रेकी करताना आलेले अदभुत्,अविश्वसनीय्,अनाकलनीय अनुभव.

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
5 Jul 2017 - 11:59 pm

मी रेकीची 'लेवल १' ही दीक्षा घेतली आहे.रेकी हे एक विज्ञान आहे असे मी मानतो,रेकीला मी कुठल्याच देवाशी कींवा धर्माशी जुळत/जोडत नाही.आता सरळ अनुभव लिहतो.ईथे मी फक्त प्राण्यांसंबधीत आलेले अनुभव लिहत आहे.

१) सोनु व ढींगण्या :

माझ्या पाळलेल्या पोपटांपैकी नर म्हणजे सोनु.त्याच्याकडे माझे दुर्लक्ष होतेय असे वाटले म्हणुन खुप दीवसांनी पिंज-याजवळ जाउन पिंज-यात हात टाकुन त्याच्यापाठीवर रेकी देउ लागलो.रेकी माझ्या ह्रदयातुन हातात व हातातुन त्याच्यापाठीवर जात आहे असे जाणवत होते.सोनु खुप दीवसाने मी हात फीरवत आहे म्हणुन मला ओळखीचे असे प्रेमळ आवाज काढत होता.अचानक मी पाहीले की त्याने मान पुर्ण खाली घातली व मध्येच जोरात वर केली,तेव्हा त्याच्या पोटाच्या भागातुन मला एक आगेची ढींगणी बाहेर पडताना दीसली.मी ती ढींगणी पाहुन "व्हॉट?" असे जणु काय ओरडलो.
आजही मला ती ढींगणी काय होती ते नाही कळाले,पण 'ती खरच ढींगणी होती का?' असा प्रश्न कींवा शंका माझ्या मनात कधीच आली नाही,कारण मला पुर्ण खात्री होती मी काय पाहीले आहे.

२) डोंगरावरच्या मंदीरातुन येताना भुंकणारा कुत्रा :
मी सुट्टीचा दीवस म्हणून सकाळी वसईच्या एका डोंगरावर चालायला गेलो व तिथल्या मंदीरात जाउन परत होतो.डोंगर उतरुन खाली आलो,तेव्हा माझा ऑरा खुप वाढला आहे असे मला जाणवले,बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझे शरीर पुर्ण त्या ऑरामधे होते,त्या ऑराने वेढले गेले होते.थोडे पुढे आल्यावर, एक खुप रागीट कुत्रा दोन चार मुलांवर भुकंत होता.ती मुले खेळुन थकली असतनाही घाबरुन जीव हातात घेउन एकडे तिकडे पळत होती.तो कुत्रा रस्त्याच्या एका बाजुला व मुले दुस-या बाजुने पळत होती.कुत्रा बांधलेला असुनही मुलांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करत होता,त्याचा मालक त्यावर ओरडत होता,पण कुत्रा भुंकायचे थांबत नव्हता.
मी कुत्रा ज्या बाजुला होता त्याच बाजुने चालत होतो.जेव्हा मी त्या भुंकणा-या कुत्र्यापासुन ७ ते ८ फुटाच्या अंतरावर आलो,तेव्हा तो कुत्रा भुंकणे बंद करावा,म्हणुन कदाचित नकळत मी माझ्या उजव्या हाताचा तळवा त्या कुत्राकडे केला व मनात 'शांत हो' 'कुल डाsssन' असे म्हणालो.व काय आश्चर्य!! मला माझ्या हातातुन माझा ऑरा एकत्र होउन त्या कुत्राच्या शरीरकडे जातोय असे 'दीसले' (ऑराचा वलय रंगहीन वायुसारखा दीसतो)....आणि जेव्हा तो ऑराचा प्रवाह माझ्या हातातुन त्या कुत्र्याच्या पुर्ण शरीरावर आदळला,तेव्हा तो कुत्रा अंगावर कोणी पाणी फेकावे असा दचकला व एका चुटकीशरशी शांत होउन मान खाली घालुन व जीभ बाहेर काढुन (कदाचित खुप भुंकल्यामुळे) तसाच उभा राहीला.त्याची एंकदर काया एकदम एक शिस्त असलेल्या कुत्र्याप्रमाणे दीसु लागली.मी त्याच्यापासुन ७-८ फुट पुढे गेल्यावर मला पुन्हा तोच कुत्रा भुंकण्याचा आवाज आला.पण ह्यावेळी थोडा हळु भुंकत होता.
मी जेव्हा घरी पोहचलो व मला हा प्रसंग आठवला तेव्हा 'अ‍ॅ?' ते काय होते एवढेच मनात आले.व माझा ऑरा खुप कमी झालेला जाणवला.

मला ४-५ कुत्र्यांनी घेरले आहे,माझ्यावर एक चावर कुत्रा भुंकत आहे असेही झाले आहे तेव्हाही रेकी देल्यावर तेच कुत्रे शॉक लागल्याप्रमाणे माझ्यापासुन लांब होतात.

