सर्जरी १
लेखनप्रकार
'अवलिया गेला "ह्या लेखावर सर्जरी झाली. १२ तासानंतर ५१ प्रतिसादानंतर. तो लवकर उडाला नाही ह्याचे मला आश्चर्य वाटले.
मिभोभौ नी आपली ' अधिक माहीती साठी प्रभु मास्तरला भेटा' ही सिग्नेचर सुरु केल्यापासुन माझ्या व्य. नी वर ताण वाढला आहे. (विनंती नंतर आता ही सिग्नेचर मागे घेतली आहे) अर्थात आधी पण तसे येत होते. तसाच एक व्य. नी. आला होता.फोन नंबर ची विचारणा झाली. वाचनमात्र सद्स्यानी रात्री ९ वाजता फोन केला.
"सर, मदत हवी होती"
बोला
" विचित्र समस्या आहे"
बोला
"कसे सांगु कळत नाही"
आता बोलणार का फोन ठेउ.
"मला ना ऑफिसला गेल्यावर विचित्र भास होतात."
कसले?
"माझ्या अपरोक्ष माझ्या घरी बायकोचा मित्र येतो असे वाटते"
बर मग?
"मग पुढची चित्रे दिसतात"
आणखी काय?
"मग मी आत्महत्या केली आहे असे चित्र डोळ्यासमोर उभे राहाते. यात्रा दिसते. बाकी सर्व रडत आहेत पण बायको आणि तिचा मित्र रडण्याचे नाटक करत आहेत असे दिसते."
अहो, मी सायकिअॅट्रीस्ट नाही. तुम्ही चांगल्या डॉक्टर ला दाखवा.
"मला वाटले तुम्ही मदत कराल. मला माहीत आहे की माझी बायको तशी नाही. पण तरी सुद्धा..."
असे वाटणारे तुम्ही एकटेच नाही.
"सर, बघा ना काही जमते का?ह्या सर्व प्रकाराला एक कारण असावे असे मला वाटते. सांगु का?"
नको. मला माहीत आहे. नेहेमीची ठराविक कारणे असतात. बघतो काही सुचले तर.
_________________________________________________________________नाना चेंगट ह्या आय डी च्या खव मधे पाठमोरा मुलगा आणि 'तो बोलवतोय' असे काहीतरी बघितल्यावर एका सदस्याचा मला व्य. नी आला होता.
"बघा हो सर, नानाला 'अर्ली डेथ सींड्रोम' आहे का?"
नाना? आणि सिंड्रोम? हॅ, कै च्या कै
तुम्हीच विचारा की?मी म्हणालो
"नको. भडकेल. तुम्ही विचारा."
बर
मी विचारले.
"मी कमीत कमी १०० वर्ष जगणार आहे. रीटायर झाल्यावर वाराणसी घाटावर पुरोहीतगीरी करणार आहे. तुम्हाला असिस्टंट म्हणुन यायचे आहे का? एक जागा रिकामी आहे. " अवलिया म्हणाला आणि सिंड्रोम माझ्या सकट ड्रोम मधे गेला.
वरील केस मधे असाच काही तरी प्रकार असणार असे मला वाटले.
म्हटले अवलिया ला विश्वासात घेउ.
तो चागल्या कामाकरता मागे हटणार नाही हे मला माहीत होते.(सावल्याच्या झळा)
अगदी पोस्ट चा नायक केला तरी.
आणि लेख टाकला.
एवढीच इच्छा होती की लेख पटकन उडू नये.
कारण अवलिया ला मानणारी बरीच मंडळी मिपावर आहेत.
त्यांचा गोंधळ उडाला.
काही फोन आले.
त्यांना अर्ध सत्य सांगितले.( त्या वेळेस पुर्ण सत्य सांगणे शक्य नव्हते)
शेवटी एकदाचा त्या सद्स्याने लेख उडायच्या आत वाचला.
तसा व्य. नी आला.
आपण मेल्यानंतर आपल्याबद्दल नेमके कोण काय बोलतील हा प्रश्न खुप जणाना छळतो.
त्या वरचा उतारा 'आपुले मरण पाहीले म्या डोळा' चा रीअॅलीटी शो होता तो लेख.
दोन दिवसानी फोन आला. भास थांबले होते.
एकमेकांशी नेमका काय संबध आहे ते ऩक्की मला पण सांगता येणार नाही पण आता बायकोबद्दलचा 'हु इज इट' (मायकेल़ जॅकसन चे सुप्रसिद्ध गाणे) सिंड्रोम पण दुर झाला आहे त्या सदस्याचा.
जाता जाता: हा लेख लिहीताना सदस्याची 'पुर्व परवानगी' घेतली आहे. त्याचा 'मास्तर लिहाच 'असा आग्रह झाल्यानंतर च पोस्ट केला आहे.
ता़. क. : 'अवलिया गेला'शिर्षकामधे कंसात दचकु नका ही ओळ टाकायला विसरलो ही माझी चुक मी मान्य करतो आणि त्या लेखाच्या शिर्षकाने ज्याना मानसिक त्रास झाला त्यांची मनापासुन माफी मागतो.
वाचने
3497
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
३१ वाचने
च्या मारी...
In reply to च्या मारी... by टुकुल
>>मला थोडी
हॅहॅहॅहॅ
In reply to हॅहॅहॅहॅ by विनायक प्रभू
हॅहॅहॅहॅ
एकमेकांशी
संबंध
पुढचा भाग
टारझणचा सल्ला
In reply to टारझणचा सल्ला by हवालदार
आयला ..
हा खुलासा
दोन
ह्म्म...
हम्म्म्म!!!
In reply to हम्म्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
असेच म्हणतो