हुच्चभ्रू एलिट शिरेल्स
एवढ्यात कुठली TV/वेब सीरिअल पाहिलीत/ पाहत आहात? हा धागा वाचला आणि मला तो न्यून कि काय म्हणतात तो गंड आला ना राव !!
बघणं तर सोडाच वो, कितीयेक शिरेलची नाव बी ऐकलेली न्हाईत.
माझी उडी ज्याच्या मध्ये फारसं काही बघण्यासारखं नसतं अश्या फालतू मराठी शिरेल पासून फार तर हिंदी पर्यंतच किंवा जास्तीतजास्त हुच्च् म्हणजे डब केलेली एखादी ल्युसी. आता आमची अभिरुचीच अशी त्याला काय करणार? आमचा मुख्य प्रॉब्लेम म्हणजे वाघिणीचे दूध. आम्ही ते भीत भीतच पिलेलो त्यामुळे च्यामारी काय बोलतोय काय बी कळंना अशी अवस्था. हरी पुत्तरचं नाव ऐकलेलं ते सिनेमाच्या संदर्भात. त्याची शिरेल पण आहे याची काही कल्पना नव्हती. आणखी एक महत्वाची बाब, तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या सारखे अगम्य संवाद ऐकण्यापेक्षा इंग्रजी चित्रपट फक्त बघण्यासाठीच थिएटर मध्ये जायचे हे मत अगदी पक्के. हा धागा वाचण्यात आला आणि मग प्रकर्षाने जाणीव झाली, या मिपावरील हुच्चभ्रू एलिट अभिजनांच्या मांदियाळीत सामील व्हायचं असेल तर या गर्दभाच्या अंगावर घोड्याची झूल पांघरायलाच पाहिजे, त्याला पर्याय नाही.
विचार केला, या धाग्यापासूनच सुरवात करू. जरा लक्षपूर्वक वाचायला घेतला आणि सुरवातीलाच अडलो ते स्पॉईलर वर. हि काय भानगड आहे? घिसाडी असल्याने एरोडायनॅमिक्सच्या संदर्भात हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी स्पॉईलर वापरतात हे माहित होते परंतु शिरेलसाठी देखील स्पॉईलर? म्हणजे शिरेल नि टेक ऑफ घ्यावा म्हणून स्पॉईलर वापरतात कि काय? शोधाशोध केल्यावर कळलं हे स्पॉईलर म्हणजे शिक्रेट. ते सांगायचं नाही म्हणे! एखादा सस्पेन्स थ्रिलर बघायचा म्हणजे डोक्याला नुसता शॉट, पुढे काय होतेय, रहस्य काय याचं सारखं टेन्शन, शेवट कळे पर्यंत जीव खालीवर. असा एखादा सिनेमा आला कि आमचा जग्गूदादा त्याच्या एखाद्या पंटरला आधी सिनेमा बघायला पाठवायचा आणि सिनेमाची सगळी ष्टोरी, किती मर्डर आहेत, रणजित टाईपचे किती शीन आहेत याची सगळी चौकशी करायचा मग निवांत सिनेमा बघायला जायचा. नो टेन्शन. परंतु हुच्चभ्रू कनसर (उच्चार बरोबर आहे ना?) व्हायचे असेल तर पहिला धडा गिरवायला घेतला तो म्हणजे स्पॉईलर कळता कामा नये. चला सुरवात तर झाली.
पुढे वाचायला लागलो आणि अडलो बिंज या शब्दावर. आता हि काय नवीन भानगड आहे? परंतु एक लक्षात आले कि हुच्च्चभ्रु व्हायचे असेल तर असे शब्द फेकता आले पाहिजेत. मग बिंजचा धांडोळा घ्यायला सुरवात केली. सुरवातीला श्री गोगलदेवाने भलताच अर्थ सांगितला परंतु अधिक खोलवर शोध घेतला तेव्हा बिंज वॉचिंग सापडले आणि मग अर्थ लागला, हुश्श झाले. आणखी थोडी प्रगती झाली.