३) भुतदया :
एक कुत्री व तिचे पिल्लु ह्यांना एका बाईकने नाजुक धडक मारली,कुत्रीला थोडेच लागले पण पिल्लाच्या पायाला थोडे लागले व ते एका दगडावर आदळले.ते पाहील्यावर 'रक्त आले नसेल तर मुका मार वाढत्या शरीरबरोबर ठीक होईल' असे माझ्या मनात आले,म्हणुन जास्त घाई न करता आरामशीर त्या पिल्लाकडे गेलो.मी लगेच जाउन त्या पिल्लाने मला हात लाउ दीला नसता.पण ते पिल्लु वेदनेने जे केकाटत होते,ते ऐकुन मनात दया कमी व त्या बाईकवाल्याचा राग जास्त येत होता.रागाने रेकी कमी होते असे मी मानतो म्हणुन पिल्लावर लक्ष केंद्रीत केले.पिल्लाजवळ जाउन मी पिल्लाच्या दुखणा-या पायला स्पर्श केला,तेव्हा ते पिल्लु अजुन जोरात विव्हळु लागले.कुत्री गोंधळामध्ये फक्त त्या पिल्लाकडे पाहत होती व मध्ये मध्ये त्याचे शरीर चाटत होती.मी त्या कुत्रीला 'पारले जी' बिस्कीट दीले व त्या पिल्लाला पायवर रेकी दीली.पिल्लु विव्हळण्याचे कमी कमी होउन पुर्ण शांत झाले तेव्हा त्याचा पाय आतल्या आत फीरल्याचे जाणवले.व ते पिल्लु पुर्ण शांत होउन कुत्रीजवळ जाउन दुध पिण्याचा प्रयत्न करु लागले.खुप लहान असल्याने बिस्कीट खात नव्हते.मग कुत्रीने दुध पाजण्यास नकार दील्यावर माझ्याजवळ आले,मी खाली एका पायावर जोर देउन बसलो होतो.मी त्याला परत रेकी दीली तेव्हा ते पिल्लु लाडात जमीनीवर झोपुन माझ्याकडे बघत होते.फक्त पाच मिनीटापुर्वी वेदनेने विव्हळणारे पिल्लु हेच होते ह्या भावनेने मला हसायला आले.मी निघु लागल्यावर माझ्या मागे धावु लागले,मी दुर्लक्ष करुन पुढे जाउ लागलो व मध्येच मागे वळुन त्याच्या डोळ्यात पाहीले,तेव्हा ते पिल्लु अक्षरक्षा रडु लागले,तो रडण्याचा आवाज व ते गोंढस डोळे बघुन मला रडु येईल असे वाटले म्हणुन मी जोरात चालु लागलो,तर त्या पिल्लाचा रडण्याचा आवाज तसाच येत राहीला.राहवले नाही म्हणून मी त्याला पुन्हा रेकी दीली,पुन्हा जमीनीवर लोळणे व मी गेल्यावर परत रडणे सुरु!
'मी तुला सोडुन जातोय्,पण तुझी आठवण ठेउन मी कधीच कुत्रा पाळणार नाही' असे मी त्याला डोळ्यात बघुन बोललो.

रेकीने मला असे प्रेम देणे शिकवले आहे,त्या रेकी आईला 'माझ्यावर असेच प्रेम आयुष्यभर करत रहा' ही विनंती.मला माझ्या कल्पनेत दीसणारे रेकी आईचे रुप काहीसे असे आहे :

Reiki Mother

विज्ञानअनुभव

प्रतिक्रिया

नक्की काय आहे हे सगळं??? तुम्ही कोठे शिकला?? कसे?? मला शिकता येईल का??? याचा प्रभाव जास्त वेळ नाही राहात का?? जर नसेल तर का नाही‍?? असेल तर कसा?? आजार व दुखणी कायमची बरी होतात?? सविस्तर सांगा किंवा या आधी लिहिले असल्यास लिंक द्या कृपया. धन्यवाद...मंदार कुलकर्णी

शानबा५१२'s picture

6 Jul 2017 - 8:46 am | शानबा५१२

हा लेख वाचल्यावर कुतुहल निर्माण होउन रेकीबद्दल माहीती शोधली जाईल असे अपेक्षित आहे.गोगलवर शोधल्यावर माहीती मिलेल.हे शब्द सर्च करा reiki,chakras,E=mc2 etc.

रेकी एकदा शिकल्यावर पुर्ण जन्मभर तुमच्या अंगात रहाते,जरी तुम्ही काही काळ तिचा वापर केलाच नाही तरी,अगदी दोन दोन वर्षे रेकीचा वापर नाही केला तरी ती आपल्यात कायम रहातेच.हे मला कळल्यावर फार अदभुत वाटले.

मला अति मानसिक ताण व धुम्रपाण ह्यामुळे Pectoris चा त्रास होता.'ह्रदयावर काम करणारी आर्युवेदीक औषधे' असा ढोबळ शोध घेउन मी रेकीवर विसंबुन राहीलो.फक्त २ महीन्याच्या आत ते औषध एका महीन्याने बंद करुनही माझा Angina Pectoris पुर्ण बरा झाला.रेकीने माझे प्राण कीत्येकदा वाचवले आहेत.गुगलवर 'reiki saved my life' असे सर्च करा.

मी मिपावर २०१०-२०११ मध्ये असायचो.तेव्हा मी रेकी शिकलो नव्हतो.पहील्यादांच रेकीबद्दल लिहत आहे.

सुबोध खरे's picture

6 Jul 2017 - 12:16 pm | सुबोध खरे

मला अति मानसिक ताण व धुम्रपाण ह्यामुळे Pectoris चा त्रास होता.'
रेकीने "अति मानसिक ताण व धुम्रपाण" यावरच उपाय का केला नाही?
मूले कुठारः ( मुळावरच घाव घालावा कि)

खरं तर मी भरपूर सारे प्रश्न विचारले होते आज दुपारी..खूप टायपिंग पण केलं होतं..पण पोस्ट करताना नेमका साईट डाउन चा एरर आला आणि ते सगळं बोंबलत गेलं...असो तुमचा इमेल आयडी द्या मला...वैयक्तिक रित्या प्रश्न विचारतो..धन्यवाद..

प्रमोद देर्देकर's picture

6 Jul 2017 - 5:38 am | प्रमोद देर्देकर

तुम्ही कट्याला या आणि हे अदभुत्,अविश्वसनीय्,अनाकलनीय रेकी प्रकार मिपावरील काही लोकांवर करा.

