रे गझलाकारा, आवर तुझे दुकान...

मोदक's picture
मोदक in जे न देखे रवी...
19 Jul 2016 - 1:36 am

गेले काही दिवस सरसकटीकरणाचा तडका आणि अभंग वाचून आमच्या शहरी असंवेदनशील मेंदूच्या झुडुपाला एक कवितेची डहाळी उगवली. ती डहाळी त्याच्यासोबतच्या पालापाचोळ्यासकट येथे चिकटवत आहे... गोड मानून घ्यावी.

***********************

तुमचे शेतकरी नेते, तुमच्याच तोंडास पुसती पाने | दोष सगळे मात्र, असंवेदनशील शहरी लोकांचे |
शेतीतून मंत्र्यास होती, कोटींचा फायदा | तुला नाही वावडे, अशा दांभिकपणाचे |
रे गझलाकारा, आवर तुझे दुकान | गेले ते दिवस, फुकट सहानुभुती मिळवण्याचे ||

खोटी माहिती, खोट्या समजुती | खोट्या आकडेवारीची पिकेही खोटी |
कितीक सल्ले मिळाले, कान कितीकदा टोचले | एकसुरी अभंग गझला गातोस, अरण्यरूदनाचे |
रे गझलाकारा, आवर तुझे दुकान | गेले ते दिवस, दुसर्‍याच्या कानांना बिडी लावण्याचे ||

मिपाकर शेतकरी, कितीकदा रोखठोक लिहिती | काय उपयोग तुझ्या, बंद झापडांचे |
अनेक शंका अनेक सल्ले, नाकारूनी सगळे | एकच भजन गातोस, अन्याय-रडगाण्याचे |
रे गझलाकारा, आवर तुझे दुकान | गेले ते दिवस, नक्राश्रू ढाळण्याचे ||

शब्द फिरवलेस कितीकदा, कितीकदा टाळलीस उत्तरे | सांग लुटारू कशी काय, सगळीच सरकारे |
चर्चा कर थोडी, वाच मते इतरांची | मीच मसीहा शेतकर्‍यांचा, फुका अहंभाव कशासाठी? |
रे गझलाकारा, आवर तुझे दुकान | गेले ते दिवस, हवेत तडका मारण्याचे ||

हिवरे बाजार , सुभाष पाळेकर आणि आनंद कर्वे | ध्येयवेढे शेतकरी मंगळवेढ्याचे |
क्रांतीकारक प्रकल्पांची, घे मनापासून दखल | सोड काम आता काळे चित्र रंगवण्याचे |
रे गझलाकारा उघड तुझे दुकान | कौतुक तरी कर अशा अनेक महामानवांचे ||

शिवार होतेय जलयुक्त, अडते चालले उंबर्‍याबाहेर | धडक विहीरी आणि वेळेवर सबसिडी |
बदल घडत आहेत, ठेव यावर विश्वास | मिळेल शेतकर्‍याला, खरेखुरे 'अभय' |
रे गझलाकारा उघड तुझे दुकान | खर्‍याखुर्‍या बदलांच्या कवितेचे ||

अभय-काव्यअभय-गझलअभय-लेखनकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागपुरी तडकाभूछत्रीमराठी गझलवाङ्मयशेतीनाट्यगझलविनोद

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

19 Jul 2016 - 2:11 am | चांदणे संदीप

तुकारामांचे अभंग हे आता तलवारीसारखे फिरू लागलेत! होऊन जाऊदेत तलवारबाजीचा एक मुकाबला मिपासमक्ष!

प्रतिवाराच्या प्रतीक्षेत!
Sandy

आदूबाळ's picture

19 Jul 2016 - 2:26 am | आदूबाळ

लोल!

कविता१९७८'s picture

19 Jul 2016 - 6:02 am | कविता१९७८

शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक असेल, सतत अन्याय होतोय असे सान्गितले नाही तर शेतकरी गझलकाराना मसीहा मानणार कसे आणि यान्चे मन्त्री बनण्याचे स्वप्न साकार होणार कसे?

