Skip to main content

भाषा

'असेल घडले' आज काही इतिहासात :(

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 16/02/2021 14:58 या दिवशी प्रकाशित केले.

असेल घडले आज काही इतिहासात
पकडून का ऐकविले पाहिजे ते प्रत्येकास?

असेल घडले आज काही इतिहासात
लेखांची माळ का लावली मिपाच्या शेतात?

असेल घडले आज काही इतिहासात
आदळते डोळ्यांवर मिपा उघडताच

असेल घडले आज काही इतिहासात
घडू द्या तिकडे चला आपण जगू वर्तमानात

असेल घडले आज काही इतिहासात
स्क्रोलचा पर्याय आहे अजूनी हातात

सीमावादात महाजन आयोगाचा महाराष्ट्रावर अन्याय

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 26/11/2020 18:57 या दिवशी प्रकाशित केले.

https://www.misalpav.com/node/47884 इथल्या चर्चेच्या संदर्भाने काही जणांना(विशेषत: सध्याच्या तरुण पिढीला किंवा द.महाराष्ट्रात राहत नसलेल्यांना) महाराष्ट्राचा सीमाप्रश्न नक्की काय आहे? महाराष्ट्र त्यासाठी का लढतो आहे? नक्की काय अन्याय महाराष्ट्रावर झाला आहे हे समजावे यासाठी हा धागा!
--------------------------------------------------

ऋणनिर्देश : पत्रकार शांताराम बोकील _/\_

महाजन अहवालावर प्रकाशझोत - शांताराम बोकील

स्मरणाला मदत

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 04/11/2020 11:09 या दिवशी प्रकाशित केले.

चांगली स्मरणशक्ती कोणाला नको असते? सर्वांनाच हवी असते. याच स्मरणशक्तीच्या विश्वाचा एक भाग आहे स्मृती सहायक.स्मृती सहायक म्हणजे जे काही आठवायचं आहे ते आठवायला मदत करणारी साधने.या साधनांपैकीच एक साधन आहे आद्याक्षरांपासून बनवलेली लघुरुपे.

भरपूर मुद्दे किंवा मोठी यादी असेल तेव्हा या प्रत्येक मुद्द्यातला महत्वाचा शब्द किंवा यादीतल्या वस्तू यांची आद्याक्षरे घेऊन त्यापासून एखादा शब्द किंवा वाक्य बनवणे ही युक्ती वापरली जाते.

यातले काही शब्द हे मजेदार असतात.किंबहूना ते मजेदार असल्यानेच लक्ष वेधून घेतात आणि दीर्घकाळ स्मरणात राहतात.

पाणिनी ह्यांचे संस्कृत

लेखक साहना यांनी बुधवार, 21/10/2020 10:46 या दिवशी प्रकाशित केले.

“We can now assert, with the power of hindsight, that Indian linguists in the
fifth century B.C. knew and understood more than Western linguists in the
nineteenth century A.D. Can one not extend this conclusion and claim that
it is probable that Indian linguists are still ahead of their Western colleagues
and may continue to be so in the next century? Quite possible; all we can say
is that it is difficult to detect something that we have not already discovered
ourselves.” - फ्रिट्स स्टाल ( UC बर्केली चे प्राध्यापक)

आणखी काय हवं?

लेखक Pratham यांनी बुधवार, 14/10/2020 20:33 या दिवशी प्रकाशित केले.

मावळणाऱ्या दिवसाची संध्याकाळची वेळ
वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सरसरणारी पाने
कडाडणारे ढग आणि चमकणाऱ्या विजा
पावसाचे पाणी व मातीचा सुगंध
बरसणाऱ्या थेंबाचा रपरपणारा आवाज
गरम चहा बरोबर आवडते पुस्तक
बोला आणखी काय हवं?

मराठी ही अभिजात भाषा होण्यात अडचणी कोणत्या?

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 13/10/2020 10:58 या दिवशी प्रकाशित केले.

https://www.misalpav.com/node/47611
या धाग्यावर मधेच मराठी अभिजात भाषा आहे का या विषयावर चर्चा सुरु होती.ती स्वतंत्रपणे व्हावी यासाठी हा धागा.

त्याकाळी ते का शक्य झालं नसावं?

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 06/10/2020 13:28 या दिवशी प्रकाशित केले.

मराठी ही भाषाकुळानुसार 'इंडो-आर्यन' भाषाकुलात येते.म्हणजेच मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे.महाराष्ट्राच्या पूर्वेला तेलंगण आणि महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व भागाला जोडून असणारा प्रदेश कर्नाटक आहे.तेलंगणात तेलुगू तर कर्नाटकात कन्नड या भाषा बोलल्या जातात.कन्नड आणि तेलुगू या दोन्ही भाषा द्रविड या भाषाकुलात येतात.

टंकबोली

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 01/09/2020 17:31 या दिवशी प्रकाशित केले.

बोली ही कुठल्याही संभाषणात संवादात आपण वास्तव जगात वापरतो.आपण त्याला वैखरी वाणी असेही म्हणतो. ही बोली वापरताना आपण नकळत अजून एक संवादाच माध्यम वापरत असतो ते म्हणजे देहबोली. ही देहबोली आपल्या बोलीत मिसळून गेलेली असते. या देहबोली व बोली यांच्या समुच्चयातून आपल्या भावना प्रकट होत असतात. आपल्या बोलीतून व्यक्त होणारे भावना, विचार यांचे आपल्याला अभिप्रेत असलेले प्रकटीकरण झाल्यानंतर समोरच्याला झालेले त्याचे आकलन यात ताळमेळ नसेल तर गैरसमज तयार होतात. हा ताळमेळ तपासायचा कसा? आपण तो प्रतिसादातून तपासायचा प्रयत्न करतो. म्हणजे पुन्हा आकलन हा मुद्दा अपरिहार्य.

आली आली गौराई

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 25/08/2020 13:38 या दिवशी प्रकाशित केले.

श्रावण महिन्यातले रिमझिम पावसासोबत केलेले उपास,व्रतवैकल्य, मंगळागौरीचा घातलेला पिंगा, झिम्मा, फुगड्या संपल्या कि सगळ्यांना वेध लागतात ते गौरी-गणपतीचे महाराष्ट्रात बहुतांश घरात महालक्ष्मी-गौरी बसवल्या जातात. गणपती बसल्यानंतर गौरी च्या रूपाने माहेरवाशिणीच घरी येतात. त्या आल्यानंतर त्यांचं स्वागत मोठ्या जल्लोषात केल्या जातं. वऱ्हाडात त्यांना 'महालक्ष्मी' तर उर्वरित महाराष्ट्रात 'गौरी' नावाने ओळखतात,