ही कौल सुविधा रंगलेल्या विषयांसाठी वापरल्यास उत्तम मात्र कुठलाही कौल संपादनाचे हक्क व्यवस्थापनाला आहेत हे ध्यानी असावे.

खरडवही.

आता मिसळपाव वर खरडवही मधून आपल्याला खरड लिहीणार्‍या सदस्याच्या खरडवही पर्यंत सहज जाता येईल व प्रतिसाद देता येईल.

यासाठी खरडीखाली प्रतिसाद द्या वर टिचकी मारा.

शशांकने स्वतः ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मिसळपाव परिवारा तर्फे त्याला धन्यवाद.

हेच,

शशांकने स्वतः ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मिसळपाव परिवारा तर्फे त्याला धन्यवाद.

नीलकांत व शशांक, या दोघांचेही मनापासून आभार...

नीलकांता, तेवढं रंगांचं काम देखील पूर्ण कर व बरीच मंडळी म्हणताहेत त्याप्रमाणे जनातलं-मनातलं, जे न देखे रवी, प्रमाणेच पाकृकरताही स्वतंत्र विभाग तू डिझाईन कर व मिपावर लॉन्च कर..

प्लीज एवढं कर...

तात्या.

खरडवही सुधारणा

आता खरड लिहिणार्‍या सदस्याचे नाव दूव्यात बदललेले आहे.

'येथेच उत्तर द्या' चा पर्याय सुध्दा काढून टाकला आहे.

धन्यवाद !

>आता खरड लिहिणार्‍या सदस्याचे नाव दूव्यात बदललेले आहे.

यामुळे अत्यंत सोय झाली आहे. धन्यवाद, सरपंच !

जाहीर अभिनंदन आणि धन्यवाद!

नीलकांत आणि शशांक, तुम्हा दोघांचेही जाहीर अभिनंदन आणि खूप खूप आभार!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

हेच म्हणते.

अभिनंदन, आभार आणि पुढील सुविधांसाठी शुभेच्छा.

अक्षररंग

मिसळपाव वर आता अक्षररंगपार्श्वरंग देण्याची सोय करण्यात आलेली आहे.

ज्या अक्षराला रंग द्यायचा असेल त्याला निवडून मग बटनावर टिचकी द्या , हवा तो रंग निवडा म्हणजे अक्षरे रंगीत होतील.

काही अडचणी असतील तर नक्की लिहा.

अक्षररंग व

क्षरंपार्श्वरं
सुविधा अतिशय आवडली. मिपा आणखी रंगतदार होणार.
सरपंच आणि सर्व पंचायतीचे अभिनंदन धन्यवाद आणि शुभेच्छा.

सर्वांची नावे

सरपंच
हजर असणार्‍या सर्वांची नावे सरकत्या खिडकीत (scrollable) मध्ये दिसण्याची सोय करता येईल का?

अनेक दिवस

वाट बघत असलेली सुविधा मिळाली.
नीलकांत आणि सरपंच धन्यवाद!Wink)

चतुरंग

"नवीन" संकेताक्षर

सरपंच,
जर कोणत्या लेखाला नवीन प्रतिसाद आले, आणि त्या लेखावर टिचकी मारून आत शिरले,
आणि जर त्याची एकापेक्षा जास्त पाने असतील, तर..
१च्या पुढील पानांवरील नवीन प्रतिसादांच्या उजव्या-वरच्या कोपर्‍यात "नवीन" असे संकेताक्षर दिसत नाही.

डेटाबेस.

एखाद्या लेखाला आलेल्या किती प्रतिक्रिया एका पानावर दाखवायच्या ते आपण ठरवत असतो. एखाद्या लेखाला आपण भेट दिल्यानंतर पुन्हा गेल्यावर त्या भेटीनंतरचे प्रतिसाद नवीन असे दिसतात.

मात्र पान ताजेतवाने केल्यावर ही नवीन ची नोंद जाते. आपण आपल्या सोईसाठी ह्या प्रतिक्रिया दोन पानावर दिलेल्या आहेत. मात्र डेटाबेस मधे तुम्ही जेव्हा पहिल्या पानाला भेट देता तेव्हा सगळाच डेटा तुम्हाला दाखविल्याची नोंद होते. आपण जेव्हा पान क्रं २ वर टिचकी देतो तेव्हा पान ताजेतवाने होते व ही नवीन ची नोंद जाते.