जस जसा पुढे वाचत गेलो तस तसा वेगवेगळ्या शॉर्टफॉर्म्स वर अडलो. GOT काय, SATC काय. पुढे तर BOT, FOX, ABC, CBC, BBC, TVF असे शब्द येऊन आदळायला लागले. सिझन या शब्दाने देखील गोंधळात टाकले. मला माहित असलेले सिझन म्हणजे ते आपले उन्हाळा, पावसाळा, हिवाळा इत्यादी. आता या शिरेलला देखील सिझन असतो तर? म्हणजे पावसाळ्यांत शिरेल मधील पात्रं हातात छत्र्या घेतात आणि थंडीत स्वेटर्स घालतात कि काय? पुढचा स्टॉप आला sitcom या शब्दावर. हि हुच्चभ्रू अभिजन मंडळी महा थोर. सरळ सध्या शब्दात नाही लिहिणार, नाहीतर कळणार कसे हुच्चभ्रू आहोत ते! या सगळ्यांचा धांडोळा घेत गेलो. एकंदरीत हे हुच्चभ्रू एलिट कनसर होणे भलतेच अवघड प्रकरण आहे हे लक्षात आले.
या सगळ्या एलिट गोष्टी समजायला लागल्यावर पुढचा प्रश्न आला या सगळ्या शिरेल बघायच्या म्हणजे एखाद्या ऑन-लाईन व्हिडीओ ऑन डिमांड आणि स्ट्रीमीन्ग मेडियाची सोय देणाऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडरचे पाय धरायला हवेत, फास्ट इंटरनेटचे कनेक्शन हवे, एखादा स्मार्ट, हाय डिफिनेशन टीव्ही आणि सोबत होम थिएटर हवे. म्हणजे हे सगळं भलतंच खर्चिक प्रकरण आहे तर. पण काय करणार एलिट क्लब मध्ये सामील व्हायचंय ना !
आता याच्या पुढची पायरी होती ती म्हणजे प्रत्यक्ष एखादी शिरेल बघणे. कुठली निवडावी बरे? विचार चालू केला. पण कसचे काय? शिरेल मध्ये देखील असंख्य प्रकार. पहिल्यांदा अडलो ते जानं (तो रं उच्चारायचा नाही म्हणे - मग लिहिलाय कशाला तेथे?) या शब्दावर. या शब्दाने जान मुश्किलमें डाल दी I किती असंख्य प्रकार आहेत बघा - हॅन्गआउट कॉमेडी, सिचुएशनल कॉमेडी, वर्कप्लेस कॉमेडी, कन्सेप्ट कॉमेडी, फॅमिली कॉमेडी, sitcom, romcom, मेडिकल ड्रामा, लीगल ड्रामा, क्राईम ड्रामा, मिस्ट्री, पझल, सायन्स फिक्शन, फँटसी, सोप ऑपेरा, डॉक्युमेंट्रीज, स्पोर्ट्स, रिलिजन, फॉर्मल आणि इनफॉर्मल एज्युकेशन, म्युझिक अँड डान्स, गेम शोज, रिऍलिटी शोज, इन्फॉर्मेशिअल, इंफोटेन्मेन्ट काय न काय. रामा शिवा गोविंदा.
या सगळ्या गोंधळात ठरवता येईना नक्की कुठून सुरवात करावी. तेव्हा आपल्या हुच्चभ्रू मिपाकरांनी काय शिफारसी केल्यात ते बघायला लागलो, म्हटलं त्यातील एखादी शिरेल निवडावी.
- हि सीरिअल माझी बघून झाली, पाहून धन्य झालो. : शिरेल बघून कोणी धन्य होऊ शकतो हे वाचून मीच धन्य झालो.
- या सिरीयलचा पहिला सीझन पहिला. मस्त आहे. : हे काय नवीन, आता पहिला सिझन पहिलाच असणार ना? नक्की कुठला सिझन पाहिला याची शोधाशोध केली परंतु सापडला नाही. शेवटी सध्या थंडी चालू असल्याने हिवाळ्याचा सिझन पाहिला असेल अशी समजूत करून घेतली.
- पहिल्या काही भागात पात्रांची ओळख Zआली की मजा वाढते 7/10. : झाली हा शब्द Zआली असाही लिहिता येतो हे वाचून मजा आली. त्याचप्रमाणे आपण रेटिंग देखील देऊ शकतो हे पाहून उगीचच समीक्षक Zआल्या सारखे वाटले.
