मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिसाद

घराच्या किंमतीत ३०% घट ? मदत हवी आहे

मीउमेश ·
मी महिन्या पूर्वी ठाण्यात हायलँड हेवन या ठिकाणी वन बीचके बुक केलाय, आता अश्या बातम्या येऊ लागल्यात कि घराच्या किंमती कमी होणार आहेत म्हणून काय करावे सुचत नाही. कृपया तज्ञ मंडळी कडून या विषयावर मदत हवी आहे. . घराची किंमत ५३ लाख + पार्किंग + २ वर्षाचा मेंटेनन्स + क्लब आणि इतर धरून ७४ लाखाला पडलाय. अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही, बुकिंग ८०-२० स्कीम मध्ये केलेले आहे. आता १४ लाख सुरुवातीला भरले आहेत. बाकी ६० लाख घर ताब्यात मिळाल्यावर २०१९. अजून बिल्डिंग चे काम सुरु झालेल नाही. काय करणे योग्य ठरेल; कृपया तज्ज्ञ मिपाकरानी आपले बहुमोल मार्गदर्शन करावे. धन्यवाद

अजय-अतुल लाईव्ह वगैरे...!

खेडूत ·
नुकताच अजिंठा महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी, अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात गाणे सुरु असताना मधेच ट्रॅक बंद झाल्याने गाणे थांबले आणि ही जोडी फक्त ओठ हलवत गाण्याचा अभिनय करत असल्याचे प्रेक्षकांना पहायला मिळाले. प्रेक्षकांना हा धक्का होताच, पण मोठ्ठ्या रकमेचे तिकीट घेऊन असे झाल्याने फसवणुकीची भावना झाली, आणि बरेच प्रेक्षक उठून गेले असे बातम्यांवरून समजते.

Please, Look After Mom!

शिव कन्या ·
Please, Look After Mom ही Kyung-sook Shin या कोरियन लेखिकेची कादंबरी नुकतीच वाचनात आली. कादंबरीच्या नावातच तिचा कथा विषय, आई, ठळकपणे सूचित होतो. खरंतर आई या विषयावर विपुल लेखन झालेले आहे.

बाप्पामुळे एकत्र आणलेली लोक मंडळांमुळे वेगळी तर झाली नाही आहेत ना ?????

सतिश२५१० ·
लहानपणी येणाऱ्या प्रत्येक मंदिरासमोर 3 -3 वेळा नमस्कार करून जाणारा मी , देवासमोर खूप खाबरून जणू त्याला मी केलेल्या सगळ्या लहान लहान चुकांची माफी मागून पुढे जात होतो .....शाळेतून घरापर्यंत येताना लागणाऱ्या प्रत्येक मंदिरासमोरून मागंन तेच असायचं फक्त त्या मध्ये जास्त कळकळ आणायचा प्रयत्न करायचो.

देह / अवयव दान - काळाची गरज

क्रेझी ·
कालच्या टाईम्स ऑफ इंडिया पेपरमधे मी ऑनलाईन ऑर्गन डोनेशन बद्दल वाचलं. खाली दोन साईट्स दिल्या आहेत जिथे जाऊन हे करता येईल www.dmer.org www.ztccmumbai.org काही विचारपूस करावयाची असल्यास हेल्पलाईन नंबर्स helpline numbers: 1800274744, 1800114770 मला ह्याबाबतीत बरंच कुतुहल आहे. मला माझे डोळे दान करायची इच्छा आहे पण मला चष्मा आहे तरी मी डोळे दान करू शकेन का? मध्यंतरी मी एके ठिकाणी वाचलं की, माणसाच्या शरिरातला प्रत्येक अवयव म्हणजे हृदय सुद्धा नविन पेशींनी तयार होतं, त्याला बराच काळ लागतो. पण डोळे हा एकच अवयव असा आहे की जो जन्मल्यापासून मरेपर्यंत आहे तसाच, त्याच पेशींनी बनलेला असतो.