मग बघा सगळे कसे जिलबी सारखी सरळ होतील सगळी. :D

शानबा५१२'s picture

6 Jul 2017 - 8:50 am | शानबा५१२

दुस-यावर रेकी करायला लेवल २ कींवा वरची डीग्री लागते व माणसांवर मी रेकी करत नाही.
एक हात डोळ्यांच्या मधे कपाळावर (थर्ड आय चक्रावर) वर दुसरा हात छातीचा पिंजरा व बेंबी ह्यांमधे ठेउन रेकी दील्याने (स्वःताल) विलक्षण अनुभव येतो.असे केल्याने माईंड-बॉडी कनेक्शन स्थीर रहाते.

सोमनाथ खांदवे's picture

6 Jul 2017 - 6:45 am | सोमनाथ खांदवे

आई शप्पत , मी आज पर्यंत अस्ल काही वाचाल नव्हतं . तुमचा आश्रम कुठे आहे ?

शानबा५१२'s picture

6 Jul 2017 - 8:52 am | शानबा५१२

जे डॉक्टर रेकी वापरतात (भारतात व पदेशातही) त्यांचेही आश्रम कुठेही नाही आहेत.

ज्योति अळवणी's picture

6 Jul 2017 - 8:39 am | ज्योति अळवणी

ऐकलं आहे हे रेकी प्रकरण. पण नक्की काय प्रकार आहे? असं म्हणतात भावनांच्या पलीकडे जाऊन सर्वांचं भलं व्हावं असा विचार करणं आणि तो प्रसवण म्हणजे रेकी. पण मग त्या 'सगळ्यांमध्ये' वाईट लोक पण येतातच न?

कृपया खुलासा करा

तुमचा दुसरा प्रश्न मलाही पडला होता.अश्याच प्रकारचे काहेए प्रश्न पडुन अस्तिक असलेले काही लोक पुर्णपणे नास्तिक झालेल्याची उदाहरणे आहेत.कडक उपवास करणारा व्यक्ती गुरुवार्,मंगळ्वारी चवीने मांसाहार खातो हे आठवुन हसु आले.
रेकीबाबाबतही तसेच आहे.मी जेव्हा हाच प्रश्न स्वःताला केला तेव्हा 'त्या वाईट व्यक्तीवरही प्रेम कर' असा सल्ला मिळाला.जेव्हा हे अंमलात आणले तेव्हा मनात आतल्य आतच स्वःताबद्दल आदर्,प्रेम वाटु लागुन 'ओह ईट्स ग्रेट,आय फील ग्रेट' अशी भावना आली.खालील रेकी प्रार्थना रोज वचली की तुमच्या मनात कोणाबद्दल द्वेष रहाणारच नाही.

https://frankawords.files.wordpress.com/2013/06/justfortodayreiki.jpg

सतिश गावडे's picture

7 Jul 2017 - 12:23 am | सतिश गावडे

मी नास्तिक असूनही पूर्णतः शाकाहारी आहे. माझ्यावर रेकी होईल का/चालेल का/करता येईल का?

सानझरी's picture

7 Jul 2017 - 1:03 pm | सानझरी

<blockquote>मी नास्तिक असूनही पूर्णतः शाकाहारी आहे.</blockquote>
म्हणजे नास्तिक लोक्स पूर्णतः शाकाहारी नसतात का?

तुमचा दुसरा प्रश्न मलाही पडला होता.अश्याच प्रकारचे काहेए प्रश्न पडुन अस्तिक असलेले काही लोक पुर्णपणे नास्तिक झालेल्याची उदाहरणे आहेत.कडक उपवास करणारा व्यक्ती गुरुवार्,मंगळ्वारी चवीने मांसाहार खाते हे आठवुन हसु आले.
रेकीबाबाबतही तसेच आहे.मी जेव्हा हाच प्रश्न स्वःताला केला तेव्हा 'त्या वाईट व्यक्तीवरही प्रेम कर' असा सल्ला मिळाला.जेव्हा हे अंमलात आणले तेव्हा मनात आतल्या आतच स्वःताबद्दल आदर्,प्रेम वाटु लागुन 'ओह ईट्स ग्रेट,आय फील ग्रेट' अशी भावना आली.विश्वास ठेवा 'सेल्फ-लव' ही भावना अद्वीतीय आहे.

खालील रेकी प्रार्थना रोज वचली की तुमच्या मनात कोणाबद्दल द्वेष रहाणारच नाही.

https://frankawords.files.wordpress.com/2013/06/justfortodayreiki.jpg

कविता१९७८'s picture

6 Jul 2017 - 4:45 pm | कविता१९७८

ऐकलं आहे हे रेकी प्रकरण. पण नक्की काय प्रकार आहे? असं म्हणतात भावनांच्या पलीकडे जाऊन सर्वांचं भलं व्हावं असा विचार करणं आणि तो प्रसवण म्हणजे रेकी. पण मग त्या 'सगळ्यांमध्ये' वाईट लोक पण येतातच न?

कृपया खुलासा करा

मी रेकी शिकले त्यांच्यामते रेकीमुळे कुणाचं वाईट होउच शकत नाही आणि आपण नकारात्मक गोष्टींचा विचार करणे सोडुन देतो.

सकारात्मक उर्जेने चांगल्या गोष्टीच घडतात. आणी आपण स्वत:च दुसर्‍याबद्दल वाईट चिंतत नाही ईतके आपण सकारात्मक बनतो. आपल्याला हा बदल जाणवतोही.

उपाशी बोका's picture

6 Jul 2017 - 9:15 am | उपाशी बोका

यूट्यूबवर रेकीचे व्हिडिओ बघितले. एकंदरीत रेकी म्हणजे प्लसिबोसारखे प्रकरण दिसत आहे.