-सिझन २ थोडा बोअर होतो. आणि मुळात ड्रग ट्रॅफिकिंग मधले २-४ विकी पेजेस वाचले असतील तर आणखीन इंटरेस्ट येतो. : अरे देवा ! शिरेल बघायची तर पूर्वतयारी देखील करावी लागते कि काय?
- एक अव्वल दर्जाचा पोलीस , ओसीडी ने त्रस्त होतो. : हे ओसीडी प्रकरण काय ते न कळल्यामुळे मीच त्रस्त Zआलो.
- आठवतील तशा सांगत जाईन. : सांगा सांगा, तेव्हडीच आमच्या ज्ञानात भर.
- मी नुकतंच " * " चं बिंज केलं. मजा आली. : करा करा बिंज करा. पण जास्त काही सांगू नका हो, बिंग फुटायचं.
- नुकत्याच दोन मोठ्या सिरियल सलगपणे संपवल्या. : मोठ्या सिरियल सलगपणे संपवल्या?? हि तुमची जीविका दिसते मग उपजीविकेसाठी काय करता?
- सर्वच कलाकारांचा दमदार अभिनय आणि " * " तर अहाहाहा... चुकवू नये अशीच. : आमची मजल फार तर कुठून चक्रबोर्ती तर अहाहाहाहा..... एव्हढीच.
- या ६ ही सिरीजचे रिव्ह्यू खूप चांगले आहेत. नक्की पहा. : नक्की पहा?? अहो पहा म्हणायला काय जातंय? बघा केव्हढे प्रॉब्लेम्स आहेत आम्हाला.
- " * " जब्राट. पण शेवट जमला नाही त्यांना. :( : अचू द्ये अचू द्ये, आपण त्यांचं घर उन्हात बांधू बर्रर्र आणि हो, असे जब्राट वगैरे शब्द वापरायला शिकायलाच पाहिजे आता.
- कार्टून सारखा तोचतोपणा यायला लागला आणि सोडून दिल्या. : अहो असं नका करू. तुम्हीच बघणं सोडून दिलं तर आम्ही पामरांनी कोणाकडून शिरेलदर्शन घ्यायचं?
- " * " बघायला सुरुवात केली होती पण एका एपिसोडवर थांबलोय तो अजून थांबलोच आहे. : सदैव प्रेक्षका पुढेच जायचे. तुम्हीच थांबला तर आम्ही कोणाकडे बघायचे?
- थोड्याच दिवसात, नवऱ्याला वेळ झाला कि स्ट्रेन्जर थिंग्स सुरु करणार .. : मी मोठ्ठा आवंढा गिळला हे वाचून परंतु नंतर कॉन्टेक्स्ट लक्षात आल्यावर हुश्य Zआले.
- सीझन १,२,३ हे अनुक्रमे उत्तम, मध्यम आणि सोसो वाट्ले. : साहजिकच आहे, काहींना हिवाळा आवडतो तर काहींना उन्हाळा. चालायचंच.
- " * " अप्रतिम अभिनय!! आणखी सांगत नाही... मेलडी खाव... : नक्काच सांगू. आम्ही नाही जा ! आम्हाला शिरेलदर्शनाची अपेक्षा आणि तुम्ही मेलडी खायला सांगताय?
- " * " पाहिली नसेल तर ती पाहून घ्या आधी. त्याशिवाय मोक्षप्राप्ती इल्ले! : अगा नवल वर्तलें. शिरेल बघून मोक्ष प्राप्ती होते हे ऐकून तुकोबांनी स्वर्गात हळहळ व्यक्त केली असेल. उगा भक्ती केली आणि अभंग लिहिले! टीव्ही समोर ठाण मांडून बसलो असतो.
- " * " चे नाव अजून कोणी कसे घेतले नाही ? : ईश्श, नाव घ्यायला लाजत असतील मंडळी.
- सत्तरीच्या दशकातील न्युयॉर्क मधील पॉर्न इंडस्ट्री ही थीम. : सत्तरीच्या दशकातली का? म्हणजे PIO के. कौर नसेल त्यात, नाही का?
