पाककृती
मेथी उडीद वड्यांची भाजी
मेथी उडीद वड्यांची भाजी हे नाव ऐकून काही विचित्र वाटेल, पण आज सकाळी हीच सौच्या कृपेने खायला मिळाली. अत्यंत स्वादिष्ट लागल्यामुळे ही कृती इथे देत आहे. कालपासून दिल्लीत थांबून थांबून पाऊस पडत आहे. १५ मार्च झाला तरी रात्री रजई अंगावर घ्यावी लागते आहे. सकाळी ढगाळ वातावरण होते. सौ. मेथी निवडत होती.
ऑरेंज तिरामिसु
तिरामिसु हे एक सर्वांचे आवडते इटालियन डेझर्ट.. तिरामिसु चा अर्थ 'पिक मी अप' ..आणि खरंचच तिरामिसु पाहिले की त्याला पिक करायचा अनिवार मोह (वाढत्या वजनाची,साखरेची तमा न बाळगता )होतोच,
ह्या वेळी नेहमीच्या तिरामिसुत थोडा बदल केला आणि एक अफलातून तिरामिसु व्हर्जन जन्माला आले.. :)
तर हे ऑरेंज तिरामिसु खास तुमच्यासाठी-
साहित्य-
कच्च्या पपई चे पौष्टिक थालीपीठ
लहान मुलांना जेवणात विविधता दिली कि ते खाण्यासाठी जे त्रास देतात तो देत नाहीत (स्वानुभव आहे) .
कच्ची पपई सलाड साठी आणली होती पण काही न काही कारणाने सलाड बनवायचे राहून जात होते.
मग वीकेंडला वेगळ काही तरी कराव म्हणून फ्रीज उघडला तर पपई समोर दिसली मग ठरवलं काहीतरी नवीन करून पहाव आणि मग सुचल कि थालीपीठ करून पहाव .
आख्खा मसुर
मला खुप आवडतो म्हणून शिकलो कराडचा स्पेशल
"आख्खा मसूर"
साहित्य :- भिजवून फुललेले मसूर दीड वाटी (साधारण अर्धी-पाऊण वाटी कोरडे भिजवावे लागतील, ७-८ तासांसाठी)
एक मोठा कांदा - बारीक चिरून
एक मध्यम टोमॅटो - बा.चि.
टोमॅटो प्युरे - दोन मोठे चमचे
कांदा-लसूण मसाला - तिखटाच्या आवडीनुसार
हिंग, हळद, मोहरी - फोडणीसाठी
तेल, मीठ
मुर्गवाला साग
खूप दिवसांनी पाकृ घेऊन येते आहे.मुर्गवाला साग अर्थात पालकातली कोंबडी.. ह्याच्या अनेक रेसिप्या आहेत,(जमेल तशा त्यातल्या इतरही देईन..) त्यापैकी ही एक एव्हरग्रीन रेसिपी..
सागरी सुका मेवा (लेखासहीत)
डोक्यावर टोपली, हातात एक हिरवा पाला असलेली छोटीशी फांदी, पायात कधी चप्पल नाहीतर अनवाणी, कोळी पद्धतीचे काष्टी पातळ नेसलेली आणि कानात मोठ्या गाठ्या प्रमाणे म्हणा की मोठ्या कोलंबीप्रमाणे असलेले कानातले, त्याच्या वजनाने आपली करंगळी जाईल इतपत कानाच्या पाळीला पडलेले होलामुळे कानाच्या पाळीसकट लोंबणारे तिचे गाठी कानातले अशी रूप असलेली एक कोळीण आजी माझ्या आजीची मैत्रीण होती.
ब्रोकोली ग्रातिन
ग्रातिन हा फ्रेन्च खाद्य संस्कृती मधला एक खास प्रकार. फ्रेन्च पदार्थांचं आपलं असं एक खास स्थान आहे जागतिक खाद्यदालनात. एक मंद सुगंध, त्यात प्रत्येक घटक आपली नजाकत घेऊन हजेरी लावणार आणि या प्रत्येकाची चव वेगवेगळी, हळूच जिभेवर घोळणारी तरी ही एकत्रित एक राजस परिणाम साधणारी. या सगळ्या वैशिष्ट्यांनी ग्रातिन पण नटलं आहे.