सतिश गावडे's picture

6 Jul 2017 - 11:23 am | सतिश गावडे

लेखक प्रच्छन्न रेकी मास्टर आहेत असे वाटते ;)

शानबा५१२'s picture

6 Jul 2017 - 1:13 pm | शानबा५१२

रेकी Albert Einstein ह्यांच्या mass energy relationshipशी सबंधीत आहे.मलाही खुप वेळा 'पण हे सर्व कसे होते? रेकी काम करते पण ह्यामागचे विज्ञान काय?' असा प्रश्न खुप वेळा पडतो.व मी vibration of the organs,heat energy supplied by hands,Kundalini,mind-body relationship (for example : controlling i.e. increasing or decreasing rate of our heart beats with brain) ह्या गोष्टींचा विचार केल्यावर काही अंशी समाधानी होतो.रेकी इदा,पिंगला व शुष्मना ह्यां नाड्यावर काम करते त्याचे ज्ञान तुम्हाला उत्तर देईल.

मराठी_माणूस's picture

6 Jul 2017 - 10:35 am | मराठी_माणूस

काही प्रश्न
१)ढींगणी म्हणजे काय ?
२)"रंगहीन वायु सारखा". मग तो दिसलाच कसा ?
३)शिस्त असलेली काया कशी असते ?
४) 'अ‍ॅ?' म्हणजे काय ?
५) नाजुक धडक कशी असते ? नाजुक थप्पड माहीत आहे जी लाडात मारली जाते जिच्याने काहीच त्रास होत नाही.
६)"कुत्रीला थोडेच लागले पण पिल्लाच्या पायाला थोडे लागले " म्हणजे काय ?

बाकी लेखाने खुप मनोरंजन झाले.

शानबा५१२'s picture

6 Jul 2017 - 1:04 pm | शानबा५१२

१) :-) ढींणगी...ओके सॉरी.

२) पाणी रंगहीन आहे पण दीसते.एखादा स्वच्छ पाण्याचा प्रवाह वाहत असतो तेव्हा आपल्याला त्या प्रवाहाच्या तळाशी काय आहे हे दीसते.त्या पाण्याला रंगहीन ज्या अर्थाने आपण बोलु तोच अर्थ इथे अभिप्रेत आहे.

३) सॉरी हे चुकलच.इथे 'देहभाषा' हा शब्द जास्त बरोबर असता.

४) अ‍ॅ?
५) 'सौम्य धडक' असे वाचावे.

६) ह्म्म्म्म.....'तीला थोडेच लागले पण त्याला थोडं लागलं हं!'

पुंबा's picture

6 Jul 2017 - 1:17 pm | पुंबा

ठिणगी हो..

मराठी_माणूस's picture

6 Jul 2017 - 2:16 pm | मराठी_माणूस

तुम्ही वायु हा शब्द वापरला आहे.

योगी९००'s picture

6 Jul 2017 - 8:35 pm | योगी९००

मलापण हेच प्रश्न पडले..

माझ्या लहानपणी तुझ्या नानाची टांग ह्या ऐवजी तुझ्या नानाची टिंगणी असे काही पोरं म्हणायचे ..(का ते माहित नाही.). ढींगणी म्हणजे टिंगणी असावी असे वाटले.

बाकी सोनू पोपटाला रेकी देण्याऐवजी "सोनू तुझा माह्यावर भरवसा नाय काय" असे म्हणाला असतात तर थोडा ऑरा वाचला असता असे उगाचच वाटून गेले.

चौथा कोनाडा's picture

6 Jul 2017 - 10:41 am | चौथा कोनाडा

" ही कसली रेकी, हा तर अतिरेकी" असं काहीसं वाक्य पुलंच्या लेखात कुठंतरी वाचल्याच आठवतंय !
इथं कोणा कडं काही संदर्भ आहे का याचा ?

शानबा५१२'s picture

6 Jul 2017 - 12:55 pm | शानबा५१२

" ही कसली रेकी, हा तर अतिरेकी" हे पुल,च्या लेखात??

'विर्यनाश म्हणजे म्रुत्यु' हे 'सत्य' असलेले वाक्य 'बटाट्याची चाळ' मध्ये आहे.

चौथा कोनाडा's picture

6 Jul 2017 - 6:22 pm | चौथा कोनाडा

ज्जे बात !
धन्यू शानबा५१२. आठवत नव्हते !

रेकाई काय क्युट दिसतेय हो, थोडा थोडा उदिता गोस्वामीसारखा चेहरा आहे.
हातात बाटली बिटली.... आहाहाहा

चांदणे संदीप's picture

6 Jul 2017 - 11:11 am | चांदणे संदीप

मान गाये आपकी नजर और.... ;)

Sandy

अभ्या..'s picture

6 Jul 2017 - 11:38 am | अभ्या..

मग नैतर काय, गणपतीच्या मूर्तीसारख्या नाकापाशी उतरत्या डोळ्याची ती हिरोईन विसरणे शक्य तरी आहे का?
पापच की ;)

शानबा५१२'s picture

6 Jul 2017 - 1:26 pm | शानबा५१२

Quan Yin, the great goddess and Mother of Compassion, loved and revered throughout Asia. A beautiful expression of Divine Mother. Mercy means there is more assistance given through love than through merit earned. Following her ascension Kwan Yin turned back to save others and made this pledge - "Never will I seek, nor receive, private individual salvation, never will I enter into final peace alone, but forever and everywhere will I live and strive for the redemption of every creature throughout the world from the bonds of conditioned existence". Kwan Yin is associated with the earth, fertility, and birth, and healing. She has also brought forth the energies of Magnified Healing. Quan Yin is known as the Goddess of Compassion and is often depicted riding on a dragon. She is the eastern counterpart of Mother Mary and she works to balance the feminine energy. She is one of the Lords of Karma representing the sixth ray. Isis carried the same 'mother energy' in Egyptian and Hinduism, Shakti (Vishnu's wife), Pavarti (Shiva's wife) and Sita (Rama's wife). Her proper name is Kuanshih Yin and means "She who harkens to the cries of the world". She is honoured in Japan and China. A Celestial Bodhisatva and Ascended Master.

