✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रे गझलाकारा, आवर तुझे दुकान...

म — मोदक, Tue, 07/19/2016 - 01:36
गेले काही दिवस सरसकटीकरणाचा तडका आणि अभंग वाचून आमच्या शहरी असंवेदनशील मेंदूच्या झुडुपाला एक कवितेची डहाळी उगवली. ती डहाळी त्याच्यासोबतच्या पालापाचोळ्यासकट येथे चिकटवत आहे... गोड मानून घ्यावी. *********************** तुमचे शेतकरी नेते, तुमच्याच तोंडास पुसती पाने | दोष सगळे मात्र, असंवेदनशील शहरी लोकांचे | शेतीतून मंत्र्यास होती, कोटींचा फायदा | तुला नाही वावडे, अशा दांभिकपणाचे | रे गझलाकारा, आवर तुझे दुकान | गेले ते दिवस, फुकट सहानुभुती मिळवण्याचे || खोटी माहिती, खोट्या समजुती | खोट्या आकडेवारीची पिकेही खोटी | कितीक सल्ले मिळाले, कान कितीकदा टोचले | एकसुरी अभंग गझला गातोस, अरण्यरूदनाचे | रे गझलाकारा, आवर तुझे दुकान | गेले ते दिवस, दुसर्‍याच्या कानांना बिडी लावण्याचे || मिपाकर शेतकरी, कितीकदा रोखठोक लिहिती | काय उपयोग तुझ्या, बंद झापडांचे | अनेक शंका अनेक सल्ले, नाकारूनी सगळे | एकच भजन गातोस, अन्याय-रडगाण्याचे | रे गझलाकारा, आवर तुझे दुकान | गेले ते दिवस, नक्राश्रू ढाळण्याचे || शब्द फिरवलेस कितीकदा, कितीकदा टाळलीस उत्तरे | सांग लुटारू कशी काय, सगळीच सरकारे | चर्चा कर थोडी, वाच मते इतरांची | मीच मसीहा शेतकर्‍यांचा, फुका अहंभाव कशासाठी? | रे गझलाकारा, आवर तुझे दुकान | गेले ते दिवस, हवेत तडका मारण्याचे || हिवरे बाजार , सुभाष पाळेकर आणि आनंद कर्वे | ध्येयवेढे शेतकरी मंगळवेढ्याचे | क्रांतीकारक प्रकल्पांची, घे मनापासून दखल | सोड काम आता काळे चित्र रंगवण्याचे | रे गझलाकारा उघड तुझे दुकान | कौतुक तरी कर अशा अनेक महामानवांचे || शिवार होतेय जलयुक्त, अडते चालले उंबर्‍याबाहेर | धडक विहीरी आणि वेळेवर सबसिडी | बदल घडत आहेत, ठेव यावर विश्वास | मिळेल शेतकर्‍याला, खरेखुरे 'अभय' | रे गझलाकारा उघड तुझे दुकान | खर्‍याखुर्‍या बदलांच्या कवितेचे ||

प्रतिक्रिया द्या
32505 वाचन

💬 प्रतिसाद (45)

छान!

चांदणे संदीप
Tue, 07/19/2016 - 02:11 नवीन
तुकारामांचे अभंग हे आता तलवारीसारखे फिरू लागलेत! होऊन जाऊदेत तलवारबाजीचा एक मुकाबला मिपासमक्ष! प्रतिवाराच्या प्रतीक्षेत! Sandy
  • Log in or register to post comments

लोल!

आदूबाळ
Tue, 07/19/2016 - 02:26 नवीन
लोल!
  • Log in or register to post comments

शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक

कविता१९७८
Tue, 07/19/2016 - 06:02 नवीन
शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक असेल, सतत अन्याय होतोय असे सान्गितले नाही तर शेतकरी गझलकाराना मसीहा मानणार कसे आणि यान्चे मन्त्री बनण्याचे स्वप्न साकार होणार कसे?
  • Log in or register to post comments

आजवर व्यापार्‍यांनी डहाळ्याचा

अन्या दातार
Tue, 07/19/2016 - 09:03 नवीन
आजवर व्यापार्‍यांनी डहाळ्याचा बाजार लावलेला माहिती होता, आज एका डहाळ्याने व्यापार्‍याचा बाजार उठवलाय =))
  • Log in or register to post comments

=)))

अजया
Tue, 07/19/2016 - 09:06 नवीन
=)))
  • Log in or register to post comments

मजल दरमजल आणि गझल

नाखु
Tue, 07/19/2016 - 09:12 नवीन
काही परिक्षणे या काव्याची... पुरते वस्त्रहरण : दैनिक टका भारत शेतकरी आडत्यांनाखोडता : दैनिक मिपा जागरण बोलवित्या धन्याची भांडाफोड : दैनिक मिपा सामना. अता याही आडत्यांचा बाजार उठू दे :दैनिक नाखु समाचार. बाकी काव्य फर्मास पण अजून काही जोडणी आणि तोडणी शिल्लक ठेवली हे जाणवते. पुलेशु+पुभाप्र नाखु
  • Log in or register to post comments

जबराट ! =)

मदनबाण
Tue, 07/19/2016 - 09:13 नवीन
जबराट ! =)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- में हुं शुरली, बच जरा...ठा ठा ठा... ;) :- Fiker Not
  • Log in or register to post comments

हाहाहा!

