विंडबकांच्या फळप्राप्तीसाठी युद्ध आमुचे सुरू
चिक्कु किंवा पेरु, चिक्कु किंवा पेरु !!
कविता आवश्यक विडबंनासाठी
कच्च्या मालावर अत्याचारासाठी
धावा कोणाचा करू, चिक्कु किंवा पेरु !!
आमुच्या थर्डक्लास काव्यप्रतिभेतुन
वाचे जी संपादकाच्या चाळणीतुन,
कोणाची कविता स्मरू, चिक्कु किंवा पेरू !!
विक्षिप्त,पुप्या,ममो ,रंगा अम्हास ठावे
थोर विडंबक औषधासही न गावे
कास कोणाची धरू, चिक्कु किंवा पेरू !!
प्रासंगिकही लेख न सापडे
पडलो धराशायी आम्ही बापुडे
एका जनार्दनी टारू , चिक्कु किंवा पेरू !!
ऊचलले दंडक संपादकानी रे सुहासा
पितृपक्षीय बाजे डंका,चाले तमाशा
बंद पडले बोरू, चिक्कु किंवा पेरू !!