निदान ह्याचा आदर करावा.बाकी असा इमेज सर्च केल्यावर येणा-या इमेजेस फार अल्हाददायी आहेत.

शानबा५१२'s picture

6 Jul 2017 - 1:28 pm | शानबा५१२

बाकी quan yin असा सर्च केल्यावर....

सतिश गावडे's picture

6 Jul 2017 - 11:22 am | सतिश गावडे

रेकाईच्या हातातील बाटलीचे कार्ल्सबर्गच्या (तीच ती "आम्ही काय बनवतो हे आपल्याला माहिती आहे" वाली) बाटलीशी साम्य आहे असे एक निरीक्षण नोंदवतो.

हेरंब's picture

6 Jul 2017 - 11:24 am | हेरंब

आमच्या सोसायटीतल्या एक बाई, मोडलेल्या व्हीसीआर वर रेकी करुन तो दुरुस्त करायच्या, तर त्यांची लेव्हल कुठली असेल ?

यशोधरा's picture

6 Jul 2017 - 12:23 pm | यशोधरा

रेकी म्हणजे काय? मला ह्या शब्दाचा अर्थ सांगेल का प्लीज कोणी? आमच्या ऑफिसात येऊन रेकी करा प्लीज, म्हणजे मला फायदा व्हायला हवा हां त्या रेकीचा. मोठं प्रमोशन, जास्त पगार वगैरे. अतिशय सिरियसली सांगत आहे. नायतर असाल तिथून करा प्लीज. माझं प्रमोशन विथ मोठठा पगार हायलाच पायजेल हे. प्लीजच प्लीज. कृप्या.

शानबा५१२'s picture

6 Jul 2017 - 12:53 pm | शानबा५१२

Rei = universal
ki = life force energy.

Source ; my Reiki level 1 manual.

रेकीमुळे तुमच्यातील सकरात्मक विचार कराय्ची शक्ती खुप वाढेल.'मी नक्की काय केले पाहीजे?' ह्याचे उत्तर प्रत्येक प्रसंगामध्ये अगदी लगेच तुम्हाला कळेल.माझ्या जीवनात ह्याचा अतिशय चांगला परीणाम झाला आहे.मी तर हेही बोलेन की रेकीमुळे माझे आयुष्य ६० ते ७० टक्के सकारत्मक दीशेने बदलले आहे.पी.एचडी. मध्येच सोडावे लागल्याचे दु:ख रेकीमुळे पचवता आले.'स्वःताचाच विचार नको करु' अशी भावना खुप काही बदलुन गेली.

कविता१९७८'s picture

6 Jul 2017 - 1:14 pm | कविता१९७८

अगदि , सगळी निगेटीविटी निघुन जाते

यशोधरा's picture

6 Jul 2017 - 1:27 pm | यशोधरा

Rei = universal
ki = life force energy.

ओके, धन्यवाद. बरेच दिवस शब्द ऐकला, आज अर्थ समजला.

बरं ते आमच्याऑफिसममध्ये माझ्यासाठी असाल तिथून रेकी करा बरं. धन्यवाद. मला हवा तो परिणाम दिसल्यास ह्या धाग्यावरच सांगेन.

कंजूस's picture

6 Jul 2017 - 12:34 pm | कंजूस

मी कोणताही रेकीचा कोर्स केलेला नाही परंतू माझ्या अंगातही कोणतातरी ओरा असावा असा मला दाट संशय आहे. कधी कधी शेतातल्या पाउलवाटेने वाटेने जाताना समोरून गुरं येता तेव्हा गुराखी सांगतो ओरडून बैल मारका आहे तरीही मी तिथेच उभा राहतो आणि तो बैल शांतपणे निघून जातो.

एकदा एका नातेवाइकाच्या गोठ्यात गेलेलो. तो धावत सांगायला आला पांढरा बैल मारका आहे परंतू मला बैलाच्या पाठीवर हात फितवताना पाहून अवाक झाला. तुम्हाला जवळ कसे येऊन दिले?
आमच्या फॅम्लीलाच ही शक्ती आहे. माणसांचा अनुभव नाही.
अजून बरीच उदाहरणे आहेत.

ऑरा प्रत्येक व्यक्तीच्याभोवती असतो.कही व्यक्ती रुममध्ये आल्यावरच त्यांच्या उपस्थीतीची जाणीव होते.अशा व्यक्ती खुप प्रभावी असतात ते त्यांच्या विचारसरणी व त्यामुळे बदलेल्या रहाणीमानामुळे.स्वभावाने दयाळु असलेला व्यक्ती हा त्याच्या पालकांकडुन जन्मता:च मिळालेल्या काही गुणसुत्रांमुळे दयाळु असतो.
तुम्ही 'पिनियल ग्लॅन्ड' व त्याच्या विकासाबद्दल वाचा मानसिक स्थरावर त्याच्या खुप फायदा होईल.

जेनी...'s picture

6 Jul 2017 - 11:07 pm | जेनी...

:D

रेकियुक्त प्रतिसाद =))

कविता१९७८'s picture

6 Jul 2017 - 12:46 pm | कविता१९७८

या ६ महिन्यात मी रेकीच्या दोन्ही लेवल केल्या आहेत. अनुभव नंतर लिहीते.