धाक... दहशत

मन ·
दहिहंडी, गणपती दिवस जवळ येउ लागतात. कुणा महापुरुषाची जयंती आलेली असते. उरुस , जुलूसही मागे नसतातच. त्याच्या काळजात धस्स होतं. तो थबकतो. बिचकतो. नजर चोरुन खालमानाने अंग चोरुन चालू लागतो. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. उत्सवप्रिय जंतू आहे. हे त्याच्या मनी बिंबवलं जाणार असतं. डोक्यात शिरवलं जाणार असतं कानांचे पडदे फाडून. छाती हादरवणार्‍या डीजेच्या दणदणाटात ; आणि भल्या मोठ्या हेडलाइट्सच्या प्रकाशात तो घरी येतो. दारं खिडक्या गच्च बंद करतो. जमल्यास कानात कापसाचे बोळे. लाइट बंद करतो. बिचकलेला सामाजिक प्राणी मग खोल घट्ट कुट्ट अंधारात एकटाच दबून झोपू पाहतो. जीव मुठित धरुन.

YZ (परिक्षण दुरुस्ती)

तर्राट जोकर ·
(समीर_happy go lucky हे मिपावर नेहमी चित्रपट परिक्षण लिहित असतात. दर्जाच्या बाबतीत थोडंफार हुकत असले तरी त्यांची चिकाटी व आवड पाहून मला फार छान वाटले. त्यांच्या नुकत्याच आलेल्या http://misalpav.com/node/37050 ह्या वायझेड मराठी चित्रपटाच्या परिक्षणामधे बरेच काही खटकले. एक उत्तम चित्रपट परिक्षक होण्याची योग्यता असलेल्या लेखकास केवळ हुर्यो उडवून पळवुन लावावे हे मला योग्य वाटले नाही. त्यापेक्षा त्यांच्या परिक्षणातल्या खटकलेल्या बाजू वगळून, शब्दरचना सुधारून तेच परिक्षण संपादित केले तर कसे वाटेल अशी कल्पना मनात आली.

राँग नंबर (पार्ट -२)

मुक्त विहारि ·
भेंडी,आजची रात्र पण अशीच जाणार. सालं, मागच्या वर्षी पर्यंत ठीक होते पण, आता ह्यापुढे दरवर्षी हा दिवस त्रासदायकच ठरणार.इतर लोक आपापले वाढदिवस साजरे करत असतांना, आपण मात्र दरवर्षी ह्या दिवशी असेच कुढत बसणार. मागच्या वर्षी ह्याच रात्री, ती बिंधास्त पणे आपल्या बॉइज होस्टेल वर आली होती.येतांना पण एकटी नाही, फूल्ल तिच्या गँग समवेत.तिचा बाप तसा आमच्याकडे शेत मजूरच आणि गावच्या प्रथे प्रमाणे त्यांचे घर पण गावा बाहेरच. जन्मापासुनच ती आणि मी एकत्रच.अगदी बालवाडी ते शाळे पर्यंत.सुरुवाती पासूनच ती एकदम बिंधास्त अगदी आमच्या जातीत शोभेल अशी.धमाल करता-करता, मी पटकन तिला प्रपोज केले. आई शप्पथ कसली लाजली ती.

वादळचा उत्तरार्ध

मराठी कथालेखक ·
अलीकडेच रातराणीच्या कळते रे फॅनक्लबमध्ये सामील झाल्यावर त्यांच्या जुन्या कथाही वाचून काढल्यात आणि मग त्यांनी सुचविल्याप्रमाणे वादळ (शतशब्दकथा)चा उत्तरार्ध लिहण्याचे ठरवले. पण शतशब्दाच बंधन नाही घालून घेतलं. रातराणी .. बघा काही जमलंय का ? जास्त टाकावू वाटल्यास संमना धागा उडवायला सांगा बिनधास्त. --------------------------------------------------------------------- नेहाशी बोलून त्याने फोन ठेवला.

किती लौकर आज उजाडलं बाई

पाषाणभेद ·
किती लौकर आज उजाडलं बाई कानडाऊ योगेशू यांच्या या रचनेत रोमांचीत कल्पना आहे. सजणप्रेमाने व्याकूळ झालेली विव्हलता रेखाटली आहे. कुणाचे प्रेम रांगडे असते जसे एखादा जव्हेरगंज "जीव नांगरटीला आलाय" म्हणून हक्काने मागून घेतो किंवा एखादा अल्लड प्रेमाने भारून आपल्या प्रियतमेचे प्रियाराधन करण्यास संकोचतो.