एस
Tue, 07/19/2016 - 09:34 नवीन
हाहाहा!
  • Log in or register to post comments

ह्हे जोरदार दणका! =))

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/19/2016 - 10:09 नवीन
ह्हे जोरदार दणका! =))
  • Log in or register to post comments

मजा आ गया

सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 10:24 नवीन
मजा आ गया
  • Log in or register to post comments

=)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/19/2016 - 10:37 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

तुम्ही म्हणे तडक्यात बचकभर

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 07/19/2016 - 11:46 नवीन
तुम्ही म्हणे तडक्यात बचकभर मिर्ची घातलीय हो! =))
  • Log in or register to post comments

Chaabuuk... =))

संदीप डांगे
Tue, 07/19/2016 - 11:53 नवीन
Chaabuuk... =))
  • Log in or register to post comments

ठसकेबाज तडका

आदिजोशी
Tue, 07/19/2016 - 12:03 नवीन
मस्त ठासली आहे. फुकट वांझोट्या चर्चा आणि जगाला नावे ठेवण्या शिवाय दुसरे उद्योग नसणारे फारच डोक्यात जातात. अपेक्षेप्रमाणे ह्याही तडक्यावर वन अँड ओन्ली मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.
  • Log in or register to post comments

आद्याच्या टोटल प्रतिसादाला

अभ्या..
Tue, 07/19/2016 - 12:10 नवीन
आद्याच्या टोटल प्रतिसादाला 100 टक्के सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

अगदी अगदी! १०हजार टक्के सहमत.

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/19/2016 - 12:13 नवीन
अगदी अगदी! १०हजार टक्के सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

सूड
Tue, 07/19/2016 - 14:46 नवीन
मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.
एखाद्या ओळीची गरळ ओकून जातात ते कधी कधी. शहरातली माणसं किती असंवेदनशील आहेत आणि नेहमी शेतकर्‍यावरच कसा अन्याय होतो याबद्दलची त्यांची कळकळ लोकांना कळणार कशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

आधी पत्ता द्या. मग बोला...

खटपट्या
Tue, 07/19/2016 - 22:55 नवीन
आधी पत्ता द्या. मग बोला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बदाम सात

कपिलमुनी
Wed, 07/20/2016 - 01:45 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

जिओ

झेन
Tue, 07/19/2016 - 22:28 नवीन
जिओ मोदकजी, लैच झाला होता धुरळा स्वय्मघोषित एकमेव कवी आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणणा-या गुर्जींचा.
  • Log in or register to post comments

कोण रडतं हेच कळेना !

चंपाबाई
Tue, 07/19/2016 - 23:35 नवीन
शेतकर्‍याला सबसिडी नको , वीज फुकट का देताय असे रडणारे शहरी लोक हुशार म्हणायचे की काय ? सबसिडी व वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होउन ते सर्वानाच फायद्याचे होते हे हुशार लोकांच्या बत्थड डोक्यात का शिरत नाही ?
  • Log in or register to post comments

डिटेलवार मंदी समजावून सांगा

सुबोध खरे
Wed, 07/20/2016 - 00:03 नवीन
डिटेलवार मंदी समजावून सांगा ना ताई अडानी लोकांना समजंल अशा भाषेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई

यात डिटेल काय हवे ?

चंपाबाई
Wed, 07/20/2016 - 02:42 नवीन
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल. ( हे शेकडो वेळा चर्चिले आहे... मग हे फक्त शेतीमालालाच का ? काम्प्युटर मोबैल वाल्या कंपन्यानाही सबसिडी द्या म्हणजे याही वस्तु स्वस्त होतील असे इथले लोक बोलल्याचे अंधुकसे आठवते. ) बाकी डिटेल्स तज्ञाकडुन घेणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

शेतीचा उत्पादन खर्च कमी

खटपट्या
Wed, 07/20/2016 - 02:46 नवीन
शेतीचा उत्पादन खर्च कमी झाल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकाला होइलच याची शाश्वती नाही. काहीही कीतीही माफ करा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई

शेतकर्‍याला बी खतात सबसिडी

बेकार तरुण
Wed, 07/20/2016 - 12:18 नवीन
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.>>> हा अर्थशास्त्रीय दृष्ट्या अतिषय महान प्रतिसाद आहे !!!! सब्सिडीची रक्कम बहुतेक आकाषातला देव सरकारला देत असावा. त्याचा टॅक्स देणार्‍या लोकांशी आणि एकुणच त्यांच्या खीषाला पडडार्‍या भुर्दंडाशी काहीच संबंध नसतो का?? माझ्या अल्पमतीप्रमाणे जगभर सब्सिडी देण यशस्वी ठरलेलं नाहीये, कारण स्वस्तात वस्तु मिळालीतर जबाबदारीने वापर करणे ही प्रवृत्ती बर्‍याचदा नसते. (कृपया खुलासा करावा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई

कुठल्या जगात वावरता चंपा बाई

विवेकपटाईत
Wed, 07/20/2016 - 19:56 नवीन
कुठल्या जगात वावरता चंपा बाई सबसिडी खत कंपन्यांच्या खिश्यात जाते. अधिकांश शेती पावसावर अवलंबून आहे. वीज सबसिडीचा फायदा होत नाही. आणखीन एक गेल्या ३० वर्षांत शेतमालाचा भाव किमान ५०% कमी झाला आहे. जास्तीही असू शकतो. उदा: कांदा १९९८ - फेब. ३ रुपये आणि सेप्ट ४०-६० , २०१६ फेब. ३-७ आणि सेप्ट. २०१५ ४०-८० रुपये. (गेल्या १८ वर्षांत बाकी वस्तूंचे भाव किती वाढले). साखर १९९० -२० रुपये आणि २०१६ ४० रुपये (बाकी वस्तूंचे भाव किमान ५-१० पटीने वाढले आहे). तसेच तेल,डाळी आणि इतर शेतमालाचे आहे. शेत माज्डूराची मजदूरी मात्र ५-७ पटीने वाढली आहे. आज तेल अर्थात पाम ओईल विदेशातून मातीच्या भावात येते त्या मुळे देश्यात खाद्य तेलाचे उत्पादन वाढत नाही आहे. शेतमालासाठी आपण विदेशांवर निर्भर होतो आहे आणि आपल्या देश्यात शेतकरी शेत रिकामे ठेवतो आहे. याचे भयंकर परिणाम निकट भविष्यात होणार आहे शहरी लोकांना याची झळ हि भोगावी लागणार आहे. पण काय करणार उच्च शिक्षित मूर्ख (IAS) देशावर राज्य करीत आहे. (हे माझे मत नाही खालच्या स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकांश अधिकाऱ्यांचे आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई

...

चंपाबाई
गुरुवार, 07/21/2016 - 11:16 नवीन
काय कळेचना बै ! सबसिडी देऊन देशी शेती वाचवायची तरी विरोध ... तिकडे एका धाग्यावर आफ्रिकेतुन अन्न आयात करण्याचे कौतुक सुरु आहे.. इथे हेच मोदीप्रेमी लोक याचे भयंकर परिणाम होतील असेही म्हणताहेत. .... सबसिडीचा मुख्य फायदा बड्या लोकाना होतो , म्हणुन ती कुचकामी आहे ! पी पी एफ चे व्याज कमी करताना सरकारने हेच कारण दिल्व होते. बड्या लोकाना व्याज जास्त मिळते. गरीबाना व्याज कमीच मिळते . मग दर कमी केला तर बिघडले कुठे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

मला एक सांगा की जी सबसिडी

मृत्युन्जय
Wed, 07/20/2016 - 13:19 नवीन
मला एक सांगा की जी सबसिडी दिली जाते ती कुठुन आणी कशी दिली जाते. मग पुढची चर्चा करु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई

जिएसटी

झेन
Wed, 07/20/2016 - 21:15 नवीन
बहुचर्चित जिएसटी आल्यावर सेवाकराचा दर वाढून अप्रत्यक्ष कराचा नवीन फटका मिळाल्यावर कळेलच सबसिडी कुठून दीली जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ल ई च हुशार हो तुम्ही!

