टोळ्ळंभट्ट
लेखनप्रकार
मोबाइल हॉल मधे ठेवला होता.
तरी सुद्धा सकाळी साडेपाच ला जाग आली.
बायॉलॉजिकल अलार्म.
नाईट लॅम्प च्या मंद प्रकाशातुन बाहेर निघालो तर आरशातुन एक हाक अयकु आली.
"ओ मास्तर, कुठे चालले? आज काही शेड्युल नाही ना. गप्प झोपा की."
बर बर. निसर्गाची हाक पुर्ण करतो.
" हो, नंतर चहा मागाल बायकोकडे"
नाही.
" उद्यापासुन हेवी असेल ना शेड्युल. संधी मिळाली आहे तर गपगुमान झोपा की. एकदिवस जरा उशीरा गेलात तर ऑफिस काही वाहुन जाणार नाही"
बर बर
परत अंथरुणावर पसरताना त्याला वाकुल्या काढुन वेडावुन दाखवले.
उठलो ते एकदम साडे आठ वाजता.
चहा पिता पिता बायको म्हणाली,
" सकाळी कुणाकडे बोलत होतात"
स्वःतकडे
"कमाल आहे, ती भावाची नात सुद्धा रात्री अडीच वाजता अशी उठुन बोलत बसते म्हणे"(वयः ९ महीने)
हम्म
मोबाइल तपासला. अनोळखी फोनचे ५ मिस्ड कॉल होते.
इतक्यात त्याच फोन वरुन परत फोन आला.
" सर, सुप्रभात. मी अमुक. तमुक ने तुमचा फोन दिला. जरा सल्ला हवा होता.
आता हा तमुक कोण ते मला आठवेना.
"फोन वर बोलु का घरी येउ" अमुक
नको ऑफिसमधे या.
_________________________________________________________________________________
ऑफिसमधे मी पोचायच्या आधी अमुक पोचला होता.
मिपावरच्या 'घोड्बंदर वाचक' मित्रमंडळापैकी एक.
" अहो सर, तुम्ही तमुकाना सल्ला दिला होता. तो एकदम लागु पडला. त्यांनी सांगितले म्हणुन तुमच्या कडे आलो"
(आयला, ह्या तमुकच्या)
बोला.
"मला स्वप्ने पडतात"
सगळ्याना पडतात.
"विचित्र असतात, सर्व आठवतात सकाळी"
सगळ्यांना पडतात, काहीना संपुर्ण आठवतात
"नाही जरा वेगळच आहे प्रकरण"
सविस्तर सांगा.
"झोपल्यावर पडणार्या स्वप्नात जागा असलेला 'मी' पण सामील असतो."
म्हणजे काय?
"अस बघा जागृत अवस्थेत असलेला 'मी' आणि झोपलेला 'मी' हा वेगळा असायला हवा की नाही"
असायलाच पाहीजे असे काही नाही.
" काल मला एक स्वप्न पडल. त्यात मी फर्स्ट क्लास मधे उभा आहे. कुर्ला स्टेशन गाडीने सोडले. वेग पकडला. इतक्यात एक बाई चालत्या गाडीतुन खाली उतरली. त्या मागोमाग एक वर्षाचे बाळ वेग पकडलेल्या गाडीतुन उतरले. झोपेतल्या 'माझा'हा प्रकार बघुन श्वास कोंडला. जागृत "मी" मधे आला आणि झोपेतल्या ' मला' हे स्वप्न आहे हे समजवले. आणि झोपेतला मी शांत झाला"
" आणखी एक स्वप्न सांगतो. मी समुद्रकिनार्यावर बसलो आहे माझ्या शाळेतल्या मैत्रीणीबरोबर. तीचे तिचे पीन्गट केस माझ्या गालाला स्पर्श करताहेत. आमचे लग्न ठरले आहे. थोड्या वेळाने मी घरी येतो. वहीनी विचारते तेंव्हा लक्षात येते की तीचा मोबाईल नंबर माझ्या कडे नाही. वहीने ओरडते,"झाले भावोजी केलात का पहील्याच दिवशी बावळटणा". झोपेतला मी पॅनिक होतो. जागृत 'मी' मधे येतो आणि झोपेतल्या 'मी' ला समजावतो, अरे मुर्खा, तुझे लग्न होउन १० वर्षे झालीत. तुझी बायको ही नाही.शांत राहा. मग झोपेतला" मी" परत शांत होतो.आणि हे सर्व सकाळी संपुर्ण आठवते आणि त्रास होतो.
अहो मी सायकॉलॉजिस्ट नाही.
" मला माहीत आहे ते. पण तुमुक ची केस अशीच कॉम्प्लीकेटेड होती ती तुम्ही सोडवलीत की. मला पण काय करु ते सांगा?"
अहो ते मी जे काही सांगितले तो निव्वळ अंदाज होता. अगदी टोळंभट्टा सारखा.
"माझ्या साठी पण तसाच करा. सायकिट्रीस्ट म्हणतात की मला 'डीप चाईल्ड हुड ट्रोमा' आहे.
अहो तो सर्वांना असतो.
सोळा वर्षे झाल्या वर जुने आठवुन 'आय हेट माय मदर्,किंवा फादर' हे काही नविन गोष्ट नाही.
तुमचे सहजीवन बरोबर आहे ना.
" तसा काही प्रॉब्लेम नाही. आता 'सर्व काही' थोडेच मीळते. कधी कधी जेवणातपण कमी जास्त होते. पण चालवुन घेतो."
तुमची आई उत्कृष्ट जेवण करायची का?
"अगदी बोटे चाटायला लागतील असे. लग्नानंतर सर्व बायकोने ताबा घेतला"
(टीपीकल मम्मा'ज बॉय)
शाळेतल्या मुलीवर प्रेम होते का?
"एकतर्फी"
माझ्या मते तुम्ही झोपता तेंव्हा भुतकाळात जाउन वर्तमानात कमी असलेल्या गोष्टी शोधता. आणि ते चुक आहे अशी अपराधीपणाची भावना तुमच्यातल्या जागृत 'मी' ला मधे आणते. बाकी काही त्रास नाही असे मला वाटते.ह्यावर कसलेही सिडेटीव हा उपाय नाही.
"आता यातुन बाहेर कसे यायचे?"
बघा हो, माझा एक टोळंभट्टी उपाय. जमला तर जमला. एक लिस्ट करा,तुमच्या मनासारखे जे होत नाही त्याची. बायकोला दाखवा. तीला विश्वासात घेउन त्यात काय जमते ते बघा. जे जमत नाही त्याचा आग्रह करु नका.
सकाळी उठल्यावर आरशातल्या प्रतिबंबाला वेडावुन दाखवा.त्याच्याबरोबर खीखीखीखी करा. एक महीन्यात उतार पडेल.(आयला निदान एक महीना तरी मी सुटलो)
अमुक धन्यवाद म्हणुन निघुन गेला.
३० व्या दिवशी फोन आला. आता'जागृत' अमुक झोपलेल्या 'अमुक' ला त्रास देत नाही.
जाता जाता: आता अमुक ला जे जमत नाही त्याचे काय?
वाचने
2961
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
भारी!!!
In reply to भारी!!! by बिपिन कार्यकर्ते
हॅ हॅ हॅ
In reply to भारी!!! by बिपिन कार्यकर्ते
एक सोपा
In reply to भारी!!! by बिपिन कार्यकर्ते
मास्तर
भारीच
नेहमी
वा !! छाण
सही मास्तर...मस्त भट्टी जमली आहे.
छान
:-)
वा ! मस्त
"बायॉलॉजिक