धन्यवाद

प्रतिसादाबद्दल धन्यवाद सरपंच,
या नवीन बाबतीत काही करता येणार नाही का..

आणि एक..
जर २र्‍या पानावरील एखाद्या प्रतिसादाची लिंक खरडीत दिली किंवा ऍड्रेस बार मध्ये टाकली तर..
त्या प्रतिसादावर न जाता लेखचे पहिले पानच दाखविले जाते.

स्माईलीज

मिसळपाव वर आता स्माईलीज चा वापर करता येईल.
यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाहीये. फक्त लेखात आधी जसे स्माईलीज टाकायचे तसे टाकले की त्याचे जागी चित्र दिसेल.

Wink Smile Sad

कष्ट..

नीलकांता,

खूप मेहनत घेतो आहेस रे. 'धन्यवाद' म्हणून परकं करत नाही...

तात्या.

स्माईलीज बद्दल

मिसळपाव वर उपलब्ध असलेल्या सगळ्या स्माईलीज आता ड्रॉपडाऊन बॉक्स च्या रूपात उपलब्ध आहेत.
त्यामुळे कुठला कोड माहिती नाही ची कटकट नाही.
जेव्हा लेख लिहीतो किंवा प्रतिक्रिया देतो तेव्हा
प्रतिक्रिया द्या
च्या खाली लाल रंगांत
Smileys आहे त्यावर टिचकी दिल्यावर खाली एक चौकोन उघडेल, ज्यात सर्व हसमुखं आहेत. हवं त्यावर टिचकी द्या व वापरा.

खरडवही व व्यक्तीगत निरोपात ही ड्रॉपडाऊन सोय नाहिये. तेथे मात्र कोड लिहावा लागेल. हा कोड शोधण्यासाठी टेक्स्ट बॉक्सच्या खाली Input format लिहीलेलं आहे त्यावर टिचकी द्या. तेथे
Full HTML

* Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
* Lines and paragraphs break automatically.
* Textual smileys will be replaced with graphical ones.

या लाल रंगाच्या दूव्यावर टिचकी दिल्यास सगळ्या स्माईलीज चे कोड मिळतील.

विश्वकर्म

विश्वकर्मा निलकांता,
भो मित्र, अरे किती करतोस रे आमच्या आनंदासाठी?
आम्ही म्हणालो अक्षररंग दे..दिलेस!
म्हणालो खरडवह्या सोप्या करुन दे...दिल्यास!
म्हणालो स्मायलीज हव्या...दिल्यास!

कसे आभार मानायचे रे तुझे?
Smile Big Grin Wink

-(हस्सरा नाच्चरा) ध मा ल.

एवढ्या कमी

एवढ्या कमी वेळात एवढ्या सोयी दिल्याबद्दल धन्यवाद.
आणि पुढील वाटचालींकरीता शुभेच्छा Smile

मिपा...

मिपा दिवसेंदिवस बाळसे धरीत आहे हे पाहून खूप आनंद होतो आहे. हार्दीक शुभेच्छा....!

(विषय दिलेला नाही)

<Tongue धन्यवाद मित्रा !

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

सर्व सभासदा॑ची नावे

सर्व सभासदा॑ची नावे उपलब्ध होतील का, म्हणजे कुणालाही व्यं. नि वगैरे पाठविणे सोपे जाईल

पाककृती

मिसळपाव वर नवीन पाककृती नावाचा साहित्य प्रकार तयार करण्यात आलेला आहे. आता आपल्या पाककृती प्रकाशित करण्यासाठी त्याचा वापर करावा.

धन्यवाद...

धन्यवाद.. एक शंका- मुखपृष्ठाच्या उजव्या कोपर्‍यात (अगदी वर)जिथे चर्चा,काव्य,साहित्य इ. लिहिले आहे तेथे पाकृ विभाग येईल का?

हो येईल.

तेथे येईल. पण त्यासाठी काही पाककृती तर त्या प्रकारात येऊ द्यात.

:)

लवकरच नवी पाकृ देऊन उद्घाटन करते,Smile आणि अजून एक शंका- जुन्या पाकृ त्या विभागात ओढून घेता येतील का?

धन्यवाद.

मनःपुर्वक धन्यवाद.....

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)