कविता१९७८'s picture

6 Jul 2017 - 12:49 pm | कविता१९७८

रेकीमुळे स्वत:च्या वागण्यातही पाॅझिटीव बदल होतात आणि आपण पाॅझिटीव विचार केल्याने आपोआपच चांगल्या गोष्टी घडु लागतात.

रेकीमुळे स्वत:च्या वागण्यातही पाॅझिटीव बदल होतात आणि आपण पाॅझिटीव विचार केल्याने आपोआपच चांगल्या गोष्टी घडु लागतात.

रेकीमुळे स्वत:च्या वागण्यातही पाॅझिटीव बदल होतात आणि आपण पाॅझिटीव विचार केल्याने आपोआपच चांगल्या गोष्टी घडु लागतात.

मलाही हेच बोलायचे होते.पण रोज रेकीने चक्र समतोल ठेवली तर सकारात्मक विचारशक्ती खुप वाढते.

कविता१९७८'s picture

6 Jul 2017 - 1:31 pm | कविता१९७८

रेकी म्हणजे निसर्गातील पाॅझिटीव एनर्जी देउन फीजीकली ' मेंटली हील करणे, वस्तु , बिघडलेल्या व अडलेल्या गोष्टी व्यवस्थित करणे. पण रेकाई हे काय प्रकरण आहे??

चांदणे संदीप's picture

6 Jul 2017 - 1:53 pm | चांदणे संदीप

समुद्रमंथनातून जशी लक्ष्मी प्रकटलेली ना तश्शीच प्रतिसादामंथनातून मिपावर आज रेकाई प्रकट झाली आहे!

रेकाईप्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (रेकाईने ह. घ्यावे एवढीच प्रार्थना!)

Sandy

इरसाल's picture

6 Jul 2017 - 1:48 pm | इरसाल

हा यांचा मिपावरचा शेवटचा लेख न ठरो.

रेकी म्हणजे दहशतवादी एखाद्या ठिकाणाची पाहणी करतात ती असा अर्थ माहीत होता. बाकी जे ज्याला लाभदायक वाटतं ते त्याला लाभो.

कविता१९७८'s picture

6 Jul 2017 - 2:44 pm | कविता१९७८

ती रेकी वेगळी , त्या रेकीचा वापर ट्रेकसाठीही केला जातो.

कंजूस's picture

6 Jul 2017 - 4:39 pm | कंजूस

ते reconnaissance रेकनिसन्स चे शॅाटफार्म

पैसा's picture

6 Jul 2017 - 5:54 pm | पैसा

अ‍ॅ

मराठी कथालेखक's picture

6 Jul 2017 - 6:14 pm | मराठी कथालेखक

रेकी म्हणजे नेमकं काय, कशी शिकायची/ करायची याबद्दल मराठीत एखादा लेख आहे का ?

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

6 Jul 2017 - 8:23 pm | सिद्धेश्वर विला...

रेकी शिकल्यावर वाईटसाईट सवयी सोडता येतील का ? मला देशाचा पंतप्रधान बनता येईल का ? उत्तर हो असेल तर मलापण रेकी शिकायचंय ... या देशाला मावामुक्त करायचंय .... तंबाखूरहित आणि रेकीसहित सज्ज आपला देश .... मी फिरवेन झेंडा चहूकडे ... मिटेल सारा द्वेष .....

माझा पहिला प्रश्न एकदम प्रामाणिक होता ... साहेब ... बाकी चारोळी पावसामुळे सुचलीय

सुबोध खरे's picture

6 Jul 2017 - 8:38 pm | सुबोध खरे

ते लेखकाची शिग्रेट सुटलिये काय रेकीने ?

कविता१९७८'s picture

6 Jul 2017 - 9:59 pm | कविता१९७८

लेखकाचे लेखकाला माहीत पण मी नाॅनवेजीटेरीयन होते रेकी १ च्या पहिल्या दिवसापासुन म्हणजे २१ जानेवारी पासुन आज पर्यँत नाॅनवेज खाल्ले नाही. आधी मा.भो. अशा शिव्या द्यायचे गाडी चालवताना कुणी मधे आले पटकन तर तेही अगदिच सुटले आता "वेडा झालायस का रे?" असे अगदि सौम्य शब्दात बोलते.

मी जिथुन रेकी शिकले तो एक वेगळा परीवार मिळाला. तिथे तुम्हाला माणसाला फक्त एक माणुस पाहायला शिकवले जाते. कुणीही कूणाला हसायचे नाही . कुणीही आपल्याला हीन लेखत नाही. पैशावरुन नाही , शिक्षणावरुन नाही की तुमच्या दिसण्यावरुनही नाही. अगदि कुणाच्या व्यंगावरही नाही. कुठल्याही प्रकारचे गाॅसिप करायचे नाही. गाॅसिप करणे जितके सोप्पे आहे त्याहुन जास्त कठीण गाॅसिप न करणे आहे पण त्यावर सध्या माझा बराच कंट्रोल आलाय अगदि घरची मंडळी गाॅसिप एक्सपर्ट असुनही. हे सगळं रेकीची स्वत:वर केलेली सततची प्रॅक्टीस यामुळे शक्य होतय.

रेकी शिकल्याने ''दुसऱ्यांच्या'' वागण्यात positive बदल होतात का हो ? प्लीज काही मिपाकरांवर रेकी करा आणि बघा ना बदल होतात का ते.. :)))

मुक्त विहारि's picture

7 Jul 2017 - 9:31 pm | मुक्त विहारि

पण काही मिपाकर त्या पलीकडे गेलेही असतील.

बसत्या शंका-कुशंका काढणार्‍या मिपाकरांना कसल्याच उपायांनी सकारात्मक फरक पडत नाही....

