पार्श्वभूमी - माझा मोठा मुलगा या वर्षी इ. १० वी ची परिक्षा उत्तीर्ण झाला आहे त्याला ६२ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. त्याच्या बरोबर सर्व क्षेत्रातील पुढील संधी जसे विज्ञान, वाणिज्य व कला इत्यादी क्षेत्रातील पर्याय चर्चा करुन झालेले आहेत. त्याच्या मतानुसार त्याला विज्ञान क्षेत्रात शिक्षण घ्यायचे असल्याने पुण्याच्या ११ वी च्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत नांव नोंदवून चारही पेऱ्यांमधुन अपेक्षित असे चांगले कनिष्ठ महाविद्यालय उपलब्ध झाले नाही. सर्वात शेवटच्या फेरीत शहरातील चांगले महाविद्यालय उपलब्ध झाले पण त्या महाविद्यालयात फक्त द्विलक्षी (Bi-focal) अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने ११ वी स्तरावरील जीवशास्त्र Biology विषय त्यात उपलब्ध नाही आणी मुलाला Biology ही घ्यायचे असल्याने त्याला त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नाही. पंरतु या अखेरच्या म्हणजे ४ थ्या फेरीत सदरचे कनिष्ठ महाविद्यालय हे पहिल्या पसंतीक्रमाचे असल्याने त्यात प्रवेश घ्यावाच लागेल असा नियम आहे.
त्यामुळे जरा वेगळा विचार करुन NIOS National Institute for Open Schooling चे Sr. Secondary या अभ्यासक्रमाचा विचार करीत आहे याला कारणे खालील प्रमाणे आहेत....
१. पारंपारिक शिक्षणात (Traditional College Bound) जास्त करुन महाविद्यालये अभ्यासक्रम ओढून ताणून पुरा करतात त्यात घोकंपट्टीचाच जास्त भर असतो. बहुतांशी महाविद्यालयात फक्त प्रात्यक्षिकांकरीताच उपस्थिती नोंदविली जात असल्याने महाविद्यालये ही प्रात्यक्षिकांपुरतीच मर्यादीत असल्याचे जाणवते.
२. नामांकित क्लासेस याच महाविद्यालयातच प्रवेश ग्या असा आग्रह धरतात - कारण या महाविद्यालयात उपस्थितीची काळजी करण्याचे कारण नसते असे समजते.
३. बहुतांश विद्यार्थी MH-CET, NEET, JEE-Main, JEE Advance यांचे प्रशिक्षण खाजगी क्लासेसच्या माध्यमांतून घेत असल्याने महाविद्यालयांनाही याची कल्पना आहे त्यामुळेच ही महाविद्यालये नियमित शिकवण्याकडे फारसे लक्ष देत नाहित असे बऱ्याच जणांजवळ चर्चा केल्यांनंतर आढळून आले आहे.
४. वरील स्पर्धात्मक परिक्षाच द्यायच्या असतील तर NIOS चे Sr. Secondary चा अब्यासक्रम अत्यंत चांगला आहे व तो स्व-अभ्यासाने (Self Study) यशस्वीरित्या पुर्ण करणे शक्य आहे असे वाटते. त्याने या सर्वाकरीता आवश्यक वेळही विद्यार्थ्याला मिळेल असे वाटते.
५. सदर NIOS मधे ११ वी अशी पातळी नसल्याने पुढील वर्षी सरळ Sr Secondary ला प्रवेश घेऊन २०१९ ची परिक्षा देता येईल.
६. NIOS ची पुस्तके, अभ्यासक्रम व संलग्न माहिती ऑनलाईन उपलब्ध असल्याने स्वअभ्यास करणे अधिक सोपे जाऊ शकते.
७. JEE Main, Neet यांसारख्या परिक्षांमध्ये percentile काढण्याची पध्दत NIOS च्या विद्यार्थ्यांना जास्त फायदेशीर होऊ शकते.
८. सर्वसाधारणपणे पांरपारिक महाविद्यालयातील ११ वी १२ वी च्या शिक्षणाला प्रत्येक वर्षी ३५ ते ४० हजार रुपये खर्च होतो त्याच खर्चात या स्पर्धात्मक परिक्षांसह स्वअध्ययनाकरीता चांगल्या पध्दतीने विनियोग करता येईल.
९. ११ वी, १२ वी चे पांरपारिक महाविद्यालयीन शिक्षण घेऊनही Neet, Jee, MHCet या परिक्षांची वेगळी तयारी करावी लागतेच त्यामुळे या सर्व गोष्टींमुळे शिकणाऱ्यावर अतिरिक्त ताण येऊ शकतो तो या पध्दतीमुळे येणार नाही असे वाटते
वरील माहिती घाई-घाईत लिहिल्याने त्यात विस्कळीतपणा आहे, परंतु विषय कळला असेल असे वाटते.
वरील सगळे मुद्दे वैध व चांगले वाटत असले तरी असे प्रवाहाविरुध्द जाऊन असे करणे कितपत योग्य होईल?
मिपावरील जाणकारांनी फायदे - तोटे यासंबंधी मार्गदर्शन करावे
वाचने
5076
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
रामराम रामभाऊ!
धाग्याचे नाव बदलून हवे
In reply to रामराम रामभाऊ! by खेडूत
धाग्याचे नाव बदलून हवे
In reply to धाग्याचे नाव बदलून हवे by एस
धन्यवाद खेडूतभाऊ,
In reply to रामराम रामभाऊ! by खेडूत
आमचा गोवा बोर्ड १२ वी विज्ञान
होमस्कुलिंगला कोणतेच
In reply to आमचा गोवा बोर्ड १२ वी विज्ञान by प्रीत-मोहर
अभ्यासाचं ओझं जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी
नाही असे काही नाही.
In reply to अभ्यासाचं ओझं जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी by खग्या
१० वी त काही मुलांचे गुण भाषा
In reply to अभ्यासाचं ओझं जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी by खग्या
आपल्या पाल्याच्या पात्रतेवर
In reply to अभ्यासाचं ओझं जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी by खग्या
आम्हालाही अशी शंका निकालानंतर
In reply to आपल्या पाल्याच्या पात्रतेवर by कोदंडधारी_राम
मुलाला जीवशास्त्र का शिकायचे आहे ?