- समाजशास्त्र मानसशास्त्र अनेकोनेक बाबींसाठी ही मालीका एकवेळ तरी अवश्य बघावी. : कुठले मानस आणि समाज शास्त्र घेऊन बसलात? जास्तीतजास्त ट्यार्पी हे एकच शास्त्र आहे बर्रर्र.
- काही तांत्रिक कारणांनी हा लेख. : बरे Zआले नाहीतर आगीतून फुफाट्यात अशी अवस्था व्हायची!
- हे मत मी ४ पासून पुढील सीजन साठी मान्य करतो. : तीन सिझन उ-पा-ही माहित होते, हा ४था कुठून आला?
- " * " पहिले ७ सीझन्स जबरदस्त कोर्ट ड्रामा. : तीन चे चार Zआले, आता सात? हे आपल्या आकलनाच्या बाहेर आहे बुवा.
- आपल्या भोवती आणि आपन बाळगत असलेल्या अनेक भ्रमाचा भोपळा फोडणारी मालिका ! : हे असं काही बघण्यापेक्षा भ्रमाचा भोपळा वाचणे चांगले, नाही का?
- ही सीरीज पाहीलेली नसल्यास एकवार अवश्य पाहावी ही आग्रहाची शिफारस. : आता दुर्मिळ Zआलेला पुण्यातील लग्नाच्या पंक्तीतला आग्रह ऐकून माहित होता परंतु शिरेलचा आग्रह ?
या इतक्या वेगवेगळ्या शिफारशी बघून अजूनच गोंधळ उडाला. मग ठरवले आपले आपणच निवडू एखादी शिरेल म्हणून लिस्ट बघायला घेतली तर नावे आणि स्टार स्टार स्टार.. इथे काय गाळलेल्या जागा भरायच्या आहेत कि काय? काही कळेना. ओ हो, हे स्टार्स म्हणजे रेटिंग आहे होय. हे कळायला अंगभूत एलिट स्मार्टनेस नसल्याने थोडा वेळच लागला. आणखी एका लिस्ट मध्ये तर ६५, ४८, ७४ असे आकडे .. म्हणजे १०० पैकी गुण आहेत कि काय अशी शंका आली. परंतु नाही, हे म्हणे शिरेलच्या भागांचे आकडे आहेत. हॅ, हे काय आकडे Zआले. आमची कपूरांची केकता बघा, एकदा रतीब लावला कि वर्षानुवर्षे चालू.
या सगळ्या आंग्ल भाषेतील हुच्चभ्रू शिरेलच्या गर्दीत एका ठिकाणी मराठी शिरेलचा उल्लेख आढळला आणि खरेच आपल्या मातीतला मृद गंध आल्यासारखे वाटले... अहाहा.
हे सगळे प्रकर्ण आपल्याला जमण्यासारखे नाही असे वाटल्याने माझ्या जवळ असलेला दूरदर्शन चालू केला तर हँ हूँ आवाज ऐकायला आला. बघतो तर आपले रादे बाबा अनुलोमविलोम शिकवत होते.
रादे बाबा, तुमची योगासनांची फक्त शिरेल बघून मला योगाचे फायदे मिळतील का हो? म्हणजे मी लगेच एव्हढ्यात कुठली योगा शिरेल पाहिलीत / पाहत आहात? अशी जिल्बी पडायला घेतो, कसे?
याद्या
15779
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त !
भेंडी ज्याम
हाहाहाहा
हॉट योगा ?? नुसतच हाय टेम्परेचर आणि हाय ह्यूमिडिटी.
In reply to हाहाहाहा by अनन्त अवधुत
नक्की काय आहे ?