अन्या दातार's picture

19 Jul 2016 - 9:03 am | अन्या दातार

आजवर व्यापार्‍यांनी डहाळ्याचा बाजार लावलेला माहिती होता, आज एका डहाळ्याने व्यापार्‍याचा बाजार उठवलाय =))

अजया's picture

19 Jul 2016 - 9:06 am | अजया

=)))

नाखु's picture

19 Jul 2016 - 9:12 am | नाखु

काही परिक्षणे या काव्याची...

पुरते वस्त्रहरण : दैनिक टका भारत

शेतकरी आडत्यांनाखोडता : दैनिक मिपा जागरण

बोलवित्या धन्याची भांडाफोड : दैनिक मिपा सामना.

अता याही आडत्यांचा बाजार उठू दे :दैनिक नाखु समाचार.

बाकी काव्य फर्मास पण अजून काही जोडणी आणि तोडणी शिल्लक ठेवली हे जाणवते.

पुलेशु+पुभाप्र

नाखु

मदनबाण's picture

19 Jul 2016 - 9:13 am | मदनबाण

जबराट ! =)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में हुं शुरली, बच जरा...ठा ठा ठा... ;) :- Fiker Not

एस's picture

19 Jul 2016 - 9:34 am | एस

हाहाहा!

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2016 - 10:09 am | अत्रुप्त आत्मा

ह्हे जोरदार दणका! =))

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 10:24 am | सुबोध खरे

मजा आ गया

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jul 2016 - 10:37 am | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Jul 2016 - 11:46 am | कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही म्हणे तडक्यात बचकभर मिर्ची घातलीय हो! =))

संदीप डांगे's picture

19 Jul 2016 - 11:53 am | संदीप डांगे

Chaabuuk... =))

आदिजोशी's picture

19 Jul 2016 - 12:03 pm | आदिजोशी

मस्त ठासली आहे. फुकट वांझोट्या चर्चा आणि जगाला नावे ठेवण्या शिवाय दुसरे उद्योग नसणारे फारच डोक्यात जातात. अपेक्षेप्रमाणे ह्याही तडक्यावर वन अँड ओन्ली मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

आद्याच्या टोटल प्रतिसादाला 100 टक्के सहमत.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2016 - 12:13 pm | अत्रुप्त आत्मा

अगदी अगदी!
१०हजार टक्के सहमत.

मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

एखाद्या ओळीची गरळ ओकून जातात ते कधी कधी. शहरातली माणसं किती असंवेदनशील आहेत आणि नेहमी शेतकर्‍यावरच कसा अन्याय होतो याबद्दलची त्यांची कळकळ लोकांना कळणार कशी?

खटपट्या's picture

19 Jul 2016 - 10:55 pm | खटपट्या

आधी पत्ता द्या. मग बोला...

कपिलमुनी's picture

20 Jul 2016 - 1:45 am | कपिलमुनी

7

झेन's picture

19 Jul 2016 - 10:28 pm | झेन

जिओ मोदकजी, लैच झाला होता धुरळा स्वय्मघोषित एकमेव कवी आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणणा-या गुर्जींचा.

चंपाबाई's picture

19 Jul 2016 - 11:35 pm | चंपाबाई

शेतकर्‍याला सबसिडी नको , वीज फुकट का देताय असे रडणारे शहरी लोक हुशार म्हणायचे की काय ? सबसिडी व वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होउन ते सर्वानाच फायद्याचे होते हे हुशार लोकांच्या बत्थड डोक्यात का शिरत नाही ?

सुबोध खरे's picture

20 Jul 2016 - 12:03 am | सुबोध खरे

डिटेलवार मंदी समजावून सांगा ना ताई अडानी लोकांना समजंल अशा भाषेत

चंपाबाई's picture

20 Jul 2016 - 2:42 am | चंपाबाई

शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.

( हे शेकडो वेळा चर्चिले आहे... मग हे फक्त शेतीमालालाच का ? काम्प्युटर मोबैल वाल्या कंपन्यानाही सबसिडी द्या म्हणजे याही वस्तु स्वस्त होतील असे इथले लोक बोलल्याचे अंधुकसे आठवते. )

बाकी डिटेल्स तज्ञाकडुन घेणे.

खटपट्या's picture

20 Jul 2016 - 2:46 am | खटपट्या

शेतीचा उत्पादन खर्च कमी झाल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकाला होइलच याची शाश्वती नाही. काहीही कीतीही माफ करा...

