आज ही दिवाळी तशीच आहे...

लेखनविषय:
काव्यरस
आज ही दिवाळी तशीच आहे... चार का होईना पण डबे आजही फराळाचे भरतात नऊ वाजता उठणारे एक दिवस का होईना पण चार वाजता उठतात आज ही दिवाळी तशीच आहे... डिओ,शाम्पू,बदामाच्या तेलानी जरी कपाटे भरली असली तरी मोती साबण आवर्जून घरी येतो अनारसे, करंजीचा नैवेद्य पूजेच्या थाळीत आजही सजतो आज ही दिवाळी तशीच आहे... थोडे फटाके सुद्धा वाजतात धुर सुद्धा होतो मातीच्या पणत्यांनी कानाकोपरा उजळतो फक्त आजच्याच दिवस हं!

घाटरस्ता, निसर्ग आणि मी

लेखनविषय:
नुकत्याच होऊन गेलेल्या वर्षावाला, निथळून टाकणारी हिरव्याकंच कांतीची गर्द वनराई. सकाळचे कोवळे ऊन पिऊन तजेलदार झालेली नवी पालवी. स्वच्छ धुऊन निघालेले, लाल मातीच्या चिखलावर, रेखीव छान वळणदार रांगोळीची जणू निळीशार रेघच असलेले रस्ते. त्यावरून वळणे घेत घेत मी निवांतपणे, आजूबाजूचा निसर्ग न्याहाळीत, मजेत आवडीचे गाणे गुणगुणत, घाटमाथ्यावर चढून जातो आणि, पुढे तसाच खाली उतरून जातो. दिवसभर राबायला, सिमेंटमध्ये वाळू, खडी मिसळायला. परत येताना पुन्हा तेच सारं. - संदीप चांदणे (मंगळवार, १३/०९/२०२२)

आठवणींचा पाऊस

लेखनविषय:
रात्रभर पडणारा पाऊस सकाळी नकोसा होतो कितीही हलका का असेना जेव्हा सतत बरसतो संध्याकाळी उदास वातावरणात मुसळधार कोसळतो तेव्हा नको त्या आठवणींचा पूर मात्र मनात येऊन जातो रात्र उदास जाण्याची चाहूल लागते मग रात्रभरचा पाऊस नकोसा होतो. - पाभे १३/०७/२०२२

आङळे वाङळें साहित्य संमेलन

आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

नकोच ते युद्ध नको

लेखनविषय:
नकोच ते युद्ध नको नकोच ते मृत्यू नको सहन न होणार्या वेदना नकोच नको पैशापायी जायी पैसा युद्धापायी भरडते जनता भावनेला घालती गोळी "युद्धच हवे" बोलतो वर नेता रणभुमीवर कुणी मारतो कुणी मरतो बाप, मुलगा, नवरा, भाऊ जातो घर दार कोसळूनी होते सुने नशीबी राही केवळ वाट पहाणे जमावात बातमी युद्धाची ऐकता विरश्री संचारून अंगी हाताच्या मुठी वळतसे परी कुणी एकच घरचा धारातिर्थी पडता युद्ध नको, युद्ध नकोच शब्द वदनी येतसे - पाषाणभेद ०२/०३/२०२२

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले अजूनी होते हवे ते परी न आता उरले उबदार किती ते वाटे गारठ्यामधे लेवून अंगी जणू चिलखत ते भासे कितीही संकटे आली जरी घाव वर्मी ते सोसतसे किती निगूतीने वस्त्र निर्माण केले उभे आडवे धागे प्रेमादराने गुंफले शिलाई नाजूक टाके अचूक रंग तयाचे भरदार असले या वस्त्राची मजबूत न तुटणारी विण कुणी न विणकर आता न विणणार भक्कम हाती नक्षीचा ठसा कोरला पुन्हा कधी न उमटे आधार होता किती नाही म्हटले तरी आठव तयाची राहील कायमची उरी न मिळणार कधी मायेचे पांघरूण ते कठोर काळाने हिरावले माझे बाबा देवाघरी गेले - पाषाणभेद ०९/०१/२०२२

माझे अन इतरांचे

लेखनविषय:
माझेच दु:ख मोठे का? इतरांचे दु:ख छोटे का? हातातले गमावले सारे काही त्यांनी तरी कमावले का? पर्वतासम संकटे आली हादरून मी गेलो, ते नाही का? जे गेले ते माझे होते इतरांचे काहीच नव्हते का? मानले माझे माझे, केले माझे माझे असेच असते इतरांचेही, नव्हे का?

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

काव्यरस
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?
Subscribe to आठवणी