मश्रुम्स विथ गार्लिक सॉस/डिप (Sautéed Mushrooms with Garlic Sauce)
जर्मनीतील नाताळच्या मार्केट्स मध्ये मिळणारा चटपटीत असा हा खाद्यप्रकार. कडाक्याच्या थंडीत हे मश्रुम्स, सोबतीला ब्रेड आणि ग्लुवाईन हे कॉम्बिनेशन म्हणजे निव्वळ सुख. याचे मूळ जर्मन नाव Champignons mit Knoblauchsoße. Champignons म्हणजे मश्रुम्स आणि Knoblauchsoße म्हणजे लसूण, दही, क्रीम यापासून केलेला एक डिपचा प्रकार. नाताळ मार्केट्सच्या स्टॉल्स वर बघून कसे करतात याचा अंदाज आला होता, सोप्पा वाटला.
प्रेमदिन स्पेशल - व्हेरी बेरी चॉकलेट कप्स
प्रेमदिनानिमित्त चला एक सोपी डिझर्ट पाककृती करुया :)
साहित्यः
भाज्यांचे लोणचे
दिल्लीत फेब्रुवारी महिना सुरु होताच वादळ आणि धुक्याचे राज्य संपते. सूर्याचे तेज जाणवू लागते. या मौसमात बाजारात भाज्याही भरपूर असतात. भाज्यांचे लोणचे घालण्यासाठी हा मौसम आदर्शाच. दरवर्षी सौ. या मौसमात भाज्याचे लोणचे एक- दोनदा तरी घालतेच. गेल्या रविवारी भाज्यांचे लोणचे घातले होते. त्याचीच कृती.
साहित्य:
दिल शाबूदाणा वडे
मी मिसळपाव ची silent observer (मराठी शब्द??) आहे..
बर्याच पाककृती येत आहेत.. म्हंटल आपणही एखादी पाककृती इथे टकवावी.
शाबूदाणा वडा ……!!!!
नवर्याला खुष करण्याचा मार्ग पोटातून जातो . मग त्याला खुश करण्यासाठी
बनवले
****दिल शाबूदाणा वडे ****
असाही आत्ता फेब्रुवारी उजाडलाच आहे .♡♡♥♥
साहित्य :-
मुळ्याची पालेभाजी
मिपावर बरेच जण पाकृ टाकतात. मग "आम्हीच का मागे रहावे ?" असे आम्हाला सारखे वाटत राहिले तर त्यात नवल काय ?
याच मेंदूभृंगाने छळल्यामुळेच केवळ घरात नेहमी आवडीने केली जाणारी आमच्या आवडीची मुळ्याची पालेभाजी जरूर सर्व त्या साभार अनुमत्या-परवानग्या घेऊन टाकत आहे. यात धाग्यात आमचा हक्क फक्त भारवाही हमालाचा आहे असे आम्ही अगोदरच झायीर करत आहोत, गैरसमज नसावा. :)
बिशी बेले भात
साहित्य : १ वाटी तांदूळ, १ वाटी तुरडाळ ,वांगे १ ,टोमाटो १,कांदा १,फरसबी ,गाजर,वाटाणा,लाल भोपळा आपापल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता .तेल ५-६ चमचे ,मीठ चवीनुसार ,चिंचेचा कोळ १ चमचा ,शेंगदाणे आवडीप्रमाणे ,४-५ कढीपत्त्याचे पाने, कोथिंबीर,सुक्या लाल मिरच्या २,पाणी आणि सर्वात महत्वाचे एम .टी.आर चा बिशी बेले मसाला ३ चमचे .
चायनीज भेळ
लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पाव किलो कोबी
चायनीज शेव - मला वाटले होते हे मैद्याचे असेल. पण पाकिटावर चक्क तांदळाची चकली असे लिहिले आहे.
चटणीसाठी - लाल टोम्याटोचा कीस , कांद्याचा कीस , शेजवान चटणी , टोम्याटो सॉस , थोडे तेल , मीठ , लाल तिखट
- ‹ previous
- 32 of 122
- next ›