बेकार तरुण's picture

20 Jul 2016 - 12:18 pm | बेकार तरुण

शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.>>>

हा अर्थशास्त्रीय दृष्ट्या अतिषय महान प्रतिसाद आहे !!!!
सब्सिडीची रक्कम बहुतेक आकाषातला देव सरकारला देत असावा. त्याचा टॅक्स देणार्‍या लोकांशी आणि एकुणच त्यांच्या खीषाला पडडार्‍या भुर्दंडाशी काहीच संबंध नसतो का??
माझ्या अल्पमतीप्रमाणे जगभर सब्सिडी देण यशस्वी ठरलेलं नाहीये, कारण स्वस्तात वस्तु मिळालीतर जबाबदारीने वापर करणे ही प्रवृत्ती बर्‍याचदा नसते. (कृपया खुलासा करावा)

विवेकपटाईत's picture

20 Jul 2016 - 7:56 pm | विवेकपटाईत

कुठल्या जगात वावरता चंपा बाई सबसिडी खत कंपन्यांच्या खिश्यात जाते. अधिकांश शेती पावसावर अवलंबून आहे. वीज सबसिडीचा फायदा होत नाही. आणखीन एक गेल्या ३० वर्षांत शेतमालाचा भाव किमान ५०% कमी झाला आहे. जास्तीही असू शकतो. उदा: कांदा १९९८ - फेब. ३ रुपये आणि सेप्ट ४०-६० , २०१६ फेब. ३-७ आणि सेप्ट. २०१५ ४०-८० रुपये. (गेल्या १८ वर्षांत बाकी वस्तूंचे भाव किती वाढले). साखर १९९० -२० रुपये आणि २०१६ ४० रुपये (बाकी वस्तूंचे भाव किमान ५-१० पटीने वाढले आहे). तसेच तेल,डाळी आणि इतर शेतमालाचे आहे. शेत माज्डूराची मजदूरी मात्र ५-७ पटीने वाढली आहे. आज तेल अर्थात पाम ओईल विदेशातून मातीच्या भावात येते त्या मुळे देश्यात खाद्य तेलाचे उत्पादन वाढत नाही आहे. शेतमालासाठी आपण विदेशांवर निर्भर होतो आहे आणि आपल्या देश्यात शेतकरी शेत रिकामे ठेवतो आहे. याचे भयंकर परिणाम निकट भविष्यात होणार आहे शहरी लोकांना याची झळ हि भोगावी लागणार आहे. पण काय करणार उच्च शिक्षित मूर्ख (IAS) देशावर राज्य करीत आहे. (हे माझे मत नाही खालच्या स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकांश अधिकाऱ्यांचे आहे).

चंपाबाई's picture

21 Jul 2016 - 11:16 am | चंपाबाई

काय कळेचना बै !

सबसिडी देऊन देशी शेती वाचवायची तरी विरोध ... तिकडे एका धाग्यावर आफ्रिकेतुन अन्न आयात करण्याचे कौतुक सुरु आहे.. इथे हेच मोदीप्रेमी लोक याचे भयंकर परिणाम होतील असेही म्हणताहेत.

....

सबसिडीचा मुख्य फायदा बड्या लोकाना होतो , म्हणुन ती कुचकामी आहे !

पी पी एफ चे व्याज कमी करताना सरकारने हेच कारण दिल्व होते. बड्या लोकाना व्याज जास्त मिळते. गरीबाना व्याज कमीच मिळते . मग दर कमी केला तर बिघडले कुठे ?

मृत्युन्जय's picture

20 Jul 2016 - 1:19 pm | मृत्युन्जय

मला एक सांगा की जी सबसिडी दिली जाते ती कुठुन आणी कशी दिली जाते. मग पुढची चर्चा करु

झेन's picture

20 Jul 2016 - 9:15 pm | झेन

बहुचर्चित जिएसटी आल्यावर सेवाकराचा दर वाढून अप्रत्यक्ष कराचा नवीन फटका मिळाल्यावर कळेलच सबसिडी कुठून दीली जाते.