असो,

मुक्त विहारि's picture

7 Jul 2017 - 9:32 pm | मुक्त विहारि

च्या ऐवजी "नसत्या" असे हवे होते...

(स्वसंपादन नसल्याचा तोटा.)

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

6 Jul 2017 - 8:43 pm | सिद्धेश्वर विला...

अर्धी अर्धी झुरके मारत आपणच सम्पवूया ... रेकी शिकूया ...चला रेकी शिकूया ... या बाई या ... बकुळेच्या झाडाखाली रेकी शिकूया ... झिम पोरी झिम ... कपाळाचा झिम ... झिम गेला फुटून ... सिगरेट गेली सुटून ....

मितान's picture

6 Jul 2017 - 10:32 pm | मितान

मनोरंजक धागा ! :)

हे खरंच सिरिअसली लिहिलंय ?? मला आधी वाटलं होतं रेकी वाल्या लोकांच्या क्लेमस ना वैतागून लिहिलंय!!!

सतिश गावडे's picture

7 Jul 2017 - 12:27 am | सतिश गावडे

मला आधी वाटलं होतं रेकी वाल्या लोकांच्या क्लेमस ना वैतागून लिहिलंय!!!

असेलही किंवा नसेलही. मात्र वाचकांचे मनोरंजन करण्याचे जबरदस्त सामर्थ्य या धाग्यात आहे. :)

वीणा३'s picture

7 Jul 2017 - 4:28 am | वीणा३

ते तर आहेच.

मला १-२ रेकी करणाऱ्या लोकांनी जे सांगितलं ते ऐकून मी पण असाच कायतरी लिहिलं असतं, एवढं डोकं भंजाळलं सगळं ऐकून. पत्राने कॅन्सर बरा करतात म्हणे . मी म्हणलं मग पत्र तरी कशाला लागतं, असाच बसल्या बसल्या सगळ्या जगातल्या लोकांचा कॅन्सर बरा करून टाकावा ना lol !!!

मला आधी बुवा लोकांचा राग यायचा कि लोकांना का फसवतात म्हणून. पण हे सगळं (रेकी, एमवे) बघितल्यावर वाटतं की लोकांना थोडं आवडतं फसवून घ्यायला, ते शोधतच असतात कि आता कशामुळे भारावून जाऊ :P

कविता१९७८'s picture

7 Jul 2017 - 5:59 am | कविता१९७८

पत्राने कॅन्सर बरा करतात म्हणे .

असे असेल तर खरेच फसवेगिरी आहे. पत्र पाठवुन आणि फोनवर बोलुन बरं करता येतं असं बरेच रेकी पाठवणारे म्हणतात जे अगदि चुक आहे. तुम्हाला रेकी शिकवणारा गुरु जर चांगला मिळाला तर याची माहीती नक्की देइल

जेनी...'s picture

6 Jul 2017 - 11:13 pm | जेनी...

बिचार्या शाबु काकांनी सिरियसली स्वताहाचे अनुभव शेअर केलेत
आणि मिपावरचे लोक हे असे...
रेकाई कोपणार आता मिपावर ...

शानबा५१२'s picture

7 Jul 2017 - 3:42 am | शानबा५१२

रेकी मास्टर पदवी/दीक्षा/डीग्री घेतलेल्या व्यक्तीला दुस-यावर रेकी करता येते.मी एका अशा व्यक्तीला भेटलोय्,की त्याच्या सामर्थासमोर (?) कीत्येक बाबा महाराज्यांच्या सिध्दी तुच्छ वाटतील व मुळात त्या आहेतही.तो व्यक्ती मुंबईतच रहातो व बायको व मुल असणारा आहे.
त्याने जेव्हा मला पहील्या भेटीत रेकीबद्दल संगितले तेव्हा मी खुप हसत होतो.हळुहळु मलाही खुप काही अनुभवायला आले.त्याने हातातुन काही कीरणासारखे माझ्या कपलावर फेकले तेव्हा मी जागच्याजागी दचकलो,एवढा की 'अरे हे काय आहे?!?!?!' असे मी जोरात ओरडायचे बाकी होते.

रेकीबद्दल असे वाचुन कोणालाही हे सर्व खोटे व थोतांड वाटेल पण हे सर्व खरे आहे.

मग तुम्ही 'आउट ऑफ बॉडी एक्सपेरिएन्स' बद्दल काय बोलाल? ह्यामध्ये थर्ड आय व सोलार प्लेक्ससचा सबंध येतो.युट्युब वर व्हीडीओ बघा व मधुकर दीघे ह्याची पुस्तके वाचा,नंतर स्वःता अनुभवा,मग मी जे वर लेखात लिहले आहे ते वाचुन बिल्कुल आश्चर्य वाटणार नाही ना त्यावर हसु येईल. :-))

कविता१९७८'s picture

7 Jul 2017 - 6:36 am | कविता१९७८

रेकी मास्टर पदवी/दीक्षा/डीग्री घेतलेल्या व्यक्तीला दुस-यावर रेकी करता येते./code>

रेकी करत नाही हो , स्वत: वर रेकी घेतात , टच थेरपी मधे दुसर्‍याला रेकी देतात आणि डिस्टंस रेकीमधे दुसर्‍याला रेकी पाठवतात.

त्याने हातातुन काही कीरणासारखे माझ्या कपलावर फेकले तेव्हा मी जागच्याजागी दचकलो,एवढा की 'अरे हे काय आहे?!?!?!' असे मी जोरात ओरडायचे बाकी होते.

