पीयूष

प्रमोदताम्बे ..........................................'s picture
प्रमोदताम्बे ..... in पाककृती
31 Jan 2015 - 8:48 pm

पीयूष

साहित्य : सहा कप घट्ट व गोड मलईचे दही , एका लिंबाचा रस , दहा चमचे साखर , छोटा अर्धा चमचा जायफळाची पूड , चिमुटभर पिवळा खायचा रंग , छोटा अर्धा चमचा मीठ.
कृती : दही, साखर, जायफळ पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पिवळा रंग एकत्र करुन त्यात साधारण ३ वात्या दूध व २वाट्या पाणी घालुन पातळ करणे व मिश्रण साखर विरघळेपर्यंत चांगले घुसळणे व थंड करून प्यायला देणे.
लिंबाची एकदम चांगली चव येत असली तरी बर्‍याचवेळा लिंबाच्या कवटपणामुळे पियुषही कडू होते म्हणून १/२ चमचा व्हिनेगर वापरले तर कडूपणा येत नाही आणि चव पण एकदम बरोबर येते.

प्रतिक्रिया

जेपी's picture

31 Jan 2015 - 9:01 pm | जेपी

अरे वा !!
आमच्या सरजींचा आवडता पदार्थ ,स्वॅप करुन पाहिला पाहिजे.

पैसा's picture

31 Jan 2015 - 9:46 pm | पैसा

डिट्टेल पाकृ!

हेच का ते जगप्रसिद्ध पीयुष!

सस्नेह's picture

31 Jan 2015 - 9:53 pm | सस्नेह

हे क्काय पैतै, जग हे 'पु' ने सुरू होऊन 'पी'त संपते हे तुला सांगायची वेळ यावी ना *wink*

टवाळ कार्टा's picture

31 Jan 2015 - 9:56 pm | टवाळ कार्टा

तुम्चे आडनाव फेमस आहे हं मिपावर... :D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 10:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=)) नुस्तं फेमस? कल्ट आहे ना?

टवाळ कार्टा's picture

31 Jan 2015 - 10:11 pm | टवाळ कार्टा

अर्रे...नवीन असेल तर आधीच घाब्रेल ना...हळू हळू आत घ्यायचे ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 10:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

मुक्त विहारि's picture

31 Jan 2015 - 10:42 pm | मुक्त विहारि

असे असते काय हे पीतुष?

हे म्हणजे श्रीखंडाच्या पाण्या सारखेच दिसत आहे.

चव पण तशीच लागत असेल का?

मला खूपच आवडते. आता बनवून पण बघते.
खूप सोपी आहे रेसिपी.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jan 2015 - 11:54 pm | अत्रुप्त आत्मा

मी असं ऐकलवतं की,
श्रीखंडाचं (संपलेलं..) भांडं विसळून जे पाणि-मिळतं...त्याला पी-यूष असं म्हणतात. ;)

...त्याला पी-यूष असं म्हणतात."

+ १...

मी पण असेच ऐकुन असल्याने, ह्या पेयाच्या चवी पासून दूरच आहे.

दिपक.कुवेत's picture

1 Feb 2015 - 12:15 am | दिपक.कुवेत

आपल्याला जाम आवडतं हे पीयूष पण ते चील्ड पीण्यातच मजा आहे. पण करण्याची हि पद्धत योग्य आहे का? म्ह्णजे दहि वस्त्रगाळ करुन मग त्यात पाणी, साखर आणि बाकि घटक अ‍ॅड केल तर जास्त चांगलं लागेल ना? शीवाय दुधात लिंबु किंवा व्हिनेगर घालून दुध फाटणार नाहि??

सुहास झेले's picture

1 Feb 2015 - 3:13 am | सुहास झेले

मला ही प्रचंड आवडते पियुष ..पण त्यात लिंबू, व्हिनेगर?

घ्या पणशीकरांची रेसिपी...
.
.

