कच्च्या पपई चे पौष्टिक थालीपीठ

सुघोषा's picture
सुघोषा in पाककृती
4 Mar 2015 - 6:32 pm

लहान मुलांना जेवणात विविधता दिली कि ते खाण्यासाठी जे त्रास देतात तो देत नाहीत (स्वानुभव आहे) .
कच्ची पपई सलाड साठी आणली होती पण काही न काही कारणाने सलाड बनवायचे राहून जात होते.
मग वीकेंडला वेगळ काही तरी कराव म्हणून फ्रीज उघडला तर पपई समोर दिसली मग ठरवलं काहीतरी नवीन करून पहाव आणि मग सुचल कि थालीपीठ करून पहाव .
खूप सोपी आणि पटकन होणारी पाककृती आहे आणि तितकीच खमंग व खुसखुशीत.

साहित्य :

  1. कच्ची पपई लहान आकाराची १
  2. लसुन पाकळ्या २-३
  3. हळद १ चमचा
  4. हिंग १/२ चमचा
  5. ओवा १ चमचा
  6. जीरे १ चमचा
  7. हिरवी मिरची किंवा लाल तिखट ऐच्छिक आहे . (माझ्या लहान मुलासाठी म्हणून मी तिखट वापरले नाही .)
  8. मीठ चवीनुसार
  9. बाजरीचे पीठ १ bowl (ज्वारीचे घेतले तरी चालेल )
  10. बेसन पीठ १/२ bowl
  11. गव्हाचे पीठ १/४ bowl

कृती :
1
प्रथम कच्ची पपई व लसूण खिसुन घेणे .
2
त्यात वरील सर्व साहित्य घालून चांगले मळून घेणे .
3
4
5
अगदी थोडसच पाणी लागत मळताना .
नंतर तव्यावर थालीपीठ थापून घेणे .
6
वरतून थोडस तेल सोडणे .
7
खमंग भाजून घेणे .
8

टोमाटो सौस किंवा दही किंवा हिरवी चटनी सोबत गरमा गरम सर्व करणे .
लहान मुलच नाही तर मोठे सुद्धा आवडीने गट्टम करतील .
9

प्रतिक्रिया

रेवती's picture

4 Mar 2015 - 6:51 pm | रेवती

पपई सालासकट किसलीत ना? थालिपिठाचा हा नवीन प्रकार वाटतोय. फोटू देण्याचा प्रयत्न स्तुस्त्य आहे. हिरव्या चटणीची ह्रदये कशी तयार केलीत? फ्रोझन आहेत का?

स्पा's picture

4 Mar 2015 - 7:11 pm | स्पा

टेस्टी दिसतय

सुघोषा's picture

4 Mar 2015 - 7:34 pm | सुघोषा

हो सालासकट च खिसली आहे.हिरवी chutny घरी बनवून फ्रोज केलेली आहे

रेवती's picture

5 Mar 2015 - 6:18 pm | रेवती

आयडिया छान आहे.

विवेकपटाईत's picture

4 Mar 2015 - 7:59 pm | विवेकपटाईत

मस्त पदार्थ. पपईचे धिरडे सुद्धा मस्त लागतात.

सूड's picture

4 Mar 2015 - 8:20 pm | सूड

आवडल्या गेले आहे, पुरणपोळ्यांवर उतारा म्हणून करण्यात येईल.

सविता००१'s picture

5 Mar 2015 - 9:57 am | सविता००१

सुरेख.

त्रिवेणी's picture

5 Mar 2015 - 11:00 am | त्रिवेणी

नक्की करुन बघणार.

उमा @ मिपा's picture

5 Mar 2015 - 3:39 pm | उमा @ मिपा

पाकृ आणि फोटो दोन्ही मस्त!
चटणीची हृदये आयडिया आवडली.

कोंबडी प्रेमी's picture

5 Mar 2015 - 5:10 pm | कोंबडी प्रेमी

वाटते आहे ...खाऊन पहिले जाईल

करुन बघते. छान पाकक्रूती.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Mar 2015 - 9:24 pm | अत्रुप्त आत्मा

शुंदल!

सानिकास्वप्निल's picture

5 Mar 2015 - 9:58 pm | सानिकास्वप्निल

पाककृती आवडली आहे :)
फोटो ही छान आहेत.

मधुरा देशपांडे's picture

5 Mar 2015 - 10:05 pm | मधुरा देशपांडे

पाकृ आणि फोटो आवडले.

स्रुजा's picture

5 Mar 2015 - 10:42 pm | स्रुजा

मस्त पाकृ. आणि चटणीची आयडिया तर फार च छान. नक्की करून बघणार.

रुपी's picture

6 Mar 2015 - 4:51 am | रुपी

थालीपीठ छान दिसत आहे!

छान पदार्थ ...करून पाहण्यात येईल ..येथे बघून पहिल्यांदाच हिरवी चटणी फ्रोजन केली आहे ..मस्त जमलीये हवी तेव्हा कशात हि वापरता येतीये ..धन्यवाद !

विजय पिंपळापुरे's picture

18 Mar 2015 - 1:14 pm | विजय पिंपळापुरे

कच्ची पपई खिसुन साबूदाणा खिचड़ीत पण घालतात.

उपवासाचे थालीपीठ करताना साबूदाणात पण कच्ची पपई खिसुन घातली तर चांगली लागते.

दिपक.कुवेत's picture

15 Jul 2015 - 12:26 pm | दिपक.कुवेत

आजच सकाळी बायकोने नाश्त्याला केली होती. अप्रतिम झाली. फक्त मी पपई सालासकट किसली नाहि...साल मला जरा कडवट लागलं म्हणून. शीवाय तुम्ही दिलेल्या साहित्यात थोडा बदल करुन त्यात आलं/मिरची पेस्ट, बारीक चीरलेली कोथींबीर, १ चमचा तीळ, २ चमचे बेसन आणि मावेल तेवढं तांदूळाचं पीठ घालून तेलावर खरपूस भाजली. आलं घातलेल्या चहाबरोबर हादडल्याने फोटो काढायचे विसरलो. नाश्त्याच्या लिस्ट मधे अजून एक पदार्थ अ‍ॅड झाला याचा आनंद आहे. खुप खुप धन्यवाद.