हा काय प्रकार आहे?? हे मलाही न पटण्यासारखे आहे. आमचे रेकी ग्रँडमास्टर प्रसाद करमरकर हे जर्मनीला जाउन रेकी शिकुन आलेत आणि १९९८ पासुन रेकी शिकवतात. मेडीटेशनचा २२-२३ वर्षांचा अनुभव आहे . ते भारताबाहेरही रेकीचे क्लासेस घेतात. त्यांना पण हे कीरणे फेकणं असं कधीच कुणी पाहीलं नाही . ते स्वत: असले काही प्रकार करतही नाहीत. त्यांचा साधा सरळ फंडा आहे "लव , लाईट अँड रेकी"

कविता१९७८'s picture

7 Jul 2017 - 6:41 am | कविता१९७८

आणि हो ते भारतात असतील तर गुरुवारी मेडीटेशन असतं . खुप छान असतं, यु ट्युब वर पाहता येत. काल झालय . युट्युबवर Thursday meditation of Prasad Karmarkar टाईपल तर पाहता येइल

समाधान राऊत's picture

7 Jul 2017 - 10:21 am | समाधान राऊत

रेकी हा प्रकार खरा आहे असे मान्य करु हो ,पण किरणे वैगरे निघतात हा कुठल्या पिक्चर चा भाग म्हणायचा.

सुबोध खरे's picture

7 Jul 2017 - 10:26 am | सुबोध खरे

किरणे वैगरे निघतात
हे रेकी तील अतिरेकी भाग आहे

मोदक's picture

7 Jul 2017 - 10:44 am | मोदक

आज सर हवे होते. ;)

विशुमित's picture

7 Jul 2017 - 11:35 am | विशुमित

अगदी अगदी..!!

माणूस गेल्यावरच त्याची किंमत कळते...!!

सर असते तर "हत्तेरेकी" केले असते =))

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

7 Jul 2017 - 1:39 pm | सिद्धेश्वर विला...

मावेवाल्याच्या ढींगण्या :

माझ्या पाळलेल्या मावेवाल्यापैकी एक म्हणजे सोनु.त्याच्याकडे माझे दुर्लक्ष होतेय असे वाटले म्हणुन खुप दीवसांनी तुमचा लेख वाचल्यानंतर त्याच्याजवळ जाउन त्याच्यापाठीवर हात टाकुन रेकी देउ लागलो.रेकी माझ्या ह्रदयातुन हातात व हातातुन त्याच्यापाठीवर जात आहे असे जाणवत होते. मी बोललो ... एक १२० ३०० , इलायची, हरी पत्ती .. कच्ची पक्की आणि रेक्की.. काय आश्चर्य .. अहो झट के पट मावा तय्यार ... माझा आनंद गगनात मावेनासा झाला .... मला वाटलं कि रेकीचा पहिला टप्पा पार केला

अचानक मी पाहीले की त्याने मान पुर्ण चुन्यात खाली घातली व मध्येच जोरात वर केली,तेव्हा त्याच्या पोटाच्या भागातुन मला एक माव्याची ढींगणी बाहेर पडताना दीसली.मी ती ढींगणी पाहुन "व्हॉट?" असे जणु काय ओरडलो.
आजही मला ती ढींगणी काय होती ते नाही कळाले,पण 'ती खरच ढींगणी होती का?' असा प्रश्न कींवा शंका माझ्या मनात कधीच आली नाही,कारण मला पुर्ण खात्री होती मी काय पाहीले आहे.

रंगीला रतन's picture

7 Jul 2017 - 1:55 pm | रंगीला रतन

ख्या ख्या ख्या .....

रंगीला रतन's picture

7 Jul 2017 - 2:07 pm | रंगीला रतन

क्या ढासू अनुभव हैं बाप.... हस हस के मेरी तो मुरकुंडी वळ गयी हैं ...
लैच विनोदी लिहिता कि राव तुम्ही...

रच्याक अदभुत्,अविश्वसनीय इथपर्यंत ठीक आहे पण ''अनाकलनीय अनुभव''? हे म्हंजी कै च्या कैच ...

महेश हतोळकर's picture

7 Jul 2017 - 2:53 pm | महेश हतोळकर

आजही मला ती ढींगणी काय होती ते नाही कळाले,पण 'ती खरच ढींगणी होती का?' असा प्रश्न कींवा शंका माझ्या मनात कधीच आली नाही,कारण मला पुर्ण खात्री होती मी काय पाहीले आहे.

या वाक्याचा अर्थ काय?

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

7 Jul 2017 - 3:04 pm | सिद्धेश्वर विला...

बहुतेक रेकीमध्ये ढुंगणातून बाहेर पडणाऱ्या वस्तूला ढींगणी म्हणत असतील ...

सरल मान's picture

7 Jul 2017 - 3:46 pm | सरल मान

:-)

शानबा५१२'s picture

7 Jul 2017 - 8:09 pm | शानबा५१२

@कविता१९७८ त्याला कीरणे नाही तर एनेर्ग्य बॉल म्हणतात.

प्लीज ह्या वेबसाईटवर वाचा : http://pjentoft.com/Energyball.html (लिंक शेअर केल्याबद्दल सॉरी)

......Many different subtle touch systems and many general spiritual healers and energy workers use energy balls.

Place your energy ball down in front of you. Pass your hand across the area, including both the space where the ball is, and where it isn't.Do you feel a difference? Can you feel where the ball is? It may feel warmer, cooler, tingling, denser, etc. You could toss it at a person who agrees , or pet an animal with it and see if they can feel it.

सप्तरंगी's picture

7 Jul 2017 - 8:53 pm | सप्तरंगी

हा लेख मी विनोदी लेख म्हणून वाचला, आणि मग खालच्या सिरीयस प्रतिक्रिया पहिल्या. हा विनोदी लेखच आहे ना ???

आणि रेकी तर pseudoscience आहे.

वैभव पवार's picture

8 Aug 2017 - 10:33 am | वैभव पवार

रिक्याईच्या हातात Tuborg बाटली आहे काय?