म्ह्णजे दहि वस्त्रगाळ करुन मग त्यात पाणी, साखर आणि बाकि घटक अ‍ॅड केल तर

मी हीच रेसिपी पाह्यली होती. सुती कापड पातेल्यावर बांधून त्यावर थोडं थोडं दही हातानं फेसायचं. ते वस्त्रगाळ होऊन पातेल्यात पडलं की परत तीच पद्धत. त्यांनी पाण्याचं प्रमाण पण सांगितलं होतं ते मी विसरलो. सगळं दही असं फेसून झालं की मग साखर, जायफळ (वेलदोडे नाही)पूड, केशर आणि पाणी घालून पुन्हा नीट फेटून घ्यायचं आणि थंड करुन सर्व्ह करायचं.

पैसा's picture

3 Feb 2015 - 8:57 pm | पैसा

पात्तळ केलेलं श्रीखंडच की रे! पुन्हा पाणी घालायचं असेल तर मग त्याचा चक्का कशाला करायचा म्हणते मी! तसा हा लस्सीचा भाऊच दिसतोय!

काय की!! आवडतं एवढं खरं!! बदलापूरात काटदर्‍यांकडे आणि ठाण्याला गोखलेत, असलं तर चुकवत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

8 Mar 2015 - 3:59 am | प्रभाकर पेठकर

>>>>पुन्हा पाणी घालायचं असेल तर मग त्याचा चक्का कशाला करायचा म्हणते मी!

दह्यातल्या पाण्यात आंबटपणा असतो. तो काढून टाकून साध पाणी (जे आंबट नसतं) त्यात मिसळलं की पियुष आंबट लागत नाही.

पियुषाबद्दल अनेक वदंता ऐकल्याने त्याच्या वाटेला कधी गेले नाही. तुमची कृती वेगळी दिसतिये.

सानिकास्वप्निल's picture

1 Feb 2015 - 10:43 pm | सानिकास्वप्निल

असेच म्हणतेय

सिरुसेरि's picture

1 Feb 2015 - 6:51 pm | सिरुसेरि

पियुष हे पेय जास्ती करून दादर मधल्या hotels मध्ये मिळते . त्या मानाने पुण्यात व इतर ठिकाणी जास्त मिळत नसावे .

किसन शिंदे's picture

1 Feb 2015 - 10:31 pm | किसन शिंदे

ठाण्यातल्या गोखलेतही अफाट पियुष मिळते.

सूड's picture

2 Feb 2015 - 2:36 pm | सूड

अफाट

अप्रतिम म्हणायचंय का? इथले एक सदस्य कोणत्याही गोष्टीला अफाट म्हणतात त्याची छाप पडल्यागत वाटली.

किसन शिंदे's picture

3 Feb 2015 - 6:33 pm | किसन शिंदे

जे काय म्हणतात ते हो म्हाग्रु. :D

अर्रर्र!! अपमान करायचाच असेल तर दुसरा शब्द वापर बे!! हे म्हाग्रु ऐकण्यापेक्षा होरेत उडी मारलेली बरी !! ;)

आदूबाळ's picture

5 Feb 2015 - 1:05 pm | आदूबाळ

होरेत उडी मारलेली बरी

क्या बात! एकदम तुंबाडचे खोत आठवले.

माझीही शॅम्पेन's picture

8 Mar 2015 - 10:52 pm | माझीही शॅम्पेन

ठाण्यातल्या गोखलेतही अफाट पियुष मिळते.

किस्ना एकदा कुटीर उद्योग (कौपिनेश्वरा शेजारी) पियुन पहा … एकदम जबरदस्त , ढासू , आजुबाजुनी कधी गेलो तरी आपोआप पाय तिकडे वळतात

जे जे लोक पियुषला श्रीखंडाचे पाणी म्हणतात त्यांनी नक्की पियुन पहावे

बोका-ए-आझम's picture

1 Feb 2015 - 11:02 pm | बोका-ए-आझम

दादरमधल्या या तिन्ही ठिकाणी पीयूष मिळते. रसिकांना प्रकाशचे जास्त आवडते असा अनुभव आहे. विशेषतः एक साबुदाणा वडा आणि मिसळ चापल्यावर पीयूष आपोअाप मागवले जाते आणि मग फक्त मराठी माणसाला देता येते अशी मस्त ढेकर येते!

विजय पिंपळापुरे's picture

2 Feb 2015 - 1:45 pm | विजय पिंपळापुरे

पुण्यात मस्तानी फेमस आहे.

चाणक्य's picture

8 Mar 2015 - 1:13 pm | चाणक्य

अत्यंत पोटेंशिअल असलेला प्रतिसाद...

जागु's picture

2 Feb 2015 - 2:37 pm | जागु

मस्त.

विनटूविन's picture

5 Feb 2015 - 12:43 pm | विनटूविन

छानच आहे

जागृती अ. घाडीगांवकर's picture

24 Feb 2015 - 4:16 pm | जागृती अ. घाडीगांवकर

माझ्या आईला पीयूष खूप आवडत. धन्यवाद रेसिपीसाठी.

अय्याऽऽऽऽ!! कित्ती छाऽऽऽन!!

सस्नेह's picture

24 Feb 2015 - 5:00 pm | सस्नेह

नक्की कोण छाऽऽऽन ..??

सूड's picture

24 Feb 2015 - 6:12 pm | सूड

ओळखा पाहू!! ;)

जागृती अ. घाडीगांवकर's picture

5 Mar 2015 - 6:45 pm | जागृती अ. घाडीगांवकर

सांगाल का मला...

श्रीरंग_जोशी's picture

8 Mar 2015 - 5:37 am | श्रीरंग_जोशी

मदत -मिपावर फोटो चिकटवणे

पाकृ रोचक दिसत आहे. पीयुषबाबत खूप ऐकले आहे. पण आजवर आस्वाद घेण्याची संधी मिळाली नाही. जनसेवामध्ये जाऊन पिणार होतो पण दुर्दैवाने ते नाही राहिले.

प्रभाकर पेठकर's picture

8 Mar 2015 - 3:16 pm | प्रभाकर पेठकर

पियुष अनेक ठिकाणी फार उत्कृष्ट मिळते. नक्कीच मिळत असणार कारण ते बनविणे फारसे कौशल्याचे नाही. पण पियुषाची सुरुवात मुंबईत दादर स्थानकासमोर श्री. पणशीकरांनी केली. आमच्या मनात त्यांच्या पियुषाची चव ही पुलंच्या 'यमीपेक्षा सातपट गोरी' अशी आहे. प्रत्येक पियुषाची चव 'त्या' पियुषाशी तुलना करूनच चांगली/वाईट किती चांगली वगैरे ठरविले जाते. असो.
पणशीकरांकडे साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, पियुष आणि चॉकलेट बर्फी हे माझे आवडते पदार्थ होते.

बॅटमॅन's picture

26 Mar 2015 - 5:59 pm | बॅटमॅन

पीयूषच्या इतिहासाबद्दल धन्यवाद. मटार करंजीबद्दलही अशी माहिती शेअर करावी ही विनंती. कारण हाही पदार्थ तितका कॉमन नाहीये.

पियुष छान झाले. लिंबाची चव चांगली आली (कमी घालणे). धन्यवाद रेसिपीसाठी.

सस्नेह's picture

26 Mar 2015 - 12:13 pm | सस्नेह

कायरा
सदस्यकाळ 1 day 9 hours
एव्ढ्यात एक पाकॄपण करून झाली ? ;)

श्रीरंग_जोशी's picture

26 Mar 2015 - 4:51 pm | श्रीरंग_जोशी

सदस्यत्व घेण्यापूर्वी अनेक लोक मिपावर वाचमात्रपणे पडिक असतात. मी पण असायचो. फक्त सक्रीय झाल्याखेरीज अनेक खाचाखोचा कळत नाहीत हे मात्र खरं.

त्यांनी प्रतिक्रिया देण्यापुरता आयडी घेतलेला असू शकतो.