बोका-ए-आझम's picture

20 Jul 2016 - 5:02 pm | बोका-ए-आझम

सबसिडी आणि वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होतो? >>> पण त्या सबसिडीचे पैसे सरकार अप्रत्यक्ष करांच्या against offset करतं आणि हे कर सगळ्यांना द्यावे लागतात, शेतकऱ्यांनाही. म्हणजे सरकार एका हाताने देतं आणि दुस-या हाताने घेतं.
शेतकऱ्यांना सबसिडी नको असं म्हणणं नाहीच आहे पण सबसिडीचा फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो कारण जेवढं शेताचं क्षेत्र जास्त तेवढी बियाण्यांची आणि खताची गरज जास्त आणि तेवढीच सबसिडी जास्त. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.
वीजमाफीचंही तसंच. एकीकडे दिलेली वीजमाफी सरकार औद्योगिक दर वाढवून वसूल करतं. त्याचाही फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत नाही.

संदीप डांगे's picture

20 Jul 2016 - 7:13 pm | संदीप डांगे

When it comes to electricity bills there is no such difference as smal or big farmer. Territory wise treatment aahe mseb kadun...

बोका-ए-आझम's picture

20 Jul 2016 - 9:40 pm | बोका-ए-आझम

पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल/उत्पन्न हे गुणोत्तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांपेक्षा अनुकूल असतं. अप्रत्यक्ष कर जसे गरिबांना जास्त जाचक असतात तशातलाच प्रकार.

माझीही शॅम्पेन's picture

20 Jul 2016 - 11:51 am | माझीही शॅम्पेन

भन्नाट कविता , सातत्याने शेतकर्याचा कळवला अस दाखवून नुसत्या टुकार कवितांचे रतीब घालणे आणि धमकी देऊन पत्ते गणांगाणा चांगलाच हाणलय की , कडक कविता __/\__

मुक्त विहारि's picture

20 Jul 2016 - 8:10 pm | मुक्त विहारि

मोदक भाऊ, एक कट्टा लवकरात लवकर करू या.

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2016 - 12:17 am | टवाळ कार्टा

पुण्यात??? =))

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jul 2016 - 7:27 am | अत्रुप्त आत्मा

पुण्यात आणी नवी मुंबैत नको. पांडू येत नै !

मुक्त विहारि's picture

21 Jul 2016 - 10:28 am | मुक्त विहारि

डोंबोलीत कट्टा केला तरी पण ते येत नाहीत.

इतर शहरांची गोष्टच सोडा.

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Jul 2016 - 9:29 pm | माम्लेदारचा पन्खा

देवबाप्पा पाप देतो !

पण

इतके धागे काढून पण ठाकूर-आळी वाले येतच नाहीत.

नवी मुंबईच्या कट्ट्याला बोईसर-दहिसर पासून मिपाकर येतात, पण बोरीवली वाले येत नाहीत.

असो,

हे देवा, असे कट्टे मिस करणार्‍यांना माफ कर, त्यांनी किती आनंदाचे क्षण हुकवले आहेत, ते त्यांना कळत नाही.

गंगाधर मुटे's picture

24 Jul 2016 - 9:12 pm | गंगाधर मुटे

a
a

बरेच लोकं हसलेत म्हणून मी बी हसलो.
किल्मिष बाजूला ठेऊन एक कविता म्हणून वाचून पाहिली. बरी वाटली.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

24 Jul 2016 - 9:27 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक होणार्या आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार्या लोकांना शेतकर्यांविशयी कीती उद्दाम भावना आहेत त्याचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे ही कविता
मुटेजी तुम्ही शेतकर्यांचे प्रश्न मांडत चला ,आम्ही शेतकरी आहित तुमच्या बाजूने.

मुक्त विहारि's picture

24 Jul 2016 - 9:32 pm | मुक्त विहारि

बादवे.

तुम्ही जवळ पास जायला अजून हेल्मेट वापरता की नाही?

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

24 Jul 2016 - 9:40 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

तात्यांनी मिपाची स्थापना केली तेव्हा व्याकरणाला फाट्यावर मारले हे विसरलात का इतक्यात,आणि तुम्ही हेल्मेट वापरताना !मग ठीक आहे.

शेतकरी फ्लॅटमधे/ब्लॉकमधे रहात नाही का?

सुबोध खरे's picture

17 Mar 2021 - 7:43 am | सुबोध खरे

झकास

आज परत वाचताना मजा आली