- थोड्याच दिवसात, नवऱ्याला वेळ झाला कि स्ट्रेन्जर थिंग्स सुरु करणार .. : मी मोठ्ठा आवंढा गिळला हे वाचून परंतु नंतर कॉन्टेक्स्ट लक्षात आल्यावर हुश्य Zआले.मुळ लेखात मिपाच्या महीला सदस्य हर्मायनीजींनी हा प्रतिसाद दिलेला आहे ज्यावर तुम्ही वरील ओळ लिहीलेली आहे तो हर्मायनीजींचा प्रतिसाद असा आहे. या प्रतिसादात हर्मायनीजींनी SATC बघतेय सेकंड सीझन चालु आहे इतकं स्पष्टपणे मी एक सिरीयल बघत आहे हे म्हटलेलं असुनही त्यानंतर च्या शब्दात तर खूपशी गर्ली सिरीयल आहे.. रिलेशनशिप ड्रामा. म्हटल्यानंतर म्हणजे इतक्या एक सोडुन तीन तीन ठिकाणी म्हटल्यानंतर अगदी लहान मुलालाही समजेल की या आता एका स्ट्रेंजर थिंग्ज या टीव्ही सीरीज विषयी बोलत आहेत इतकं सर्व सुस्पष्ट असुनही.... ? लगेच तात्काळ त्याच्याच खालच्या दुसर्या प्रतिसादात हर्मायनीजी म्हणतात स्ट्रेन्जर थिंग्स ह्या सिरीयल चा नुकताच सेकंड सीझन आला आहे. हि सिरीयल पॅरलल युनिव्हर्स वगैरे कल्पनांवर अधिकारीत आहे. बघायला मजा येईल असे वाटते. पण थोडी स्कॅरी असू शकेल असे वाटते म्हणून एकटीने बघायची हिम्मत नाही होते. तरीही तुमच्या लक्षात इतकी साधी बाब न येता "भलतेच" काही तरी येते. याचे कारण काय असावे ? समजण्याच्या गतीचा वेग हे कारण आहे ? की जान कर अंजान बनना आपकी फितरत है ? की द्विअर्थी विनोदाची उबळ ? बाकी विनोदात व द्विअर्थी विनोदात ही काहीच गैर नाही असोतो धागा जरा जास्तच अति झाला
In reply to नक्की काय आहे ? by मारवा
झकास लिहिलय... आवडलं...
उगा काहितरीच, नाखु, रंगीला
हा हा
कहर!!! मजा आली!! धन्यवाद!!
मस्तं लिहिलंय :)
चामुंडराय, मज्जा आली. बरंही
हरकत नाय. आपण 'घाडगे अँड सून'
राणा व पाठक बाईंचा उल्लेख
In reply to हरकत नाय. आपण 'घाडगे अँड सून' by आदूबाळ
राणा आणि पाठकबै इज सो लास्ट
In reply to राणा व पाठक बाईंचा उल्लेख by पगला गजोधर
इंद्रवदन ...
In reply to राणा आणि पाठकबै इज सो लास्ट by आदूबाळ
घाडगे आणि सून मधल्या
In reply to हरकत नाय. आपण 'घाडगे अँड सून' by आदूबाळ
तिला बघून मला वत्स अॅपमधल्या
In reply to घाडगे आणि सून मधल्या by तेजस आठवले
त्या धाग्यावर हुच्चभ्रूंच्या "मी टू, मी टू" करत उड्या पडल्या
In reply to हरकत नाय. आपण 'घाडगे अँड सून' by आदूबाळ
आज जे लोकं* "हुच्चभ्रू एलिट
आर्चीची जुडवा बहीण मिर्ची आणि परश्याचा जुडवा भाऊ नरश्या
In reply to आज जे लोकं* "हुच्चभ्रू एलिट by पगला गजोधर
आयडियाची कल्पना चांगली वाटतें
In reply to आर्चीची जुडवा बहीण मिर्ची आणि परश्याचा जुडवा भाऊ नरश्या by चामुंडराय
मस्त लिहिलय !!
मस्त
मस्त
मस्त
त्रिवार धन्यवाद :)
मस्त!!!
हाहाहा!
एवढं कुजकटपणे का लिहिलंय ? तो
मलाही हाच प्रश्न पडलेला !
यावरून आठवले
In reply to मलाही हाच प्रश्न पडलेला ! by चामुंडराय
अपडेट-
In reply to यावरून आठवले by आनंदयात्री
गेऑथ्रो नाय ओ ..
In reply to अपडेट- by पगला गजोधर
आय्मायस्वार्रि
In reply to गेऑथ्रो नाय ओ .. by अभिदेश
ओके, ओके. I GOT IT.
In reply to गेऑथ्रो नाय ओ .. by अभिदेश
=))
In reply to मलाही हाच प्रश्न पडलेला ! by चामुंडराय