बोका-ए-आझम
Wed, 07/20/2016 - 17:02 नवीन
सबसिडी आणि वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होतो? >>> पण त्या सबसिडीचे पैसे सरकार अप्रत्यक्ष करांच्या against offset करतं आणि हे कर सगळ्यांना द्यावे लागतात, शेतकऱ्यांनाही. म्हणजे सरकार एका हाताने देतं आणि दुस-या हाताने घेतं. शेतकऱ्यांना सबसिडी नको असं म्हणणं नाहीच आहे पण सबसिडीचा फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो कारण जेवढं शेताचं क्षेत्र जास्त तेवढी बियाण्यांची आणि खताची गरज जास्त आणि तेवढीच सबसिडी जास्त. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वीजमाफीचंही तसंच. एकीकडे दिलेली वीजमाफी सरकार औद्योगिक दर वाढवून वसूल करतं. त्याचाही फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई

When it comes to electricity

संदीप डांगे
Wed, 07/20/2016 - 19:13 नवीन
When it comes to electricity bills there is no such difference as smal or big farmer. Territory wise treatment aahe mseb kadun...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

ठीक आहे अण्णा

बोका-ए-आझम
Wed, 07/20/2016 - 21:40 नवीन
पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल/उत्पन्न हे गुणोत्तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांपेक्षा अनुकूल असतं. अप्रत्यक्ष कर जसे गरिबांना जास्त जाचक असतात तशातलाच प्रकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

भन्नाट कविता , सातत्याने

माझीही शॅम्पेन
Wed, 07/20/2016 - 11:51 नवीन
भन्नाट कविता , सातत्याने शेतकर्याचा कळवला अस दाखवून नुसत्या टुकार कवितांचे रतीब घालणे आणि धमकी देऊन पत्ते गणांगाणा चांगलाच हाणलय की , कडक कविता __/\__
  • Log in or register to post comments

भन्नाट....

मुक्त विहारि
Wed, 07/20/2016 - 20:10 नवीन
मोदक भाऊ, एक कट्टा लवकरात लवकर करू या.
  • Log in or register to post comments

पुण्यात??? =))

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/21/2016 - 00:17 नवीन
पुण्यात??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पुण्यात आणी नवी मुंबैत नको.

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/21/2016 - 07:27 नवीन
पुण्यात आणी नवी मुंबैत नको. पांडू येत नै !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पांडू येत नै !

मुक्त विहारि
गुरुवार, 07/21/2016 - 10:28 नवीन
डोंबोलीत कट्टा केला तरी पण ते येत नाहीत. इतर शहरांची गोष्टच सोडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

असा गपचूप कट्टा करु नये....

माम्लेदारचा पन्खा
Sun, 07/24/2016 - 21:29 नवीन
देवबाप्पा पाप देतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आम्ही गुपचूप कट्टा करायच्या विरोधातच आहोत....

मुक्त विहारि
Sun, 07/24/2016 - 21:36 नवीन
पण इतके धागे काढून पण ठाकूर-आळी वाले येतच नाहीत. नवी मुंबईच्या कट्ट्याला बोईसर-दहिसर पासून मिपाकर येतात, पण बोरीवली वाले येत नाहीत. असो, हे देवा, असे कट्टे मिस करणार्‍यांना माफ कर, त्यांनी किती आनंदाचे क्षण हुकवले आहेत, ते त्यांना कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

बरेच लोकं हसलेत म्हणून मी बी

गंगाधर मुटे
Sun, 07/24/2016 - 21:12 नवीन
Image removed. Image removed. बरेच लोकं हसलेत म्हणून मी बी हसलो. किल्मिष बाजूला ठेऊन एक कविता म्हणून वाचून पाहिली. बरी वाटली.
  • Log in or register to post comments

शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Sun, 07/24/2016 - 21:27 नवीन
शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक होणार्या आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार्या लोकांना शेतकर्यांविशयी कीती उद्दाम भावना आहेत त्याचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे ही कविता मुटेजी तुम्ही शेतकर्यांचे प्रश्न मांडत चला ,आम्ही शेतकरी आहित तुमच्या बाजूने.
  • Log in or register to post comments

आधी व्याकरण सुधारा...

मुक्त विहारि
Sun, 07/24/2016 - 21:32 नवीन
बादवे. तुम्ही जवळ पास जायला अजून हेल्मेट वापरता की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर

तात्यांनी मिपाची स्थापना केली

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Sun, 07/24/2016 - 21:40 नवीन
तात्यांनी मिपाची स्थापना केली तेव्हा व्याकरणाला फाट्यावर मारले हे विसरलात का इतक्यात,आणि तुम्ही हेल्मेट वापरताना !मग ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

शेतकरी फ्लॅटमधे/ब्लॉकमधे रहात

खटपट्या
Sun, 07/24/2016 - 21:54 नवीन
शेतकरी फ्लॅटमधे/ब्लॉकमधे रहात नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर

झकास आज परत वाचताना मजा आली

सुबोध खरे
Wed, 03/17/2021 - 07:43 नवीन
झकास आज परत वाचताना मजा आली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा