पाककृती
खान्देशी भरीत
बहुतेक आपल्या मिपावर आधीही आली आहे याची पाककृती.
पण म्हटलं मिपा आहे घरच तर होवु दे खर्च. आता अपर्णा ताई आणि मितान सारखे रसाळ वर्णन करून लिखाणाची माझ्याकडे प्रचंड कमतरता असल्याने आपली साधी सरळ डायरेक्ट पाककृतीच देते.
साहित्य-
भरताची वांगी(हिरवी) – 1 किलो,
कांद्याची पात – अर्धी जुडी,
लसूण+ मिरची पेस्ट- आपापल्या पचनशक्तीचा अंदाज घेवुन,
शेंगदाणे—1 वाटी,
उकडशेंगोळे
काल गप्पा मारताना मी उकडशेंगोळे केलेत म्हणाले तर प्रश्न आला म्हणजे काय ? हा मराठवाड्यातला एक वन
डिश मील का काय म्हणतात तसला पदार्थ. इतरत्र शेंगोळे म्हणून करताना कोणी कुळिथ तर कोणी नाचणीचं पीठ
वापरतात. हे शेंगोळे नुसते वाफवुन मग कमी तेलावर परतून कोरडेही खाता येतात. थालिपिठाची पिल्लंच म्हणा ना.. !
पोटभरीचा पदार्थ म्हणून करताना तो असा वरणफळाच्या स्टाइलने करतात.
बाभळीच्या काट्यांची उसळ
इथे एका पेक्षा एक पाककृती टाकून लोकांना आनंदी करणाऱ्या सगळ्यांची माफी मागून . .
करा! करा!! करा!!! क्रापाव राईस!! (अ थायी राईस!)
हॅप्पी न्यु इयर मिपाकर्स!! हॅप्पी न्यु इयर!!
करु करु म्हणत, गेल्यावर्षी मागे राहिलेल्या सगळ्या गोष्टी आता पूर्ण करायच्याच असं मनोमन ठरवुन, मी या वर्षी गेल्या वर्षीची आणखी एक गोष्ट पुरी करतेय.
निमोना
काल चतुर्थीचा उपास सोडण्यासाठी निमोना, पुर्या आणि सुधारस असा बेत होता. त्यातल्या निमोनाची पाकृ देतेय खाली. ही पाकृ कांदा-लसूण विरहित आहे त्यामुळे उपास सोडायला चालली. Smile
मला ही माझ्या एका उ.प्रदेशीय मैत्रिणीने दिली. अफलातून होते. आणि थंडीच्या दिवसातच ही करतात कारण मटार सुरेख आलेला असतो.ती याला व्रत का खाना म्हणते. Smile
तर चला- करूया निमोना.
मिक्स व्हेज सूप (सध्या उपलब्ध भाज्यांचे)
मेथी कोथींबीर इत्यादी काही भाज्यांचे बाजारभाव उत्पादन खर्चा पेक्षा खाली पडताहेत हि बातमी दै सकाळमध्ये वाचली. अशा बातम्या सहसा वाचून सोडून द्यावयाच्या असतात तशी मी वाचून सोडून दिली होती, कारण शेतकर्याला किंमत कोसळते पण शहरातील ग्राहकाला त्याचा लाभ होतो असे नाही. पण काल जवळच्या भाजीमंडईतील एक भाजीवाला पावला आणि बातमीतल्या भाज्या अपेक्षेपेक्षा बकळ रिझनेबल मिळाल्या.
हुरड्याचे थालीपीठ
यंदाच्या हिवाळ्यात गावी जाऊन मस्त हुरडा खाऊन झालाय ,आणि आता येथे मुंबईत परत आल्यावर नवऱ्याला एका ठिकाणी ताजा कोवळा हुरडा दिसला मग तो घेऊन आला ,आता नुसताच भाजून खाण्यापेक्षा त्याचे काहीतरी वेगळे बनवावे असा विचार आला .मग थोडी शोधमोहीम केली आणि त्याचे थालीपीठ बनवले .अप्रतिम चव होती .पहिल्यांदाच बनवले आणि चांगले झाले .पुन्हा बनवते वेळी यात आवश्यकतेप्रमाणे काही बदल करू शकते असे वाटले .तूर्तास आज बन
व्हेज बिर्याणी
खरेतर भाताच्या या प्रकाराला व्हेज बिर्याणी म्हटले पाहिजे असे काहि नाहि. रेसिपी बिर्याणीची आहे, पण मी माझ्या पद्धतीने त्यात थोडे फ़ेरफ़ार केले आहेत.
साहित्य:
भातासाठी:
१. २ वाटी बासमती तांदुळ,
२. १ वाटी फ़ुलकोबी
३. १ किसलेले गाजर,
४. १/२ वाटी मटार,
५. २-३ फ़रसबी तोडुन त्याचे तुकडे करुन घ्या
६. १/२ बटाट्याचे तुकडे
ओला मसाला:
टोमॅटो राईस
साहित्य
2 वाटया बासमती तांदुळ
5 मिडियम टोमॅटो प्युरी करून
2 मोठे कांदे
3 मिरच्या
आलं लसूण पेस्ट 2 मोठे चमचे.
साजूक तूप 1/2 वाटी
पाव वाटी काजू
मीठ
साखर
आल्याचे लोणचे
आल्याचे लोणचे
साहित्य
पाव किलो आले
10 मोठी लिंबे
शेंदेलोण , पादेलोण .- चवीपुरते
चवीपुरती साखर
कृती
आल्याची साले काढून ते किसून घ्यावे. नंतर त्यात बाकी सर्व गोष्टी मिसळा. लिंबाचा रस घालून एकत्र करावे. नंतर त्यात अधूनमधून लिंबाचा रस घालता रहावे.
पित्ताचा त्रास असेल तर खूप गुणकारी. उलटी झाली तर चाटवा.
तोंडाला लगेच चव येते.
वांगे पावटे भाजी
साहित्य ..
हिरवी वांगी पाव किलो , पावटे पाव किलो
तेल , मोहरी , जिरे , हळद
एक कांदा , एक टोमॅटो , लसूण पाकळ्या , कढीपत्ता. कांदा व टोमॅटो किसुन घ्यावे.
तिखट , मीठ , गूळ , गरम मसाला / भाजी मसाला
दोन चमचे दही.
-------------------------------------------
कृती..
पावटे उकडुन बाजुला ठेवावेत.
नवलकोलची भाजी
साधारणपणे भात कापणीनंतर कोकणात लाल माठ, मुळा, नवलकोल, गावठी मिरच्या इत्यादी भाज्या लावल्या जातात. याच सिझनला त्या मिळतात. ज्यांनी नवलकोलची भाजी पाहिली नाही, त्यांच्यासाठी हा फोटो आंतरजालावरून साभार.
फोडणीचे खमंग डोसे
मिठ
१ वाटी तांदळाचे पिठ
अर्धी वाटी रवा
पाऊणवाटी दही
फोडणीसाठी :
१ चमचा राई/मोहरी
१ चमचा जीरं
२ मिरच्यांचे तुकडे
थोड कढीपत्ता
फोडणीच्या गरजेनुसार तेल
बदाम एक्का
खूप दिवसांपासून नवीन पदार्थ करण्याचे डोक्यात घोळत होते. आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो पदार्थ बनवला आणि झक्कास जमून आला. त्याला आम्ही नाव दिले बदाम एक्का. हा पदार्थ heavy duty dessert या विभागात मोडेल. तर पाहूया त्याची कृती.
साहित्य: (१० जणांसाठी)
गाजर -खोबऱ्याचे लाडू (carrot coconut ladoo)
साहित्य : गाजर अर्धा किलो ,डेसिकेटेड कोकोनट १ वाटी ,साखर अर्धी वाटी ,condensed milk अर्धी वाटी ,मिल्क पावडर २० ग्राम,साजूक तूप ३ चमचे सजावटी साठी बदाम .
शेजवान बिट्टे
साहित्य :
१ बिट्टे करण्यासाठी : १ वाटी कणीक , पाणी , तेल किंवा तूप
२ बाजारात मिळणारी शेजवान चटणी
३ दही : अर्धी वाटी.
चपातीसाठी मळतो तशी कणीक मळुन घ्यावी.
त्याचा गोळा करुन पोळपाटावर एक चपाती लाटावी.
त्याला तेल किंवा तुप लावावे आणि बाकरवडीला करतात तसा रोल करावा. रॉल थोडा दाबुन करावा म्हणजे त्याचे थर सुटणार नाहीत.
पांढरा रस्सा
खर तर पांढरा रस्सा म्हटल की कोल्हापूर डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. कोल्हापूरी स्पेशल मेनू मध्ये गणला जाणारा हा पांढरा रस्सा आणि सोबत असणारा तांबडा रस्साही नाव काढल्याबरोबर अगदी तोपासु होत. कोल्हापूरात ह्यासाठी लागणारे मसाले खास गिरणीत दळून आणतात असे ऐकले आहे. कोल्हापूरकर ह्यावर अजून माहीती देतीलच. माझ्या वाचनात ही रेसिपी आली आणि ती करून मी करून पाहीली. फारच झ्याक (टेस्टी) लागला हो.
- ‹ previous
- 33 of 122
- next ›